(सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।) एक युवा चळवळ - वारकरी वर्गाकरिता , युवा परिवर्तनाकरिता,स्वदेशी प्रेमाकरिता,आपल्या सर्वांसाठी . तुमचा माझा सर्वांचा एकच हक्काच व्यासपीठ - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य संपर्क :अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ ( मुख्य कार्यालय - मुंबई )शाखा : नवी मुंबई ,कल्याण - डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर,पुणे , सातारा , नाशिक , जळगाव , औरंगाबाद , जालना , धुळे ,रायगड , ठाणे , परभणी , नांदेड , कोल्हापूर , सोलापूर
Friday, 9 September 2016
३५ शास्त्रीय रागांमध्ये स्वरबद्ध केलेला हरिपाठ !
संत श्रेष्ठ श्रीज्ञानेश्वरमाऊली म्हणजे साक्षात भगवान विष्णू .भावार्थदीपिका उर्फ श्रीज्ञानेश्वरी हि माऊलींची काया असून हरिपाठ हे त्यांचे ह्रदय आहे .वेदशास्त्रपुराणांचे सार म्हणजे हरी. तो हरी हरिनामानेच प्राप्त करण्याचा सुगम उपाय हरिपाठात ज्ञानोबा माऊलींनी सर्वांसाठी प्रगट केलेलं आहे . हरिपाठ हा वारकऱ्यांच्या साधक जीवनाचे प्रमुख अंग आहे . आज पर्यंत अनेक मान्यवर गायकांनी आपल्या शैलीत हरिपाठ गायलेला आहे . त्यावर अनेक ध्वनी मुद्रणेही उपलब्ध आहेत .तथापी सुप्रसिद्ध शास्त्रीय अभंगवाणी गायक संगीत अलंकार ह.भ.प.श्री सूर्यकांतजी गायकवाड यांनी स्वरसाध चढवलेला आणि त्यांच्या धर्मपत्नी व शिष्या सौ संगीता ताई तसेच त्यांची कन्या व शिष्या कु.गायत्री या मायलेकींनी गायलेला व कु. रमाकांत गायकवाड यांची हार्मोनियम साथ व श्री पांडुरंग पवार यांची तबला साथ लाभलेला समाधी संजीवन हरिपाठ !
हा हरिपाठ वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण कि , या हरिपाठात प्रत्येक अभंगाला त्या अभांगतील भावार्थानुसार समर्पक रंगांची निवड करून तशी चाल लावण्यात आलेली आहे.विविध अशा सुमारे ३५ रागांमध्ये ह्या चाली निबद्ध केलेल्या असून सप्तसुरांच्या आरोहाचा चढता क्रम ह्या चालींमध्ये सुरेख पणे योजलेला आहे. असा हा अत्यंत भक्तीयुक्त अंतःकरणाने गायलेला हरिपाठ आपल्या मनाला नक्कीच शांतता प्रदान करेल . सीडी मिळवण्याकरिता आजच संपर्क करा.
गायत्री गायकवाड ९७६३४६२२३१
(Also Search On YouTube Ramakant / Gayatri Gaikwad )
श्रीराधाष्टमी ।।
आज श्रीराधाष्टमी !!
अनुत्तरभट्टारिका, व्रजनंदिनी, महारासेश्वरी, कृष्णमन्त्राधिदेवता श्रीकृष्णवल्लभा आदिशक्ती भगवती श्री श्रीराधाजींची जयंती !
बिन राधा कृष्ण आधा । असे महात्मे आवर्जून सांगतात. नुसते सांगतात नव्हे तर ती वस्तुस्थितीच आहे. शक्तीशिवाय 'शिव'ही 'शव'रूप होऊन जातात, असे भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजही म्हणतात. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंची आल्हादिनी दिव्यशक्ती म्हणजे अपर-श्रीकृष्णस्वरूपा भगवती श्रीराधा !
रा शब्दोच्चारणादेव स्फीतो भवति माधव: ।
धा शब्दोच्चारणादेव धावत्यैव ससम्भ्रम: ।
एखाद्याने अत्यंत प्रेमाने " राधा " नाम घ्यायचे ठरवून त्यातले नुसते " रा " उच्चारले की, भगवान श्रीकृष्णप्रभू अत्यंत उल्हासित, आनंदित होतात आणि पुढे " धा " म्हटल्याबरोबर त्या भक्ताच्या मागे मागे धावू लागतात, इतके त्यांचे श्रीराधाजींवर प्रेम आहे.
- रोहन उपळेकर