Saturday, 29 October 2016

हुतात्मा नितीनसाठी आकाशदिवे उतरवले

सांगली - जम्मू-काश्‍मिरमधील कुपवाडा जिल्ह्यात मच्छिल सेक्‍टरमध्ये पाकिस्तान सीमेवरून झालेल्या गोळीबारात जिल्ह्यातील दुधगाव (ता. मिरज) चा सुपुत्र सीमा सुरक्षा दलाचा जवान नितीन सुभाष कोळी (वय 32) हा शहीद झाला. काल रात्री साडे दहाच्या सुमारास तो गोळीबारात जखमी झाला होता. पहाटे अडीचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी दुधगाव येथे नितीन शहीद झाल्याचे समजताच संपूर्ण गाव बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. घरावरील आकाश कंदील उतरवले. तसेच फटाके न वाजवण्याचा निर्णय घेतला.

दुधगाव येथे दहावीपर्यंत शिक्षण झालेला नितीन 2008 मध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये भरती झाला. 2010 मध्ये त्याचा विवाह संपदा हिच्याशी झाला. त्यांना देवराज (वय 4), युवराज (वय 2) ही दोन मुले आहेत. वडील सुभाष, आई सुमन, भाऊ उल्हास असा नितीनचा परिवार आहे. गणेशोत्सवात नितीन गावी आला होता. त्यानंतर त्याचा मोबाईलवरून कुटुंबाशी संपर्क असायचा. काल दुपारीच त्याने घरी मोबाईलवर कुटुंबाशी अखेरचा संवाद साधला. दिवाळीनंतर 5 नोव्हेंबरला घरी येणार असल्याचे त्याने कळवले होते. परंतू आज सकाळीच तो शहीद झाल्याची दु:खद बातमी भाऊ उल्हास याला सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी कळवली. भाऊ शहीद झाल्याचे वृत्त ऐकताच त्याला धक्का बसला. स्वत:ला सावरत त्याने वडीलांना हकीकत सांगितली.

दरम्यान गावातील नितीन शहीद झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरताच शोककळा पसरली. ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवले. घरावर लावलेले आकाशकंदील खाली उतरवले. ग्रामपंचायतीजवळ शोकसभा झाली. सरपंच सुरेखा आडमुठे, पंचायत समिती सदस्य प्रमोद आवटी, उपसरपंच संजय देशमुख, माजी सरपंच विलास आवटी आदींनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. गावचा सुपुत्र नितीन शहीद झाल्यामुळे सर्वांनी यंदाची दिवाळी साधेपणाने साजरी करावी असे ठरले. गावात फटाके वाजवू नयेत असे आवाहनही केले.

अखेरचा संवाद साधला..
नितीनने काल दुपारी अडीचच्या सुमारास मोबाईलवरून कुटुंबाशी संवाद साधून दिवाळीनंतर येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आठ तासांनी रात्री साडे दहा वाजता मच्छिल भागात पाकिस्तानी सीमेवरून झालेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. उपचार सुरू असताना पहाटे अडीच वाजता तो मृत झाला. मोबाईलवरून त्याने कुटुंबाशी साधलेला संवाद अखेरचा ठरला.

तो दिवाळीला नाही आला, आली ती बातमीच...
नितीनने काल दुपारीच बोलताना दिवाळीनंतर 5 नोव्हेंबरला येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. परंतू आज सकाळीच भाऊ उल्हास याला तो शहीद झाल्याची बातमी समजली. दुपारपर्यंत नितीनची आई, पत्नी आणि मुलांना नितीन शहीद झाल्याचे सांगण्यात आले नव्हते.

उद्या पार्थिव येणार-
नितीनचे पार्थिव रविवारी सायंकाळपर्यंत गावात आणले जाईल असे सांगण्यात आले. त्यानंतर शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सोशल मिडीयावर श्रद्धांजली
पाकिस्तानच्या गोळीबारात नितीन शहीद झाल्याची बातमी आज फेसबुक, व्हॉटस्‌ ऍपवर पसरली. अनेकांनी ती फॉरवर्ड करून शोक व्यक्त केला. तसेच पाकिस्तानचा निषेध व्यक्त केला.

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
   - Varkariyuva.blogspot.in

Friday, 28 October 2016

मा.श्री.प्रभाकरजी देशमुख (आय.ए.एस.) यांच्यासमवेत दीपावली ..!

मा.श्री.प्रभाकरजी देशमुख  (आय.ए.एस. ) - कोकण विभागीय आयुक्त यांच्यासमवेत ह.भ.प.श्रीअक्षयमहाराज भोसले - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र 
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ...!

Tuesday, 25 October 2016

वसुबारस आणि दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ..!

।। ज्ञानेशो भगवान विष्णु :।।
तैसे गीतेचे हे दुभते । वत्स करुनि पार्थाते । दुभीनली जगापुरते । श्रीकृष्ण गाय ।। - ज्ञानेश्वरी १८-७८-१६९०

आज वसुबारस . दिपावलीचा पहिला दिवस . शारीरिक पुष्टि करिता लाडू , चिवडा ई चा फराळ कराच . परंतु आत्मोन्नतीसाठी गीतारुपी श्रीकृष्ण मातेचे ज्ञानेश्वरी मधील ओवीरुपी दुग्ध प्राशन करून आत्मबळाने संपन्न व्हा !
वसुबारस आणि दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ..!
- अक्षय चंद्रकांत भोसले
     ०८४५१८२२७७२

Saturday, 15 October 2016

प.पू.श्रीगुरु श्रीप्रमोदमहाराज यांच्या अमृतमय वाणीतून सुवर्ण कलशरोहन समारंभ प्रसंगी आशीर्वादपर संकीर्तन ..!

कोजागिरी पौर्णिमा ☺

आगा विश्वाईक धामा । तुझा प्रसादु चंद्रमा । करू मज पौर्णिमा । स्फूर्तीचीजी ।।

- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी

कोजागिरी पौर्णिमेच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा !

- वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
Varkariyuva.blogspot.in

Wednesday, 12 October 2016

सस्नेह निमंत्रण - सुवर्ण कलशारोहन ...!

निमंत्रक : श्री प्रमोदमहाराज पवार
अध्यक्ष : वारकरी संप्रदाय युवा मंच , पिंपरी चिंचवड

करावी तें पूजा मनेचि उत्तम ।

|| ज्ञानेशो भगवान विष्णु : ||

करावी तें पूजा मनेचि उत्तम । लौकिकाचे काम काय असें ॥ १ ॥
कळावें तयासी कळे अंतरिचे । कारण ते साचे साच अंगीं ॥ २॥
अतिशयाअंतीं लाभ किंवा घात । फळ देते चित्त बीजाऐसे ॥ ३ ॥
तुका म्हणे जेणे राहे समाधान । ऐंसे ते भजन पार पावी ॥ ४ ॥


इंग्रजी तथा मराठी या दोन्ही भाषेतील निरुपणासमवेत

English   Meaning :

One should rather perform worship in mind. (मानसपूजा Then there is no need for the ritualistic worship . || 1||
Such a worship , done with full concentration of mind is the true worship | When one worships God like this then He knows this ( because He can understand the thoughts in the mind.)|| 2 ||
Any activity when done intensely ; results (gives) either some benefits or some Losses., it all depends upon what the intention is there in the mind || 3||
Tuka says that one should do the worship which give satisfaction to the mind . Such worship results in Liberation|| 4 ||

Back ground Information:

Generally when a person understands meaning of some major attributes of God such as (Omniscient, Omnipresent, Omnipotent सर्वज्ञ ,सर्वव्यापीसर्वशक्तिमान, ), then one looks upon the God as His Father, or Mother or Friend, or Child, or Lover as per the likes of the individual. The relationship thus develops between the devotee and the God. It is not possible to imagine the God without form( निर्गूण ) and therefore it is one does the worship of the Form of God he/She most likes. ( Such Srirama, Srikrishna, Goddess Lakshmi , Swastika, , etc ) Sri.Ramakrishna Paramhansa says that Body and Shadow both are the same.

We have seen earlier that there are Nine ways one can worship the God (नवविधाभक्ति).
One of these is Archanbhakti ( अर्चनभक्ती) in which the devotee worships the God in some form .Here the devotee offers to his God all that generally is offered to a VIP( Very Important Person) when such a VIP visits the house.

This is a popular form of Image worship .(मूर्तीपूजा) , sometimes the images are replaced with symbolic objects such as  , shaligramaa, shivalingaa etc. In our country many families have the practice of performing the worship daily . One major advantage is that , we at least remember Him during this worship.
To perform the worship our Shastras have prescribed some specific method namely Worship with 16 steps,षोडशोपचार पूजा ) The . There is a shorter version in which five steps are followed..(पंचोपचार पूजा) .However we need many material objects such as flowers, Lamp, Incense Sticks, Betel leaf and nut, cloths, etc. and of cource the food articles. This type of worship is External and is said to be necessary since it leads to concentration. When the concentration becomes deep then external rituals drop off themselves .
Internal worship is called (मानसपुजा)manasapuja. It is actually meditation which may be a simple process of contemplation on the God with form.
Sant Tukarama is praising this form of worship in this abhanga.

Meaning of the Abhanga:

In the beginning itself Sant Tukarama Maharaj is saying that Manasapuja is better . It does not require any external objects. All one has to do is contemplate on God.
He further says that God knows what is there in your mind. He will give you whatever you want . ( However , we must remember here that there is a need of complete surrender to Him. Then only it becomes clear and accepted by our mind that all that happens is for our welfare only.)
The third stanza of this abhanga is very important. Here Tukarama maharaja says that when one prays to the God with intense desires , it may result in getting some benefits, or it may result in some losses. However both are of temporary nature. It is far superior worship where one is not asking anything from our God except love for Him and for all that he has created. Gita calls it ( निष्काम भाव) . It leads to pure satisfaction for the devotee. The devotee then accepts whatever happens around him without getting disturbed. His love for God does not diminish due to problems he faces.
In Srimad Bhagavad gita the Lord has assured that He takes care of such a devotee.
That is why in the last stanza Sant Tukaram maharaj is advocating that this kind of Meditation ( internal worship ) is the best and one should follow it.
-       Dnyanda


MarathI version of the Abhanga  -

करावी तें पूजा मनेचि उत्तम । लौकिकाचे काम काय असें ॥ १ ॥
कळावें तयासी कळे अंतरिचे । कारण ते साचे साच अंगीं ॥ २॥
अतिशयाअंतीं लाभ किंवा घात । फळ देते चित्त बीजाऐसे ॥ ३ ॥
तुका म्हणे जेणे राहे समाधान । ऐंसे ते भजन पार पावी ॥ ४ ॥


अभंगाचा शब्दार्थ :
माणसाने उत्तम पद्धतीने मानसपूजा करावी.त्या साठी कसलीही सामग्री वगैरे लागत नाही ॥ १॥
भगवंताला तुमच्या मनात काय आहे ते सर्व कळतेतो अंतर्यामी आहेतुम्ही पुजा कां करताआहत त्याचे खरे कारण पण तो जाणतो.॥ २॥
जसे चितामधे असेल त्या बिजरूपाप्रमाणे कर्माचे फळ मिळतेअतिशय लोभाचा अंत शेवटी घातच करतो॥ ३॥
तुकाराम महाराज म्हणतात  की असे भजन करा की जेणेकरून तुमच्या मनामधे समाधान राहील.असे भजन्च तुम्हाला भवसागरातून  पार नेईल॥ ४ ॥

अभंगामागची भूमिका व अर्थ स्पष्टीकरणासाठी लागणारी माहिती:

जेंव्हा माणसाला भगवंताच्या कांही मुख्य गुणांचा म्हणजे सर्वज्ञसर्वशक्तीमानव सर्वव्यापी ह्या गुणांचा अर्थ कळतो तेंव्हाच त्याला हे पटते की भगवंताच्या बरोबर आपण कांही नाते जोडून त्याची भक्ती करावीमग माणूस त्याच्या स्वभावानुसार भगवंताशी व्डीलआईसखाप्रियकर असे कोणतेतरी नाते ठरवतो व भगवंताला त्याभावाने पाहातो व हळूहळू हे नाते दृढ होत जातेभगवंत हा खरेतर निर्गूणच आहेपण तो सगूणही आहे.सगून रुपाशीच आपण प्रथम नाते जोडू शकतो.( श्री रामश्रीकृष्णलक्ष्मीदेवी,
स्वस्तिकचिन्हॐकार ईत्यादी सर्व भगवंताची सगूण रुपे आहेत.) श्रीरामकृष्ण परमहंस म्हणतात की जसे शरीर व सावली ही एकाचीच रूपे आहेत तसेच.

आपण हेहीपाहिले आहे की सगूणाची भक्ति करण्याचे नऊ प्रकारा आहेतत्यांनाच नवविधा भक्ति म्हणतात.
ह्या नवविधाभक्तिंपैकी एकीचे नांव आहे अर्चनभक्तीह्या प्रकारामधे भक्त देवाची पूजा करतोपूजेमधे देवाला ते ते सर्वकांही अर्पण केले जाते जे आपल्याकडे एखादी अत्यंत महत्वाची व्यक्ति पाहूणा म्हणून येते तेंव्हा अशा पाहूण्याला अर्पण केले जातेयेथे आपण भगवंताला त्याच्या मूर्तीमधे पाहतो.
अर्चनभक्ती हा मूर्तीपूजेचा सर्वांत लोकमान्य व सर्वांना आवडणारा असा प्रकार आहे.
कांही ठिकाणी भगवंताच्या मूर्ती ऐवजी ॐकाराचे चित्रशालिग्रामशिवाची शाळुंका शिवलिंगअशी चिन्हरूपेपण देव म्हणुन पूजेला घेतात.
आपल्या देशांत बरच जण रोजच देवपूजा करतातपूजा केलीजाते तेंव्हा कमीतकमी त्यावेळेपुरते काम होईना भगवंताची आठवणस्मरण घडते.

आपल्या शास्त्रांनी पुझेच दोन प्रकार पद्धती सांगितल्या अहेतषोडशोपचार पूजा .ह्या पुजेमधे भगवंताला १६ उपचारानी(आवाहन आसनआचमन , स्नान,अभिषेक धूपदीप नैवैद्यविडा देणे इत्यादि ) पूजिले जातेपंचोपचार पूजा.ह्या पुजेच्या दुसरी पद्धतीत फक्त ५ उपचार केले जातात.

पण दोनही पुजा करायच्या तर निरनिराली साधन सामग्री जसे गंधफुलेदीप,उदबत्तीविड्याचे पान व सुपारीकपडे,इत्यादी व शिवाय नैवेद्यासाठई फळेव भोजनसामग्री हे सर्व लागतेअर्थात पैसा पण खर्च करावा हा लागतो.
ह्या बाह्य उपचारांच्या पुजेच मुख्य फायदा हा आहे की मन भगवंताकडे एकाग्र होते.म्हणूनच जेंव्हा मनाची एकाग्रता ह्या सर्व बाह्य उपचारांविना होऊ लागते तेंव्हा साहजिकच बाह्य उपचारांनी पूजा करणे बंद होते.
ह्या नंतर आपण मनानेच सर्व उपचार करून पूजा करू शकतो.अशा अंतर्यामी केलेल्या पूजेला "मानसपूजा " असे नांव आहेध्यान करणे ही पण एक वेगळ्या पद्धतीची मानसपूजाच असते असे म्हणता येईल.

अभंगामधे संत तुकाराम महाराज ह्या मानसपूजेचेच कौतुक करीत आहेत.

अभंगाचा स्पष्टिकरण करुन अर्थ :
अभंगाच्या सुरवातीलाच तुकाराम महाराज म्हणतात की मानसपूजा करणेच खरतर उत्तम पूजा करणॆ होयह्या पूजेसाठी कांहिही बाह्य सामग्री लागत नाही .लागते ते भगवंताचे ध्यान .

पुढे महाराज म्हणतात की भगवंतास तुमच्या मनामधे काय विचार चालले आहेत ते कळते.तुम्हाला काय पाहिजे आहे ते पण कळतेतो नक्कीच तुम्हाला जे काय आवश्यक असेल ते ते सर्व देईलच ह्याची खात्री बाळगावी. ( पण हे ही लक्षांत घेणे आवश्यक आहे की त्याला अनन्यभावे शरण जायला हवेअशी शरणागती पत्करली असेल तरच तुम्हाला हे पण पटेल की तो जे जे कांही करतो ते तुमच्या भल्यासाठीच करत आहे.) ह्या शिवाय अशी पूजा तुम्हाला मोक्षा कडे पण नेते हा मोठा फायदा आहेच.

अभंगाचा तिसरा व चौथा चरण दोन्ही अत्यंत मह्त्वाचे आहेतयेथे तुकाराम महाराज म्हणतात की जेंव्हा कोणी भगवंताची अत्यंत तीव्रभावाने प्रार्थना करत्तो , तेंव्हा त्याला कांहितरी फायदा हा नक्कीच अनुभवास येतो पन कधीकधी कांहीच फायदा न होता उलट नुकसान झाल्यासारखे भासते.फायदा काय वा नुकसान काय दोनही अशाश्वतचफार काळ न टिकणारे असतात.
त्यापेक्षा वरच्या दर्जाची पूजा म्हणजे भगवंतास कांहीच न मागंणे , त्याच्याकडून कसलीच अपेक्षा न धरता करणे व फक्त त्याच्यावरील प्रेमामुळेत्याच्या सर्व निर्मितीचे कौतुक म्हणून करणे ही होय.भघवद्‌गीतेमधे ह्यालाच निष्काम भावम्हटलेले आहे.
जर पूजा कांही फळाशा धरून केली तर त्या लोभाचे फळ हे मिळेलच पण हा फलाशेचा भावच आपल्याला जन्म-मृत्युच्या फेरी मधे अडकवतो व जन्मोजन्मी दु:खे भोगायला लावतो हे विसरू नये हे अभंगाच तिसरा चरन सांगतो.
असा भाव भक्ताला शाशवत समाधानचा अनुभव देतोअसा भक्त त्याच्यावरआलेल्या कोणत्याही संकटांमुळेविचलीत होत नाही.ट्याचे भगवंतावरचे प्रेम सर्व स्थितींमधे कायमच राहतेकमी होते नाही.
श्रीमद्‍भगवद्‍गीते मधे भगवंतांनी ही खात्री दिली आहे की भगवंत अशा भक्ताचा योगक्षेम स्वतचालवतातह्या कारणास्तव तुकाराम माहाराज अभंगाच्या शेवटच्या कडव्यांमधे अशा आंतरिक मानसपूजेचाच सर्वोत्तम पूजा म्हणुन स्विकार करताहेत.

अशी मानसपूजा आपल्या सर्वांकडून घडॊ हीच भगवंतास प्रार्थना करूया.
-       ज्ञानदा

radharaniji.blogspot.in

दसरा अलंकार पूजा श्री विठ्ठल रुक्मिणी , श्रीक्षेत्र पंढरपूर

परमपूज्य श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांची चातुर्मास प्रवचनातील भावमुद्रा ..!

फोटो साभार :जयश्री पाटील .

Monday, 10 October 2016

दसरा दिवाळी तोचि माझां सण । सखे हरभजन भेटतील ।।

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।
दसरा दिवाळी तोचि माझां सण | सखे हरभजनभेटतील ||१|
| अमुप जोडल्या पुण्याचिया राशी | पार त्या सुखासी नाही लेखा ||२|| धन्य दिवस आजी झाला सोनियाचा | पिकली हे वाचा रामनामे ||३||
तुका म्हणे काय होऊ उतराई | जीव ठेवूं पायीं संतांचिये ||४||
विजयादशमीच्या आपणास सगळ्यांनाच मनापासून हार्दिक शुभेच्छा
......!!!!
पुण्य फळले बहुता दिवसा | भाग्य उदयाचा ठसा |
झालो सन्मुख तो कैसा | संतचरण पावलो ||
भाग्याचा उदय | ते हे जोडी संत पाय """||

धन्य दिवस आजी झाला सोनियाचा

जगात साधु संत नाहीत..असे नाही...पण त्यांची भेट होणे मात्र कठीण आहे. असे सर्वच संतांनी म्हटले आहे.संतचरणसंग म्हणजेच असा संग तोच की ज्याच्या अंतःकरणावर परिणाम झाला पाहीजे ना...हदयात भक्तीप्रेमाचा उदय व्हायला हवा...त्यांच्या संगती शिवाय भगवद् भक्ती निर्माण होणे अशक्यच....
ज्ञानी विद्वान पुरूषांच्या संगतीत ज्ञान, विद्या प्राप्त होते...धनवानाच्या संगतीने धनाची प्राप्ती...
तसेच संत महात्म्यांच्या संगतीत भगवद् भाव प्राप्त होतो....माऊली म्हणतात...."
साधुचा अंकिला हरिभक्त
सर्वोपकारी महात्म्या पुरुषाचा संग दुर्लभ आहे...अगम्य आहे..
.....जरी संत भेटले  तरी त्यांना "संत" स्वरूपात जाणणे कठीण आहे...
कारण वास्तविक ते जगात राहुन जगासारखे वावरताना दिसतात पण.. त्यांचा अंतरंगातील अध्यात्मिक अधिकार भाव फार श्रेष्ठ असतो...त्या अधिकाराचे दृष्टीने
त्यांना ओळखने कठीण असते.
...या संसारात क्षणभर जरी संत्सग घडला...तरी या सांसारिक जिवाला कल्याणकारी असतो....
ही संत्सगती म्हणजेच आपली दिवाळी आणि दसरा
क्षणभराची श्री देवर्षि नारदांची संगती घडून वाल्याकोळ्यास त्यांच्याकडून श्री नारायण मंत्राची प्राप्ती झाली.
संत हे ज्ञान ,वैराग्य,भक्तीप्रेम यानी कायावाचामनाने संपुर्ण व्यापून गेलेले असतात....श्री विठ्ठल विठ्ठल

- varkariyuva.blogspot.in

Tuesday, 4 October 2016

सर्वत्रीं वरिष्ठ आदिशक्ती ॥


सद्गुरू श्री गुंडानाथमहाराज देगलूरकर पुण्यतिथी उत्सवानिम्मित गुरु परंपरा माहिती ....!

|| ज्ञानेशो भगवान विष्णु: || 

संत श्रेष्ठ श्री ज्ञानदेवांपासून निर्माण झालेल्या ‘ भागवत परंपरा ‘ पैकी एक जी श्री ज्ञानदेव , श्री सोपानदेव , श्री विसोबा , श्री नामदेव महाराज या केमाने पुढे विकसित होत गेली . तर दुसरी योग परंपरा या नावाने ओळखली जाणारी परंपरा . श्री ज्ञानदेव , श्री सत्यमळनाथ , श्री गैबीनाथ , श्री उद्बोधनाथ , श्री केसरीनाथ , श्री शिवदिननाथ या क्रमाने पुढे प्रवाही होत गेली . या परंपरेचा अभ्यास संत साहित्याचे व मराठी वाड्मयाचे अभ्यासकांनी केला , त्यावर भरपूर लेखनही केले . परंतु या परंपरेच्या मालिकेत तिसऱ्या परंपरेचा विसर संत व मराठी साहित्याचे अभ्यासक यांना झालेला दिसतो . हि परंपरा श्री ज्ञानदेव , श्री देवनाथ महाराज , श्री चूडामणी , श्री गुंडानाथ (प्रथम) अशी मानली जाते . प्रथम गुरुपरंपरेतून आलेली आणि पुढे गुरु आणि वंश परंपरेने विकसित होत गेली .
श्री ज्ञानदेवांच्या नंतर बऱ्याच कालावधीने देवनाथ नावाचे साधुपुरुष होऊन गेले . त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनेच्छेने आळंदीत ज्ञानेश्वरीची अनेक पारायणे करूनही त्यांना ज्ञानदेवांनी दर्शन दिले नव्हते . श्री ज्ञानदेवांच्या भेटीस आपण अपात्र असून , ती भेट घडवून आणण्यास अपात्र असणारी जीभ शरीरात ठेवून तरी काय उपयोग ? असा विचार करून एका तीक्ष्ण हत्याराने ती कापून टाकली होती . हा त्यांचा आत्यंतिक श्रद्धाभाव पाहून ज्ञानदेव प्रगट झाले आणि आपल्या योग सामर्थ्याने देवनाथांची जिव्हा पूर्ववत केली . त्यांच्या मस्तकावर करकमल ठेवला व शांभव असे अद्वयानंदाचे संत निवृत्तीनाथां पासून प्राप्त झालेले वैभव देवनाथाना देऊन त्यांना महेशाच्या तुलनेत उतरविले होते . या देवनाथानी देगलूर येथील ‘ श्री चूडामणी ‘ नामक एका सत्पात्री साधकाला हे अद्वयानंदाचे वैभव देऊन ऋषीऋणातून मुक्त होण्याचे ठरवले . श्री ज्ञानदेवांपासून प्राप्त झालेला बोध त्यांनी श्री चूडामणी यांना देऊन कृतार्थ केले . हेच श्रीचूडामणी महाराज श्री गुंडामहाराज (प्रथम) यांचे सद्गुरू होत . यांच्यापासून श्री गुंडामहाराजांना बोध प्राप्त झाला .

सिद्धरस हे देगलूरकर घराण्याचे मूळ कुलनाम . या घराण्यास प्राप्त झालेल्या जहागिरीची देखभाल करण्याच्या हेतूने देगलूर ( जि.नांदेड ,मराठवाडा )येथे स्थायिक झालेलं सिद्धरस पुढे देगलूरकर याच नावाने प्रसिद्ध झाले . अत्यंत धर्मनिष्ठा , आचार विचार संपन्न आणि परोपकारी घरण्यात सतत महाभारत , भागवत , श्रीज्ञानेश्वरी , श्रीतुकाराम गाथा इ.धर्म ग्रंथाचे वाचन , भजन , कीर्तन आणि पंढरीची वारी या सर्व गोष्टी कुलाचाराप्रमाणे केल्या जात होत्या . परंपरेतील सर्वच व्यक्ती नीतीसंपन्न , शुद्ध सात्विक , आचारवंत , अतिथींबद्दल अगत्यशील , गरिबांप्रती कणव असणाऱ्या आणि मुख्य म्हणजे समाजाचा पारमार्थिक विकास व्हावा हि समाज निष्ठा बाळगून त्या दृष्टीने प्रयत्नशील होत्या व समाजही देगलूरकर घराण्याचा नित्य आदर करीत होता , आजही करीत आहे .

‘कुल पवित्र जननी कृतार्थ | वसुंधरा पुण्यवती च तेन | ’ किंवा

‘ पवित्र ते कुळ , पावन तो देश | जेथे हरीचे दास जन्म घेती | ’

या उक्तींची प्रचीती या कुळातील श्री गुंडामहाराज प्रथम यांच्यापासून पुढे सर्वच व्यक्तींनी आपली पारमार्थिक उंची वाढवली , त्याचबरोबर समाजाच्या उद्धाराची काळजी घेतली . हे घराणे धर्महिताबरोबर समाजहितालाही महत्त्व देत आलेले दिसते . या सर्व गोष्टींचा पाया घातला तो आदिपुरुष श्री गुंडा महाराज सिद्धरस ( देगलूरकर ) यांनी .

सद्गुरू श्रीगुंडानाथ महाराज ( आद्यपुरुष )

या घराण्याचे आदिपुरुष सद्गुरू श्री गुंडामहाराज हे संत चूडामणी महाराज यांचे अनुग्रहित व शिष्य हि होते . हरिकृपा साक्षात्कारी , अनुभव संपन्न , तत्त्वज्ञ , तत्त्वदर्शी आणि भजनानंदी संत असणाऱ्या श्री गुंडामहाराजांनी देगलूरजवळ रामपूर नामक ठिकाणी बारा वर्षे तीव्र तप केले होते . त्यानंतरही श्री विठ्ठल दर्शन न झाल्याने अस्वस्थ झालेल्या सद्गुरू श्री गुंडामहाराजांनी हातात वीणा व चिपळ्या घेऊन भजनास प्रारंभ केला होता . आता श्री विठ्ठलाचे दर्शन झाल्याशिवाय विणा खाली ठेवायचीच नाही असा पण करून ते भजनात रंगून गेले होते . चोवीस तास केवळ ‘ विठ्ठल – विठ्ठल ’ हाच नाद होता . या भजनाने सद्गुरू श्री गुंडामहाराजांना श्री विठ्ठलाचे दर्शन दिल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात सापडतो . आपले अध्यात्मिक गुरु श्री चूडामणीमहाराज यांच्याकडे वास्तव्य असताना श्री गुंडामहाराजांनी वेद , शास्त्रे आणि संगीत याही विषयांचा अभ्यास केला होता . सद्गुरू श्री गुंडामहाराज म्हणजे ज्ञानोत्तर जीवनात इतरांसाठी आदर्शाचा धडा होत . त्यांनी सुमारे ७०० अभंगाची रचना केली . महाराजांच्या पश्चात पुढे याच परंपरेत वंश परंपरेने श्रीश्रीहारी महाराज , श्री गुंडामहाराज ( द्वितीय ) –

१) श्री नारायण महाराज – १)श्री गुंडा महाराज ( तृतीय ) ,२) श्री मार्तंड महाराज ३) श्री काशिनाथ महाराज

२)श्री रामचंद्र महाराज – १)सद्गुरू श्रीधुंडामहाराज २) सद्गुरू श्रीबंडामहाराज

३) सद्गुरू श्रीमहिपती महाराज

तद्नंतर पुढे हा समर्थ वारसा प.पू.सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर यांनी सांभाळला . .पूज्य मोठ्या महाराजांच्या नंतर तोच वारसा प.पू.सद्गुरू श्रीभानुदास महाराज देगलूरकर कि ज्याचं नुकतच प्रथम पुण्यस्मरण श्री क्षेत्र पंढरपूर येथे संपन्न झाले यांनी सांभाळले व आता प.पू.श्रीगुरू चैतन्यमहाराज देगलूरकर अत्यंत निष्ठेने पुढे चालवीत आहेत . वारकरी संप्रदायच्या क्षितिजा वरील एक तेजस्वी तारा अर्थात प.पू.श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज होय .

या परंपरेचे आद्यपुरुष सद्गुरू श्रीगुंडामहाराज व पूज्य गुरु परंपरेच्या चरणी साष्टांग दंडवत !

माहिती साभार - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाद्वारे प्रकाशित महाराष्ट्राचे शिल्पकार महाभागवत ह.भ.प.वै.धुंडामहाराज देगलूरकर या ग्रंथातुन .

संकलन - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

varkariyuva.blogspot.in

श्रीरुख्मिणी माता !

Monday, 3 October 2016

वैकुंठवासिनी वो जगत्रयजननी । तुझा वेधु ये मनीं वो ॥



शारदीय नवरात्र शब्दसुमनांची  ४ थी माळ

रंगा येई वो ये रंगा येई वो ये ।
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ॥
वैकुंठवासिनी वो जगत्रयजननी ।
तुझा वेधु ये मनीं वो ॥
कटीं कर विराजित मुकुट रत्नजडित । 
पीतांबरु कासिया तैसी येई कां धावत ॥
विश्वरूप विश्वंभरे कमळनयने कमळाकारे वो । 
तुझे ध्यान लागो बापरखुमादेविवरे वो ॥


सदर अभांगत माझ्या माऊली वर्णन करतात की , 
माझ्या प्रेमरूपी भजनरंगात हे विठाबाई देवी तू लवकर ये . तुला किती नावे आहे म्हणून सांगावे ? तुला किठाई म्हणतात , तुला विठाई , कृष्णाई व कान्हाई म्हणतात . वैकुंठात राहणारी असून जगत्रयाला उत्पन्न करणारी तू आहेस . त्यामुळे तुझा छंद माझ्या मनाला लागला आहे . तू कटेवर कर ठेवलेली अशी शोभत असून तुझ्या डोक्यावर रत्नजडित मुकुट आहे . कमरेला पितांबर आहे . अशा तऱ्हेच्या देविरुप विठठला तू माझे भजन रंगात धावत ये बरे . हे विश्वरूप , विश्वंभरे कमलनयने , कमलाकरे अशा स्वरूपाने असणारे हे विठठल रखुमादेवीवरे तुझे ध्यान माझ्या मनास नित्य लागो .

- ज्ञानदा 
Varkariyuva.blogspot.in

Sunday, 2 October 2016

शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचा एक सुंदर गोंधळ !



सुदिन सुवेळ तुझा गोंधळ मांडिला वो ।
ज्ञान वैराग्याचा वरती फुलवरा बांधिला वो ।
चंद्र सूर्य दोन्ही यांचा पोत पाजळिला वो ।
घालुनि सिंहासन वरूते घट स्थापियला वो ॥२॥
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ॥ध्रु.॥
प्रवृत्ती निवृत्तीचे घालुनि शुद्धासन वो ।
ध्येय ध्याता ध्यान प्रक्षाळिले चरण वो ।
काया वाचा मनें एकविध अर्चन केले वो ।
द्वैत अद्वैत भावे दिले आचमन वो ॥२॥
भक्ति वैराग्य ज्ञान याही पूजियली अंबा वो ।
सद्रूप चिद्रूप पाहुनी प्रसन्न जगदंबा वो ।
एका जनार्दनी शरण मूळकदंबा वो ।
त्राहे त्राहे अंबे तुझा दास आहे उभा वो ॥३॥
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ॥

कल्याण - डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर , श्रीमलंग व आदी परिसरात नवीन पदनियुक्ती !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु:।।

सर्व वारकरी बंधू भगिनी वर्गास एक आनंदाची गोष्ट
वारकरी संप्रदाय युवा मंच द्वारे एक सुशिक्षित तथा संस्कारीक युवा वर्ग आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे . नुकतीच वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र यांद्वारे कल्याण - डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर , श्रीमलंग व आदी परिसरात अत्यंत निष्ठावान अशा युवा वारकऱ्यांची कार्याची दखल घेत विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे ती पद् नियुक्त यादी समवेत असणाऱ्या पत्रात नाम निर्देशित करण्यात आली आहे . पद नियुक्त सर्व युवा वारकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व भविष्यातील कार्यास हार्दिक शुभेच्छा !

- अक्षय चंद्रकांत  भोसले
संस्थापक : वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

Saturday, 1 October 2016

श्रीसंत ज्ञानेश्वरमहाराज व भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज रचित ओवी तथा श्लोक श्री भगवती देवी स्तुती ..!

|| ज्ञानेशो भगवान विष्णु: ||

भगवान श्रीज्ञानेश्वर माउली भगवती श्रीअंबाबाईची स्तुती करताना म्हणतात,
म्हणोनि अंबे श्रीमंते ।
निजजनकल्पलते ।
आज्ञापीं मातें ।
ग्रंथनिरूपणीं ॥ज्ञाने.१२.०.१०॥
श्रीमाउली भगवती अंबेला 'श्रीमंत' व 'निजजनकल्पलता' ही दोन मार्मिक विशेषणे येथे मुद्दामच वापरीत आहेत. भगवंतांच्या कृपाशक्तीलाच " श्री " म्हणतात तर त्यांच्या वैभवसंपन्नतेला " महालक्ष्मी " म्हणतात. येथे माउलींनी खुबीने भगवतीच्या या दोन्ही स्वरूपांचा सुंदर उल्लेख केलाय. श्रीज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रकटलेली ही अलौकिक कृपाशक्ती, तिला शरण आलेल्या भक्तावर या दोन्ही प्रकाराने कृपाप्रसाद करते, हेच त्यांना त्यातून सूचित करायचे आहे.
भगवती अंबा जेव्हा शरण आलेल्या जीवावर अनुग्रहकृपा करून त्याला परमार्थाचे दान देते, तेव्हा तीच श्रीरूप होते. तर जेव्हा ती त्या जीवाच्या सर्व प्रापंचिक इच्छा पूर्ण करते तेव्हा ती " निजजनकल्पलता " होते. तिला शरण आलेल्या जीवांच्या सर्व कल्पना पूर्ण करणारी तीच " कल्पलता " असते. मग आपण जर, " प्रपंचाचाच परमार्थ होऊ दे ", अशीच तिच्या चरणीं प्रार्थना केली तर? सगळेच काम फत्ते ! कल्पनाच नष्ट करणारी ही कल्पलता, अकल्पनाख्य असा भगवत्प्राप्तीरूप मोठा वरप्रसाद देण्यासाठी म्हणून आपल्यावर सर्वार्थाने वोळेल ! अर्थात् हे कृपाकार्य त्या भगवती जगदंबेच्या "श्रीसद्गुरु" या रूपाद्वारे होत असते. म्हणूनच भगवान शिव, त्यांची अभिन्न शक्ती भवानी व श्रीसद्गुरु हे तिन्ही एकरूपच आहेत, असे माउली बाह्या उभारून वारंवार सांगतात.
तर
भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
भवानी भवानी भवानी त्रिवारं
उदारं मुदा सर्वदा ये जपन्ति ।
न शोको न मोहो न पापं न भीति:
कदाचित्कथंचित्कुतश्चित् जनानाम् ॥
भवानी हे नाम जो केवळ तीनवेळा सतत आनंदाने जपतो, त्याला शोक, पाप, मोह व भीती इत्यादी कधीच, केव्हाही, कोणाकडूनही व कुठेही अनुभवाला येत नाहीत, असे साक्षात् श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज 'भवानीभुजङ्गस्तोत्रा'मध्ये स्पष्ट सांगतात. त्यांचेे हे सांगणे आपण या नवरात्र महोत्सवामध्ये मनापासून पालन करून धन्य होऊया !!
- ज्ञानदा
varkariyuva.blogspot.in

( श्री.रोहन उपळेकर यांचा एक पूर्वी  वाचनात आलेला लेख संकलन करून ठेवला  होते त्यातील काही भाग देत आहोत )