Wednesday 12 March 2014

आदरणीय . चित्रांगना जी वाढदिवसाच्या संगीतमय शुभेच्छा !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

प्रथमत : शतश प्रणाम व आपणास वाढदिवसाच्या स्नेहपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा ! 
आपला वाढदिवस खरतर उद्या आहे पण आमच्याकडून एकदिवस आधीच  आपण अगदी लहान वयात अर्थात वयाच्या ५ व्या वर्षी कत्थक शिकलात आणि तद्नंतर लगेचच पखवाज हि ...आज आपण जागतिक कलाकारांमध्ये हि अग्रगण्य आहात व प्रथम महिला पखवाज वादक म्हणून आपण संपूर्ण विश्वात आपली ख्याती हि आहे . पण अपना विषयी एक गोष्ट सर्वांनाच सांगायला आनंद वाटेल कि तरीही आपण अत्यंत नम्र आणि खरच एखाद्या व्यक्तीला कलेविषयी माहिती अथवा काही मदत लागली तर आपण लगेच मदतीकरता सरसावत .
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ।।
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक । तयाचा हरिख वाटे देवा ।।
आपणास जगतगुरू तुकराम महाराजंचा अभंग पूर्णतः लागू होतो हे सांगण्यास ताई फार आनंद वाटत आहे .
आजच्या काळातील माझ्या सर्व युवक विशेषता माझ्या भगनी वर्गाच्या आपणा आदर्श आहत . आणि पुढे आपण संगीतमय जीवनात उत्तरोतर कायम कलेच्या शिखरावर जावोत हि पांडुरंग परमात्मा तथा ज्ञानेश्वर माऊली जवळ प्रार्थना .आपणास शुभेच्छा द्याव्यात यापेक्षा आपणच आमच्या सर्व तरुण युवा संगीत प्रेमी व्यक्तींवर आपले प्रेम आशीर्वाद कायम ठेवावेत हीच विनंती . पुनश्च एकदा वाढदिवसाच्या संगीतमय शुभेच्छा !
अक्षय भोसले - 8451822772
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र