Thursday 9 June 2016

श्री संत मुक्ताई यांचे श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने आज प्रस्थान !

संत मुक्ताई यांची ३०९ वर्षाची परंपरा असलेली पालखीचे आज श्री पंढरपुरच्या दिशेने  प्रस्थान !


आषाढी वारीसाठी संत मुक्ताई यांची ३०९ वर्षाची परंपरा असलेली पालखीचे आज गुरुवारी सकाळी अभिषेक पूजा व आरती झाल्यानंतर आई मुक्ताईचे जयघोषात पंढरपूरसाठी प्रस्थान झाले. यावेळी निरोप देण्यासाठी हजारो वारकऱ्यांनी कोथळी येथील मंदिर परिसरात गर्दी केली. 
विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह मध्य प्रदेश येथून मोठ्या प्रमाणावर वारकरी येथे एकत्र होतात आणि पालखीसोबत पंढरपूरास जातात. संत मुक्ताई पालखीचा प्रस्थान सोहळा असल्याने कोथळीच्या जुन्या मुक्ताई मंदिरात दोन दिवसांपासून वारकऱ्यांची गर्दी उसळली होती. बुधवारी अर्थात काल रात्री मंदिरात सायंकाळी हरिपाठ तर रात्री ह.भ.प.रवींद्रमहाराज हरणे महाराज यांचे कीर्तन झाले. 
पहाटे आई मुक्ताईची षोडषोपचार पूजा करण्यात आली. मुक्ताईच्या पादुकांना  अभिषेक करण्यात आला. यानंतर अॅड रवींद्र पाटील यांनी पादुकांना सजवलेल्या पालखीत स्थापन केले. यावेळी वारकऱ्यांचे भजन आणि आई मुक्ताईचा नामाचा गजर करण्यता आला. यानंतर पालखीचा पूजा आणि आरती झाली. भाविकांच्या उत्कट प्रेमाला यावेळी भरती आली. प्रदक्षिणेनंतर महाव्दारातून पालखी रथात ठेवण्यात आली हा क्षण डोळयात साठवण्यासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली. हजारोंच्या उपस्थितीत ठिकठिकाणी स्वागत स्वीकारत पालखी नवीन मंदिरात आज दाखल  होईल . पालखी सोहळ्यास सुमारे ३०९ वर्षांची अखंड परंपरा असून महाराष्ट्रात सर्वात लवकर ही पालखी निघते. सुमारे साडे सातशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी पालखीला ३४ दिवस लागतात. जळगाव, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातून पालखी मार्गक्रमण करते. यंदा पालखी १२ जुलै २०१६ रोजी पंढरपूरात पोचणार आहे . नियमित पहात रहा वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र (varkariyuva.blogspot.in )

विशेष सहकार्य - संत मुक्ताई संस्थान , कोथळी -.मुक्ताईनगर 
मा. रवींद्रजी पाटील -संत मुक्ताई संस्थान 
ह.भ.प.रवींद्रमहाराज हरणे - दिंडी प्रमुख संत मुक्ताई संस्थान
ह.भ.प.उद्धवमहाराज जुनारे - व्यस्थापक संत मुक्ताई संस्थान जुने मंदिर 

माहिती - अक्षय भोसले 
फोटो साभार - ह.भ.प.ज्ञानेश्वरमहाराज हरणे पाटील (अध्यक्ष - वारकरी संप्रदाय युवा मंच , मुक्ताईनगर जळगाव )

Varkariyuva.blogspot.in 


प.पु.श्रीगुरु ह.भ.प.चैतन्यमहाराज देगलूरकर