Tuesday 25 March 2014

साधक वर्गास (युवा वर्गास) श्री संत तुकाराम महाराजांचा उपदेशपर अभंग

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||

साधक वर्गाला संपूर्ण युवा वर्गास तुकाराम महाराजांनी केलेला उपदेश - 
खालील उपदेशाच जर युवकांनी आपल्या जीवनात अनुकरण केल तर नक्कीच तो एक दिवस आयुष्यातला सर्वोच आनंद प्राप्त करेल .
साधकाची दशा उदास असावी | उपाधी नसावी अंतर्बाह्य || १ ||
लोलुपता काय निद्रेते जिणावे | भोजन करावे परिमित ||२ ||
एकांती लोकांती स्त्रियांसी भाषण | प्राण गेल्या जाण करू नये ||३ ||
संग सज्जनांचा उच्चार नामाचा | घोष कीर्तनाचा अहर्निशी ||४ ||
तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे | तोची ज्ञान लाहे गुरुकृपा ||५ ||
गुरुकृपा 
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

गुढीपाडव्याच्या हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! - अक्षय भोसले


सुजनवाक्य :- " प्रपंच सांडोनी परमार्थ कराल | तेणे तुम्ही कष्टी व्हाल || " - श्री महंत प्रमोद महाराज जगताप

सुजनवाक्य :- 


" प्रपंच सांडोनी परमार्थ कराल | तेणे तुम्ही कष्टी व्हाल || "

पारमार्थिक जीवन जगत असताना अनेक साधकांचे दुर्लक्ष होते .
एकांगी परमार्थ करीत हि साधक मंडळी शेवटी कष्टी होतात , असे श्री स्वामी महराज म्हणतात .
प्रोंच सांडोनी परमार्थ कराल | तेणे तुम्ही कष्टी व्हाल |
प्रपंच परमार्थ चालवाल | तरी तुम्ही विवेकी ||

परमार्थ जरी करीत असला तरीसुद्धा अन्न , वस्त्र , निवारा या मुलभूत गरजा आल्याच . त्या पूर्ण करताना साधकाची त्रेधातिरपीट उडते . महाराज म्हणतात अगदी संन्यासी जरी असला तरी त्याला दुपारी बारा वाजता दोन घास अन्न पाहिजेच .

जरी झाला सन्यासी | तरी माध्यानासी तोंड वासी ||

लज्जा रक्षणाकरिता आणि शरीर संरक्षणयाकरिता वस्त्र पाहिजे .विश्रांती करिता निवारा पाहिजे . पारमार्थिक झाला तरी त्याला प्रपंच आहेच . तो टाकून कसा चालेल ? आणि जर प्रपंच सोडून परमार्थ करायचा म्हटला तरी त्यात कष्ट भोगावे लागतील . जर परमार्थ व प्रपंच यांची सांगड घातली तरच तो विवेकी मनुष्य होय .

प्रपंच परमार्थ चालवाल | तरी तुम्ही विवेकी ||

श्री समर्थ रामदास स्वामी महाराज पुढील ओवीत मोठ मार्मिक वर्णन करतात .

प्रपंच सांडून परमार्थ केला | तरी अन्न मिळेना खायला |
मगतया करंट्याला | परमार्थ कैंचा || - दासबोध
.
प्रपंचाकडे पाठ फिरवून नुसताच परमार्थ करीत बसलात तर खायला दुपारी अन्न सुद्धा मिळणार नाही ; मग अशा कमनशिबी माणसाला परमार्थ कसा बरे साध्य होईल ? श्री संत ज्ञानेश्वर माऊली सुद्धा एका ठिकाणी सुंदर उपदेश करतात :

का सोडिसी गृह आश्रम | का संडिसी कुळीचे धर्म ||

हा सुंदर असा गृहस्थाश्र्म का सोडतोस ? कुळीचे कुलधर्म का त्यागतोस ? हा प्रपंच परमार्थाच्या आड येणार नाही . फक्त प्रपंचात रममाण न होता , त्यातच रत न होता परमार्थ हि करावा .
हि एक बाजू झाली , आता ण परमार्थ न करिता केवळ प्रपंचात रमणारे जे लोक आहेत त्यांचा हि स्वामी महाराजांनी विचार सांगितला आहे .
धन्यवाद .
 वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य 

संत एकनाथ महाराज वाडा :- विजयी पांडुरंग दर्शन

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

शांतीब्रह्म संतश्रेष्ठ एकनाथ महाराज षष्ठी सोहळा २०१४
अनुभवण्याचा भाग्य माऊली कृपेने प्राप्त झाल .
शरणरशरण एकनाथा । पायी माथा ठेविला ॥
नका पाहु गुणदोष । झालो दास पायाचा ॥
आदरणीय तथा परमस्नेही ह.भ.प. Yogirajजी गोसावी , ह.भ.प. Pushkar ji गोसावी , सर्वच गोसावी परिवार यांची भेट झाली . प्रचंड गर्दी भाविकांची वरदळ असतानाही दोन्ही हि बंधूनी २ ते ३ तास आमच्या सोबत व्यतीत केले . श्री विजयो पांडुरंगाची मूर्तीच अतिशय जवळून अस गाभार्यातून दर्शन पुष्कर महाराजांमुळे प्राप्त झाल . गौरव अपरंपार यांच्या सोबत लाखोंच्या संख्येने भाविक असताना काही क्षणात संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या समाधीच दर्शन झाल . केवळ आणि केवळ माऊली कृपा 
संपूर्ण नाथवंशज परिवाराच प्रेम असच माऊली कृपेने माझ्यावर सदोदित राहव .
समस्त वारकरी संप्रदाय युवा मंच परिवार :)

४१५ वा भागवतोत्तम शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज षष्ठी सोहळा , श्री क्षेत्र पैठण

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
४१५ वा भागवतोत्तम शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज षष्ठी सोहळा , श्री क्षेत्र पैठण येथे सुरु ..
शरण शरण एकनाथ | पायी माथा ठेविला ||
नक्कीच जास्तीत जास्त सहभागी व्हा !
शांतीब्रम्ह संतश्रेष्ठ एकनाथ महाराज षष्ठी सोहळा २०१४
https://www.facebook.com/events/1394440904159797/1400885363515351/?notif_t=event_mall_reply
पहा LIVE अपडेट ४१५ वा शांतीब्रम्ह संतश्रेष्ठ एकनाथ महाराज षष्ठी सोहळा २०१४
विशेष साह्य :-
ह.भ.प. Pushkar महाराज गोसावी .
ह.भ.प.ज्ञानराज महाराज गोसावी .
ह.भ.प.Yogiraj महाराज गोसावी .
आणि संपूर्ण नाथ वंशज परिवार ...

तुमचा ,
अक्षय भोसले
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र