Friday 17 January 2014

फलटण येथे कत्तलखाना होऊ देणार नाही - वारकरी संप्रदाय युवा मंच


|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

उठा  वैष्णवांनो  हिंदुनो वारकरी बंधू भगिनीनो  राष्ट्रभक्तानो समाजसेवकानो शेतकऱ्यानो ...
छत्रपती  शिवाजी महाराजांच्या सौभाग्यवती महाराणी राजमाता सईबाई साहेब यांची जन्मभूमीला रक्त रंजित करण्याच्या उद्देशाने फलटण नगर पालिका , धर्मद्रोही - राष्ट्र द्रोही असे आपले राज्यकर्ते आणि प्रशासणातील धर्मद्रोही अधिकारी यांनी फलटण शहरामध्ये अत्याधुनिक कत्तलखाना निर्माण करण्याचे कटकारस्थान रचले आहे .
                                           ज्या भूमी मध्ये हिंदूंचा छत्रपती  राजश्री शिवराय यांच्या सौभाग्यवती महाराणी राजमाता सईबाई साहेब यांचा जन्म झाला . ज्या भूमीमध्ये श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आणि लाखो संत वारकरी दरवर्षी मुक्कामी असतात टी भूमी गोवंशाच्या रक्त व मांसाने अपवित्र करण्याचे सुनियोजित कारस्थान रचले आहे .आम्ही हजारो राष्ट्र व गो भक्तांना बरोबर घेऊन " परमपूज्य श्री श्रद्धेय उदयनाथजी महाराज यांच्या नेतृत्वा खाली दिनांक २० जानेवारी २०१४ रोजी दुपारी १२.०० वाजता फलटण नगरपालिकेवर धडक मोर्चा निघालो आहोत . आता फक्त अपेक्षा आहे गो मातेच्या रक्षणासाठी आपल्या सहभागाची ....जास्तीत जास्त लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा हि नम्र विनंती ...!
संपर्क :- श्री .गोरक्षनाथजी घाडगे -९९८७७८१०४३
 श्री .अक्षय भोसले :- ८४५१८२२७७२
बंधुनो मोठ्या प्रमाणात शेअर करा . जोक आणि इतर गोष्टी आपण लगेच इतरांना फोरवर्ड करतो किमान तुमचे काही मिनिट्स लागतील पोस्त इतरांपर्यंत पोहचवायला .आपण आपल्या राष्ट्राकरिता किमान इतक तरी सहकार्य तरी करू शकतोच हि नम्र अपेक्षा ,
तुमचा
वारकरी संप्रदाय युवा मंच / गोरक्षक बंधू  .

जीवाला विषयाचीच गोडी वाटते .....


|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
जीवाला विषयाचीच गोडी वाटते ..

हे पहा पाहुणे,या ठिकाणी जर आता विंचू निघाला,त्‍याला म्‍हटले नांगी सरळ कर तो करेल का । जाऊ द्या,आपल्‍या मुख्‍यमंत्रयाने जरी नांगी सरळ करायला सांगितली तरी तो करणार नाही. विंचू ज्‍याला चावला त्‍याला गुदगुदल्‍या होतात का. ज्‍याला चावला त्‍यालाच माहिती. आहा हा हा किती विषारी. विंचवाने भांडयाला जर डंक मारला तर बोळ पडते. एवढा विषारी आहे. तला कोणीही सांगितले नांगी सरळ कर तर तो करणार नाही. पण देवाने येथे एक एकाहून बळी निर्माण केले, तोच विंचू पाल पाहिली की लगेच नांगी सरळ करतो.कारण ती पाल त्‍याला अख्‍खा गटट करते. मग पालीलाही अभिमान झाला. एक पट विंचवाच विष पचायला दोन पट पाल. परंतु तीलाही अभिमान झाला,तर देवाने तिसरा प्राणी तयार केला कोंबडूबाई. ती कोंबूडबाई त्‍या पालीला आख्‍खी खाते. तीन पट पालीचं विष पचवायला सहा पट कोंबडीमध्‍ये विष आहे. ती कोंबडी दिवसभर उकरते परंतू पोट काय भरत नाही, हे लहान लहान मुले रस्‍त्‍याच्‍या कडेला बसतात. पहि त्‍याच्‍यावर ताव मारते आणि अशी विषारी असणारी कोंबडी पचवायला किती पट विष पाहिजे. आणि त्‍या कोंबडीलाही अभिमान झाला तर देवाने पहा ना ती कोंबडी कोण खातं. या देशातले सुशीक्षित विचारंत अशी विषारी कोंबडी खातात. सांगा पाव्‍हणे किती विषारी असतील व म्‍हणून तर या ठिकाणी मेळ बसत नाही.

सिध्‍दांत - काय खावं आणि काय खाऊ नये. काय प्‍यावं आणि काय पिऊ नये हे सुध्‍दा आम्‍हाला कळत नाही. इतके आम्‍ही विषयाधीन झालो. म्‍हणून तर देवाचा संबंध आम्‍हाला कळत नाही. मनुष्‍य म्‍हणून जन्‍माला येऊन सुध्‍दा आम्‍ही माणसासारखे वागत नाही.

प्रमाण - १) विषय ओढी भुलले जीव । कोण करीत त्‍यांची कीव । न उपजे नारायणी भाव । पावोनी ठाव नरदेह ॥ तुकाराम महाराज ॥
२) वेदे न करीता प्रेरणा । विषयावरी सहज वासना । स्‍वभावे सकळ जना । अनिवार्य ॥ भागवत॥

तुमचा 
अक्षय भोसले ,
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य

Wednesday 15 January 2014

वारकरी संप्रदाय युवा मंच तर्फे आपल सहर्ष स्वागत !


फलटण येथील कत्तलखाना बंद झालाच पाहिजे !

१०० चरणांचा अभंग तुकाराम महराजंचा अभंग ..!

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
राम कृष्ण हरि ! ..आपण सारेच कीर्तन आदि भक्तीमय वातावरणात नेहमीच वावरत असतो ..जेव्हा आपण कीर्तनास जातो कीर्तनाच्या प्रारंभीस कीर्तनकार एक अभंग म्हणतात अगदी लहान नमन पर .अर्थात
पांडुरंगा करू प्रथम नमन । दुसरे चरण संतांचिया॥१॥
यांच्या कृपादाने कथेचा विस्तारु । बाबाजी सद्गुरुदास तुका ॥२॥ ...वेळेअभावी पुढील ९८ चरण म्हणन संगन जमत नाही मुळात कीर्तनाची वेळ हि आता २ तास असते दुर्दैवाने ..असो ..तर आज आम्ही प्रयत्न करतोय पुढील ९८ अधिक सुरवातीची २ अशी म्ह्जेच १०० चरणांचा अभंग तुकाराम महराजंचा आहे ..आपल्या पुढे मांडत आहोत ...
पांडुरंगा करू प्रथम नमन । दुसरे चरण संतांचिया॥१॥
यांच्या कृपादाने कथेचा विस्तारु । बाबाजी सद्गुरुदास तुका ॥२॥
काय माझी वाणी मानेल संतांसी । रंजवू चित्तासी आपुलिया ॥३॥
या मनासी लागो हरिनामाचा छंद । आवडी गोविंद गावयासी ॥४॥
सीण जाला मज संवसार संभ्रमे । सीतळ या नामे जाली काया॥५॥
या सुखा उपमा नाही द्यावयासी । आले आकारासी निर्विकार ॥६॥
नित्य धावे तेथे नामाचा गजर । घोष जयजयकार आइकता ॥७॥
तातडी ते काय हरिगुण गाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥८॥
मूळ नरकाचे राज्य मदे माते । अंतरे बहुत देव दुरी ॥९॥
दुरी अंतरला नामनिंदकासी । जैसे गोचिडासी क्षीर राहे ॥१०॥
हे वाट गोमटी वैकुंठासी जाता । रामकृष्णकथा दिंडी ध्वजा ॥११॥
जाणते तयांनी सांगितले करा । अंतरासी वारा आडूनिया ॥१२॥
यासी आहे ठावे परि अंध होती । विषयाची खंती वाटे जना ॥१३॥
नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया । भस्म दंड छाया तरुवराची ॥१४॥
चित्त ज्याचे पुत्र पत्‍नी बंधूवरी । सुटल हा परि कैसे जाणा ॥१५॥
जाणते नेणते करा हरिकथा । तराल सर्वथा भाक माझी ॥१६॥
माझी मज असे घडली प्रचित । नसेल पतित ऐसा कोणी ॥१७॥
कोणी तरी काही केले आचरण । मज या कीर्तनेविण नाही ॥१८॥
नाही भय भक्ता तराया पोटाचे । देवासी तयाचे करणे लागे ॥१९॥
लागे पाठोवाटी पाहे पायां कडे । पीतांबर खडे वाट झाडी ॥२०॥
डिंकोनिया का रे राहिले हे लोक । हे चि कवतुक वाटे मज ॥२१॥
जयाने तारिले पाषाण सागरी । तो ध्या रे अंतरी स्वामी माझा॥२२॥
माझिया जीवाची केली सोडवण । ऐसा नारायण कृपाळु हा ॥२३॥
हा चि माझा नेम हा चि माझा धर्म । नित्य वाचे नाम विठोबाचे ॥२४॥
चेतवला अग्नि तापत्रयज्वाळ । तो करी शितळ रामनाम ॥२५॥
मना धीर करी दृढ चित्ता धरी । तारील श्रीहरि मायबाप ॥२६॥
बाप हा कृपाळु भक्ता भाविकांसी । घरी होय दासी कामारी त्या ॥२७॥
त्याचा भार माथा चालवी आपुला। जिही त्या दिधला सर्व भाव ॥२८॥
भावेविण जाणा नाही त्याची प्राप्ति । पुराणे बोलती ऐसी मात ॥२९॥
मात त्याची जया आवडे जीवासी। तया गर्भवासी नाही येणे ॥३०॥
यावे गर्भवासी तरी च विष्णुदासी । उध्दार लोकासी पूज्य होती ॥३१॥
होती आवडत जीवाचे ताइत। त्या घडी अच्युत न विसंभे ॥३२॥
भेदाभेद नाही चिंता दुःख काही । वैकुंठ त्या ठायी सदा वसे ॥३३॥
वसे तेथे देव सदा सर्वकाळ । करिती निर्मळ नामघोष ॥३४॥
संपदा तयांची न सरे कल्पांती। मेळविला भक्ती देवलाभ ॥३५॥
लाभ तया जाला संसारा येऊनी । भगवंत ॠणी भक्ती केला ॥३६॥
लागलेसे पिसे काय मूढजनां । काय नारायणा विसरली ॥३७॥
विसरली तया थोर जाली हाणी । पचविल्या खाणी चौऱ्यासी ॥३८॥
शिकविले तरी नाही कोणा लाज । लागलीसे भाज धन गोड ॥३९॥
गोड एक आहे अविट गोविंद । आणीक तो छंद नासिवंत ॥४०॥
तळमळ त्याची काही तरी करा । का रे निदसुरा बुडावया ॥४१॥
या जनासी भय यमाचे नाही । सांडियेली तिही एकराज्ये ॥४२॥
जेणे अग्निमाजी घातलासे पाव । नेणता तो राव जनक होता ॥४३॥
तान भूक जिही साहिले आघात । तया पाय हात काय नाही ॥४४॥
नाही ऐसा तिही केला संवसार । दुःखाचे डोंगर तोडावया ॥४५॥
याच जन्मे घडे देवाचे भजन । आणीक हे ज्ञान नाही कोठे ॥४६॥
कोठे पुढे नाही घ्यावया विसावा । फिरोनि या गावा आल्याविण॥४७॥
विनविता दिवस बहुत लागती । म्हणउनि चित्ती देव धरा ॥४८॥
धरा पाय तुम्ही संतांचे जीवासी । वियोग तयासी देवा नाही ॥४९॥
नाही चाड देवा आणीक सुखाची । आवडी नामाची त्याच्या तया॥५०॥
त्याचीच उच्छिष्ट बोलतो उत्तरे । सांगितले खरे व्यासादिकी ॥५१॥
व्यासे सांगितले भक्ति हे चि सार । भवसिंधु पार तरावया ॥५२॥
तरावया जना केले भागवत । गोवळ गोपी भक्त माता पिता ॥५३॥
तारुनिया खरे नेली एक्यासरे । निमित्ते उत्तरे ऋषीचिया ॥५४॥
यासी वर्म ठावे भक्ता तरावया । जननी बाळ माया राखे तान्हे ॥५५॥
तान्हेले भुकेले म्हणे वेळोवेळा । न मगता लळा जाणोनिया ॥५६॥
जाणोनिया वर्म देठ लावियेला । द्रौपदीच्या बोलासवे धावे ॥५७॥
धावे सर्वथा धेनु जैसी वत्सा । भक्तालागी तैसा नारायण ॥५८॥
नारायण व्होवा हाव ज्याच्या जीवा । धन्य त्याच्या दैवा पार नाही ॥५९॥
पार नाही सुखा ते दिले तयासी । अखंड वाचेसी रामनाम ॥६०॥
रामनाम दोनी उत्तम अक्षरे । भवानी शंकरे उपदेशिली ॥६१॥
उपदेश करी विश्वनाथ कानी । वाराणसी प्राणी मध्ये मरे ॥६२॥
मरणाचे अंती राम म्हणे जरी । न लगे यमपुरी जावे तया ॥६३॥
तयासी उत्तम ठाव वैकुंठी । वसे नाम चित्ती सर्वकाळ ॥६४॥
सर्वकाळ वसे वैष्णवांच्या घरी । नसे क्षणभरी स्थिर कोठे ॥६५॥
कोठे नका पाहो करा हरिकथा । तेथे अवचिता सापडेल ॥६६॥
सापडे हा देव भाविकांचे हाती। शाहाणे मरती तरी नाही ॥६७॥
नाही भले भक्ती केलियावाचूनि। अहंता पापिणी नागवण ॥६८॥
नागवलो म्हणे देव मी आपणा । लाभ दिला जना ठकला तो ॥६९॥
तो चि देव येर नव्हे ऐसे काही । जनार्दन ठायी चहू खाणी ॥७०॥
खाणी भरूनिया राहिलासे आत । बोलावया मात ठाव नाही ॥७१॥
ठाव नाही रिता कोणी देवाविण । ऐसी ते सज्जन संतवाणी ॥७२॥
वाणी बोलूनिया गेली एक पुढे । तयासी वाकुडे जाता ठके ॥७३॥
ठका नाही अर्थ ठाउका वेदांचा । होऊनि भेदाचा दास ठेला ॥७४॥
दास ठेला पोट अर्थ दंभासाटी । म्हणउनि तुटी देवासवे ॥७५॥
सवे देव द्विजा तीही दुराविला । आणिकांचा आला कोण पाड ॥७६॥
पाड करूनिया नागविली फार । पंडित वेव्हार खळवादी ॥७७॥
वादका निंदका देवाचे दरुशन । नव्हे जाला पूर्ण षडकर्मी ॥७८॥
षडकर्मी हीन रामनाम कंठी । तयासवे भेटी सवे देवा ॥७९॥
देवासी आवडे भाविक जो भोळा । शुध्द त्या चांडाळा करुनि मानी ॥८०॥
मानियेला नाही विश्वास या बोला । नाम घेता मला युक्ति थोडी ॥८१॥
युक्त थोडी मज दुर्बळाची वाचा । प्रताप नामाचा बोलावया ॥८२॥
बोलता पांगल्या श्रुति नेति नेति । खुंटलिया युक्ति पुढे त्याच्या ॥८३॥
पुढे पार त्याचा न कळे चि जाता । पाउले देखता ब्रम्हादिका ॥८४॥
काय भक्तीपिसे लागले देवासी । इच्छा ज्याची जैसी तैसा होय ॥८५॥
होय हा सगुण निर्गुण आवडी । भक्तिप्रिय गोडी फेडावया ॥८६॥
या बापासी बाळ बोले लाडे कोडे । करुनि वाकुडे मुख तैसे ॥८७॥
तैसे याचकाचे समाधान दाता । होय हा राखता सत्त्वकाळी ॥८८॥
सत्त्वकाळी कामा न येती आयुधे । बळ हा संबंध सैन्यलोक॥८९॥
सैन्यलोक तया दाखवी प्रताप । लोटला हा कोप कोपावरी ॥९०॥
कोपा मरण नाही शांत होय त्यासी । प्रमाण भल्यासी सत्त्वगुणी ॥९१॥
सत्त्व रज तम आपण नासती । करिता हे भक्ति विठोबाची ॥९२॥
चित्त रंगलिया चैतन्य चि होय । तेथे उणे काय निजसुखा ॥९३॥
सुखाचा सागरु आहे विटेवरी । कृपादान करी तो चि एक ॥९४॥
एक चित्त धरू विठोबाचे पायी । तेथे उणे काही एक आम्हा ॥९५॥
आम्हासी विश्वास याचिया नामाचा । म्हणउनि वाचा घोष करू ॥९६॥
करू हरिकथा सुखाची समाधि । आणिकाची बुध्दी दुष्ट नासे ॥९७॥
नासे संवसार लोक मोहो माया । शरण जा रे तया विठोबासी ॥९८॥
सिकविले मज मूढा संतजनी । दृढ या वचनी राहिलोसे ॥९९॥
राहिलोसे दृढ विठोबाचे पायी । तुका म्हणे काही न लगे आता ॥१००॥
अशा व्यक्त करतो नक्कीच च आपणास आवडेल आमची हि पोस्ट  आवडल्यास नक्कीच जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत पोहचवा ..
तुमचा ,
अक्षय भोसले
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य .

चिरंजीवपद - संत एकनाथ

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
माणवास भगवद्भक्तीचा अधिकार आहे. भक्तीमार्गातील शेवटची भक्ती आत्मनिवेदन अनुभवल्याशिवाय मनुष्य जन्माचेसार्थक नाही हे सकल संतानी विविध पध्‍दतीने पटवून दिले आहे. अन्यथा जीवाला जन्ममरणाच्या फे-यात सुटता येणार नाही.याच जन्मी ओळखी करा आत्माराम । संसार संभ्रम भोगू नका॥भक्तीमार्गातील आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू व ज्ञानी भक्तांना भक्तीमार्गात येणारे अडथळे, धोके कशात? व अनुभव कसे असतात? हे जाणून सावधपणे भक्ती जगण्यासाठी संत एकनाथ महाराजांनी चिरंजीवपद द्वारे बहुमोल मार्गदर्शन केले आहे. तुका म्‍हणे सांडा घाटे । तेणे नका भरु पोटे॥संत एकनाथमहाराजांचा चिरंजीव पद रुपाने सकल भक्‍तीमार्गस्‍थांसाठी मोलाचा संदेश आहे. यावर आत्मियतेने विश्वास व शब्‍द एक एक मंत्र असुन त्यानुसारच्या अनुकरणाने साधक संतअनुभूतीचे चिरंजीव पदास पात्र होतो. चिरंजीव पदाचा अर्थ तर इतका सरळ आणि सोपा हे कि वाचता क्षणी आपणास कळून जाईल आणि नक्कीच भक्ती मार्गात येणारे अडथळे दूर होतील 
चिरंजीवपद
चिरंजीव पद पावावयासी । अधिकार कैसा साधकासी । किंचित बोलेन निश्चयेंसी । कळावयासी साधका॥१॥आधीं पाहिजे अनुताप । तयासें कैसें स्वरुप ।नित्य मृत्यु जाणे समीप । न मनीं अल्प देह सुख॥२॥म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला । तो म्यां विषय भोगी लाविला । थिता परमार्थ हातीचा गेला । करीं वहिला विचार॥३॥ऐसा अनुताप वाहती चित्तां । वेराग्यं ये त्याचिये हातां । वैराग्या्ची कथा । किंचित आतां पै बोले॥४॥तें वैराग्या बहुतांपरी । आहे गा तूं अवधारीं । सात्विक राजस तामस त्रिप्रकारी । योगेश्वरी बोलिजे ।५॥राजस तामस त्याग । तेणें न कळे परमार्थ मार्ग । करावा सात्विक त्याग । सुख अव्यंग मग लाहे॥६॥प्रथम राजस तामस दोन्ही । अल्प बोलो उकलोनी । जें सात्विका लागोनी । अंतरींहुनी त्यागावा॥७॥नेणें वेधविध विचार । नाहीं सत्संग सधर । कर्मभ्रष्ट साचार । तो अपवित्र तामस॥८॥त्याग केला पूज्यतेकारणें । सत्संग सोडूनि पूज्यता भोगणें । शिष्या ममता धरुन राहणें । तो जाणणें राजस॥९॥ऐसें वैराग्य राजस तामस । तो त्याग न माने संतास । तेने भेटे कृष्ण परेश । अनर्थासी मूळ हें॥१०॥आतां वैराग्य शुध्द सात्विक । जे जगद्वंद्य मानी यदुनायक । तें तूं सविस्तर ऐक । मनीं निष्टंक बैसावया॥११॥भोगेच्छा विषयिक । ते तो सांडी सकळिक । प्रारब्धें प्राप्ता होतां देख । तेथुनि निष्टंक मन काढी॥१२॥विषय पांच आहाती । ते अवश्य साधका नाडिती । म्हणोनी लागों न द्यावी प्रीती । कोणे रीती तें ऐक॥१३॥जेणें धरिला शुध्द परमार्थ । त्यासी जनमान हा अनर्थ । तेणे वाढे विषय स्वा्र्थ । ऐका नेमस्त विचार॥१४॥वैराग्य पुरुष देखुनी । त्याची स्तुती करती जनीं । एक सन्मानें करुनी । पूजेलागूनि पैं नेती॥१५॥तंव त्या्चे वैराग्य‍ कोमळ कंटक । नेट न धरी निष्टंक । देखोनि मान स्तुती अलौकिक । भुलला देख पैं तेथें॥१६॥जनस्तुती लागे मधुर । म्हणती हा उध्दरावया हरीचा अवतार । आम्हांलागी जाहला स्थीर । धरी अपार शब्देगोडी॥१७॥हा पांच विषयांमाजीं प्रथम । शब्द विषय उपक्रम । मग स्पर्श विषय संभ्रम । झोंबे परम त्या् कैसा॥१८॥नाना मृदु आसनें घालिती । विचित्र पर्यंक निद्रेप्रती । नरनारी आंग शुश्रुषा करिती । तेणें धरी प्रीती स्पर्शाची॥१९॥रुप कैसा गोंवी । वस्त्रें भूषणें देती बरवी । तेणें सौंदर्य करी जीवीं । देहभावे श्लाघ्यता॥२०॥रुप विषय ऐसा जडला । मग रस विषय कैसा झोंबला । जैसें आवडे तें त्याला । गोड गोड अर्पिती॥२१॥ते रस गोडी करितां । घडी न विसंबें धरी ममता । मग गंध विषय ओढीता । होय तत्वतां त्याग कैसा॥२२॥आवडे सुमन चंदन । बुका केंशर विलेपन । ऐसें पांचही विषय संपूर्ण । जडले जाण सन्मानें॥२३॥मग जे जे जन वंदिती । तेवी त्या ची निंदा करिती । परी अनुताप नुपजे चित्तीं । ममता निश्चिती पूजकाची॥२४॥म्हणाल जो विवेकी आहे । त्यासी जनमान करील काय । हें बोलणें मुर्खाचे पाहे । तया चाड आहे मानाची॥२५॥ज्ञात्यासी प्रारब्ध गती । मान झाला तरी नेघो म्हणती । तेथेंचि गुंतोनी न राहती । उदास होती तात्काळ॥२६॥यापरी साधकाच्या चित्ता । मान न सोडी सर्वथा । जरी कृपा उपजेल भगवंता । परी होय मागुता विरक्ता॥२७॥तो विरक्त कैसा म्हणाल । जो मानलें सांडी स्थळ । सत्संगीं राहे निश्चळ । न करी तळमळ मानाची॥२८॥ऐसा परमार्थ साधकासी । जन मान्यता विघ्न त्यासी । तेणें लुब्धा विषयासी । या चिन्हासी बोलिजे ।२९॥न सांडी स्वतंत्र फड । अंगी अहंता येईल वाड । धरुनी जीवीकेची चाड । न बोले गोड मनधरणी॥३०॥नावडे लौकिक परवडी । नावडे लेणीं लुगडी । नावडें परान्न गोडी । द्रव्या जोडी नावडे॥३१॥नावडे प्रपंच जनीं बैसणे । नावडे कोणाचे बोलणे । नावडे योग्यता मिरविणें । बरवें खाणे नावडे॥३२॥नावडे स्रियांत बोलणें । नावडे स्रियांते पाहणें । नावडे स्रियांचे रगडणें । त्यांचा स्पर्श नावडे॥३३॥नको नको स्रियांचा सांगात । नको नको स्रियांचा एकांत । नको नको स्रियांचा परमार्थ । करतीं आघात पुरुषासी॥३४॥म्हणती गृहस्थ साधकें । स्रिया सांडुनी जावेकें। येच अर्थी उत्तर निकें । ऐक आतां सांगेन॥३५॥तरी स्वस्त्री वांचुनी । नाताळावी अन्य कामिनी । कोणे स्रियेसी संनिधवाणी । आश्रय झणी न द्यावा॥३६॥स्वस्त्रीसही कार्यापुरते । पाचारावें स्पर्शावे निरुतें । परी आसक्त होऊ नये तेथें । अती सर्वथा न गुंतावे॥३७॥जरी स्रिया सेवा करिती । भक्ती ममता उपजविती । तरी त्यांच्या संगती । शुध्द परमार्थी न बैसे॥३८॥अखंड एकांती बैसणें । प्रमदा संगे न राहणें । जो निसंगी निराभिमानें । त्या पैं बैसणें सर्वदा॥३९॥कुटुंब आहाराकारणें । अकल्पित न मिळे तरी कोरान्न करणे । ऐसें स्थिती जें वर्तणें । तें जाणणें शुध्द वैराग्या॥४०॥ऐसी स्तिती नाही ज्यासी । कृष्ण प्राप्ती कैंची त्यासी । म्हणुनी कृष्णभक्तासी । ऐसी स्तिती असावी ।४१॥या स्तितीवेगळा जाण । कृष्णीं मिळूं पाहे अज्ञान । सकळ मूर्खाचे तो अधिष्ठान । लटकें तरी आण देवाची॥४२॥हे बोलणे माझिये मतीचें । नव्हेचि गा साचें । कृष्णें सांगितलें उध्दवा हिताचें । ते मी साचें बोलिलों॥४३॥साच न मानी ज्याचें मन । तो विकल्पे न पवे कृष्णचरण । माझे काय जाईल जाण । मी बोलेन उतराई ॥४४॥साधावया वैराग्य जाण । मनुष्यदेही करावा प्रयत्न । सांगे एका जनार्दन । आणिक प्रयत्न असे ना ॥४५॥
सर्वाना नम्रतेची विनंती आहे कि हे अमुल्य असा संत साहित्याचा साठा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 
आपले नम्र ,
वारकरी संप्रदाय युवा मंच . महाराष्ट्र राज्य 

संत विचाराचा प्रसार करण्यास विरोध करणाऱ्या रामेश्वर शास्त्रींचा निषेध !

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र राज्य 
संत विचाराचा प्रसार करण्यास विरोध करणाऱ्या रामेश्वर शास्त्रींचा निषेध ! 
.
वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचा प्रचार आणि प्रसार करण्यास विरोध करणाऱ्या स्वयंघोषित धर्माचार्य रामेश्वर शास्त्रींचा वारकरी युवा मंचच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. वारकरी युवा मंचला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या सन्मानामुळे पोटशूळ उठलेल्या रामेश्वर शास्त्री यांनी नुकतीच एका व्यासपीठावर बेताल बडबड करून आपल्या नीच वृत्तीचे दर्शन घडविले.
त्याबद्दल वारकरी संप्रयातील विविध संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


वारकरी संतांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा वारकरी युवा मंचच्या वतीने प्रचार आणि प्रसार केला जातो.

ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, चोखोबा, गोरोबा यांनी सातशे वर्षापूर्वी, एकनाथ महाराजांनी साडेसहाशे वर्षापूर्वी तर तुकाराम महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी जे सामाजिक समतेचे आणि डोळस भक्तीचे विचार जगाला दिले त्याची उपयुक्तता आजही कशी आहे, हे वारकरी युवा मंचने सोशल नेटवर्कीगच्या माध्यमातून जगास दाखवून दिले.

युवा मंचने केलेल्या या कामगिरीची दखल मुंबई विद्यापीठाने घेतली आणि १४ जानेवारी रोजी होत असलेल्या ‘ऑक्टेव्ह फेस्टीवल’मध्ये सादरीकरणासाठी निमंत्रीत केले.
वारकरी युवा मंचला मिळालेल्या सन्मानाचा प्रत्येक वारकऱ्याला अभिमान वाटत आहे. मात्र इतरांना मिळालेल्या सन्मानाने रामेश्वर शास्त्रीला नेहमीच पोटशूळ उठतो. तसाच तो पुन्हा पोटशूळ उठला.

वारकरी संप्रदायात इतरांचे कौतूक झाले,
इतराने काही चांगले केले की या शास्त्रीने नेहमी खोडा घातलेला आहे.
नुकताच वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीने पांडुरंगाचा पालखी सोहळा मुंबईत निघाला. तेव्हा वारकरी प्रबोधन समितीच्या सर्व विश्वस्तांनी वारकरी युवा मंचला मिळालेल्या सन्मानाचे तोंडभरून कौतूक केले.
वारकरी प्रबोधन समितीचे विश्वस्त शामसुंदर महाराज सोन्नर यांनी तर जाहीररीत्या या सन्मानेचे कौतूक करून युवा मंचच्या उपक्रमात वारकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
मात्र यावेळी व्यासपीठावर असलेल्या रामेश्वर शास्त्री यांचा तोल गेला आणि त्यांनी असंबंध बडबड केली. आंतरराष्ट्रीय मिळालेल्या सन्मानात काही विशेष नाही,
अशा सन्मानाची गरज नाही.
अशाप्रकारच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यास संप्रदायाची किंमत कमी होईल असे अकलेचे तारे त्यांनी तोडले..
विद्यापीठात शिक्षण घेऊन कोणी मोठा होत नाही,
अशी बेताल बडबड केली.
खंत इतकीच वाटे कि "एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंथ " हे कृपया कोणी त्यांना सांगाव .
अशा अक्कलशून्य व बेताल बडबड्या, शास्त्री?? व्यक्तिचा
वारकरी युवा मंचच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे..
(यातील एक हि शब्द कोणाच्या मनाचा नाही त्यांच्या भाषणाचा विडओ हि युवा मंच कडे उपलब्ध आहे )
वरील गोष्टी विषयी कुणास आक्षेप असेल तर त्वरित संपर्क करा :- वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्र राज्य - ९८९२१६६४७०/८४५१८२२७७२

प.पू. महंत महामंडलेश्वर आबानंदगिरी महाराज यांच्यासमवेत वारकरी संप्रदाय युवा मंचचे अक्षय भोसले .

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
परम पूजनीय महंत महामंडलेश्वर वंदनीय आबानंदगिरी महाराज यांचे आज मार्गदर्शन तथा शुभआशीर्वाद वंदनीय ह.भ.प .सुभाष महाराज घाडगे (भाऊ ) यांच्यामुळे सहकार्यामुळे परिचयाने लाभले . पूजनीय महाराजांचे आशीर्वाद प्राप्त आम्हास झाले हे आमचे सदभाग्य . परमशांती वृद्धाश्रम , ( तळोजा )पनवेल याची स्थापना महाराजांनी केली सद्य स्थितीला तेथे ५० ते ६० वायो वृद्ध असे व्यक्ती मागील जीवनातील दुख विसरून आनंदने नवीन जीवन जगत आहे . वृद्धश्रमातील व्यक्तींशी चर्चा केली असता , त्यांच्या चेहऱ्यावरील सुख आनंद शब्दात सांगण कठीणच आहे अस म्हणाव लागेल . नियमित हरिपाठ भजन हे सर्व मिळून करतात .युवा पिढीला मोठ्या प्रमाणात महाराज प्रबोधन करत आहेत . विशेष म्हणजे परम पूजनीय गगनगिरी महाराजंच्या पटशिष्य वर्गापैकी आबानंदगिरी महाराज हे एक होय . पूजनीय महाराजांनी || सिद्ध संजीवनी || नामक ग्रंथ भेट दिला . युवा मंच च्या कार्यास खूप शुभेच्छा महाराजांनी दिल्यात  आपण सर्वच युवक वर्ग त्यांच्या चरणी कृतज्ञता तथा नतमस्तक होऊन पुढील कार्यास वेगाने सुरवात करूयात हि माउली चरणी प्रार्थना 
 तुमचा ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ / ९८९२७४७८९३ 

महंत . उद्धव महाराज मंडलिक यांच्याशी चर्चा करताना अक्षय भोसले .

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
रायगड , ठाणे जिल्हा वारकरी महामंडळ आयोजित 
१५० वी स्वामी विवेकानंद जयंती मोह्त्सव संपती 
राज्यस्तरीय भव्य दिव्य 
अखंड हरीनाम साप्ताह ( कीर्तन मोह्त्सव )
१०/०१/२०१४ कीर्तन :- महंत . उद्धव महाराज मंडलिक (नेवासे ) याचं
कोणा पुण्यें यांचा होईन सेवक । जींहीं द्वंदादिक दुराविलें ॥१॥
ऐसें वर्म मज दावीं नारायणा । अंतरीं च खुणा प्रकटोनि ॥ध्रु.॥
बहु अवघड असे संतभेटी । तरि जगजेठी करुणा केली ॥२॥
तुका म्हणे मग नयें वृत्तीवरी । सुखाचे शेजारीं पहुडईन ॥३॥
जगतगुरू तुकाराम महाराजांच्या अभंगावर अत्यंत हृद्यस्पर्शी आणि मार्मिक अस चिंतन आदरणीय महाराजांनी मांडल .
कीर्तनानंतर आदरणीय ह.भ.प .महंत . उद्धव महाराज मंडलिक (नेवासे ) यांच्याशी चर्चा झाली युवा मंच च्या कार्याविषयी युवा मंचने उपस्थित केलेल्या प्रश्नाविषयी चर्चा करण्यात आली . फेसबुकचा वापर संप्रदाय अशा प्रकारे प्रचार संत विचार सर्वांपर्यंत पोहचविन्याकरिता करिता करू शकतो याच त्यांनी कौतुक केल व आपले आशीर्वाद पाठिंबा सदैव तुमच्या सोबत आहेत अस वक्तव्य केल . त्यांच्या सोबतच वंदनीय .ह.भ.प .सुभाष महाराज घाडगे , आदरणीय प्रसिद्ध पखवाजवादक विठ्ठ्ल्जी (आबा ) गव्हाणे हे हि उपस्थित होते .
तुमचा
अक्षय भोसले ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य .

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य - By Akshay Bhosale .


विमानाचा शोध संकल्पना - श्री संत ज्ञानेश्वरांची

विमानाचा शोध संकल्पना - श्री संत ज्ञानेश्वरांची

Tuesday 14 January 2014

कॅमेराची संकल्पना आणि शोध - संत ज्ञानेश्वरांचा

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी आपल्या श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथात ७०० वर्षापूर्वी फार मोठ्या प्रमाणात विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि बरेच शोध हि सांगितलेत .
SEARCH मुळातच होते आणि आता झालेत ते RESEARCH आहेत 
कॅमेरा विषयी माउली सांगतात :- जेथ हें संसारचित्र उमटे । तो मनोरुपु पटु फाटे । जैसें सरोवर आटे । मग प्रतिमा नाहीं ॥ अध्याय - ५-कर्मसंन्यासयोग श्लोक २८ - ओवी क्रमांक १५६ .
असे अजून बरेच शोध ज्ञानेशाव्रीतील आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत . जास्तीत जास्त लोकापर्यंत माउलीनच हे ज्ञान वैभव पोहचवण्याची जबाबदारी आता तुमची ,
तुमचा ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य .
 

Monday 13 January 2014

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
आज मकर संक्रांत सर्व गुरुवर्य ज्येष्ठ वंदनीय तथा माझ्या सर्व बंधू भगिनी मित्रपरिवारास खूप खूप शुभेच्छा !
प्रत्येक जण आज म्हणत असतो " तिळगुळ घ्या गोड गोड बोला " तिळगुळा पेक्षा हि काही गोड आम्ही तर अस म्हणू कि माझ्या संतांच्या भाषेत अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ...आणि तुम्ही हि त्याच देवाच नामस्मरण करा .
मकर संक्रांतच नव्हे तर आपल पुढील आयुष्य फार आनंदाच आणि सुख समृद्धीच जाईल हे खात्री पूर्वक सांगतो ...
सदा माझे डोळा जडो तुझी मुर्ती । रखुमाईच्या पती सोयरी या ।
गोड तुझे रूप गोड तुझे नाम । देई मज प्रेम सर्व काळ ॥
विठु माऊलीये हाची वर देई । संचारोनी राही हृदया माझी ।
तुका म्हणे काही न मागे आणिक । तुझे पायी सुख सर्व आहे ॥
त्याच भगवंताच नाम घ्या ..
पुनश्च एकदा सर्वाना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमचा ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ .
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य .