|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थापित, वारकरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त तथा संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान त्र्यंबकेश्वर यांचे अध्यक्ष मा.ह.भ.प.त्र्यंबकराव गायकवाड , कीर्तनकेसरी श्रद्धेय गु. संजयमहाराज धोंडगे ( विश्वस्त - संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान त्र्यंबकेश्वर ) यांच्या शुभहस्ते येवल्याचा प्रसिद्ध असणारा रेशमी फेटा देऊन सन्मान करण्यात आला , ह्याला सन्मान म्हण इतकस मनाला रुचत नाही . माझ्याकरिता हा संत निवृत्तीनाथ महाराज यांचा भेटलेला आशीर्वादरुपी प्रसाद आहे . समवेत मा. विनीतजी सबनीस ( अध्यक्ष - श्रीमंत माउली प्रतिष्ठान , मुंबई )