|| श्रीगुरू ||
मीराबाई, गोपिका आणि भरत हे भगवद्भक्तच असले तरी भरताची भक्ती अनुकरणीय होती. ती इतर कोणाच्याही भक्तीपेक्षा श्रेष्ठ असून, राम स्वरुपाला प्राप्त करायचे असेल तर भरत चरित्र समजून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ह. भ. प. अँड. जयवंत बोधले महाराजांनी केले.भगवंत देवस्थान व बोधराज भक्त मंडळाच्या संयुक्त विद्यमाने भगवंत मंदिरात सुरू असलेल्या श्रावणमास प्रवचनमालेत ते बोलत होते. भरत या नावाच्या व्युत्पत्तीबाबत बोलताना बोधले महाराज म्हणाले, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असो की नवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई असो की तुकाराम, चोखोबा, निळोबा असो येथे फक्त नावात भिन्नता आहे. तत्त्वात नाही. सर्वांचे तत्त्व एकच. कालावधीत, कामामध्ये भिन्नता, अधिकारात नाही. सार्मथ्य एकच. काही नावे अवतारद्योतक, काही नावे कर्मसूचक तर काही नावे गुणवाचक असतात.
भरत या नामाधिकरणावर भाष्य करताना महाराज म्हणाले, भरत हे नाव अगदी साधं, सोपं आहे. भ म्हणजे भरण, पोषण करणारा, र म्हणजे रमणारा आणि त म्हणजे तारणारा असा त्याचा गर्भितार्थ आहे. आपण चातकाला प्रेमाचे तर हंसाला विवेकाचे प्रतीक मानतो. भरताकडे हंसाचे विवेकत्वही आहे आणि चातकाचं प्रेम तत्त्वही आहे. भरत कुलाभिमानी, चारित्रसंपन्न आहे. सात्विक आहे. तो त्यागी आहे. सेवाभाव समजण्यासाठी भरत समजून घ्यावा. भरत साधू, संतही आहे. ज्ञानदेव पासष्ठीमधील ज्ञानदेवांनी चांगदेवांना लिहिलेलं पत्र, भगवंतांच्या हातातील तीन अस्त्रासोबतचे कमळाचे प्रयोजन, १४ वर्षांनंतर परत येतो म्हणून भरताला आश्वासन दिल्याप्रमाणे प्रभू रामचंद्र परतले, पण त्यांनी त्या अगोदर भरत काय करतोय, हे पाहण्यासाठी हनुमंताला पाठविलं तो प्रसंग, रामायणास कारणीभूत ठरलेल्या भरताला गादीवर बसवा आणि रामाला १४ वर्षे वनवासाला पाठविले जाण्याचे कैकयीचे दोन वर या संबंधीचा प्रसंग, प्रभू रामचंद्र आणि भरत यांच्या संवादामधील बौद्धिक व भावनिक द्वंद्व आणि पुढे राम गादीवर बसल्यानंतर भरताने स्वीकारलेली छत्र चामराची जबाबदारी आदींवर महाराजांनी दृष्टांत, दाखले, नित्य व्यावहारिक उदाहरणांसह भावोत्कट शब्दात विवेचन केले.
( साभार दैनिक लोकमत )-
आपला
अक्षय चंद्रकांत भोसले
८४५१८२२७७२
|
(सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।) एक युवा चळवळ - वारकरी वर्गाकरिता , युवा परिवर्तनाकरिता,स्वदेशी प्रेमाकरिता,आपल्या सर्वांसाठी . तुमचा माझा सर्वांचा एकच हक्काच व्यासपीठ - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य संपर्क :अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ ( मुख्य कार्यालय - मुंबई )शाखा : नवी मुंबई ,कल्याण - डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर,पुणे , सातारा , नाशिक , जळगाव , औरंगाबाद , जालना , धुळे ,रायगड , ठाणे , परभणी , नांदेड , कोल्हापूर , सोलापूर
Sunday, 30 August 2015
भरताची भक्ती सर्वश्रेष्ठ - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले
संत सद्गुरु विठोबादादा महाराज चातुर्मास्ये यांची २२४ वी पुण्यतिथी उत्सव
।। श्री विठ्ठल ।।
दि. १० सप्टेंबर २०१५ गुरुवार रोजी प्रातःस्मरणीय
संत सद्गुरु
विठोबादादा महाराज चातुर्मास्ये यांची २२४
वी पुण्यतिथी आहे.
संत सद्गुरु
विठोबादादा महाराज चातुर्मास्ये यांची २२४
वी पुण्यतिथी आहे.
वारकरी सांप्रदायातील अनेक प्रासादिक
परंपरेपैकी हि एक परंपरा असुन तिचे जतन करुन वृद्धीगत
झालेली आहे.
परंपरेपैकी हि एक परंपरा असुन तिचे जतन करुन वृद्धीगत
झालेली आहे.
श्रीभानुदास पैठणकर | भगवंताचे भक्त थोर | तेच आले महीवर | या पुुत्ररुपाने ||
श्रीदासगणूंची वैखरी | भक्तिसारामृतामाझारी | वदली आहे यापरी | ते पहा विबुधहो ||
सद्गुरुदादामहाराज हे संत भानुदास महाराजांचे अवतार
होते. अनवे
या गावी अवतारास येऊन पंढरपूर येथे कीर्तनसेवा
केली. ३६वर्षेपर्यंत
सेवा केल्यावर शके १७१३ मध्ये पंढरपूर येथे समाधिस्त
झाले. पूज्य
महाराजांचा व आर्याकार कवी मोरोपंतांचा स्नेह
होता. पंत
महाराजांना गुरुस्थानी मानत. केलेले काव्य
महाराजांकडे अवलोकनास
पाठवुन मगच प्रकाशित करत असत.
होते. अनवे
या गावी अवतारास येऊन पंढरपूर येथे कीर्तनसेवा
केली. ३६वर्षेपर्यंत
सेवा केल्यावर शके १७१३ मध्ये पंढरपूर येथे समाधिस्त
झाले. पूज्य
महाराजांचा व आर्याकार कवी मोरोपंतांचा स्नेह
होता. पंत
महाराजांना गुरुस्थानी मानत. केलेले काव्य
महाराजांकडे अवलोकनास
पाठवुन मगच प्रकाशित करत असत.
पंढरपूर येथे पुण्यतिथी निमित्त भव्य
सोहळा होत असतो.
१३ दिवस गाथा भजन,नामजप कीर्तनादि कार्यक्रम
होतात........
सोहळा होत असतो.
१३ दिवस गाथा भजन,नामजप कीर्तनादि कार्यक्रम
होतात........
पंढरपूर इथे दि. २९ ऑगस्ट २०१५ ते १० सप्टेंबर २०१५ पर्यंत
पुण्यतिथी निमित
मठा मध्ये तेरा दिवस पुढील प्रमाणे आदी कार्यक्रम होतील तरी सर्व गुरु
भक्तांनी लाभ घ्यावा हि नम्र विनंती ................
पुण्यतिथी निमित
मठा मध्ये तेरा दिवस पुढील प्रमाणे आदी कार्यक्रम होतील तरी सर्व गुरु
भक्तांनी लाभ घ्यावा हि नम्र विनंती ................
सकाळी ४.०० - ६.०० काकडा भजन.......
सकाळी ६.०० - ७.३० सद्गुरूच्या समाधीस अभिषेक,
आरती .......
सकाळी ७.३०- ८.३० श्रीमद्भागवत कथा ...
सकाळी ९.३० ते ११.०० नामजप
सकाळी ११.००-१२.०० भजन
दुपारी १२ - ३ महाप्रसाद
दुपारी ४.०० - ५.०० हरिपाठ
संध्याकाळी -
५. ३० ते ७. ३० - चातुर्मासाचे नित्य नियमाचे
कीर्तन .........
रात्री १०.३० - हरी जागर .......
सकाळी ६.०० - ७.३० सद्गुरूच्या समाधीस अभिषेक,
आरती .......
सकाळी ७.३०- ८.३० श्रीमद्भागवत कथा ...
सकाळी ९.३० ते ११.०० नामजप
सकाळी ११.००-१२.०० भजन
दुपारी १२ - ३ महाप्रसाद
दुपारी ४.०० - ५.०० हरिपाठ
संध्याकाळी -
५. ३० ते ७. ३० - चातुर्मासाचे नित्य नियमाचे
कीर्तन .........
रात्री १०.३० - हरी जागर .......
संतचरणज -
ह.भ.प.श्री.कैवल्य उर्फ भानुदास महाराज चातुर्मास्ये
ह.भ.प.श्री.कैवल्य उर्फ भानुदास महाराज चातुर्मास्ये
संपर्क : +९१ ९७६३३६३६९४
श्री चातुर्मास्ये महाराज मठ
२२९५,दत्त घाट रामायणे गेट,श्रीक्षेत्र पंढरपूर
श्री चातुर्मास्ये महाराज मठ
२२९५,दत्त घाट रामायणे गेट,श्रीक्षेत्र पंढरपूर
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
शाखा - पंढरपूर
शाखा - पंढरपूर
Subscribe to:
Posts (Atom)