Friday 8 July 2016

साधुबाबाचा ओढा म्हणजे नेमकं काय ?

उत्तमची उरे किर्ती मागे

सातारा जिल्हातील कराङ पासुन अवघ्या २५ किमी असणाऱ्या कुभारंगावात श्री हैबतबाबांचेच समकालीन असनारे ह भ प यशवंत शिवाजी चव्हाण पाटील  यांना बालपणापासुन तुकोबारायाचा संत वाङमयावर अतिशय प्रेम निर्माण झाले
तुकोबारायाचे अंभग कागदावर लिहीत असत त्याचप्रमाणे ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी सुद्धा बाबांनी वहीवर लिहीली होती
ते सरपण तोङुन विकत व त्या पैशातून शाई बोरू कागद आणत
अशा रितीने त्यानी खुपच अंभग तुकोबारायाचे वहिवर उतरवून घेतले
असा हा नित्यक्रम सुरू होता
बाबाचा विवाहानंतर त्यानी पहिला पुत्र झाल्यावर पत्नीस मातेप्रमाने मानले
संपुर्ण आयुष्यभर माऊली सोबतच वारी केली
एके दिवशी महाराजाकङे रात्री चोरी झाली व सर्व संत अंभग साहीत्य चोरी झाले
सकाळी चोरानी बघितले तर ते गाठोडे धन नसुन  अंभग होते बाबानी हस्त लिखीत केलेले
चोरानी ते सर्व संत साहित्य गावाजवळील वांग नदीमध्ये बुडवून ते निघून गेले
इकङे सकाळी बाबानी बघितले तर अंभग नाहीत बाबानी पंढरीश परमात्म्याचा धावा सुरू केला
हे पाङुरंगा जसे तुकोबारायाचा गाथा पाण्यावर तरगंला तसे माझ्याविषयी का निष्टूर झाला
असे आठ दिवस महाराजानी मंदिरातच धरणे धरले
पुढे एक दिवस मच्छीमार ओढ्यात मासे पकङन्यासाठी गेला असता जाळ्यातच बाबाचं संत वाङंमय आले
त्यानी बघितले तर ते तुकोबारायाचे अंभग बाबाची हस्त लिखीत प्रती त्यानी त्या बाबाकङे पोहचविन्याचे ठरविले इकङे बाबांना पण पंढरिश परमात्म्याने संकेत  गाथा असल्याचे  केल्याने
बाबाना खुप आनंद झाला
बाबाच्या घरात नियमीत पंढरीची वारी होतिच एका वारित तर माऊलिच्या सोहळ्यात बाबानी बरडच्या पालखी तळावरच अंतकाळा विषयी बोलले साधु हे इच्छामरणी असतात
पुढे वारीत चालताना त्यानी ज्या ठिकाणी देह ठेवला तो ओढा महादेवाचा ओढा म्हणून ओळखला जात पन साधुबाबांच्या देह त्यागानंतर त्यास साधुबाबाचा ओढा नाव प्राप्त झाले
आजही माऊलींचा पालखी सोहळ्याचा सकाळ चा विसावा येथे असतो माऊलींच्या पादुका साधुबाबाच्या समाधीवर आणतात त्यांच्या वंशजांच्या हस्ते पादुका व समाधीस अभिषेक केला जातो
साधु जिवन काय असते
नामदेव महाराज वर्णन करतात
साधु थोर जाणा साधु थोर जाणा । साधु थोर जाणा कलीयुगी ।।
माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात
ऐसे सांगितले देवे ।
परी ऐके गा पाङंवे ।
जेथ वाचा विसावे ।
ती साधुकथा ।।
श्रीसंताचीये माथा चरणावरी !
साष्टांग हे करी दंङवत
काही वेळापुर्विच साधुबाबाचं दर्शन घेऊन माऊलीचां  सोहळा धर्मपुरीकड़े मार्गस्थ !

आय.ए.एस , आय.पी.एस अधिकारी वारीच्या वाटेवर !

मा. तानाजी सत्रे सर (आय ए एस ) यांनी दिवसभर वारीचा मनसोक्त आनंद लुटला . वारीची संकल्पना वारीतील जीवन जवळून अनुभवले.  वारकरी संप्रदाय युवा मंच च्या वारीला चला या आव्हानाला आय ए एस , आय पी एस अधिकारी ही उपस्थित !

- varkariyuva.blogapot.in

लावोनी मृदंग श्रुति टाळ घोष । सेवू ब्रह्मरस आवडीने ॥