(सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।) एक युवा चळवळ - वारकरी वर्गाकरिता , युवा परिवर्तनाकरिता,स्वदेशी प्रेमाकरिता,आपल्या सर्वांसाठी . तुमचा माझा सर्वांचा एकच हक्काच व्यासपीठ - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य संपर्क :अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ ( मुख्य कार्यालय - मुंबई )शाखा : नवी मुंबई ,कल्याण - डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर,पुणे , सातारा , नाशिक , जळगाव , औरंगाबाद , जालना , धुळे ,रायगड , ठाणे , परभणी , नांदेड , कोल्हापूर , सोलापूर
Tuesday, 7 June 2016
नीतीच्या तीन गोष्टी !
।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।
प्रश्न साधकांचे उत्तरे श्रीमहाराजांची
नीतीच्या तीन गोष्टी
भक्त : " नीतीने राहवे म्हणजे कसे ? "
श्रीमहाराज : नीतीच्या मुख्य तीन गोष्टी लक्षात ठेवाव्यात . एक म्हणजे एक पत्नीव्रत असावं , त्याला प्राणपलीकडे सांभाळाव . धर्माची बंधने प्राणाशी गाठ आल्यावर सोडली तर चालतात . एक अगदी कर्मठ ब्राह्मण होता. तो बेशुद्ध पडला. त्याला डॉक्टरने थोडी दारू पाजली हे चालेल ; पण नीती प्राण गेला तरी जपली पाहिजे . दुसरी गोष्ट म्हणजे पैशाचा लोभ न धरावा. पैसा खूप अनर्थांना कारण आहे. आपल्या श्रमाने मिळणार पैसा खरा. बाकीच्याचा लोभ धरू नये .आणि पैशा मुळे मी सुखी आहे , असे मनात चुकून सुद्धा आणू नये . तिसरी गोष्ट म्हणजे कोणाचेही वाईट चिंतू नये. सर्वांच कल्याण व्हावं , म्हणावं कोणाचे अंतःकरण दुखवू नये. घरातील अगदी कुत्र्याहीसुद्धा वाईट वागू नये.दुसरा आपल्याशी जसा वागावासा वाटतो तस आपण दुसऱ्याशी वागावं ; हीच नीती एवढं जो करेल ना , त्याला भगवंत लांब नाही . आपल्या कर्तव्यात राहावं आणि त्यात त्याची आठवण ठेवावी हे अगदी सगळ्याच सार आहे.
Varkariyuva.blogspot.in