लोकसेवा समिती धाराशीवचा लोकसेवा पुरस्कार आपल्या परीवारातील सदस्य श्रीनिवासराव व सौ. मंजूषा कुलकर्णी यांना ऊस्मानाबाद येथे वितरीत करण्यात आला .
(सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।) एक युवा चळवळ - वारकरी वर्गाकरिता , युवा परिवर्तनाकरिता,स्वदेशी प्रेमाकरिता,आपल्या सर्वांसाठी . तुमचा माझा सर्वांचा एकच हक्काच व्यासपीठ - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य संपर्क :अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ ( मुख्य कार्यालय - मुंबई )शाखा : नवी मुंबई ,कल्याण - डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर,पुणे , सातारा , नाशिक , जळगाव , औरंगाबाद , जालना , धुळे ,रायगड , ठाणे , परभणी , नांदेड , कोल्हापूर , सोलापूर
Sunday, 25 December 2016
लोहपुरुष गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यासमवेत चर्चा !
लोहपुरुष श्रद्धेय गु. संभाजीराव भिडे गुरुजी काल रात्री ११ ते १२ दरम्यान भेट झाली .शिवस्मारक उत्सवात मा.श्री पंतप्रधान नरेंद्रजी मोदींची भेट घेऊन गुरुजी मुक्कामी पवई ला आले होते .मनसोक्त संवाद घडला प.पू.सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकरांची अनेक कीर्तन श्रवण करण्याचे भाग्य मला लाभले अशी ग्वाही पू.गुरुजींनी दिली . रात्र फार झाली होती म्हणून बैठक आवरती घेतली मात्र निघताना गुरुजी अगदी लिफ्टच्या दरवाज्या पर्यंत सोडायला आले . वास्तविक पाहता गुरुजींचे हे वारकरी संप्रदाय व वारकरी युवकांवरील असलेले अतीव प्रेम या माध्यमातून मला पाह्यला मिळाले .
जो पर्यंत संत ज्ञानेश्वरमहाराज , संत तुकाराममहाराज यांचे विचार समाजाला कळणार नाहीत तो पर्यंत प्रभू शिवराय व छत्रपती संभाजी राजे समाजाला कळणे अशक्य आहे ! - श्रद्धेय श्री. संभाजीराव भिडे गुरुजी
एक नवी ऊर्जा मिळाली . मित्रवर्य श्री.अनिलजी आघाव व श्री.प्रणितजी माने मनपूर्वक धन्यवाद हा सुंदर योग जुळवून आणल्या बद्दल
- अक्षयमहाराज भोसले ०८४५१८२२७७२