(सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।) एक युवा चळवळ - वारकरी वर्गाकरिता , युवा परिवर्तनाकरिता,स्वदेशी प्रेमाकरिता,आपल्या सर्वांसाठी . तुमचा माझा सर्वांचा एकच हक्काच व्यासपीठ - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य संपर्क :अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ ( मुख्य कार्यालय - मुंबई )शाखा : नवी मुंबई ,कल्याण - डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर,पुणे , सातारा , नाशिक , जळगाव , औरंगाबाद , जालना , धुळे ,रायगड , ठाणे , परभणी , नांदेड , कोल्हापूर , सोलापूर
Saturday, 16 July 2016
Friday, 15 July 2016
Thursday, 14 July 2016
श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात माऊलींच्या पादुका दिल्या तो क्षण !
आज श्री माऊलींचा पालखी सोहळ्याने वैष्णवांची नगर पंढरी नगरी मध्ये प्रवेश केला , त्यावेळी श्री माऊलींच्या पादुका श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यामध्ये देण्याची परंपरा आहे तेव्हाचे काही क्षण
वंशपरंपरा दास मी अंकीत.......
आज माऊलींच्या सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण पार पडले व परंपरेप्रमाणे माऊली ज्ञानोबारायांचे पालखी सोहळा मालक प. पु. हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब पवार ( आरफळकर ) यांनी श्री माऊलींच्या पादुका रथातून काढुन उर्जितसिंह शितोळे सरदार यांच्या गळ्यात दिल्या. पादुकांचा दुसरा जोड पालखीत ठेवण्यात आल्या .
माऊलींचे वंशपरंपरागत श्री चोपदार व वासकर परीवार शितोळे सरदारांच्या बाजुने चालत होते.
हा क्षण डोळ्यात साठविण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. दिंड्यामधुन वाट काढत श्री शितोळे सरदारांनी माऊलींच्या पादुका नाथचौकातील श्री ज्ञानेश्वर मंदीरामध्ये आणल्या . मंदीरात समाज आरती झाली....
आणि नकळत ओठावर अभंग आला.......
पावलो पंढरी वैकुंठ भुवन |
धन्य आज दिन सोनियाचा ||
आज माऊलींच्या सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण पार पडले व परंपरेप्रमाणे माऊली ज्ञानोबारायांचे
माऊलींचे वंशपरंपरागत श्री चोपदार व वासकर परीवार शितोळे सरदारांच्या बाजुने चालत होते.
हा क्षण डोळ्यात साठविण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. दिंड्यामधुन वाट काढत श्री शितोळे सरदारांनी माऊलींच्या पादुका नाथचौकातील श्री ज्ञानेश्वर मंदीरामध्ये आणल्या . मंदीरात समाज आरती झाली....
आणि नकळत ओठावर अभंग आला.......
पावलो पंढरी वैकुंठ भुवन |
धन्य आज दिन सोनियाचा ||
Subscribe to:
Posts (Atom)