Friday, 1 August 2014

सेवासुर्य श्री ह.भ.प. सुभाष महाराज घाडगे यांस वाढदिवसानिम्मित अभिष्टचिंतन !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


" सेवासुर्य " अगदी सूर्याप्रमाणे तेजोमय कार्य करणारे तथा युवकप्रेरणास्थान श्री ह.भ.प.गुरुवर्य सुभाष महाराज घाडगे यांस वाढदिवसानिम्मित अभिष्टचिंतन ! आपणास दीर्घायुष्य तथा आरोग्य संपन्नता लाभो हि माऊलीचरणी प्रार्थना !

समस्त वारकरी संप्रदाय तथा वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र !
 

माळीन गावातील दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या सर्व व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली !

देवा तुझ आणि माझ नेमक वैर काय आहे रे का आमच्यावर इतका रागवलायस तू का इतक दुख आमच्या वाट्याला पाठवतोयस .. 


तुझा माझा देवा कां रे वैराकार । दुःखाचे डोंगर दाखविशी ॥१॥ 
बळें बांधोनियां देसी काळा हातीं । ऐसें काय चित्तीं आलें तुझ्या ॥२॥
आम्हीं देवा तुझी केली होती आशा । बरवें ह्रषिकेशा कळों आलें ॥३॥
नामा म्हणे देवा करा माझी कींव । नाहीं तरी जीव घ्यावा माझा ॥४॥

माळीन गावातील दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या सर्व व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली !
त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त हो हि माऊलि चरणी प्रार्थना !
शोकाकुल :- वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

Monday, 28 July 2014

भगवान विष्णू आणि भगवान शिवजी यांची एकरुपता दर्शवणारा आणि शिव नामाच महत्त्व सांगणारा अभंग

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


भगवान विष्णू आणि भगवान शिवजी यांची एकरुपता दर्शवणारा आणि शिव नामाच महत्त्व सांगणारा अभंग :- 

शिव ऐसा शब्द कल्याणदायक । जाणती भाविक साधुजन ॥१॥
तारक हें नाम भोळ्याभाविकांसी । नेणते जाणत्यांसी लाभ एक ॥२॥
उपमन्यु बाळक दूध मागों गेला । क्षीरांब्धि दिधला उचितासी ॥३॥
दुष्टदुराचारी पतित तारिले । नाही आव्हेरिलें दीनानाथें ॥४॥
नामा म्हणे शिव विष्णु एकरूप । ताराया अमूप अवतार ॥५॥
- श्री संत नामदेव महाराज

Sunday, 27 July 2014

श्रावण महिना प्रारंभ :)

|| ज्ञानेशो भगवान विष्णू || 

श्रावण महिना प्रारंभ  


शिव भोळा चक्रवर्ती।
त्याचे पाय माझे चित्ती॥
वाचे वदता शिवनाम।
तया न बाधी क्रोधकाम॥
धर्म अर्थ काम मोक्ष।
शिवा देखता प्रत्यक्ष।
एका जनार्दनी शिव।
निवारी कळिकाळाचा भेव॥
- संत एकनाथ महाराज

Monday, 21 July 2014

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील पदार्थविज्ञान विषयक संदर्भ - शास्त्रज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील पदार्थविज्ञान विषयक संदर्भ ! 
गीतेच्या या प्राकृत टीकेचे सार्थक होण्यासाठी ' लक्ष देऊन ऐकावे ' अशी श्रोत्यांनी विनंती करताना श्री ज्ञानराज म्हणतात ,
तिये अवधान द्यावे गोठी | बोलिजेल नीट मऱ्हाटी |
जैसी कानाचे आधी दृष्टी | उपेगा जाये ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ७-२०६
श्रोत्यांनी अवधानपूर्वक ऐकले तर ज्याप्रमाणे कानाच्या आधी दृष्टी उपयोगी पडते ( ऐकायला येण्यापूर्वी दिसते ) , तसे माझ्या या मराठी बोलण्याचे होईल . प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त असतो त्यामुळे आपल्याला दूरची गोष्ट आधी दिसते मग ऐकायला येते हे वैज्ञानिक सत्य उपमा म्हणून वापरले आहे .
संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य समझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र