शंभू वसला शिंगणापूरी
शिखर शिंगणापूर अर्थात 'दक्षिण कैलास' रूसून बसलेल्या भगवान शंभू महादेवांचा शोध घेतल्यानंतर माता पार्वतीनी भगवान शंकराशी दुसरा विवाह केला अशी कथा आहे.वारीच्या वाटेवर नातेपुते पासून आवघ्या अठरा किलोमीटर असणारे हे तीर्थक्षेत्र. मनुष्य जीव हा शिवाच्या भेटीला चालत जात असतानाच दुरूनच शिखर शिंगणापूरचा डोंगर आणि कळस दिसून येतो. वारकऱ्यांचे,हात,साहजिकच जोडले जात होते.
संत जनाबाई म्हणतात,शिवा राम नाही भेद।तिही देव,ऐसे सिद्ध।
किंवा संत कान्होपात्रा म्हणतात त्याप्रमाणे शिव तो निवृत्ती।विष्णू ज्ञानदेव पाही। सोपान तो ब्रम्हा।मूळ माया मुक्ताई।
संत निवृत्तीनाथ हा भगवान शिवाचा अवतार तर माऊली ज्ञानोबाराय हे भगवान विष्णूचा अवतार संत सोपानदेव हे भगवान ब्रम्हदेवांचा अवतार.
जसे रूक्मिणी मातेच्या शोधार्थ भगवान श्रीकृष्ण परमात्मा पंढरपूरात आले.तसेच भगवान शिवजी माऊली ज्ञानोबारांयाचा पालखी सोहळा पाहण्यासाठी तर शिखरावर येऊन राहिले नसतील ?
असो...
भजन करी महादेव।राम पुजी सदाशिव।
माऊलींचा आजचा मुक्काम हा शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या जवळ असणाऱ्या नातेपुतेत...
(सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।) एक युवा चळवळ - वारकरी वर्गाकरिता , युवा परिवर्तनाकरिता,स्वदेशी प्रेमाकरिता,आपल्या सर्वांसाठी . तुमचा माझा सर्वांचा एकच हक्काच व्यासपीठ - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य संपर्क :अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ ( मुख्य कार्यालय - मुंबई )शाखा : नवी मुंबई ,कल्याण - डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर,पुणे , सातारा , नाशिक , जळगाव , औरंगाबाद , जालना , धुळे ,रायगड , ठाणे , परभणी , नांदेड , कोल्हापूर , सोलापूर
Saturday, 9 July 2016
आज माऊली नातेपुतें मुक्कामी !
Subscribe to:
Posts (Atom)