(सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।) एक युवा चळवळ - वारकरी वर्गाकरिता , युवा परिवर्तनाकरिता,स्वदेशी प्रेमाकरिता,आपल्या सर्वांसाठी . तुमचा माझा सर्वांचा एकच हक्काच व्यासपीठ - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य संपर्क :अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ ( मुख्य कार्यालय - मुंबई )शाखा : नवी मुंबई ,कल्याण - डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर,पुणे , सातारा , नाशिक , जळगाव , औरंगाबाद , जालना , धुळे ,रायगड , ठाणे , परभणी , नांदेड , कोल्हापूर , सोलापूर
Tuesday, 28 March 2017
ह.भ.प.वै. सीताराम महाराज जगताप (सचिव)
ह.भ.प.वै. मधुकर महाराज शिंपी (सचिव)
ह.भ.प.वै. नथूसिंग डोंगरसिंग राजपूत (सचिव)
ह.भ.प.वै. विठ्ठल महाराज घुले (सचिव)
ह.भ.प.वै. नारायण हिरोजी वरोलीकर महाराज (सचिव)
ह.भ.प.वै. शांताराम गुरुजी (सचिव)
ह.भ.प.वै.मारोती विठोबा गुरव तथा गुरुवर्य मारोतीबाबा गुरव (सचिव)
ह.भ.प.वै. पांडुरंग ज्ञानेश्वर कुलकर्णी तथा पांडुरंग शास्त्री शर्मा चऱ्होलीकर (सचिव)
वेदशास्त्रसंपन्न पांडुरंग शर्मा यांचा संस्थेच्या स्थापने मध्ये सिंहाचावाटा होता. हे संस्थेचे दि. २४ मार्च १९१७ ते दि. २ फेब्रुवारी १९२३ असे पाच वर्षे अकरा महिने संस्थेचे पहिले संस्थापक सचिव होते. पूर्वी संस्थेत एकाचवेळी दोन सचिव असत त्यात एक कार्यालयीन सचिव व दुसरा कार्यालयबाह्य लोकसंपर्क इत्यादी कार्यसचिव याच प्रमाणे संस्थेत एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष व एक खजिनदार असे सहा पदाधिकारी व पाच सभासद असे अकरा लोकांचे कार्यकारी मंडळ असे. विशेष सभेच्या आजीव सभासदानाही संख्येची मर्यादा नव्हती. अशा संस्थेच्या प्रथम घटनेच्या रचनेमध्ये पांडुरंग शास्त्री शर्मा यांची मुख्य भूमिका होती. परंतु ३१ ऑक्टोबर १९५२ साली झालेल्या घटना दुरुस्ती नुसार एक अध्यक्ष, एक सचिव व पाच विश्वस्त अशा सात लोकांच्या कार्यकारी मंडळाची रचना मंजूर करण्यात आली. या संकोचित घटनादुरुस्तीमुळे संस्थेच्या कार्याविस्तारावर व दैनंदिन कारभाराच्या पारदर्शकतेवर विपरीत परिणाम झाला तो सर्व विदित आहे.
वेदशास्त्रसंपन्न पांडुरंग शास्त्री कुलकर्णी, चऱ्होली बु. पुणे, हे वाराणसी येथे शास्त्राध्यन करून वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षक ,श्री सद्गुरू जोगमहाराज यांचे साक्षात अनुग्रहित, आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष ,श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष , जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य, लेजीस्लेतीव कौसील मुंबईचे सदस्य, सर्वशास्त्र पारंगत, चिद्विलासवादाचे विशुद्ध प्रतिपादक, चांगदेव पासष्टीवर स्वानंदजीवन नामक शास्त्रशुद्ध चिद्विलासवादाचे लेखक, प्रतिभासंपन्न संशोधक, विचारवंत प्रकांड विद्वान होते. आणि त्यांचे गुरुनिष्ठनिर्मल जीवन सदैव प्रेरणादायी होते व आहे.
साभार - वारकरी शिक्षण संस्था
ह.भ.प.श्री.मारुती लहानू कुरेकर तथा शान्तिब्रम्ह मारुतीबाबा
साभार - वारकरी शिक्षण संस्था
ह.भ.प.वै. विठ्ठल भावडू चौधरी तथा मोठे बाबा
साभार - वारकरी शिक्षण संस्था
ह.भ.प.वै. स.के.नेऊरगावकर
ह.भ.प.वै.मामासाहेब दांडेकर
ह.भ.प.वै.लक्ष्मणबुवा इगतपूरीकर
ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज
- साभार - वारकरी शिक्षण संस्था
स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज
साभार - वारकरी शिक्षण संस्था
वारकरी शिक्षण संस्था म्हणजे समाजाकडून संचालित, सक्रीय अनौपचारिक संत साहित्य विद्यापीठ.
साभार - वारकरी शिक्षण संस्था
Monday, 27 March 2017
वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रवासाची १०० वर्षे ।।
सद्गुरू श्रीजोगमहाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था , श्रीक्षेत्र आळंदी येथील कीर्तनसेवेची गोड आठवण ...!
वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रवासाची १०० वर्षे ।।
सन १९१७ - २०१७
Saturday, 25 March 2017
Wednesday, 15 March 2017
Tuesday, 14 March 2017
वाढवेळ झाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ।
आम्ही जातो तुम्हीं कृपा आसो द्यावी ।
सकाळा सांगांवी विनंती माझी।।
वाढवेळ झाला उभा पांडुरंग ।
वैकुंठा श्रीरंग बोलावितो ।
अतःकाळी विठो आम्हासी पावला ।
कुडी सहित झाला गुप्त तुका ।।
Wednesday, 8 March 2017
समर्पण - प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर
कोणताही अभिमान धारण न करता स्वत:ला सदैव भगवंताच्या चरणावर समर्पण करणे हे शरणागतीचे लक्षण आहे.
भक्त हे आपले सर्वस्व भगवच्चरणीच समर्पित करीत असतात.तसे पाहिले तर सर्वांच्याच अंत:करणात समर्पणाची भावना असतेच.आपल्या भावना कोणाच्या तरी ठिकाणी समर्पित केल्याशिवाय माणसाला चैन पडत नाही.स्वत: भगवानच 'मनुष्यजात सकऴ । स्वभावातच भजनशीऴ ।।' अशी मनुष्य स्वभावाची जाती सांगतात.आपल्या प्रेमाच्या ठिकाणीच समर्पणाची भावना निर्माण होत असते.व्यवहारामध्येही मनुष्य प्रेमातील माणसाला सर्व काही देण्याची तयारी दाखवीत असतो.तसे विषयी विषयीच्या ठिकाणी समर्पण करेल.भक्त देवाच्या ठिकाणी समर्पण करेल.पामर संसाराच्या ठिकाणी समर्पण करेल.श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी म्हटले आहे,
"प्रेमाथिलेनि भक्ते । जैसेनि भजिजे कुलदैवते ।।
तैसा एकाग्रचित्ते । स्त्री जॊ उपासी ।।"
विषयीच्या संदर्भातील हे उद्गार आहेत.आपणही संसारासाठी वाटेल ते करीतच असतो,पण भक्ताचे मात्र तसे नसते.तो केवऴ देवाच्याच चरणी समर्पणाची भाषा करीत असतो.कारण आपणास मिऴालेले सर्व काही देवानेच दिलेले आहे याची त्यांना जाणीव असते;त्यामुऴे आपणांस सर्व काही दिलेले आहे त्यालाच ते सर्व काही समर्पित करीत असतात.
'त्वदीय वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये ।'
अशी त्यांची भाषा असते. श्रीतुकाराम महाराजांनी म्हटले आहे,
"मनेसहित वाचा काया । अवघे दिले पंढरीराया ।।"
आणि भक्ताचे हे समर्पण कोणत्याही अभिमानाशिवाय असते.इतरांपेक्षा माझे समर्पण अधिक आहे किंवा इतर कोणी जे देवास देत नाही ते मी देतो आहे.असा कोणताही अभिमान त्या समर्पणामध्ये नसतो.उलट हे समर्पण हे स्वत:चे कर्तव्य मानत असतात.अशा अभिमानरहित परमात्मचरणी समर्पणाच्या भावनेस शरणागती म्हणतात
।। रामकृष्णहरि ।।
संदर्भ - संतसंग
© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.
https://m.facebook.com/chaitanyamaharajdeglurkar/
Monday, 6 March 2017
ह.भ.प.श्रीयोगीराजमहाराज गोसावी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक अभीष्टचिंतन ....!
धन्य धन्य एकनाथा | तुमचे पायीं माझा माथा || आमचे परममित्र सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.श्री.योगीराज महाराज गोसावी,श्रीक्षेत्र पैठण,(शांतीब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज यांचे १४ वे वंशज) यांना वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक हार्दिक अभिष्टचिंतन..!!
Sunday, 5 March 2017
Saturday, 4 March 2017
Friday, 3 March 2017
Thursday, 2 March 2017
श्रीसंत प.पू.सदगुरु श्रीवामनबाबा महाराज , तळोजे म. पुण्यसमरण ...!
संतपुरुष हे परमेश्वराचे प्रगट रुप. निर्गुण निराकार भगवंत संतांच्या रुपाने सगुण साकार होतो. त्यांच्या सहवासात राहाण्याचे भाग्य मात्र आपल्यापाशी असावे लागते. पूर्वसंचित जबरदस्त असल्याशिवाय संतांचा सहवासच नव्हे तर साधे दर्शनसुध्दा घडत नाही. माउली ज्ञानदेवांनी तर आपल्या अभंग भाषेमधून एक शाश्वत सत्य सांगितले आहे की,
आणि जे वर्णन श्री संत तुकाराम महाराज यांनी संत लक्षण म्हणून केले त्याला पूर्णतः साजेसे आपले सदगुरु श्रीवामनबाबा महाराज
वै.प.पू. सद्गुरू श्रीवामनबाबामहाराज , तळोजा म. - पनवेल पुण्यतिथी उत्सव २०१७
कविवर्य श्री.ग.का.आपटे स्मृती संतश्रेष्ठ तुकोबाराय पुरस्कार प.पू.श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांना जाहिर !
आनंद वार्ता
यंदाचा कविवर्य श्री.ग.का.आपटे स्मृती संतश्रेष्ठ तुकोबाराय पुरस्कार श्री.चैतन्य महाराज देगलूरकर यांना जाहिर !
प.पू.देगलूरकर परंपरेत आणखी एक मानाचा तुरा …..!