Tuesday 6 December 2016

श्रद्धेय दिनकरराव देशपांडे , कोरंगळेकर यांचे वैकुंठगमन !

पूज्य श्रीदेगलूरकर परंपरेचे निष्ठावंत भक्त ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व श्री.दिनकरराव देशपांडे,कोरंगळेकर यांचे अल्पशा आजाराने  देहावसान ..!

तूं मनबुद्धि साचेंसीं । जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी ।

तरी मातेंचि गा पावसी । हे माझी भाक ॥ ७९॥

या भगवंतानी दिलेल्या अभिवचनाचा प्रत्यय आपण दिनु काकांच्या जीवन प्रवासात पहात आहोत.. 

अवघे आयुष्य श्रीसद्गुरु सेवा आणि त्यायोगे भगवद् चिंतनात उजळुन गेले. 

तेविं सदभ्यासें निरंतर । चित्तासि परमपुरूषाची मोहर ।

लावें मग शरीर । राहो अथवा जावो ॥ ८२ ॥

जें नानागतीतें पाववितें । तें चित्त वरील आत्मयातें ।

मग कवण आठवी देहातें । गेलें की आहे ॥ ८३॥

पैं सरितेचिनि ओघें । सिंधुजळा मीनलें ओघें ।

तें काय वर्तत आहे मागें । म्हणोनि पाहों येते ॥ ८४॥

ना तें समुद्रचि होऊन ठेलें । तेविं चित्ताचें चैतन्य जाहालें ।

जेथ यातायात निमालें । घनानंद जें ॥ ८५॥

त्यांची जीवनगंगा अशी समुद्रच बनुन राहीली आहे.. 

श्रीसद्गुरु माऊली त्यांच्या तनुत्याग प्रसंगी सोबतच आहेत कारण, 

म्हणोनि देहांतींचें सांकडें । माझियां कहींचि न पडे ।

मी आपुलियांतें आपुलीकडे । सुखेंचि आणीं ॥ १३४॥


श्रद्धेय दिनू काकांच्या चरणी प्रणाम तथा भावपूर्ण श्रद्धांजली ..!

- समस्त वारकरी संप्रदाय युवा मंच परीवार

आशीर्वाद संतांचे - प.पू. श्रीसंत शांतिब्रह्म गुरुवर्य मारोतीबाबा कुऱ्हेकर

प.पू. शांतिब्रह्म गुरुवर्य संत श्रीमारोतीबोवा कुऱ्हेकर
(अध्यापक - वारकरी शिक्षण संस्था , श्रीक्षेत्र आळंदी देवाची ) यांच्या पावन सानिध्यात ...!

प.पू. श्रीगुरू श्रीप्रमोदमहाराज जगताप यांच्या अमृतमय वाणीतून श्रीमद दासबोध निरुपण कथा ...!

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

प.पू. श्रीगुरू श्रीप्रमोदमहाराज जगताप यांच्या अमृतमय वाणीतून श्रीक्षेत्र टाळगाव चिखली येथे श्रीमतदासबोध निरुपण कथा प्रारंभ ...!

प्रथम दिनी प्रमुख पूज्य उपस्थिती
प.पू. गुरुवर्य शांतीब्रह्म श्रीमारोतीबोवा कुरेकर

गुरुवर्य श्रीबाजीरावनाना चंदीले
सचिव - वारकरी शिक्षण संस्था

श्रीसदानंदमहाराज बग
कानिफनाथ प्रतिष्ठान तथा सल्लागार समिती - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

व मान्यवर

- श्रीदत्तगुरु सेवा मंडळ , श्रीक्षेत्र टाळगाव

varkariyuva.blogspot.in