Wednesday 28 May 2014

भक्तराज पुंडलिक अल्प चरित्र - पंढरीची वारी विशेष

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
आज आपण पाहणार आहोत ते पंदृंग परमात्मा पंढरीला कशा प्रकारे आला व कोणाकरिता आला संपूर्ण इतिहास

पंढरीची वारी विशेष –

भक्तराज पुंडलिक अल्पचरित्र

तंव हरी अंकीं राधा बैसली | रुक्मिणीने ते पहिली ||
मनी विषमता उदेली | मर्यादा न धरी माझी हे ||
आणि पुढील भविष्य जाणोनी | रुक्मिणी निघाली रुसोनी |
दक्षिणे मानदेंशी दिंडरी वन | त्ये स्थळी पातळी ||
मग बाळ वेश घेऊन | गोकुळी आला श्रीकृष्ण |
गाईगोपाळ संवे घेऊन | दक्षिण दिंशी पातला ||३७ ||
गाई गोप ठेवोन वेणू नांदी | आपण निघाला रुक्मिणी शुद्धी |
तों दिंडर वनामधी | तप आचरत बैसली ||३८||
ऐकोन रुक्मिणीचे वचन | हास्य करी जगजीवन |.
गळया मंधी हात घालोन | आलिंगन दिले प्रीतीने ||४१ ||
दिंडरवन पाहत पाहत | तों पुढे दिखेले लोह दंडतीर्थ |
तेथे मायबापाची सेवा करीत | बैंसला विप्र पुंडलिक ||४३ ||
सूर्यवंशी राजा दशरथ | तयासी घडला श्रावण घात |
तोची हा पुंडलिक यथार्थ | चरित्र त्यांचे परियेसा ||४४ ||
मानदेशी ग्रामस्थ जाण | तेथे भिक्षुक वृत्ती पद्मनाभ ब्राह्मण |
कांता गोदावरी सुलक्षण | अपार गुणवान सर्वज्ञ ||४५ ||
बहु प्रयत्न करता जाण | उदरी एकाची झाले संतान |
त्यांचे नाम पुंडलिक पूर्ण | आवडी जाण ठेविले ||४६||
 असा पुंडलिकाचा इतिहास विस्तारपूर्वक संत एकनाथ महराजांनी लिहला आहे . पुंडलिकाचे लग्न होऊन तो स्त्रीलंपट झाला . पूर्व जन्मात अपूर्ण राहिलेली कशी यात्रा पूर्ण करावी , असे आई वडिलास वाटले व टी आपली इच्छा त्यांनी पुंडलिकास सांगितली , पण पुंडलिकाची बायको म्हणाली , या म्हातारा म्हातारीला नेण्यात आपणास त्रास होईल , म्हणून यांचं बरोबर आपण येत नाही . शेवटी यात्रेकरूसोबत आई वडील निघाले व नंत्य्र पुंडलिकाने जाण्याची तयारी केलि . पुंडलिकाची पत्नी सासू- सासऱ्यास म्हणाली कि , तुम्हाला यायचे असेल , तर खुशाल या , पण आम्ही तुमचे काहीच करणार नाही , असे म्हणून सर्वच यात्रेला निघाले .
पुढे कुक्कुट ऋषींच्या आश्रमावर तीन स्त्रिया मलीन रूपाने येऊन दास्र्ह्न घेऊन परत जाऊ लागल्या असता पुंडलीकाने त्यांना विचारले , हा काय प्रकार आहे ? त्यावर त्यांनी उत्तर दिले कि , आम्ही गंगा यमुना सरस्वती असून तुझ्यासारख्या आई वडिलांची सेवा न करणारे पातकी आमच्यात स्नान करून पाप विसर्जन करतात व ते पाप आम्ही ऋषींच्या दर्शनाने घालवतो . हे ऐकून पुंडलिकास पश्चाताप होऊन त्याने आई वडिलांची सेवा करण्यास सुरवात केली व त्याच्या भावाने देव पंढरपूरला आले .
“ पुंडलिकाच्या भावार्था | झाला गोकुलीहुनी येता |”
मतांतर
अन्य मते पुंडलिकास काशीला जाताना रोहिदास महाराजांनी उपदेश केला कि काशीला जाऊन काय करतोस . आई वडिलांची सेवा करत नाहीस .
“ माय बाप केवळ काशी | तेणे न जावे आणिक तीर्थाशी || ”  किंवा “अरे मन चंगा , तो काठोक मी गंगा ”
असे म्हटल्यावर पुंडलिक म्हणाले , महाराज ! तुमच्या या कातड्याच्या काठोक मध्ये पैसा टाकला , तर गंगेत जाईल काय ? असे म्हटल्याबरोबर काठोक मधून गंगेचा हात वर येऊन रोहीदासांचा पैसा घेतला , हे पाहून पुंडलिकास पश्चाताप होऊन घरी जुं तो आई वडिलांची सेवा करू लागला व तेही प्रमाण आहे , असे एकनाथ महाराज म्हणतात
अन्य मत कवी म्हणती | तोही आधार ग्रंथी ||
रोहिदास उपदेश स्थिती | पुंडलिकास मानली ||७७||
बहु ग्रंथ बहु कथा | श्रोती दोष ण ठेवावा सर्वथा ||
ज्या ज्या वाणी स्तविता | प्रिय सर्वथा हरीशी ||७८||
आता यावरून पुंडलिक व रोहिदास एकाच काळातले होते , असे वाटते व रोहीदासांचे वर्णन नामदेवांनी केले आहे , यावरून ते ज्ञानदेव महाराज व नामदेवांचे समकालीन होऊन गेले असेहि होते व त्यांनी पुंडलिकास उपदेश केला .
पण हे जमत नाही , म्हणून कुक्कुट आश्रमातच उपदेश मानणे योग्य आहे . अस्तु , अशा त्या पुंडलिकास देवाने दर्शन दिले . पुंडलीकाने देवास आसन म्हणून एक दगडाची वीट उजव्या हाताने दिली , त्यावर देव उभे राहिले , गौतमच्या शापाने इंद्र टी वीट झाला होता . देव म्हणाले , ‘ पुंडलिका मी तुझ्यावर प्रसन्न झालो , वर माग .’ पुंडलिक म्हणाले कि , मूढ पापी जैसे तैसे | उतरी कसे लावूनी || देवानी वर दिला कि , मी पंढरपूरला येनारांच्या पाप-पुण्याचा विचार करणार नाही . मूढ पापी जसे अस्टेल तसे असोत . तयंचा उद्धार करीन .
“ पंढरीचे वारकरी | ते अधिकारी मोक्षाचे ||
पुंडलिका दिला वर | करुणाकरे विठ्ठले ||’’
याप्रमाणे देव पतीतांच्या उद्धराकरिता पंढरपूरला विटेवर उभे राहिले . पण शेकडो वर्षे देवाकडे कोणीच आले नाही . म्हणून ज्ञानेश्वरांना वाटले , आपण सर्व लोकांना गोळा करून दिंडीच्या रूपाने पंढरपुरास नेऊन त्यांना वारीचे वळण लावून त्यांचा उद्धार करावा . तसेच माझ्या जीवनाचेही साफल्य पंढरपूरला जाऊनच होईल असे वाटू लागले .
आणि आज आपण जी वारी पाहतो पंढरीची ती  हीच वारी माझ्या माऊली ज्ञानेश्वर महराजांनी सुरु केली  .
माझ्या जीवीची आवडी | पंढरपुरा नेईन गुढी ||
आवडल्यास नक्कीच इतरांपर्यंत पोहचवा व अध्यात्मिक कार्यास पुढे नेण्यास मदत करा
साभार :- संत साहित्य  व ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते .
तुमचा ,
अक्षय भोसले -८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदु संस्कृती !
#facebookdindi #वारकरी  #वारी  #पंढरपूर #आळंदी  #देहू  #पुंडलिक  #संत  #महाराज  #पालखी  #hindu #sant eknath #paithn #nashik #facebook #mumbai #maharashtra #youth #आईवडील #संत #संत साहित्य #पालखी सोहळा