Monday 30 May 2016

श्री संत मुक्ताई संस्थान तर्फे श्री पांडुरंग पादुकांचे जळगाव जिल्ह्यांत जंगी स्वागत !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।

श्री संत मुक्ताई संस्थान तर्फे श्री पांडुरंग पादुकांचे जळगाव जिल्ह्यांत जंगी स्वागत !

जामनेर येथील फडावर श्री पांडुरंग पादुका यांच्या समोर  ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले , बिजवडी सातारा यांचे कीर्तन संपन्न .

प्रमुख उपस्थिती :
मा. भैय्यासाहेब पाटील
प्रमुख - संत मुक्ताई संस्थान , मुक्ताईनगर
मा. सौ.साधनाताई महाजन
जामनेर नगरपालिका - नगराध्यक्ष
मा. ह.भ.प.रवींद्रमहाराज हरणे
दिंडी चालक - मुक्ताई संस्थान
मा. ह.भ.प.उद्धवमहाराज जुनारे
मुक्ताई मंदिर , कोथळी
मा. विनीत सबनीस
अध्यक्ष - श्रीमंत माऊली प्रतिष्ठान , मुंबई
मा. सूर्यकांत भिसे
महाराष्ट्र राज्य पालखी पत्रकार संघ .

श्री पांडुरंग पादुका सोहळा भुसावळ येथे दाखल !

- श्री संत मुक्ताई संस्थान , मुक्ताईनगर

श्री विठ्ठल भगवान आणि आदिशक्ती मुक्ताई भेट !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।


श्री विठ्ठल भगवान आणि आदिशक्ती मुक्ताई भेट ! 

varkariyuva.blogspot.in

Saturday 28 May 2016

श्री पांडुरंगाच्या पादुकांचे मुक्ताईनगरकडे प्रस्थान !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।

श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळा
श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र मुक्ताईनगर

संत मुक्ताई मठ , पंढरपूर येथून पांडुरंगाच्या पादुकांचे प्रस्थान !

पाहत रहा - Varkariyuva.blogspot.in

Tuesday 24 May 2016

माण तालुक्यातील मा.चंद्रकांत दळवी (I.A.S.) जाणीव दुष्काळाची !

एखाद्या भागात पाऊस किती पडतो याचा आपण कधी विचार केला आहे काय?
एखाद्या भागात ७०० मीमी पाऊस पडत असेत तर दर एकरात २८,००,००० लिटर पाऊस पडतो. एखाद्या शेतक-याजवळ पाच एकर जमीन असेल तर तो पावसाच्या बाबतीत कोट्याधीशच झाला की हो. कारण त्याच्या शेतीत १ कोटी ४० लाख लिटर पाऊस पडावयास हवा. इतका पाऊस पडून सुद्धा तो स्वतःला कोरडवाहू शेतकरी म्हणवून घेत असेल तर ते त्याचे दुर्दैवच म्हणावे लागेेल. एवढ्या पावसात दोन हंगामी शेती आरामात व्हायला हवी. पण अट एकच आहे. ती म्हणजे या पडलेल्या पावसाचे योग्य जतन व्हावयास हवे. या पैकी तो फक्त १० टक्के पाणी अडवितो व बाकीचे पाणी कोठे जाते याचा तो विचारही करीत नाही. या पाण्यापैकी अर्धे पाणी सूर्यनारायण बाष्पीभवनाद्वारे घेवून जातो व उरलेले पाणी नदी नाले करीत समुद्राला परत जाऊन मिळते. निसर्ग दरवर्षी त्याच्या शेतापर्यंत पाणी विनामूल्य आणून पोहोचवितो पण तो मात्र ते अडवित नाही व शेवटी पाणी नाही म्हणून ओरडा करत बसतो. काय म्हणावे याला? हे पडलेले पावसाचे पाणी सुरक्षित ठेवायचे असेल तर ते जमिनीच्या पोटात साठवून ठेवले तरच ते कामी येवू शकते.

      मा. श्री . चंद्रकांत दळवी
        " भारतीय प्रशासकिय सेवा "
    ( सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य )

- वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

भव्य नारदीय व वारकरी कीर्तन महोत्सव - २०१६ , श्रीक्षेत्र पैठण

Sunday 22 May 2016

असा असेल यंदाचा श्री माउलींचा पालखी सोहळा

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा शके १९३८ सन २०१६
श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर 
श्रींच्या पालखी सोहळ्याचा दिनक्रम 

ज्येष्ठ वद्य ८ अष्टमी मंगळवार दि .२८ जून २०१६ ते आषाढ कृ.११ शनिवार दि ३० जुलै २०१६

आळंदी येथून माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान यंदा २८  जून २०१६  रोजी होणार आहे. विविध मुक्कामांनंतर १४ जुलै  २०१६ रोजी पालखी सोहळा पंढरीत प्रवेश करेल, अशी माहिती पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर यांनी दिली. यंदा माउलींचा पालखी सोहळा वाल्हे आणि माळशिरस येथे गावातून न जाता थेट मुक्कामाच्या ठिकाणी पालखी तळावर विसावणार असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, यंदा माउलींची पालखी वाहून नेण्याचा मान आळंदी येथील संतोष वहिले यांच्या बैलजोडीला मिळाला आहे.

असा असेल यंदाचा माउलींचा पालखी सोहळा

● २८ जून २०१६ आळंदीतून प्रस्थान ०४ वा प्रस्थान , पहिल्या दिवशीचा मुक्काम देवस्थानच्या आजोळघरी (गांधीवाडा - दर्शन मंडप इमारत आळंदी देवस्थान )
● २९  जूनला २०१६  दुस-या दिवशी हा सोहळा पुण्याच्या दिशेने दोन दिवसांच्या मुक्कामासाठी मार्गस्थ  (१-  थोरल्या पादुका २ - भोसरी फाटा ) दुपारी - फुलेनगर  दुपारी विसावा - सँगमवाडी रात्री - पालखी विठोबा मंदिर , भवानी पेठ , पुणे
● ३० जून २०१६  दिवसभर पुणे मुक्काम
● ०१  जुलै २०१६ - सकाळी - शिंदेछत्री -  हडपसर  - उरळी देवाची - वडकिनाला -  झेंडेवाडी - दिवे घाटातून मार्गस्थ होत दोन दिवसांच्या मुक्कामासाठी सासवडला
● ०२ जुलै २०१६दिवसभर  सासवड मुक्काम
● ०३  जुलै २०१६ बोरावके मळा - यमाईशिवरी - साकुर्डे -  जेजुरीत मुक्काम
●  ०४   जुलै२०१६  दौंडज शिव - दौंडज -वाल्हे मुक्काम
● ०५ जुलै२०१६  पिंपरे खुर्द विहीर - नीरा - श्रींचे नीरा स्नान - लोणंद मुक्काम
●  ०६  जुलै २०१६ चांदोबाचा लिंब उभे रिंगण पहिले -   तरडगाव मुक्काम
●  ०७  जुलै२०१६  दत्तमंदिर काळज - सुरवडी - निभोरे ओढा - वडजल - फलटण मुक्काम
● ०८   जुलै २०१६  विडणी - पिंपरद - निंबलक फाटा - बरड
● ०९  जुलै २०१६ साधुबुवाचा ओढा - धर्मपुरी - कारुंडे - शिंगणापूर फाटा - पानसकरवाडी - नातेपुते मुक्काम
●  १०  जुलै२०१६  मांडवी ओढा - सदाशिव नगर गोल रिंगण १ ले - येळवी -  माळशिरस मुक्काम
●  ११ जुलै २०१६ खुडूसफाटा गोल रिंगण २ रे - विंझोरी - धावबावी माउंट -  वेळापूर मुक्काम
●  १२  जुलै २०१६ ठाकूरबुवा समाधी गोल रिंगण ३ रे - तोंडलेबोंडले - टप्पा ( संत सोपानदेव भेट ) भंडीशेगाव मुक्काम
●  १३  जुलै २०१६ बाजीरावाची विहीर उभे रिंगण २ रे व गोल रिंगण ४ थे   वाखरी 
● १४ जुलै  २०१६  पादुकाजवळ आरती - व उभे ३ रे रिंगण - पालखी सोहळा पंढरीत विसावेल .

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
varkariyuva.blogspot.in

वारी संदर्भातील विशेष माहितीकरिता आजच वरील लिंक ला भेट द्या .