Wednesday 14 June 2017

वारीला येताय मग या वस्तू घेतल्यात का ?

१) टाळ - प्रत्येकाकडे वैक्तिक टाळ अवश्यक
२)वारकरी संप्रदायिक भजनी मालिका
३) किट - १)आपले औषधें (मधुमेह ect )२) अंगदुखी , डोकेदुःखी ४ ) ताप सर्दी इत्यादी
४) वळकुटी - मिनी सतरंजी , त्याच आकाराचा प्लास्टिकचा कागद
५)कपड्यांची बॅग
६)ताट तांब्या चमचा ect
७) निवासाच्या प्रत्येक तंबूत बल होल्डर असतो तो काढून आपल्याकडील बल होल्डर  + त्याला टू पिन लावता येईल असा होल्डर जर सोबत असेल तर आपला मोबाईल आपल्या जवळ राहील .मोबाईल चार्जिंग साठी एखाद एक्स्टेंशन बोर्ड असेल तर आपल्या सोबत इतर वारकऱ्यांची हि मोबाईल चार्जिंग सोय होते .
८) पुरुषांनी विशेष करून सांप्रदायिक पोषक वापरावा (शुभ्र सदरा धोतर व टोपी  )
९) किट क्र २ - कैची , सुई , धागा इत्यादी वेळी प्रसंगी अचानक लागतात .
१०) शक्यतो जे प्रथम वरीला येत आहेत त्यांनी शुद्ध पाणीच प्यावं वारी दरम्यान पाणी बॉटल ५ ते १० रु. उपलब्द होते .
११)शबनम or बॅग - दिवसरभराच्या प्रवासात सामानाची बॅग अर्थात वळकुटी हि ट्रक मध्ये टाकलेली असते तिची गाठ हि रात्रीच्या मुक्कामवर च होत असते म्हणून शबनम अर्थात लहान बॅग हि आपल्या सोबत असावी जेणेकरून त्यात भजनी मालिका, टाळ, काही औषध , पाण्याची बॉटल त्यात ठेवता येतील.
१२) मुक्कामाच्या ठिकाणी पाणी उपलब्ध झाल तर कपडे धुण्याकरिता लागणारी सामुग्री . पाण्याची काटकसर करा मुख्यतः सुकवण्याकरिता लांब दोरी
१३) लहान प्लास्टिक चा कागद .सहसा माऊली विसाव्याला थांबली असता त्यावर आराम करण्याकरिता  बसता हि येत व झोपता हि येत .
१४)छत्री किंवा कोट पाऊसा पासून संरक्षण करण्यासाठी .
१५) एक मोठी गोण त्यावर ठळक अक्षराने आपले नाव व क्रमांक पत्ता  लिहलेला असावे त्यात सामानाची बॅग बसेल इतकी व ती बांधून सामनाच्या ट्रक मध्ये टाकता येते व नंतर शेकडोंच्या समानातून शोधताना सहज मिळते .
१६) आपल्या नावच आय कार्ड इत्यादी आपल्या खिशात ठेवावे दिंडीत गेल्यावर सहसा दिंडी सोडू नये पण कदाचित चुका मूक झाली असता भेट घडावी म्हणून  पहिल्याच दिवशी सहकारी वर्गाचा फोन नंबर व दिंडीची पत्रिका सोबत ठेवावी .
१७)मौल्यवान वस्तू कृपया सोबत आणने टाळणे .
१८) एक छान तुळशीची जप माळ - निवांत वेळी नाम जप करण्यास उपयुक्त
१९) पूजेचे देव - व ग्रँथ
२०) हरिपाठच पुस्तक सुरवातीला असावे ज्यांचा पाठ नाही त्यांच्या करिता पण वारीच्या शेवटी पंढरपूर येई पर्यंत तो हि पाठ झालेला असतो .

चला तर मग साऱ्या वस्तू अगदी व्यवस्थित भरून घ्या आणि आता घरी बसुन काय करता चला पाऊले चालती पंढरिची वाट.

प्रस्थान :  दि.१७ जून २०१७ 
श्री संत ज्ञानेश्वरमहाराज समाधी मंदिर , श्री क्षेत्र आळंदी देवाची  येथून .

#अक्षयवारी

आशा विविध अपडेट्स साठी ८४५१८२२७७२ या क्रमांकावर "वारी" हा एस एम एस करावा .

Varkariyuva.blogspot.in

संघटन - ह.भ.प.श्रीगुरू श्रीचैतन्य महाराज देगलूरकर.

संघटन

आज आपल्या देशाची,समाजाची परिस्थिती ही चिंताजनक आहे.परदेशातून देशावर,धर्मावर,संस्कृतीवर होणारे हल्ले समाजजीवनाची घडी विस्कऴित करीत आहेत,ही सुर्यप्रकाशाइतकी स्पष्ट गोष्ट आहे आणि आपणही आपले स्वत्व विसरून त्याला बऴी पडतो आहोत.या सर्व गोष्टी घडण्याचे कारण काय असावे,याचे मुऴातून चिंतन केल्यास एक उत्तर सापडते,ते म्हणजे विघटन ! कारण जोपर्यंत समाज,देश हा सुसंघटित होत नाही,तोपर्यंत बाहेरच्या कोणत्याही आक्रमणाला थोपविण्याचे सामर्थ्य त्याच्या ठिकाणी निर्माण होणार नाही.एक व्यक्ती अनेक आघाड्यांवर एकाच वेऴी लढू शकत नाही.महाभारत म्हणते,

भेदे गणा विनश्युर्हि भिन्नास्तु सुजया: परै: ।
तस्मात्संघातयोगेन प्रयतेरन्गणा: सदा ।।

समुदायामध्ये भेद निर्माण झाला की त्यांचा सर्वथा नाश हा ठरलेलाच ! कारण त्यांच्यात फूट पडली की शत्रु त्यांचा सहज पराभव करू शकतात.म्हणून समुदायाने नेहमी संघशक्तीने कार्य करावे.आज नेमका याचाच अभाव आहे.आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे.ही खरी गोष्ट आहे.पण संघटनेच्या मुऴाशी दोन गोष्टी मानाव्या लागतात.एक म्हणजे वैचारिक ऐक्य आणि दोन,कृतीचा समन्वय.काही वेऴा उलटाही विचार करावा लागतो.काही वेऴा कृतीचा तर काही वेऴा विचारांचा समन्वय संघटनेसाठी आवश्यक असतो आणि एकदा संघटना झाली की सिकंदरासारख्या जगज्जेत्यालाही माघार घ्यावी लागते हा इतिहास आहे.महाभारतात यासाठी मधमाश्यांचे उदाहरण दिले आहे.

सर्वथा संहतैरेव दुर्बलैर्बलवानपि ।
अमित्र: शक्यते हन्तुं मधुहा भ्रमरैरिव ।।

पोऴ्यातील मध काढणाऱ्याचा मधमाश्या एकजुटीने प्राण घेतात.तसे सर्वांची एकता असेल तर दुर्बलदेखील बलिष्ठ शत्रूचा नाश करू शकतात.अनेक मुंग्या मोठ्या सापाला नष्ट करू शकतात ते एक होऊनच.पंचतंत्रात याची अनेक उदाहरणे सापडतील.मुंग्यांना,मधमाश्यांना जे शक्य होते ते माणसाला जमू नये ? आज आपण जातीच्या,धर्माच्या नावाखाली संघटित होतो,पण ते संघटन देशाचे हित करेलच असे नाही.कारण या संघटनेचा हेतू शुद्ध असेलच असे नाही.सर्वांनी शुद्ध अंत:करणाने देशाच्या,समाजाच्या हितासाठी संघटीत होण्याचा सोपा उपाय सातशे वर्षांपूर्वी जगाच्या माउलीने सांगून ठेवला आहे.

भूता परस्परे जडॊ । मैत्र जिवाचे ।।

।। रामकृष्णहरि ।।

संदर्भ - संतसंग

© ह.भ.प.श्रीगुरू श्रीचैतन्य महाराज देगलूरकर.

संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची बैलजोड

संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची बैलजोड, सोबत यंदाचे मानकरी श्री.संजय कुऱ्हाडे पाटिल .

#अक्षयवारी - ८४५१८२२७७२