Wednesday 9 November 2016

ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीचं सार्वकालिक सत्यत्व:

राजाज्ञेची अक्षरे आहाती l
तिये चामा एका जया पडती l
तया चामासाठी जोडती  l
सकळ वस्तु ll9- 453ll

वाचूनि सोने रूपे प्रमाण नोहे l
एथ राजाज्ञाचि समर्थ आहेl
तैचि चाम एक जै लाहे l
तेणे विकती आघवी ll9-454ll

राजाची आज्ञा (हुकूम) ज्या एका चामड्याच्या तुकड्यावर (किंवा नोटेवर) उमटलेला आहे, त्या तुकड्याच्या मोबदल्यातच बाजारातील सर्व वस्तूंची खरेदीविक्री होऊ शकते. त्याच्यावर राजाज्ञा नसेल तर तो कस्पटासमान होय. त्या तुकड्यावाचून सोने-चांदी अशासारखे धातू कितीही मौल्यवान असले तरी (दैनंदिन व्यवहारासाठी) ते प्रमाण नाहीत. त्यासाठी राजाज्ञा असलेला तो चामड्याचा तुकडाच समर्थ, प्रभावी, उपयुक्त आहे.

माननीय  पंतप्रधानांनी एका तडाख्यात 500 व 1000 रूपयांच्या जुन्या नोटांवरील *राजाज्ञा* (केंद्र सरकरने रिझर्व्ह बॅन्केच्या गव्हर्नरच्या सहीने दिलेले वचन) पुसून टाकली. पुढे जे घडतंय, ते आपण कालपासूनच अनुभवतो आहोत. सूज्ञांना माऊलींच्या 726 वर्षांपूर्वींच्या ओव्यांवरून त्यांचे अलौकिक द्रष्टेपण कळले असेलच.

- varkariyuva.blogspot.in