Sunday 19 June 2016

योग:चित्तवृत्ती निरोध: - पतंजली सूत्र (१.०२ )

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।

आज जागतिक योग दिन - २१ जून  या अनुषंगाने काहीस चिंतन !

श्री ज्ञानेश्वरी ६ व्या अध्यायामध्ये योगाचा विस्तार माऊली सांगतात . आणि ६ वा अध्याय म्हणजे माऊलींच्या भाषेत सांगायचे झाले तर ,

 तैसें गीतार्थाचे सार । जे विवेकसिंधूचे पार । 

नाना योगविभवभांडार ।  उघडेल का ।। ओवी क्र ११ / ६ वा अध्याय 

याचा अर्थ असा की , ६ वा अध्याय हा म्हणजे गीतार्थचं सार आहे . आत्मनात्म विचारांचा पैलतीर आहे आणि योगसंपत्तीचा खजिनाच आहे .

पहिले  पाच अध्याय भगवान श्री कृष्णाने कर्मयोग सांगितला .मग त्यानंतर आता योग का सांगतो आहे ? या दोन्हीचा संबंध काय आहे ? कर्माचा आणि योगाचा संबध काय आहे हे आपण समजून घ्या. हे आपण संक्षेपाने पाहू . कर्माला चार अंग आहेत .पहिलं असेल तर कर्म करणं दुसर असेल तर कर्म सोडणं , तिसरं कर्म सुटणं आणि चौथ असेल तर त्याला चमत्कारच म्हणावं लागतो, कर्म करण आणि न केल्या सारख राहणं. पहिलं आहे कर्म करण हे तुमच्या हातात आहे का?  माऊली अस म्हणतात कि , कर्म प्रकृतीगुणे , पराधीनपणे निर्माण होत. अमकं कर्म मी अमक्या वेळेला करीन हे तुमच्या हातात नाही . तुम्ही रेल्वेने जाता,बसने जाता त्यांची वेळ तुमच्या हातात असते का ?  पुढे अस आहे की , तुम्ही कर्म केल्यावर त्याचा संस्कार तुमच्या मनावर राहतो . कोणतही कर्म केल्यावर हा संस्कार तुमच्या अंतर्मनामध्ये जातो. फ्राँइडचं म्हणणं अस की , माणसाच व्यक्तीमत्त्व त्याच्या पहिल्या तीन वर्षातच ठरून जात ते संस्कार त्याच्या मनामध्ये असतात . हे अनुभवाला कस येत तर वृत्तीरुपाने अनुभवाला येतं. माणूस जर बदलायचा असेल तर , त्याची वृत्ती बदलायला पाहिजे . ही वृत्ती बदलणं म्हणजे योग आहे .म्हणून कर्मानंतर योग.आपल्याला आतून बदलायला पाहिजे असेल , भगवंताच स्मरण ठेवायला जे काही आड येतं आपल्या वृत्ती मध्ये असतं. ती वृत्ती बदलायला पाहिजे .म्हणून महाराज नेहमी सांगायचे वृत्ती बदला , वृत्ती बदला .आणि वृत्ती बदलायला भगवंताच स्मरण हाच उपाय असल्यामुळे , दुसरी वृत्ती आली की  तिच्या तोंडी नाम द्या अस ते म्हणत असत . आता वृत्ती म्हणजे काय ? आपलं मन समुद्रासारखं खोल आहे , गंभीर आहे त्यातून जे स्फुरण येतं ना ती वृत्ती . हे स्फुरण का येत तर आतमधे वासना असते ती सुप्त असते ,सूक्ष्म असते , ती जेव्हा दृश्यात येते तेव्हा जो तरंग येतो त्याचं नाव वृत्ती . आपण पहिल्यांदा आपल्या मनात काय येतं आहे हे बघायला शिकलं पाहिजे . या वृत्तीला काही बंधन नाही आपण स्वस्थ बसलो की , ती येते . हि वृत्ती सूक्ष्म तरल आहे . काय झालं कि , कोणती वृत्ती येईल त्याला काही नेम नाही .म्हणून योगाची व्याख्या पतंजलीने जी केली आहे - ' योग:चित्तवृत्ती निरोध: ' या वृत्ती येतात त्या आवरणं , निरोधन हा योग आहे . हे सार आम्हाला हि नव्हतं माहित पण फक्त गुरूचरणांचा आश्रय म्हणून मागील वर्षी ऐसी अक्षरे रसिके मेळवींन या समारोहा दरम्यान पूज्य श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी माऊलींच्या मोगरा फुलला या अभांगावरील चिंतन मांडले होते . त्यात श्रीगुरुदेवांनी मोगऱ्याच्या चार पाकळ्या सांगितल्या होत्या कर्म ज्ञान योग आणि भक्ती . त्यातील योगाचा विचार आपण आता पाहिलात . बरोबर आहे ते सार पूज्य श्रीगुरूंचे . लिखाणात कदाचित माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमस्व . जागतिक योग दिना निम्मित हार्दिक शुभेच्छा !

- varkariyuva.blogspot.in

श्री गुरू निवृत्तीराये मार्ग दाविला सोज्वळ ।

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।

      पंढरपुर वारी ही ज्ञानदेवांनी  सुरु केली असे नाही,  ही वारी ज्ञानराजांच्या  पुर्वीही होती. त्यांचे वडील श्री विठ्ठलपंत हे पंढरीचे वारकरी होते ज्ञानराजांणा पंढरीच्या वारीची दिक्षा त्यांचे वडीलबंधु व आध्यात्मिक गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांनी दिली. 
परंतु
पढंरीनाथाचे सर्वात पहीले
वारकरी जर कोन असतील ते भगवान शिवजी
त्रिशूळ ङमरू घेऊनी आला गिरीजेचा कातं
अशी भगवान शिवजी पासुन चालत आलेली परंपरा पुढे
मंछिद्र तयाचा मुख्य शिष्य
पुढे
बोध गोरक्षासी केला
आणी
गोरक्ष वोळला गहीनीप्रती
निवृतीनाथ दादा म्हणतात
अशी पुरातन वारी पंरपरेचे
निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज ।
गहीनीराजे मज सांगितले ।।
तेच गुज म्हणजे
जनासी तारक विठ्ठलची एक । केलासे विवेक सनकादीकी ।।
ज्या परमात्माच दर्शन सनकादीकाना दुर्लभ होत
तेहे रूप पंढरी ओळलेसे देखा ।
द्वैताची शाखा मोङीयली ।।
ते दुर्लक्ष दर्शन आता इथ युगानुयुगे विटेवर भक्ताची वाट पहात
उगवले बिबं अद्वैत स्वयंभ ।
नाम हे सुलभ विठ्ठलराज ।। ''पंढरीचा सोज्वळ मार्ग माझ्या गुरूंनी दाखवुन आपल्या डोळ्यात कृष्णांजन घालून आपणास कृतार्थ केले'' याविषयीचे कृतार्थतेचे उदगार माऊलींनी अभंगात सांगीतले आहे.
पुंडलीक वैद्यराजे पुर्वी साधिले साधण ।
वैकुंठीचे मुळपीठ डोळा घातले ते अंजन
श्री गुरू निवृत्तीराये मार्ग दाविला सोज्वळ
याच  मार्गाने  विश्वगुरू श्रीनिवृतीनाथ दादाचा पालखी सोहळा पंढरीनाथाच्या दर्शनासाठी प्रस्थान  !
मग चलता ना वारीला
जय मुक्ताई

©चैतन्याचा जिव्हाळा

- Varkariyuva.blogspot.in

विश्वगुरु श्रीसंत निवृत्तिनाथ दादांचे श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान !

।। चैतन्य श्रीगुरु निवृत्तिनाथाय नम: ।।

        आपल्याला सर्वाना माहेरची ओढ़ लागली आहे.पण या माहेरच्या प्रवासात संत संगती असेल तर मजा काही औरच.
श्री भगवान पांडुरंगाच्या भेटिसाठी आदिशक्ति मुक्ताई आईसाहेबानी तर केव्हाच प्रवास  सुरु केला आणि आता उद्या विश्वगुरु श्रीसंत निवृत्तिनाथ दादा पण प्रस्थान ठेवत आहेत .
.चला तर मग दादाच्या प्रस्थान सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर

   उदया २० जून २०१६ रोजी सकाळी ठीक  १०.००  वाजता श्री संत निवृत्तीनाथ दादांचा पालखी सोहळा समाधी मंदिरातुन पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवेल.

- Varkariyuva.blogspot.in

सौ. वीणा खाडिलकर यांना " विश्वकर्मा युनिवर्सिटी " च्या वतीने डाॅक्टरेट प्रदान...!

प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.सौ.वीणा त्यागराज खाडिलकर यांना त्यांच्या अध्यात्म आणि पारमार्थिक साधनेतील  भरीव योगदानासाठी दिल्लीतील विश्वकर्मा युनिवर्सिटी च्या वतीने "डाॅक्टरेट " प्रदान करण्यात आली आहे .                    
                 " स्पिरिच्युअल एज्युकेशन " या विषयातील  डाॅक्टरेटही सर्वोच्च पदवी प्राप्त करणार्‍या त्या देशातील पहिली व्यक्ति ठरल्या आहेत ....! ह.भ.प. सौ. वीणा यांना माहेर च्या अपामार्जने घराण्याकडून तीन पिढ्यांच्या कीर्तन परंपरेचा वारसा लाभला आहे. नारदीय आणि वारकरी अशा दोन्ही शैलीमधून कीर्तन करणार्‍या व शिकविणार्‍या त्या एकमेव महिला कीर्तनकार  आहेत .व हिंदी व मराठीतून आपली कला सादर करणार्‍याहि त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. संस्कृत बी.ए.(B .A.),संगीत एम् .ए.(M.A.) त्यांनी केले आहे .अनेक संत, चरित्रांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, अनेक क्रांतिकारक तसेच महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींनवर ही त्या कीर्तन सादर करतात ." अनेकसामाजिक विषयांवर कीर्तनातून त्या वक्तव्य प्रबोधन  करतात.  मोक्षा आर्टस् " या सांस्कृतिक कार्यक्रम करणार्‍या ,संस्थेच्या त्या " मॅनेजींग डिरेक्टर " आहेत . संगीत, नृत्य, नाटक, आणि कीर्तना चे अनेक भव्य सोहळे त्यांनी आयोजित केले आहेत.तसेच "मला वेड लागले संतांचे " या अध्यात्मिक ,नितांत सुंदर अशा संगीत नाटकाची निर्मिती केली आहे .महाराष्ट्र शासन आयोजित संचालक म्हणून कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत त्यांनी अनेक युवा कीर्तनकार घडवले आहेत .                              " स्पिरिच्युअल एज्युकेशन " या विषयातील डाॅक्टरेट प्राप्त झाल्याने, कीर्तन कलेचा प्रचार व प्रसार संपूर्ण भारत व जगभरात करण्यासाठी त्यांचा  उत्साह व्दिगुणित झाला आहे ...!
       
 आदरणीय वीणाताई आपले  अध्यात्म  क्षेत्रातील नवनवीन कल्पना व धेयपूर्ती  पूर्ण होवो ही  ईश चरणी प्रार्थना...!   आपणास भविष्यातील कार्याकरिता खूप खूप शुभेच्छा ! 

- वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र 

वृक्ष नोहे वङ पिपंळ


|| ज्ञानेशो भगवान विष्णु : ||

राम रावणाच्या युद्धात रावणाचा मृत्यू झालेवर त्याचे दहाही शिर एकदम शरीरावरून उसळली व प्रभुच्या सभोवती फिरून त्रास देऊ लागली
प्रभुने ते सर्वही शिरे मंत्रबलाने जाळून टाकली व प्रजाजनास मौन धारण करण्यास सांगितले
प्रजा त्या राज आदेशाप्रमाने वागूही लागली
परंतू मौनामुळे यज्ञयाग सर्व बदं पङले
शेवटी अयोध्येतून रूषिवर ब्रम्हवृदं बाहेर पडले
शेवटी हे वर्तमान महर्षी नारदानी इद्रंदेवाला कळविले
इद्रंदेव नारदजी बरोबर ब्रम्हं विष्णू महेश तिनही देवाकडे गेले
भगवान शकंरानी ब्रम्हदेवाला अयोध्येत अश्वस्थ ( पिपंळ) वृक्षाचे रूप धारण करायला लावले
व मोठय़ाने वेदघोष सुरू करायला सागितंले
ब्रम्हंदेव शकंरजीना म्हणाले
मी वृक्ष होतो पन स्वाभाविकच लोक माझ्यावर कुर्‍हाडीचे घाव घालतीलच
देह स्वभावाप्रमाने पानेही तोङतील
तेव्हा महादेव म्हणाले


जो तुजवर घाव घालील त्याला ब्रम्हंहत्येचे पातक होईल
आणि याकङे दुर्लक्ष करून जो कोनी घाव घालील ते पहीले तिन आघात मी सहन करील
व भगवान विष्णूही तिन घाव सहन करतील
हे ऐकुन इंद्रादी देव देवताही इतर वृक्ष व वनस्पती होऊन ब्रम्हंदेवाला साह्य करू लागल्या
माऊली ज्ञानोबाराय सुद्धा
वर्णन करतात
महावने लावावी ! नानाविध !!
तुकोबाराय तर म्हणतात
वृक्ष नोहे वङ पिपंळ !
श्रेष्ठ तनू देवाचिया !!
म्हणून तर तुकोबारायही म्हणतात
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी
उद्या वटसावित्री पौर्णिमा
वटपुजेचा मगंल दिन
फक्त
हिदुं धर्माच्या मायबहिनीनां पुज्य असलेल्या पवित्र सनावारावर पाचंट विनोद नसावे
हिच अपेक्षा
जय मुक्ताई👏🏻


- varkariyuva.blogspot.in