Monday 27 February 2017

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा श्रीगोळवलकर गुरूजी धर्मसंस्कृती पुरस्कार प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांना जाहीर ...!


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने धर्मसंस्कृती व अनुसंधान क्षेत्रासाठी श्रीगोळवलकर गुरूजी पुरस्कार नुकतेच जाहिर झाले असून
या वर्षी धर्मसंस्कृती क्षेत्रासाठी श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांची निवड झाली आहे. तर अनुसंधान क्षेत्रासाठी पद्मश्री डाॅ. एच्. आर. नागेंद्र , अध्यक्ष, स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था, बंगळूर, यांची निवड झाली आहे.

दि. ५ मार्च रोजी सायं ५.३० वा. पुरस्कार प्रदान सोहळा , सावित्रीबाई फुले कलामंदिर, डोंबिवली  (पूर्व) येथे संपन्न होणार आहे.

परंपरेत आणखी एक मानाचा तुरा …

मन:पूर्वक अभिनंदन !