Friday 24 April 2015

श्री संत तुकराम बिज उत्सव तथा जागतिक महिला दिन यांचा समनव्य साधुन मासिक "वैष्णव दर्शन" स्त्री संत विशेष अंकाचे प्रकाशन करताना श्रीगुरु महंत ह.भ.प.प्रमोद महाराज जगतापजी , खासदार श्रीरंगजी उर्फ़ आप्पा बारणे .

ll श्री गुरु ll



श्री संत तुकराम बिज उत्सव तथा जागतिक महिला दिन यांचा समनव्य साधुन मासिक "वैष्णव दर्शन" स्त्री संत विशेष अंकाचे प्रकाशन करताना श्रीगुरु महंत ह.भ.प.प्रमोद महाराज जगतापजी , खासदार श्रीरंगजी उर्फ़ आप्पा बारणे ,ह.भ.प. सजंय महाराज धोंडगे ,उद्योजक मा.शेखरभाऊ कूटेजी श्री क्षेत्र देहू येथे
संपादक - अक्षय चंद्रकांत भोसले
०८४५१८२२७७२

संतवीर ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांचे शुभाशीर्वाद !

|| श्री गुरु ||

परमआदरणीय श्रद्धेय संतवीर बंडातात्या कराडकर यांचे शुभाशीर्वाद !
 


राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक मा.श्री रविंद्र जी जगताप यांचा अभिप्राय .

|| श्री गुरु ||



कीर्तन संपता क्षणी हातात चिठ्ठी आली आणि ती चिठ्ठी होती 

श्री रविंद्र विठोबा जगताप 

माजी प्राचार्य , राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक

यांचा भेटलेला लेखी अभिप्राय मुळात सुरवातीस कल्पना ही नव्हती की एक महनीय आदर्श व्यक्ति कीर्तन श्रवण करण्यासाठी उपस्थित आहे  गुरुकृपेने सेवा घडून आली
येथे माझेचि उरले पाईकपण

" स्त्रीला दुषणे न देता तिच्याकडे बघण्याची दृष्टी अधिक व्यापक करणे गरजेचे आहे , स्त्रियांचा प्रथम गौरव कोणी केला असेल तर तो वारकरी संप्रदायानेच "- अक्षय भोसले





"नाईट लाईफ"मुळे व्याभिचार वाढेल! - अक्षय भोसले

मुंबईतील night life या विषया वरील दैनिक सकाळ वृत्तपत्र यांनी घेतलेली मुलाखत !

०१ मार्च २०१५

"नाईट लाईफ"मुळे व्याभिचार वाढेल!

"सिटी नेव्हर स्लिप्स' अशी मुंबईची ओळख.. पोटाची खळगी भरण्यासाठी मायमातीसोबतची नाळ तोडून या मायानगरीत हरवलेला प्रत्येक जण इथं लढत असतो... अस्तित्व टिकवायचं आव्हान असल्यानं सहाजिकच वेळेचे बंधन नसतं. युवा सेनाप्रमुख आदित्य
ठाकरे यांनी हातावर पोट असलेल्या अशाच शेकडो नागरिकांसाठी "नाईट लाईफ'ची संकल्पना मांडली, की यात बड्या उद्योजकांचे हित आहे हा संशोधनाचा, पर्यायानं वादाचा विषय... परंतु या "चाकोरीबाह्य' संस्कृतीला काही घटकांनी विरोध दर्शवला आहे. वारकरी संप्रदायाची याबाबत भूमिका मांडलीय वारकरी संप्रदाय युवा मंचचे अध्यक्ष कीर्तनकार अक्षय भोसले यांनी...
--------------------

¤ शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या "नाईट लाईफ'बद्दल वारकरी संप्रदायाची भूमिका काय?
- आपली संस्कृती अत्यंत पवित्र आणि परिपूर्ण आहे. तिला बाधा पोहोचेल असं कोणतंही पाऊल उचलता कामा नये. आमचा कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध नाही. शिवसेनेने तर मराठी माणसाच्या हितासाठी अनेक प्रकल्प राबवले आहेत. परंतु "नाईट लाईफ' ही संकल्पना तितकीशी रुचणारी नाही. यामुळे गैरव्यवहारांना अधिक चालना मिळेल.

¤ "नाईट लाईफ'मुळे रोजगारनिर्मिती होईल, असा ठाकरेंचा दावा आहे.
- खरं तर "नाईट लाईफ' ही संकल्पनाच मुळी मुंबईसाठी नवी नाही. गिरण्या बंद झाल्या असल्या तरी हे शहर आजही रात्रभर जागेच असते. दूधवाल्यांपासून मच्छीचा व्यवसाय करणाऱ्यांचा दिवस तर इतर सगळे झोपल्यानंतर मध्यरात्री सुरू होतो. कीर्तनकार असल्यानं माझा बऱ्याचदा रात्रीचा प्रवास होतो. त्या वेळी पावभाजी, बुर्जीपाव, वडापाव ते सायकलवर चाय विकणारे सर्रास दिसतात. हे सर्वसामान्य मुंबईकर आहेत. "नाईट लाईफ'ची नवी संकल्पना त्यांच्या हितापेक्षा बडे उद्योजक, राजकारण्यांचे हित जपणारी आहे. पब, डिस्को सुरू ठेवून त्यांना काय रोजगार मिळणार? यात 70 टक्के राजकारण आणि केवळ 30 टक्के समाजकारण आहे, असं प्रथमदर्शनी वाटतं.

¤ यामुळं पर्यटनाला चालना मिळून सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर पडेल, असं समीकरण मांडण्यात आलंय. तसं झालं तर नागरिकांचाच फायदा नाही का?
- पर्यटनवाढीसाठी "नाईट लाईफ' हा पर्याय नव्हे. उलटपक्षी या संस्कृतीमुळे व्यभिचाराला चालना मिळेल आणि स्त्री-संरक्षणाचा प्रश्‍न अधिक गंभीर बनेल. सरकारला याद्वारे फायदा होईल असं वाटत असेल, तर याअगोदर ही संकल्पना का राबवली गेली नाही? सरकारला काही करायचंच असेल तर रात्रशाळा, रात्रमहाविद्यालये सुरू करावीत.

¤ प्रश्‍न गैरव्यवहारांचा असेल, तर "नाईट लाईफ'मुळे रहदारी वाढेल आणि पोलिसांवरील ताण कमी होईल, असं पोलिस आयुक्तांचं म्हणणं आहे?
- पोलिस यंत्रणेची निर्मिती नागरिकांच्या संरक्षणासाठीच झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील ताण कमी करण्यासाठी अशा संस्कृतीला प्रोत्साहन देणं केव्हाही चुकीचंच आहे. खरं तर रात्रीचा व्यवसाय करू पाहणाऱ्यांना पोलिसांचाच जास्त त्रास होतो, हे आता जगजाहीर आहे.

¤ पोलिस आयुक्तांसह भाजपच्या शायना एन. सी. यांनी या संकल्पनेला संमती दर्शवली आहे. मुख्यमंत्र्यांनीही अर्थसंकल्पी अधिवेशनात यासंबंधी कायद्यातील बदलांसाठी प्रयत्नांचे आश्‍वासन दिले आहे.
- आमचा याला पूर्णपणे विरोध आहे. तरीही "नाईट लाईफ' अस्तित्वात आलंच तर आमच्या काही मागण्या असतील. त्या आम्ही संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचवू.

¤ त्यावेळी तुम्ही रात्रभर भजन-कीर्तनासाठी परवानगी मागणार का?
- नाही. तसं केल्यास येथे धर्माचं राजकारण जन्माला येईल. प्रत्येक धर्मातील बांधव तशा प्रकारची मागणी करतील व यातून सामाजिक तेढ निर्माण होईल.

¤ तुम्ही विरोध केलात तर "प्रतिगामी संप्रदाय' असा शिक्का बसणार नाही का?
- अध्यात्मावर भर असला तरी अंधश्रद्धेला आमच्याकडे थारा नाही. किंबहुना डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर आम्ही प्रबोधनात्मक कीर्तनेही केली. कॉ. पानसरेंच्या हत्येचाही आम्ही तीव्र निषेध करतो. परंतु पाश्‍चात्य संस्कृतीचं डोळे झाकून अनुकरण केलं जात असेल आणि त्यामुळे आमच्या संस्कृतीला धोका निर्माण होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही.

पत्रकार - लहूजी सरफरे
लिंक :

epaper.esakal.com/sakal/2Mar2015/Normal/Mumbai/page6.htm

वैद्य प्रशांत सुरु सर ( प्रमुख विश्वस्त- श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , आळंदी )यांच्याकडून प्राप्त आशीर्वादरुपी शुभेच्छा !

|| श्री गुरु ||

श्रीमंत माऊली प्रतिष्ठान च्या वतीने आदरणीय वैद्य प्रशांत सुरु सर ( प्रमुख विश्वस्त- श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , आळंदी )यांच्याकडून प्राप्त आशीर्वादरुपी शुभेच्छा ! समवेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिलजी आव्हाड  

वारकरी संप्रदाय युवा मंच चे संस्थापक अक्षय भोसले यांद्वारे कीर्तनाच्या माध्यमातून जन समुदायात प्रबोधन - जळगाव कीर्तन मोह्त्स्व



मासिक वैष्णव दर्शन - सदगुरु विशेषांक - जानेवारी २०१५

ll श्री गुरु ll
कळविन्यास आनंद होत आहे
नोव्हेंबर २०१४ कार्तिक वारी ला सुरु झालेल आपल्या सर्वांच आवडत मासिक वैष्णव दर्शन याचे २ अंक आपल्या पर्यन्त आले ,वैष्णव दर्शन - मासिक यांचा जानेवारी २०१५ अंक हा
सदगुरु विशेषांक आहे .
सदरहु मासिक अंकात पूजनीय सदगुरु धुंडा महाराज देगलुरकर यांच्या जीवन चरित्राचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे
वारकरी संप्रदायाचे तथा संत साहित्य यांचे गाढ़ेअभ्यासक असे व्यक्तिमत्त्वे याचं चिंतन या अंकात आहे ते पुढीलप्रमाणे
जय जय देव अद्वितीय -श्रद्धेय श्रीगुरु चैतन्य महाराज देगलुरकर पंढरपुर .
ज्ञानेश्वरीचा जिवंत ज्ञानकोश अर्थात धुंडा महाराज देगलूरकर -श्रद्धेय वा न उत्पात शास्त्री , पंढरपुर
तो करी उपाय गुरुराव - आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर पुणे
ज्ञानमार्तंड -श्रीगुरु महंत प्रमोद महाराज जगताप , बारामती
वै धूंडा महाराज देगलुरकर एक व्यासंगी व्यक्तिमत्तव - सौ ऋताजी देशमुख , लातूर
संत कबीर - समर्थभक्त सुनील चिंचोलकरजी
वारकरी संप्रदायाचे आधुनिक काळातील आधारस्तंभ वै धूंडा महाराज देगलुरकर - ह.भ.प. योगिराज महाराज गोसावी ,नाथवंशज पैठनकर
श्रद्धेय धूंडा महाराज देगलुरकर एक विभुतित्त्व -ह.भ.प माधवदास महाराज राठी , नासिक
ज्ञानेश्वरीतील पाप पूण्य विचार -डॉ मंगलाताई सासवडेजी ,जुन्नर
चालते ज्ञानाचे बिंब सदगुरु धूंडा महाराज देगलुरकर -ह.भ.प.एकनाथ महाराज पुजारी , बीड
भगवद्गितेतिल उत्तम भक्ताची लक्षणे- प्रा.डॉ शिरीष लिमये , पुणे
धन्य तुकोबा समर्थ - प्रा डॉ ज्ञानेश्वर थोरात , मंचर
वेध भविष्याचा - वेदमुर्ति उदयशास्त्री जोशी , नवी मुंबई
अधिक माहिती करिता आजच सभासद व्हा वैष्णव मासिक दर्शनचे smile emoticon
अधिक माहितीकरिता संपर्क वैष्णव दर्शन - मासिक

प.पु.सदगुरु धुंडामहाराज देगलूरकरजी पूण्यस्मरण सोहळा नगरप्रदक्षिणा

ll श्री गुरु ll

प.पु.सदगुरु धुंडामहाराज देगलूरकरजी पूण्यस्मरण सोहळा- पंढरपुर नगरप्रदक्षिणा वाळवंट येथील भजनातील क्षण

श्रीगुरू श्रीमहंत प्रमोद महाराज जगताप जी , श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर जी यांच्या पावन सानिध्यात

श्रीगुरू श्रीमहंत प्रमोद महाराज जगताप जी  , श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर जी यांच्या पावन सानिध्यात

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र चे ऊर्जा स्त्रोत .

चित्रपटांच्या माध्यमातून नव्या पिढीची हानी करणाऱ्या केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचा निषेध - ह.भ.प. अक्षय महाराज भोसले

दैनिक सनातन प्रभात !

link :- http://dainiksanatanprabhat.blogspot.in/2014/11/blog-post_9774.html