Thursday 17 July 2014

श्री ज्ञानेश्वरीतील लोहचुंबकिय संदर्भ - शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

 श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील लोहचुंबक संदर्भ आपल्या पुढे मांडण्याचा आमचा हा प्रयत्न्न !

लोहचुंबका विषयी श्री ज्ञानेश्वरीत काही उपमा आलेल्या आहेत , परमेश्वर प्रकृतीचा ( मुळमाया ) अंगीकार केला कि सृष्टीचा उत्पत्ती होते , परंतु याचा परमेश्वराला काहीही शीण होत नाही , हे सांगताना उपमा देतात ,
                    जड परि जवळिका । लोह चळे तरि चळो कां ।
                     कवणु शीणु भ्रामका । सन्निधानाचा ॥
                                         - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ९-११६
लोखंड जड असूनही लोह्चुबंकच्या जवळ खेचले जाते , त्याच्या या खेचले जाण्याचा लोहचुंबकाला कोणता त्रास होतो ? अर्थात कोणताही त्रास होत नाही . त्याप्रमाणे परमेश्वराला या सृष्टीचा , व्यवहाराचा काही शीण नाही .
      तेराव्या अध्यायात क्षेत्र क्षेत्रज्ञानाविषयी सांगताना दृष्टांत देतात ,
                             संसर्गे चेष्टिजे  लोहे | परि लोह भ्रामक नोहे |
                            क्षेत्र क्षेत्रज्ञा आहे | तेतुला पाडू ||
                            - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १३-११२२
ज्याप्रमाणे लोहचुंबकाच्या सानिध्यात लोखंडहि चुंबकासारखे होते . परंतु लोखंड काही चुंबक नसते , त्याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्याविषयी समजावे .
                  अठराव्या अध्यायात हि ईश्वरी सत्तेने भूत मात्रांचे व्यवहार होतात हे सांगतानाही लोहचुंबकाचि उपमा दिली आहे ,
                        भ्रामकाचेनि संगें । जैसें लोहो वेढा रिगे ।
                          तैसीं ईश्वरसत्तायोगें । चेष्टती भूतें ॥
                                                   - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८-१३११
 जसे लोखंड लोहचुंबकाच्या सामर्थ्यामुळे हालते , फिरते , तसे ईश्वराच्या सत्तेने जड असलेल्या भूतमात्रांच्या हालचाली होतात .
                            संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य सामझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
                           आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मच , महाराष्ट्र
                                 -

१२ व्या शतकात सांगितले खगोलशास्त्र - शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

      अकराव्या अध्यायाच्या आरंभी या अध्यायामधे शांत आणि अद्भुत रस एकत्र आले आहेत हे सांगताना म्हटले आहे ,
                          नातरी अवसेचा दिवशी | भेटली बिंबे दोनी जैशी |
                          तेवी एकवळा रसी | केला एथ || - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ११-०५
 अमावस्येच्या दिवशी चंद्र आणि सूर्य पृथ्वीच्या एकीकडेच असतात , जणू काय ते एकमेकांना भेटतात .( त्याप्रमाणे  शांत आणि अद्भुत हे दोन्ही रस या अध्यायात एकमेकांना भेटले आहेत )
                   वद्य पक्षात कमी कमी होत अमावस्येला रात्री चंद्र संपलेला नसतो तर त्या दिवशी तो सूर्याबरोबरच उगवतो , मावळतो , त्यामुळे अमावस्येला रात्री आकाशात चंद्र दिसत नाही , हे वैज्ञानिक सत्य सांगितले आहे .
                    चंद्राच्या दिसणाऱ्या कला या दृश्यभास असतात म या कला चंद्र , सूर्य आणि पृथ्वी यांच्या परिभ्रमणामुळे बदलणाऱ्या जागांच्या परस्पर सापेक्षतेच्या परिणामाने दिसतात , चंद्र आणि त्यांच्या या कलांचा हा संकेत भगवंताचे समत्व सांगताना उदाहरण म्हणून सांगितला आहे .
                  हा गा पूर्णिमेआधी कायी | चंद्र सावयवुचि नाही |
                        परी तिये दिवशी भेटे पाही | पूर्णता तया ||          
                                                          - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८ - ११२७
पुर्निमेआधी चंद्राचे पूर्णबिंब दिसत नसले तरी चंद्रबिंब पूर्ण नसते काय ? अर्थात असतेच . पण पुर्निमेच्या दिवशी त्याचे  पूर्णबिंब दिसते
                संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य सामझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
                          आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मच , महाराष्ट्र
             
आकाशाचा रंग निळा हा केवळ भास :- शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

पृथ्वीवरून आपल्याला आकाश निळे दिसते परंतु वास्तविक आकाश काही निळे नसते . पृथ्वीवरून दिसणारा तो एक आभास आहे हे हि ग्रंथराज ज्ञानेश्वरीत दोनी ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात सांगितलेले आहे .
निळिमा अंबरी | का मृगतृष्णालहरी |
तैसे वायाचि फरारी | वावो जाहले ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी : १३-१०५
ज्या प्रमाणे आकाशाचा निळा रंग किंवा मृगजळाच्या लाटा वास्तविक नसतात , व्यर्थ असतात
( त्याप्रमाणे मन हा वायूत्त्वाचाच एक अभ्यास आहे . ) मुळात आकाशाचा रंग हा निळा नाही अस यातून प्रतिपादन होत .
वांझेच्या लेका | कैची जन्मपत्रिका |
नभी निळी भूमिका | के कल्पू पा ||
-श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी : १५-२३४
वांझेच्या मुलाची जन्मपत्रिका असते का ? किंवा आकाशाला निळा रंग असतो का ? अर्थात या दोन्ही गोष्टी अस्तित्वात नसतात , ( त्याप्रमाणे या संसारवृक्षाचे अस्तित्व जाणावे )