Saturday 20 May 2017

आदिशक्ती संत मुक्ताई ७२० अंतर्धान समाधी सोहळा - २०१७

आदिशक्ती संत मुक्ताई ७२० अंतर्धान समाधी सोहळा - २०१७

▪श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र मुक्ताईनगर

▪श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र मुक्ताईनगर

दि.२१ मे  २०१७  रोजी भगवान श्रीविठ्ठल  व संत निवृत्तीनाथमहाराज हे स्वतः या उत्सवाला येत आहेत .
संत मुक्ताई जेव्हा अंतर्धान पावल्या त्यावेळी स्वतः भगवंत व संत निवृत्तीनाथ उपस्थित होते .
म्हणून
श्रीविठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या वतीने श्रीपांडुरंगाच्या व श्रीसंत निवृत्तीनाथ संस्थान , त्र्यंबकेश्वर च्या वतीने श्री संत निवृत्तीनाथांच्या चरण पादुका  मुक्ताईनगर येथे येणार आहेत .
अत्यंत सुंदर व भव्य असा हा सोहळा आहे . आज दोन्ही पालख्यांचे स्वागत भुसावळ येथे करण्यात आले .

#अक्षयवारी

मुक्ताईनगर वृत्त प्रतिनिधी - श्रीज्ञानेश्वरजी  हरणे
अध्यक्ष - वारकरी संप्रदाय युवा मंच , मुक्ताईनगर

Varkariyuva.blogspot.in

Thursday 18 May 2017

आपल्या स्मार्ट फोनवर पंढरीची वारी ...!

।। ज्ञानेशो भगवान विष्णू :।।

आजच्या तरुणांना आधात्म्याची गोडी फार कमी आहे. मात्र वारकरी संप्रदायाची प्रथा अशीच अविरत पुढे सुरू ठेवण्याकरता आम्ही तरुणांना पर्यंत संत साहित्य पोहचविण्याकरिता सोशल मीडियामार्फत पाऊल उचलले आहे .परमार्थात तरूणाची गरज आहे
श्रीमाऊलींनी सकल तरूण वर्गाला हाच संदेश दिला
परमार्थ तरून वयातच होतो .श्रीतुकोबारायांना हेच अपेक्षित आहे .
तरणा भाग्यवंत । नटे हरि किर्तनात ।।
मागील ३ वर्षांपासून अपणास थेट आपल्या व्हाट्सअप्प वर वारीचे व वारकरी संप्रदायक अभंग निरूपण आदी उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत . आपण सारे भाविक मग त्यात कोणी विद्यार्थी , शिक्षक , डॉक्टर , कोपरेट्स ऑफिस , गृहिणी , वृद्ध अबाल  आदी सर्वांना वारीला येण्याची तीव्र इच्छा असते मात्र कामाअभावी तथा इतर काही तांत्रिक अडचणी मुळे येणे शक्य होत नाही याचाच विचार लक्षात घेत . प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर व प.पू. श्रीगुरु श्रीप्रमोदमहाराज जगताप यांचे अभंग निरूपण व वारी तसेच वारकरी विश्वातील सर्वच अपडेट आपणास आता घरबसल्या स्मार्टफोन वर उपलब्ध होणार आहेत .

हेची व्हावी माझी आस। जन्मोजन्मी तुझा दास।।
पंढरीचा वारकरी ।वारी चुको नेदी हरी।।
संत संग सर्वकाळ। अखंड प्रेमाचा कल्लोळ ।।
चंद्रभागे स्नान। तुका मागे हेचि दान ।।

*विशेष सहकार्य*  -

संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर , त्र्यंबकेश्वर

संत ज्ञानेश्वरमहाराज संस्थान , आळंदी  व श्रद्धेय श्रीबाळासाहेबचोपदार / श्रद्धेय  श्रीराजाभाऊ चोपदार

संत मुक्ताई संस्थान , मुक्ताईनगर

अपडेट मिळवण्यासाठी -

८४५१८२२७७२  या क्रमांकावर '' वारी '' हा संदेश पाठवावा व या उपक्रमात सामील व्हावे .व इतरांना ही अवश्य ही माहिती द्या .

आपल्या सेवेत सदैव तत्पर  -
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

varkariyuva.blogspot.in

Saturday 13 May 2017

वृंदावन म्हणजे काय ? - प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर

( प.पू. श्रीगुरु महाराजांनी आजच्या कथा सत्रात वृंदावन या संदर्भाने अनेक व्याख्या सांगीतल्यात त्यापैकी एक )

गोपिका अखंड चिंतन भगवतांच करत होत्या . खर प्रेम ते आहे. पूर्वराग रस सरोवरामध्ये फुललेल एक कमळ . त्या कमळातल्या कर्णिक (केसर ) म्हणजे गोपिका आहेत . त्या कर्णिके वरती जे बारीक बारीक पराग कण असतात तो पराग कण म्हणजे परमात्मा आहे. त्या पराग कणांचा मकरंद म्हणजे राधा आहे आणि राधेचे हृदय म्हणजे वृंदावन आहे .

- प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर
श्रीभागवत कथा निरूपण , फोगला आश्रम - श्रीक्षेत्र वृंदावन  कथेतून साभार

(प्रथम दिन - दि.१३ मे २०१७ )

संकलन - अक्षय चंद्रकांत भोसले

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
Varkariyuva.blogspot.in

भागवत ही एक कोळश्याची खान आहे - प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर

भागवताच्या संदर्भाने माझ्या मनात नेहमी एक येणार विचार    रूपक अलंकारातून व्यक्त करतो . भागवत द्वादश स्कँदाने युक्त आहे . १२ स्कँद आहेत भागवताचे . काय आहे हे भागवत . माझ्या दृष्टीने जर विचार कराल तर भागवत ही एक कोळश्याची खान आहे . कोळश्याची खाणीमध्ये मनुष्य जर उतरला आणि एका बाजूने खाली उतरून दुसऱ्या बाजूने वर चढला आणि बाहेर पडला . कुठल्या भिंतीला स्पर्श झाला नाही . कुठल्या भिंती ला कपडे लागले नाहीत . काही नाही. पण बाहेर पडताना तो काळा होऊनच बाहेर पडणार हे नक्की आहे .त्यात ही पांढरे शुभ्र कपडे घालून तो आत उतरला तर अधिक चांगले . आत जाताना तो पांढरा स्वच्छ असतो येताना तो बाहेर निघताना काळा कुळकुळीत होऊन बाहेर पडतो . फक्त कपडे पांढरे असले पाहिजेत .मग तिथल्या भिंती ला स्पर्श नाही झाला , कशाला हात नाही लावला , काही घासल नाही गेल तरी चालेल नुसतं या दारातून जा , त्या दारातून बाहेर पडा . काळेपणा येणार .तस भागवत ही एक कोळश्याची खाण आहे.आपण फक्त एवढंच करायचे की शुद्ध अंत:करण घेऊन याच्यात उतरायचं .मग आम्हाला कोणती कथा कळली नाही तरी चालेल आम्हाला त्याच्यातील तत्वज्ञान कळलं नाही तरी चालेल आम्हाला त्याच्यातील प्रेमाच्या व्याख्या नाही कळल्या तरी चालतील . आम्ही भागवताच्या प्रथम स्कँधातून आत उतरायचं शुभ्र कपडे घालून शुभ्र अंत:करण घेऊन आणि द्वादश स्कँधातून बाहेर पडायचं आपल्याला सुद्धा पांडुरंगाचा रंग लागल्याशिवाय राहणार नाही तो काळा होणारच आहे . भागवताच हे महात्म्य आहे . भागवत हर करत तुमच्या माझ्या करिता . भागवताने हे केलेलं आहे अनेकांच्या जीवनामध्ये , आपल्यावर जबाबदारी एवढीच आहे की आपण फक्त शुभ्र कपडे घालायचे .आपण फक्त अंत:करण शुद्ध ठेवायचं .

- प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर
श्रीभागवत कथा निरूपण , फोगला आश्रम - श्रीक्षेत्र वृंदावन  कथेतून साभार
फोटो - श्रीनिलेश ढोमसे

संकलन - अक्षय चंद्रकांत भोसले
varkariyuva.blogspot.in

Friday 12 May 2017

प.पू.श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर - भागवत भाव कथा निरूपण ( प्रथम दिन )

भगवंताची कृपा झाली तरच भगवंतांची कृपा होते . - प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर

श्रीक्षेत्र वृंदावन :)

Thursday 11 May 2017

श्रीक्षेत्र वृंदावन - प.पू.श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांचा संदेश ..!

श्रीक्षेत्र वृंदावन श्रीमद्भागवत भाव - कथा  मार्गदर्शिका पुस्तिकेतून साभार  -

प.पू.श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांचा संदेश ..!

श्रीक्षेत्र वृंदावन येथे होणाऱ्या श्रीमद्भागवत भावकथा सोहळ्याची मार्गदर्शक पुस्तिका भाविक यांत्रिकांच्या हाती देताना अत्यंत आनंद होतो आहे . यावर्षी आमचे मुळपुरुष सद्गुरू श्रीगुंडामहाराजांच्या समाधी सोहळ्यास दोनशे वर्षे व सद्गुरू श्रीमहाराजांच्या व सौ. अम्मांच्या सहगमनाला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने मी ही प्रथमच श्रीमद्भागवत सांगण्याचा प्रयत्न करीत आहे . भगवंताच्या व सद्गुरुंच्या कृपेने या सर्व कार्यास यश येईलच !

श्री वृंदावन हे भगवंताचे भक्तांसमवेत लीला करण्याचे अत्यंत आवडते स्थान ! भक्ताला भावविभोर करणाऱ्या व स्मरणाने पुन:प्रत्ययाचा आनंद देणाऱ्या लीला येथेच घडल्या ! त्याच ठिकाणी आपणा सर्वांच्या साक्षीने व साह्याने श्रीमद्भागवताची व भगवंताची सेवा करण्याचे भाग्य मला  व सद्गुरू सेवा समितीस प्राप्त होते आहे. ही यात्रा व हा सोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी केलेल्या सर्व नियोजनाचा तपशील  या मार्गदर्शिकेमध्ये समाविष्ट केला आहे . आवश्यक तेथे  योग्य व्यक्तींशी संपर्क करून समस्यांचे निराकरण करून घेण्यास ही पुस्तिका  उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो . सर्व संभाव्य अडचणींचा विचार केला आहेच . सूचनांचे पालन होईल तर शक्यतो अडचणी येणार नाहीत तथापी नवा प्रांत , नवे वातावरण , नवी भाषा यामुळे गोंधळ झाला तर सुकाणू समितीतील कोणासही  केव्हाही संपर्क करता येईल .

कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून आपलेही सहकार्य अपेक्षित आहेच ! वृंदावनविहारीची सर्वांवर कृपा व्हावी ही प्रार्थना !

- श्रीचैतन्य भानुदासमहाराज देगलूरकर

संपर्क -  सद्गुरू सेवा समिती , श्रीक्षेत्र पंढरपूर
९८२२०२९१३७ /९४२१३६१४३९/९४२१३६१४३९/
९४२२२४१६९२/९२२५३४०००२

-  varkariyuva.blogspot.in

Monday 8 May 2017

आर्ट ऑफ लिव्हिंग कडून श्रीअक्षयमहाराज भोसले यांचा गौरव ...!

दै. पुण्यनगरी /  स्मार्ट मुंबई - पृष्ठ क्र ०१ ( मुंबई आवृत्ती )

दै. पुण्यनगरी / स्मार्ट सातारा - पृष्ठ क्र ०२ ( सातारा आवृत्ती ) दि.०९ मे २०१७


दै. पुढारी - माय मुंबई  -  महत्त्वाचे मुंबई सदर - पृष्ठ २ ( दि.०९ मे २०१७  )


दै. सकाळ.  दि.१० मे २०१७ ( मुख्य पुरवणी पृष्ठ ०३- दृष्टीक्षेपात सातारा जिल्हा ) - सातारा आवृत्ती