Wednesday 16 July 2014

सापक्षतेचा सिद्धांत - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी

|| ज्ञानेशो  भगवान विष्णू ||
सापक्षेतेचा सिद्धांत माऊलींच्या ज्ञानेश्वरीत :)



 अथवा नावे हन जो रिगे । तो थडियेचे रुख जातां देखे वेगें ।
 तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ॥
                                                     - श्री ज्ञानेश्वरी ४-९७
                                             नावेत बसून जाताना नदीच्या काठावरील झाडे धावताना दिसतात , परंतु खरे पाहिले तर ती स्थिरच असतात , कर्म आत्म्याकडून घडत नसून शरीराकडून ते घडत असते . कर्माचरण आभासात्मक आहे हे पटवून देताना ज्ञानेश्वरांनी प्रस्तुत दृष्टांत श्रोत्यांच्या पुढे ठेवला आहे . विज्ञानाच्या परिभाषेत हा " सापेक्षतेचा सिद्धांत आहे .
                                             केवळ प्रपंच ज्ञान एवढ्या मर्यादित अर्थाने ज्ञानेश्वरांनी विवेचन केले नसून , त्यातील ' सर्वसमावेशक ' अर्थ जाणून घेणे महत्वाचे आहे . दैनदिन व्यवहारातील आचारविचार  , नितीमुल्ये सर्व शास्त्रे ' प्रपंच विज्ञानात येतात असे ज्ञानेश्वरीतील बहुसंख्य दृष्टांतावरून लक्षात येते .
संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य सामझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
                           आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मच , महाराष्ट्र 

गो चिकित्सा आणि शिक्षण !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
१० वी झाली , १२ वी झाली नंतर पुढे काय ? 

१० वी १२ वी झालेल्या युवा वर्ग गोभक्त यांना सुवर्णसंधी ! 
अभ्यासक्रम निवडताना वर्तमान / भविष्य पहा …..
१० वी १२ वी नंतर उच्च शिक्षण घेण हे काळाची गरज आहे , मात्र त्या सोबतच आपण आपली परंपरा वडिलोपार्जीत जमीन आणि घरचा अर्थात गावाकडील शेती व्यसाय , पशुपालन या कडे आपण दुर्लक्ष करतो . मात्र खर धन तर तेच आहे , जर शेती नसेल तर मग अन्न कोठून ? आज जी गो माता कि भारतातील प्रत्येक व्यक्ती तीच दुध पिऊन सुदृढ झाला अगदी तीच संकटात आहे ? खुले आम कत्तलखाने आहेत . अगदी हे सार थांबवायचं आहे न आपल्याला मग काही वेगळ केल पाहिजे गाईच्या संदर्भात शिक्षण घेतल पाहिजे , गाईपासून मिळणाऱ्या घटकांपासून उदा दुध , गोमुत्र शेन आदींपासून हाजारो उत्पादन करता येतात मात्र आपण आतापर्यंत गो मातेकडे अध्यात्मिक दृष्ट्या पाहत आलो गो मातेतील विज्ञान आपण पहिलच नाही कधी ! अगदी याच साऱ्या गोष्टी आपणास कळाव्यात म्हणून आम्ही आपानाकरिता भारत सरकार द्वारे प्रवर्तित राष्ट्रीय विकास केंद्र द्वारे काही कोर्स उपलब्ध करून देत आहोत अगदी आपल नेहमीच शिक्षण , काम धंदा करत करत आपणास ते हि पूर्ण करता येईल . गो मात हेच खर धन आहे ! आपल्याला एखाद्या गोष्टीतून जर आर्थिक फायदा असेल तर आपण लगेच करतो अगदी आपण कश्या प्रकारे आर्थिक दृष्ट्या सक्षम बनू शकाल विशेष करून माझा आजचा युवा वारकरी , माझे सर्वच युवा कीर्तनकार बंधू आपण नक्कीच याची दखल घ्यावी . आपण गो चीक्त्सिक एक प्रकारे वैद्य बनू शकता सर्व कोर्से हे स्वदेशी पंचगव्यम गुरुकुलूम संशोधन केंद्र , उज्जैन
भारत सरकार द्वारा प्रवर्तित राष्ट्रीय विकास केंद्र यांच्याशी संबधित आहेत आपणास त्याच प्रमाणपत्र उपलब्ध होईल व आपण हि या शिक्षणा द्वारे गाई शी संबधित लघु उद्योग सुरु करू शकता .
* MASTER DIPLOMA IN PANCHGAVYA THERAPY
* DIPLOMA IN PANCHGAVYA THERAPY
* CERTIFICATE IN PANCHGAVYA THERAPY
प्रवेशप्रक्रिया सुरु ..
प्रवेश प्रक्रिया अंतिम दिवस :- २५ जुलै २०१४

प्रशिक्षण ठिकाण :- मधु प्रमिला दंडवते संकुल
, मुंबई - गोवा द्रुतगती मार्ग ता - पनवेल , जि - रायगड , महाराष्ट्र

सविस्तर माहिती करिता आजच संपर्क करा .
श्री अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
श्री गोरक्षनाथ घाडगे - ९९८७७८१०४३
श्री तुकाराम सांगळे – ९८९२१६६४७०

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र 

पृथ्वी चे सूर्याभोवती परिभ्रमण - शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान  विष्णू ||.
संत साहित्य आणि विज्ञान याची सांगड फार पूर्वीपासून चालत आली आहे , दुर्दैवाची गोष्ट आपण आपल्या परंपरे कडे विचारपूर्वक पाहतही नाही . लक्षात घ्या आपणच जर आपल्यापरंपरेचा अभ्यास केला नाही तर कोण करणार ? असो .

आम्हाला चवथ्या अध्याय वाचताना , श्री ज्ञानेश्वरीतील या वैज्ञानिक सिद्धांतांचे दर्शन ज्या ओविमुळे घडते ती ओवी , 
आणि उदो-अस्ताचेनि प्रमाणे। जैसे सूर्याचे न चलता चालणे। तैसे नैष्कर्म्यत्व जाणे। कर्मेचि असता॥ 
- श्री  ज्ञानेश्वरी ४-९९ 
कर्म करूनही , केलेले दिसूनही 'नैष्कर्म्य' कसे असू शकते हा विषय समजाऊन सांगताना श्री ज्ञानदेव म्हणतात , ज्याप्रमाणे आपल्याला उदय-अस्त असा सूर्याचा प्रवास , चालणे दिसते . परंतु प्रत्यक्षात सूर्य काही उगवतीकडून (पूर्वेकडून ) मावळतीकडे ( पश्चिमेकडे ) चालत नाही , त्याप्रमाणे कर्म करीत असतानाही नैष्कर्म्य अवस्था असू शकते हे जाणतो ..
 या ओवीमध्ये सूर्य उदय ते अस्त या प्रवासात सूर्य पूर्व क्षितिजाकडून पश्चिम क्षितिजाकडे फिरलेला प्रत्यक्ष दिसतो , असे दिसत असूनही प्रत्यक्षात सुर्याचे चालणे न चालता झालेले असते , असे स्पष्ट सांगितले आहे . ' न चालता सूर्याचे चालणे ' म्हणजेच सूर्य असा पूर्वेकडून पश्चिमेकडे चालत नाही . तो त्याच्या ठिकाणीच असतो . पृथ्वीच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या परिभ्रमणामुळे आपल्याला तसे वाटते . या शास्त्रीय सत्याचाच उलेख्ख या उपमेमधे केलेला आहे .
 म्हणजे पृथ्वीच्या भ्रमणामुळे उदय -अस्त असे सूर्य फिरल्यासारखे वाटते . मग पृथ्वी गोल आहे आणि ती फिरते आहे याचे ज्ञान आपल्याकडे पूर्वी होते काय , याचे अन्य प्राचीन संदर्भ आहेत काय ? असा प्रश्न उपस्थित होतो 
आणि याचे उत्तर आहे , याचे प्राचीन संदर्भही आहेत !
 आपल्याकडे अनेक पुराने ( १८ महत्त्वाची पुराणे ) उपलब्ध आहेत . त्यांचा सामन्यत : काल ५००० वर्षापूर्वीचा आहे . दुर्दैवाने त्यांच्याकडेही आपण केवळ एक "रंजक कथा" म्हणून पाहतो . त्यांच्यामधेही  असे वैज्ञानिक संदर्भ आढळतात . जिज्ञासूसाठी प्रस्तुत प्रकरणाच्या विषयाचे दोन संदर्भ देतो त्यावरून आपल्या लक्षात येईल . सुप्रसिद्ध अशा श्रीमद भागवत महापुराणामधे कर्दम प्रजापतीने आपली पत्नी देवहुती हिला तत्कालीन विमानातून भूगोल दाखविला असा स्पष्ट निर्देश आहे  
 "प्रेक्षयित्वा भुवो गोलं " पत्‍न्यै यावान् स्वसंस्थया । बह्वाश्चर्यं महायोगी स्वाश्रमाय न्यवर्तत ॥ 
                             ( - श्रीभागवत ३-२३-४३ )

देवीभागवतामधेही स्पष्ट उलेख्ख आहे कि ,
 नैवास्तमनमर्कस्य नोदयः सवकदा सतः ॥
 उदयास्तमनाख्यंहि. दर्कनादर्कनं रवः ॥ (- देवीभागवत .८-१५-२४ )
सूर्य सर्वदा आहे तसाच सत्य आहे  , त्याला अस्त नाही , उदयही नाही .
सूर्य दिसायला लागला कि उगवला म्हटले जाते . दिसेनासा झाला कि मावळला असे म्हटले जाते अस अजून बरच गूढ आपल्या संत साहित्यात आह इमात्र आपण ते चीक्तसक रित्या अभ्यासल पाहिजे ,

संदर्भ: 

१. आर्यभटीय- गोलपाद 
२. आकाशाशी जडले नाते. डा. जयंत नारळीकर. (पृष्ठ २ व ३९)
३. "Birth and Early Development of Indian Astronomy - Dr. Subhash Kak
४.  Are Aryabhata’s and Galilean Relativity Equivalent? - Roopa H. Narayan
५. A Note on Aryabhata's Principle of Relativity- Abhishek Parekh
६ . भारतीय खगोलशास्त्राचा आद्य ग्रंथ: आर्यभटीय- डा. मोहन आपटे

                           संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य सामझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते . आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा ,     लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद 
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ 
वारकरी संप्रदाय युवा मच , महाराष्ट्र 










संत साहित्य आणि विज्ञान - आपली कालगणना

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||



अत्यंत प्राचीन संस्कृती असलेल्या आपल्या या राष्ट्राचा वैज्ञानिक शास्त्र परंपरेचा आपला दिव्य वारसा , एक अमुल्य धरोहर , या विषयी आपणा स्फार्शी काही माहिती नाही . आपली संस्कृती हि उपयोग शून्य , परलोकवादी , आणि काहीशी अध्यात्मिक तत्वांची चर्चा करणारी अशा प्रकारची होती , आहे . असे पाल्याला शिकवले जाते . परंतु हा दृष्टीकोण चूक आहे . आपली संस्कृती त्याग्पूर्ण उपभोग घेत इह - प्र्लोकीचे जीव्न्न समाधानी होण्यासाठी , आदर्श जीवनाची ओळख आणि प्राप्ती करून देण्यास्तही व्यवहार आणि अध्यात्म यांचा समन्वय सांगणारी आशी थोर परंपरा आहे , या उपक्रमाद्वारे आपल्या संस्कृतीकडे विशेषता: प्राचीन ग्रंथाकडे , आणि त्यातील वैज्ञानिक माहितीकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी , एक नवीन आयाम ( Dimension) प्राप्त व्हावी अशी अपेक्षा आहे .
यासाठी आम्ही श्री ज्ञानेश्वरीतील आढळलेल्या काही वैज्ञानिक सिद्धांतांची थोडशी चर्चा या स्थानी करीत आहोत .
आपल्याकडे श्री ज्ञानेश्वरी म्हणजेच श्रीमद भगवदगीतेचे भावार्थ दीपिका प्राचीन मराठी भाषेतील ओवीबद्ध टीका ग्रंथ , हा एक अद्भुत ग्रंथ आहे असे मानले जाते . मुख्यत : अध्यात्मिक , परमार्थिक क्षेत्रातल्या या ग्रंथात विज्ञानाच्या अनेक शाखा मधल्या सिद्धांत संदर्भ आढळतात , कि जे पाश्चिमात्य शास्त्रज्ञ यांच्या बद्दल , आणि त्यांच्या संशोधनाबद्दल संपूर्ण आदर ठेऊनही असे म्हणावेसे वाटते कि आपल्याकडे या सिद्धांतांची माहिती फार प्राचीन काळा पासून चालत आलेली होती . अशा काही गोष्टी आपल्या पुढे मांडण्याचा हा प्रयत्न आहे .
श्रीमद्भगवत गीता किंवा ज्ञानेश्वरी या ग्रंथांचे श्रेष्ठत्व , महात्म्य हा एक स्वतंत्र्य विषय होऊ शकेल , तथापि अगदी थोडक्यात सांगयचे तर ' नेमक काय करावे ' हे न समजणारा , गोंधळलेला अर्जुन हा आपणासारख्याच सर्वसामन्य माणसांचा प्रतिनिधी आहे , आपल्यापुढे अशा प्रकारची किंकर्तव्यविमूढ अवस्था अनेकवेळा असते . भ्रांतचित्त अशा अर्जुनाबरोबर भगवान श्रीकृष्ण समरांगणावर जी दिव्य चर्चा केली , जिचे संपादन महर्षी व्यास यांनी महाभारतात केले , ती म्हणजे श्रीमद्भगवत गीता . या गीतेमधील त्त्वज्ञानामुळे अर्जुनाचा वैचार्क गोंधळ संपला , आणि तो ' करिष्ये वचनं त्व ' असा निश्चय करून भगवत कार्य म्हणून केलेल्या महा संग्रामात विजयी झाला .
अत्यंत अर्थगर्भ असलेली संस्कृत भाषेतील हि गीता जनसामन्य यांना समजावी यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेचा भावार्थ प्राकृत अशा मराठी भाषेत ओविरुपात सांगितला . या ज्ञानेश्वरीचा मुख्य विषय जरी भगवतगीतेचा भावार्थ असला तरी त्याच्या अनुषंगाने विविध वैज्ञानिक सिद्धांत प्रगट दिसतात , त्याकडे माही जिज्ञासूंचे लक्ष वेधू इच्छितो .
हे वैज्ञानिक संदर्भ श्री ज्ञानदेवांना माहित होते असे म्हणणे आमच्या औध्दत्याचा भाग ठरू शकतो . कारण श्री ज्ञानदेव तर "ज्ञानियांचा राजा गुरु महाराव " असे जगद्गुरू श्री तुकोबाराय म्हणतात , त्यांना अज्ञात असे काही नसणारच , परंतु आम्हाला इथे म्हण्याचे आहे कि , हे वैज्ञानिक संदर्भ श्री ज्ञानदेवांच्या श्रोते यांना हि परिचित होते . कारण हे सगळे संदर्भ उपमेच्या स्वरूपात आढळतात . आणि अपरिचित गोष्टींची उपमा उपयोगाची नसते , उपमा हि परिचित गोष्टींची असली पाहिजे हे अगदी स्पष्ट आहे .
सर्व प्रथम आपण श्री ज्ञानदेवांच्या काळाचा विचार करू , ग्रंथाचा समारोप करताना अस लिखाण उपलब्ध आहे कि ,
शके बाराशते बारोत्तरे | तैं टीका केली ज्ञानेश्वरें |..... ( ज्ञानेश्वरी अध्याय १८ / १८१० )
शके १२१२ म्हणजे युगाब्ध ४३९२ . सामन्यपणे इसवीसन १२९० . याचा विचार करण्याचे कारण म्हणजे पाश्चात्य शास्त्रज्ञानांचा काल आणि श्री ज्ञानेश्वरी काल यानाचा तौलनिक विचार केला पाहिजे . ' निकोलस कोपर्निकस ' , ज्यांचा जन्म इ.सन.१४७३ चा त्यांचे संशोधन ' कोमेंट्रीऑल्स ' सन १५३३ मध्ये किंवा ' रीव्होल्यूशनिबस ' हा ग्रंथ इ.सन.१५४३ मधला . श्री ज्ञानेश्वरी नंतर सुमारे २४३ वर्ष ' योहान केप्लर ' जन्म इ.सन. १५७१ यांचेच समकालीन ' गलिलिओ ' , ज्यांनी पृथ्वी फिरते असे संगीतले त्यांचा कालावधी श्री ज्ञानेश्वरी नंतर २८१ वर्षे , गुरुत्व आकर्षण सिद्धांत मांडणारे ' आयझक न्यूटन ' ज्यांचा सिद्धांताचा ग्रंथ " प्रींकपिया " प्रकाशित झाला , त्याचा कालावधी इ.सन.१६६६ ते १६८५ म्हणजे श्री ज्ञानेश्वरी नंतर ३७६ वर्षे . ' अल्बर्ट आईन्स्टाइन ' यांनी विविक्षित सापेक्षता सिद्धांत ( Special Relativity ) सांगितला इ.सन.१९०५ मध्ये आणि व्यापक सापेक्षता ( General Relativity ) सिद्धांत सांगितला इ.सन.१९१५ मध्ये . हा कालावधी "श्री ज्ञानेश्वरी "नंतर ६१५ वर्षे .
आजकाल २१ व्या शतकाच्या गोष्टी केल्या जातात , पण आपण विसरलो आहोत आपले कलियुगाचे ५२ वे शतक चालू आहे . कालमापनाची आपली प्रचीत पद्धत शालिवाहन शक नाही . युगांची वर्षे अर्थात युगाब्द मोजण्याची आपली पद्धती आहे . चार युगांचे एक युगचतुष्क म्हणजे मानवी ४३ लक्ष २० सहस्त्र वर्षे . ज्यातील चार युगांची वर्षे पुढील प्रमाणे आहेत , पहिले कृतयुग १७,२८,००० वर्षे . दुसरे त्रेतायुग १२,९६,००० वर्षे , द्वापारयुग ८,६४,००० वर्षे आणि चवथे कलियुग ४,३२,००० वर्षे , या आपल्या गणनेप्रमाणे कलियुगाचे ५१०७ वे वर्ष चालू आएह ,कालमापनाची व्याप्ती केवढी आहे , हे जाताजाता लक्षात घ्या , आपल्याकडे एक परमाणु म्हणजे सामान्यत : १.०९७४ * १०'-५ सेकंद इथपासून आदिशक्तीचे आयुष्य ३.७६०५*१०'५३ पर्यंत विचार उपलब्ध आहे म्हणजे जवळपास ५८ दशमस्थानंचा विचार उपलब्ध आहे , अशा अत्यंत प्राचीन परंपरेचा वारसा असणारे आपण आहोत , आजची युवा शक्ती एकत्र आली पाहिजे आपल्या संत साहित्यात जितक ज्ञान आहे तितक जागच्या पाठीवर कुठेच उपलब्ध नाही .
तळमळ इतकीच कि आपण सर्वांनी आपल संत साहित्य वाचल पाहिजे
मुळात हे सर्व " श्री ज्ञानेश्वरीतील विज्ञान दर्शन अर्थात वैज्ञानिक सिद्धांताचे संदर्भ "
आदरणीय नीलकण्ठ अनन्त आठवले जी
श्री वरदानंद भारती प्रतिष्ठान , श्री क्षेत्र पंढरपूर आणि असंख्य संत साहित्य गाढे अभ्यासक यांच्या पुस्तकात उपलब्ध आहे मात्र ते आजतागायत अनेकांपर्यंत पोहचल नाही कारण ते पुस्तक जे वाचेल त्यांच्या पर्यंत फक्त पोहचत मात्र तेच अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य सामझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते . आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच नवीन सिद्धांतासोबत भेटूयात .
आपला
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ 
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र


संत साहित्य आणि विज्ञान - अक्षय भोसले

संत साहित्य आणि विज्ञान !
लवकरच ज्ञानेश्वरीतील तात्विक आणि त्यातील विज्ञान असे काहीस नक्कीच आपल्या पुढे मांडू लिखाण संकलन सुरु आहे वैज्ञानिक सिद्धांतांचे संदर्भ अनेक ज्ञानेश्वरीत आलेत आपण चीक्त्स्क रित्या ते पाहत नाहीत आजची युवा पिढी या माध्यमातून तरी का होईना संत साहित्य वाचेल व त्यातील त्यांची रुची वाढेल हा आमचा यातून प्रयत्न राहील .
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२  
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र