Thursday 26 June 2014

अधिवक्ता . जयवंतजी महाराज बोधले बार्शी भूषण पुरस्काराने सन्मानित !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


आमचे परमस्नेही आदरणीय अधिवक्ता . जयवंतजी महाराज बोधले यांना नुकताच बार्शी येथे झालेल्या लायन्स क्लब च्या वतीने बार्शी येथे तब्बल ११ वर्षे वारकरी संप्रदायाची सेवा तथा प्रचार प्रसार आणि जन मार्गदर्शन समाज प्रबोधन या कार्यत विशेष कार्य केल्या बद्दल बार्शी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
आपण केलेल्या कार्याची हि पोहच पावती आहे असे आम्ही सारे वारकरी समझतो आपण आम्हा सर्व युवा वर्गास नेहमीच आदर्श स्थानी आहात . आपणास प्रणाम तथा खूप खूप शुभेच्छा ! 
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ 
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य

Tuesday 24 June 2014

योगेश्वर संत निवृत्तीनाथ महाराज समाधी - ज्येष्ठ वद्य १२ तृतीय प्रहर शके १२१९

योगेश्वर संत निवृत्तीनाथ महाराज समाधी - ज्येष्ठ वद्य १२ तृतीय प्रहर शके १२१९ 




गेल्या त्या विभूती अनादी अवतार :.
भगवंताने स्वत : श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीची शिळा लावली . माता रखुमाईस गहिवर येऊन त्या रडू लागल्या , संत म्हणत यांना हि ओसंडून आले , देव गंधर्व हि भारी चिंता करू लागले . नामदेवांच्या पुत्रांनी तर लहानच असल्यामुळे दीर्घ कंठाने टाहो फोडून , उभ्याने शरीर जमिनीवर टाकले , विसोबा खेचर फार कष्टी झाले . सूर्यासारखा निवृत्तीनाथ जुं सर्व जगात अंधार झाला . योगेश्वर समाधिस्त झाले .
गेल्या त्या विभूती अनादी अवतार | आता देवा फार आठवते ||
नामा म्हणे हरी धरवेना धीर | येती गहिंवर ओसांडोनी ||
परिसाभागवत करितसे शोक | म्हणती देवा दुख: फार झाले ||
द्वादशी समाधी दिधली निवृत्तिसी | झाले उदासी अवघे जन ||
( नामदेव महाराज गाथा .१२१० - ११ )
नंतर देव म्हणाले " आता पूजा करा समाधीस पुष्पे वाहून सर्वांनी प्रदक्षिणा करा " त्या प्रमाणे सर्वांनी प्रदक्षिणा केली व पुशकारीनला आच्म्नास गेले . दशमी ते अमवस्यापर्यंत एकंदर पाच दिवस त्र्यंबकेश्वरी राहून आमवस्येला काला केला व प्रतिपदेला पंढरपूरला निघाले .
पाच दिवस उत्सव केला निवृत्तिसी | काला अमावस्येशी त्र्यंबकेश्वरी ||

व काला झाला .
प्रतिपदेसी हरी निघाले बाहेरी | कीर्तन गजरी पुढे होत ||
काही ऋषी , मुनी तेथेच ब्रह्मगिरीवर राहिले , काही अलंकापुराला म्हणजे आळंदीस आले , तर काही ऋषी संत मंडळी पंढरपूरला आषाढी यात्रेस निघाली , जस कि पहा आज योगेश्वर निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा आई नंतर लगेचच आषाढी वारी .!

शत शत नमन तथा दंडवत मायबापा निवृत्तीनाथा !
visit :- www.facebook.com/vaishnavdarshn

आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !

Monday 23 June 2014

" वैष्णव दर्शन " - वारकरी , वैष्णव , भागवत संप्रदायाच एकमेव मुखपत्र

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

आपल्या सेवेत
" वैष्णव दर्शन " - वारकरी , वैष्णव , भागवत संप्रदायाच एकमेव मुखपत्र 
आपण  व आपल्या मुलांच्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्याकरिता हवेत सद्विचार  संत विचार आणि तेच आम्ही आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत आहोत या मासिक स्वरूपातून
आजच या पेज ला भेट द्या व सभासद व्हा .
आम्ही तरुणांनी अंगिकारलेल्या सेवाव्रतास आपल्या आशीर्वादाची व सहकार्याची नितांत गरज आहे  

लिंक :- https://www.facebook.com/vaishnavdarshn

सोबत आपल्या मित्रांना हि यात सहभागी करा व किमान १०  मित्र मैत्रीणीना  पेज पाहण्यास  निमंत्रित करा  .
एकमेका साहय्य करू | अवघा धरु  सुपंथ ||
- अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ / ९८९२७४७८९३
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र .

Tuesday 3 June 2014

सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यामार्फत अनेक अनुदान तथा शिष्यवृत्ती - अक्षय भोसले .

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
प्रथमच आपल्या सर्व युवा वारकरी बंधू भगिनी आणि इतर सर्वच जे भारतीय शास्त्रीय संगीत शिकत आहेत त्यांच्या करिता   खुश खबर ...

सांस्कृतिक कार्य संचालनालय  यांच्यामार्फत अनेक अनुदान तथा शिष्यवृत्ती असतात मात्र त्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहचत नाही ती  आपला सर्वांपर्यंत पोहचावी म्हणून आमचा हा एक छोटा प्रयत्न :-
सांस्कृतिक कार्य संचालनालय भारतरत्न पंडित . भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती योजना
आपण नक्कीच याचा  पाठपुरावा करावा .
लिंक :- https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Citizen%20Charter/Marathi/Cultural%20Affairs.pdf

तुमचा ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !

वारकरी परंपरा जपणारा एक दिवंगत लोकनेता - आदरणीय गोपीनाथजी मुंडे .




समस्त वारकरी वर्गातर्फे आदरणीय गोपीनाथजी मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

गेले दिंगबर ईश्वर विभूती। राहिल्या त्या कीर्ती जगामाजी॥

महाराष्ट्राचे धुरंधर नेते केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे अपघाती निधन झाले परमेश्वर त्यांचे आत्म्यास चिरशांती देवो . वारकरी समाजाकरिता त्यांनी केलेलं कार्य अत्यंत स्तुत्य आणि भरीव आहे . श्री संत भगवान बाबा याचं कार्य क्षेत्र असणार भगवानगड येथील मोठ्या प्रमाणत विकास आदरणीय मुंडे जी यांनी केला . समस्त वारकरी वर्ग नेहमीच त्यांच्या ऋणात राहील जस महाराज म्हणतात कि तुका म्हणे एका मरणेची सरे | उत्त्मची उरे कीर्ती मागे || आपल कार्य नेहमीच संपूर्ण महाराष्ट्राच्या स्मरणात राहील . श्री संत भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना कि आदरणीय मुंडेजी यांच्या आत्मज्योती आपल्यात विलीन करून घ्यावी . समस्त वारकरी युवा मंच आणि संपूर्ण वारकरी वर्ग यांच्या तर्फे आदरणीय गोपीनाथजी मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू संस्कृती !

Monday 2 June 2014

तुळशी महात्म्य आणि त्या मागील विज्ञान - अक्षय भोसले

ज्ञानेशो भगवान विष्णू !


वारकरी संप्रदायात तुळशी अनन्यसाधारण महत्त्व आहे  . वारी आषाढीची असो वा कातिर्कीची, भक्तगण अखंड नामस्मरण करत या 'हरिप्रिया' तुळशीला डोक्यावर घेऊन नाचत असतात. वारीत लाखो भाविकांच्या मस्तकावर तुळस विराजमान झालेली दिसते. 
तुळस ही कृष्णसखी असल्याने पांडुरंगाचीही ती सखीच. कारण भगवंताचा आठवा अवतार श्री कृष्ण आणि  नववा अवतार बद्ध अर्थात श्री विठ्ठल पांडुरंगाचा ! साहजिकच सगळ्या वैष्णव संतांना आणि वैष्णवभक्तांनाही तिचे कमालीचे प्रेम. पांडुरंग हृदयात हवा, तशी प्रत्येकाच्या घरात तुळसही हवीच. हे नवे अद्वैत सांगताना संत नामदेव म्हणतात- 
 
तुलसीविण ज्याचे घर। तें तंव जाणावें अघोर।
        तेथ वसती यम किंकर। आज्ञा आहे म्हणोनि।। 
         तुलसीवृंदावन ज्याचे घरी । त्यासी प्रसन्न श्रीहरी। 
         तुलसीवृंदावना जे करिती प्रदक्षिणा। जन्ममरण त्यांना नाही नामा म्हणे।। 

 याचा अर्थ असा कि ,
ज्या घरात तुळस नाही ते घर अघोर, भयंकरच म्हणायला हवे, तिथे यमदूतांचे वास्तव्य असते, ते ईश्वराची आज्ञा म्हणून. ज्याच्या घरी तुळशीवृंदावन आहे, त्याला श्रीहरी प्रसन्न होतो आणि जे तुळशीवृंदावनाला प्रदक्षिणा घालतात त्यांचे जन्ममरण चुकलेच म्हणून समजावे. नामदेवांचा हा अभंग नीट वाचला तर त्यातील खरा अर्थ धामिर्कतेपेक्षा वैज्ञानिकच अधिक आहे, हे लक्षात येते. ज्याच्या घरी तुळस नाही, तिथे श्रीहरी नव्हे, तर यमदूत वास्तव्याला येणार आहेत हे त्यांचे सांगणे म्हणजे विज्ञानाला लपेटून घेणे आहे. 
तुळशीचे एक पानही त्रैलोक्यासमान आहे, असे सांगताना संत एकनाथांनी म्हटले आहे-
           
तुळशीने पान। एक त्रैलोक्यासमान। उठोनिया प्रात:काळी। वंदी तुळशी माऊली।। 
             मनींचे मनोरथ। पुरती हेचि सत्य। तुळशीचे चरणी। शरण एका जनार्दनी।। 

किंवा 
तुळशीची करिता सेवा। महाराज सांगतात. अरे बाबांनो, देवाला आपलेसे करण्यासाठी यज्ञ-यागाच्या भानगडीत तुम्ही पडू नका. यज्ञ केल्याचे पुण्य जर तुम्हाला पदरात पाडून घ्यायचे असेल, तर केवळ तुळशीचे पूजन करा -होय देवा प्रिय तो।
इतकेच नव्हे तर त्याच्या पुढे एकनाथ महाराज सांगतात. अरे बाबांनो, देवाला आपलेसे करण्यासाठी यज्ञ-यागाच्या भानगडीत तुम्ही पडू नका. यज्ञ केल्याचे पुण्य जर तुम्हाला पदरात पाडून घ्यायचे असेल, तर केवळ तुळशीचे पूजन करा -
सकाळीच उठून तुळशीला वंदन करायचे तर तुळस घरात असली पाहिजे. ते कशासाठी हे आयुवेर्दाने सांगितले आहे. तुळस आणि कडुनिंब ही झाडे अशी आहेत, की ज्यामध्ये कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन ऑक्सिजन अधिक प्रमाणात बाहेर सोडला जातो. तुळशीच्या रोपाच्या ५० मीटर परीघातील हवा अत्यंत शुद्ध राहते. या क्षेत्रात ऑक्सिजनचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याने घरात पिसवा, हिवतापाचे जंतू, अन्य साथीच्या रोगांचे जंतू शिरत नाहीत. सकाळीच या तुळशीसमोर काही वेळ बसल्यामुळे सर्वाधिक शुद्ध हवा श्वासोच्छ्वासाद्वारे शरीरात जाते आणि दिनचर्या सुरू करण्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा शरीराला होतो. मन आणि शरीर दोन्ही एकाग्र करणे शक्य होते. साहजिकच मृत्यूला आमंत्रण देणारे जीव-जंतूही घराच्या आसपासही फिरकत नाहीत. आणि घरात वास्तव्य राहते, ते प्रसन्न श्रीहरीचे. म्हणूनच नामदेवांनी म्हटले आहे की- 

तुळस असे ज्याचे द्वारीं। लक्ष्मी वसे त्याचे घरीं। 
येवोनि श्रीहरी। क्रीडा करी स्वानंदे।।
 जे तुळसी घालिती उदका।  ते नर पावती ब्रह्मासुख। 
  नामा म्हणे पंढरीनायका। तुळसीजवळी उभा असे। 
साक्षात स्वत : पंढरीनाथ तुळशी जवळ उभे असतात .
भगवंताच्या रूपाच वर्णन करताना तुकाराम महाराजांनी तुळशीचा उलेख्ख केला 

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी।
कर कटेवरी ठेवोनिया॥
तुळशी हार गळा कासे पितांबर।
आवडे निरंतर हेची ध्यान॥

तुकाराम महाराजांनी तर तुळशीच्या पुढे इतर सर्व गोष्टी तुच्छ मानल्या. त्यांची ख्याती ऐकून एकदा छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकायला आले. महाराजांनी मांडलेले विचार ऐकल्यानंतर शिवाजी महाराज अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी तुकाराम महाराजांसाठी सुवर्णाच्या मोहरांचा नजराणा पाठवला. खरे आजकालचा एखादा साधू असता तर त्याने लगेच ते धन स्वीकारले असते. महाराजांना, शिवरायांना आशीर्वाद दिले, परंतु शिवरायांचा तो नजराणा स्वीकारला नाही. ते म्हणाले – राजे या धनाची गरज माझ्यापेक्षा अधिक हिंदवी स्वराज्याला आहे आणि अशा धनाची आस माझ्यासारख्या माणसाला उरलेली नाही. आता सोन्या-रूप्यात मन रमत नाही-

सोने रूपे आम्हा मृतीके समान।
माणिक पाशान खडे जैसे॥

सोने-चांदी हे आम्हाला मातीप्रमाणे आहे आणि माणिक-मोती म्हणाल, तर ते माझ्यासाठी दगड-धोंडय़ांसारखे आहेत.
येर तुमचे वित्त धन। ते मज मृती के समान॥
हे तुम्ही जे धन पाठविलेले आहे, ते माझ्यासाठी मातीसमान आहे. शेवटी शिवाजी महाराजांनी विचारले, महाराज तुम्ही सुखी, आनंदी राहावे; म्हणूनच मी हा सुवर्णमुद्रांचा नजराणा पाठवला होता. त्यावर तुकाराम महाराज म्हणाले, आम्ही सुखी व्हावे, आनंदी राहावे असे वाटत असेल, तर त्यासाठी एकच उपाय आहे. तुकाराम महाराज म्हणाले -

आम्ही तेणे सुखी। म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी।
कंठी मिरवा तुळशी। व्रत करा एकादशी॥

आम्ही सुखी व्हावे, असे वाटत असेल तर तुळशीची माळ गळय़ात धारण करा आणि विठ्ठल नामाचा गजर करा. यावरून वारकरी संतांनी तुळशीला किती महत्त्व दिले आहे, हे लक्षात येते. बरे ही तुळस नेमकी आहे तरी कोण आणि ती भगवंतांला इतकी प्रिय असण्याचे कारण काय? याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते.
जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू-संतांना पार त्राहीत्राही करून सोडलेले असते. त्याला कसे रोखायचे, असा प्रश्न सर्व देवांना पडतो. मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात. विष्णूनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली, तेव्हा त्यांना असे कळते की, त्याची पत्नी वृंदा ही सतीपतीव्रता असते. तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यांनेच जालिंदर विजयी होत असतो. त्याला पराजित करायचे असेल, तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो. ते करण्यास कुणीही धजावत नाही. अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात. जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात.
आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना अलिंगन देते. तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच, जालिंदराचा मृत्यू होतो. देवांनी मारलेल्या बाणाने त्याचे शीर तुटते आणि ते वृंदेच्या दारात पडते. नवऱ्याचे शीर पाहताच वृंदा चकीत होते आणि विष्णूला विचारते, तू कोण आहेस? त्यावर विष्णू आपले ख-या रूपात प्रकटतात. संतप्त झालेली वृंदा विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला, तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल, असा शाप देते. भगवंत तिची क्षमा मागतात. तेव्हा वृंदा म्हणते, तू मला आता भ्रष्ट केलेस, आता मला कोण स्वीकारील? तेव्हा भगवंत म्हणतात, ‘मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल.’ त्यानंतर वृंदा सती गेली. पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला. देव दगड होऊन पडले. त्यालाच ‘शालिग्राम’ म्हणतात. ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले, तिथे तुळशीचे रोप उगवले. तीच ही तुळस. वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते, तिला ‘वृंदावन’ असे म्हटले जाते. तीच तुळस कृष्णाने, पांडुरंगानेही धारण केली. तिला भगवंताने स्वीकारले याचे प्रतीक म्हणून ‘शालिग्राम’ हा जो दगड आहे, त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो. ती भगवंतांची प्रिय होते, म्हणूनच तिला धारण करणा-यांवर भगवंत प्रेम करतो, अशी श्रद्धा आहे. याच विचाराने वारक-यांनी तुळशीला आजतागायत पूजनीय मानले आहे.

घरातल्या तुळशीचे महत्त्व ऑक्सिजनपुरते किंवा रोगप्रतिबंधक म्हणून नाही. इतर अनेक दृष्टीने ती आरोग्यदायिनी आहे. सर्दी -खोकला, घशाचे विकार यावर तुळस अत्यंत उपयुक्त आहे. तुळशीचे जिवंत रोप आपल्या आरोग्याचे सतत रक्षण करीत असतेच, पण या तुळशीच्या माळा गळ्यात घातल्यानंतरही त्यांचे हे काम सुरूच राहते. म्हणूनच पांडुरंग आणि त्यांचे भक्त ही तुळशीमाळ नेहमी गळ्यात घालतात. आपले जीवन आरोग्यमय राहिले तर जन्म-मरणाचा फेराही चुकविता येईल अशी श्रद्धाच नव्हे तर विश्वास संत नामदेवांसह सर्वांना आहे. 
आता एकविसाव्या शतकात केवळ धर्म किंवा धामिर्क श्रद्धा म्हणून तुळशीकडे न पाहता तिचे 'आरोग्यदायिनी' हे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. पूवीर् घर हिंदूचे आहे, हे बाहेरच्या तुळशी वृंदावनावरून लक्षात येई. पण तिचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व वैष्णव वा हिंदूंपुरते मर्यादित नाही. बाहेर सतत वाढणाऱ्या प्रदूषणाला, स्वाईन फ्लूसारख्या नव्या नव्या साथीच्या रोगांना निदान घरापासून तरी दूर ठेवायचे असेल तर तुळशीचे रोप प्रत्येकाच्या घरात हवेच. मुंबई-पुण्यासारख्या महानगरांचे प्रदूषण कमी करायचे असेल, तर जागोजागी अखंड प्राणवायू पुरविणाऱ्या तुळशीवाटिका उभ्या करायला हव्यात. तुळशीचे हे वैज्ञानिक महत्त्व आपल्या लक्षात आले, तर 'तुलसीमहात्म्य' हा श्रद्धेचा विषय न राहता वैज्ञानिक चळवळीचा होईल. त्यामुळेच श्रीमंत माऊली प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेला तुळशी वाटप समारंभ अत्यंत स्तुत्य आणि इतरांकरिता आदर्श असा निर्माण केला आहे .
आपल्या प्रतिष्ठान कडून असेच समाज उपयोगी व वारकरी संप्रदाय प्रचार प्रसाराचे कार्य निरन्त असेच घडत राहो हि माऊली चरणी प्रार्थना  
तुळशीच महात्म्य सांगणारे अनेक अभंग आपणास संत साहित्यात पाहण्यास भेटतात त्या पैकी काही खालील प्रमाणे ,
तुळसीविण ज्याचें घर । तें तंव जाणावें अघोर । तेथें वसती यम किंकर । आज्ञा आहे म्हणोनी ॥१॥
तुळसी वृंदावन ज्याचे धरी। त्यासी प्रसन्न श्रीहरी । तें वर्जिलें यमर्किकरीं । आज्ञा आहे म्हणोनी ॥२॥
तुळसीवृंदावना । जे करिती प्रदक्षणा । अंत्त-काळां होतां स्मरण । जन्ममरण नाहीं नामा ह्मणे ॥३॥

२.
तुळसीवृंदावन दर्शन । त्यासी वैकुंठीं गमन । लटिकें ह्मणे कोण । त्यासी आण केशवाची ॥१॥
तुळसीमाळा घाली गळां । त्या भेटे घनसांवळा । चतुर्भुज सहित कमळा । केशिराज प्रत्यक्ष ॥२॥
तुळसीरोपा घाली उदक । त्याचे हरती महादोष । ब्रह्मादिकां न कळे नि:शेष । जन्ममरण त्या नाहीं ॥३॥
तुळसीची देवा बहु प्रीति । आणिक पुष्पें न लागती । नामा म्हणे जी श्रीपति । हेचि भक्ति द्यावी मज ॥४॥

३.
तुळसी पुष्पांहूनि आगळी । वृंदावनीं ते मिरवली । देवें मस्तकीं वंदिली । वंद्य झाली तिहीं लोकां ॥१॥
तुळसी वंदाची माउली । अरे हे संतांची साउली । तुळसीपासीं वनमाळी । सदा रहात असे ॥२॥
तुळसी दळ भूमीवरी पडिलें । तें जरी मस्तकीं वंदिलें । कोटी तीर्थस्नान केलें । एवढें फळ नामा म्हणे ॥३॥

४.
उभें वृंदावन जयाचिये द्वारीं । होय तो श्रीहरि प्रसन्न त्या ॥१॥
तुळसीचें रोप लावील जो आणोनि । तया चक्र-पाणी न विसंबे ॥२॥
तुळसीचें काष्ठ जपमाळ करी । तयासि श्रीहरि प्रसन्न तो ॥३॥
तुळसीची कीर्ति अगाध पैं आहे । पंध-रीसि पाहे ह्मणे नामा ॥४॥

५.
तुळसीची सेवा घडे । रंगमाळा घालूं सडे ॥१॥
दूत्त न येती तयाकडे । हरिनामाची घरटी पडे ॥२॥
नामा ह्मणे हरि-एवढें । ब्रह्म वृंदावनीं सांपडे ॥३॥

६.
फुकाचिया तुळसी वहारे । ध्रुवासारिखें पद मागारे ॥१॥
एका विठ्ठला शरण जारे । जन्म वांयां कां दवडारे ॥२॥
नामा ह्मणे हा देवो पहा रे । विठ्ठ भक्तांचा ऋणियारे ॥३॥

७.
तुळसीचें हत्यार । वृंदावन दुर्ग थोर ॥१॥
तुळसीच्या दळीं । यम जिंकिला महाबळी ॥२॥
नामा ह्मणे बळिरे बळी । विठ्ठल आमचा भुजबळी ॥३॥

८.
उठोनियां प्रात:काळीं । तुळस वंदावी माउली । तुळस संतांची साउली । मुगुटीं वाहिली विष्णूनें ॥१॥
तुळस असे ज्याचे द्वारीं । लक्ष्मी वसे त्याचे घरीं । येवोनी श्रीहरि । क्रिडा करी स्वानंदें ॥२॥
तुळसीसी मंजुरा येतां । पळ सुटे यमदूतां । अद्वैत तुळस कृष्ण स्मरतां । नासे दुरित चित्ताचें ॥३॥
जे जे तुळसी घालिती उदक । ते नर पावती ब्रह्मसुख । नामा म्हणे पंढरीनायक । तुळसी जवळी उभा असे ॥४॥

सभार :- संत साहित्य , महाराष्ट्र टाईम्स , प्रहार .

तुमचा ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू संस्कृती !

Sunday 1 June 2014

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र यांच्या वतीने पवई पोलीस ठाणे येथे निवेदन दाखल - अक्षय भोसले

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र यांच्या वतीने पवई पोलीस ठाणे येथे निवेदन दाखल ..

महाराजांचे सर्व आक्षेपार्ह सर्व प्रतिमा काढण्यात आल्या आहेत .
सर्व गोष्टीचा निषेध म्हणून २ जून रोजी पवई बंदची राजनैतिक तथा सामजिक पक्षांची हाक ..
वरिष्ठ पोलीस , पवई पोलीस ठाणे यांना देलेल निवदेन खालील प्रमाणे ..
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !
 

वारकरी तथा सर्व पक्षीय आंदोलन - अक्षय भोसले

जय शिवराय ! 

वारकरी तथा सर्व पक्षीय आंदोलन श्री
शिवाजी महाराजांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही !
या उठ आता तरी जागे व्हा !
आज ठीक ४ वाजता पवई पोलीस ठाणे येथे .
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू संस्कृती !