Sunday 10 July 2016

माऊलींचे २ रे गोल रिंगण - खुडूस फाटा येथे संपन्न !

माऊली माळशिरस येथे मुक्कामी ! माळशिरस बद्दलच्या दोन अद्भुत कथा...!

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

जगद्गुरू संत तुकोबाराय  आणि माळशिरस या गावचे  एक अतूट असे नाते आहे.
माळशिरसच्या मुक्कामाबाबत एक कथा  ऐका महात्म्याच्या कीर्तनात श्रवणात आलीय.
पूर्वीच्या काळी आजच्या सारख्या सुख सोयी नव्हत्या.
वारकरी घरूनच वारीतील मुक्कामानुसार बरोबर दशम्या (भाकरी ) घ्यायचे.
तुकोबारायही  अगदी देहुहुन निघताना बरोबर दशम्या बांधून आणायचे
या माळशिरस मुक्कामी
प्रसंग  असा घड़ला की तुकोबाराय माळशिरस मुक्कामी कीर्तन करीत असता भगवंताला तुकोबारायांचा चेहरा  थोडासा  थकलेले वाटला.
म्हणून
साक्षात् पांडुरंग परमात्मा कीर्तनात प्रगट झाले.
होणारच
संताच प्रमाण आहे
माझे भक्त् गाती जेथे !
नारदाचे मी उभा तेथे !!
किंवा
तेथे असे देव उभा
भगवान पढंरीश परमात्मा किर्तनातच प्रकट झाले

तुकोबारायांना म्हणाले
माझ्या भक्ताला खुप दुर यावे लागत
मी इथेच माळशिरसलाच पंढरपूर निर्माण करतो.
भगवान परमात्माचे हे बोल ऐकून
तुकोबाराय भगवंताला म्हणाले
येथे तुजलागी बोलावीले कोणी !
प्रार्थील्या वाचुनी आलासी का ? !!
महाराज म्हणाले
देवा थांबा
मी माझ्या घरून आणलेल्या दशम्या बघतो
तुकोबारायांनी दशम्या बघितल्या
तर चार शिल्लक होत्या
महाराज म्हणाले
देवा
अजून चार दशम्या शिल्लक आहेत
चार मुक्काम होतील
त्यावर भगवान् निरूत्तर झाले भक्ताचिया काजा धावतसे
मला आपली अवस्था पाहावली नाही म्हणून आलो.
तुकोबारायांनी भगवंतांला पुन्हा पंढरपूरी पाठवले.
माळशिरस पासून पुढे चार मुक्काम आहेत.१)वेळापूर२)भंडीशेगाव३)वाखरी आणि ४)पंढरपूर
चार दशम्या आणि चार मुक्काम अशी कथा श्रवणात आली आहे.
कथा दुसरी
माळशिरसच्या वेशीवर ओढ्याकाठी श्रीरामभक्त मारुती रायाचे सुप्रसिद्ध मंदीर आहे. 
जगद्गुरू तुकोबाराय महाराज  पंढरपूरला वारीला जातांना येथे तुकोबारायांचे कीर्तन सुरु होते.
किर्तनाच्या प्रारंभीच तुकोबाराय श्रोत्यांना म्हणाले
आज मी तुम्हाला खरे कीर्तन सागंनार आहे
महाराजांनी
रामकृष्णहरि भजन सुरू केले
भजन करता करता महाराज अगदी भावसमाधीत गेले. श्रोत्यांना ते समजलेही नाही.
एक सारखच रामकृष्णहरि भजन ऐकून
श्रोतेही उठुन जाऊ लागले,टाळकरी आणि मृदंगाचार्य ही हळूहळू निघून गेले.
भजनात
ब्रम्हांनदी टाळी लागलेले तुकाराम महाराजांची
भावसमाधी उतरल्यावर तुकोबारायांनी पाहीले तर श्रोत्यांनी भरलेले मंदीर रिकामे दिसले.एक श्रोता फक्त कोपऱ्यात बसला होता. कारण त्याचे घोंगडे तुकोबारायांच्या पायाखाली होते. तुकोबारायांनी ते  मनातच ओळखले 
महाराजांनी मग तर रामकृष्णहरि भजन आनंदाने गात उड़्या मारू लागले
प्रसंगावधान राखुन त्या ऐकमेव असलेल्या श्रोत्यांने तुकोबारायांचे पायाखाली असलेले
घोंगडे  बाजुला ओढुन घेतले  घोंगडे मोकळे होतांच तोही निघुन गेला.
मग  उरला होता एकच श्रोता
तो म्हणजे हनुमंतराय
त्यांच्याकड़े महाराजांनी बघितले
ते ही थोड़ेसे झोपेने व्याकुळ वाटले
मग
तुकोबाराय मारुतीरायांस म्हणाले, " सर्व श्रोते निघून गेले,
आता आपणही विश्रांती घ्यावी   आणि
मारुतीराय निद्रा घेन्यासाठी सहजच थोड़ेसे  आडवे झाले. आजही मारुतीरायांची   किचितंसी
कललेली मुर्ती  माळशिरस   मंदीरात पहावयास मिळते.
अशा या अद्भुत कथा सांगणाऱ्या माळशिरस मुक्कामी आज माऊलींचा मुक्काम.
जय मुक्ताई !

- varkariyuva.blogspot.in

माऊलींचे पहिले गोल रिंगण संपन्न !