Friday 7 February 2014

परमार्थ सांडून प्रपंच करिसी | तरी तू येम यातना भोगिसी | - दासबोध " सुजनवाक्य "

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||

आज दासबोध जयंती  आणि योग योग असा कि आजच सुजन वाक्य हे हि रामदास स्वामीयांच्या दासबोधातील  

परमार्थ सांडून प्रपंच करिसी |
तरी तू येम यातना भोगिसी |

' परमार्थ ' हा शब्द ज्यांच्या गावीही नाही अशी निव्वळ प्रपंचात अडकलेली जी माणसे आहेत , त्यांचा विचार समर्थ रामदासस्वामी जी पुढील ओवीत प्रतिपादन करतात ..

परमार्थ सांडून प्रपंच करिसी |
तरी तू येम यातना भोगिसी |
संसाराच्या राहटगाडग्यात अनेक लोक परमार्थ करावयाचे विसरून जातात . परमार्थ म्हणजे आयुष्याच्या शेवटी म्हातारपनात करण्याचा उद्योग असाही सोयीस्कर अर्थ अनेकजण लावतात . सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहलेली ज्ञानेश्वरी माणसे एकष्टव्या वर्षी वाचतात याला काय म्हणावे ? प्रपंच करताना परमार्थाचे विस्मरण झाले तर त्याची फलश्रुती ठरलेली आहे .अशा व्यक्तीला यम यातना भोगाव्या लागतील . श्री संत ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात , जे लोक हरिस्मरण करीत नाहीत ; असे लोक यमाचे पाहुणे असतात . यमराज त्यांचे आदरतिथ्य करतात .

हरिविण जन्म नर्कचि पै जाणा | यमाचा पाहुणा प्राणी होय || - संत ज्ञानेश्वर महाराज

श्री संत नामदेव महाराज म्हणतात . प्रपंचाच्या नादात , धनाच्या आणि मनाच्या मदमस्ती मध्ये जो देवाचे नामस्मरण करीत नाही , त्याला यमदंड सोसावा लागतो .

धन मान बळ नाठविसी देवा | मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे ||
यमाचे यमदंड बैसतील माथा | तेव्हा तुझा रक्षिता कोण आहे || - संत नामदेव महाराज

श्री संत तुकाराम महाराज या यातनांचे वर्णन करताना म्हणतात कि ; यमाला करुणा माहीत नाही . ओढाळ जनावर हाती लागल्यावर मालक जसा त्याला बेदम मारतो , तशी अवस्था होते .

नाही त्या यमासी करून | बाहेर काढीता कुडी प्राणा |
ओढाळ सापडे बैसतील माथा | तेव्हा तुझा ताक्षिता कोण आहे || - संत तुकाराम महाराज

समर्थ रामदासस्वामी त्याकरिता एक दृष्टांत देतात , कामगार कामावर गेला नाही तर साहेब त्याला ज्याप्रमाणे दंड करतो , तसा परमार्थ ण केला तर प्रपंचीकला यमदंड ठरलेलाच आहे .

साहेब कामास नाही गेला | गृहीच सुखडोनि राहिला |
तरी साहेब कुटील त्याला | पाहाती लोक || - दासबोध
म्हणून परमार्थ सांडून सुखाने नुसता प्रपंच करीत राहिल्यास तर अंती यमयातना भोगाव्या लागतील आणि तुला दुख प्राप्त होईल .

:- श्री महंत प्रमोदजी महाराज जगताप

जास्ती जास्त मित्र परिवारपर्यंत हि पोस्त आपण पोहचवा स्वत : हि आनंद घ्या आणि इतरांना हि द्या .
वारकरी संप्रदाय युवा मंच ,महाराष्ट्र राज्य - ८४५१८२२७७