Friday 30 May 2014

संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन सामान्य वर्गास उपदेश - अक्षय भोसले

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
माऊली हो जस कि आपण पाहिलं मागील “ मेळविले मांदी वैष्णवांची “ मध्ये माउलींनी कसा प्रकारे सायास करून दिंडी सोहळा पंढरीची वारी सुरु केली .
पंढरीकडे मार्गक्रमण करताना लोकांना पंढरीस चलण्याविषयी उपदेश  करू लागले तो असा कि ,
वाजतसे बोंब कोणी नायकती कानीं । हरि हरि न म्हणती तया थोर झाली हानी ॥१॥
उठा उठा जागा पाठीं भय आलें मोठें । पंढरीवांचुनि दुजा ठाव नाहीं कोठें ॥२॥
तापत्रय अग्नीचा लागला वोणवा । कवण रिघे आड कवण करी सावाधावा ॥३॥
देखोनि ऎकोनि एक अंध बहिर झाले । विषयाचे लंपट बांधोनि यमपुरीस नेले ॥४॥
आजा मेला पणजा मेला बाप मसणा नेला । देखत देखत नातु पणतु तोही तैसा झाला ॥५॥
व्याघ्र लासी भूतें हीं लागताती पाठीं । हरि भजन न करितां सकळें घालूं पाहे पोटीं ॥६॥
संतसंग धरा तुम्ही हरिभजन करा । पाठी लागलासे काळ दांत खातो करकरां ॥७॥
बापरखुमादेविवरा विठ्ठला शरण । भावें न रिघतां न चुके जन्ममरण ॥८॥
असा उपदेश केल्यामुळे बऱ्याच लोकांना वैराग्य होऊन दिंडीत सामील होऊ लागले , त्यांना माझ्या माऊली म्हणत असत नुसते मार्गक्रमण नाही करायचं  तर मुखाने भजन करायचं  ते मग कस ..
गात जा गा गात जा गा | प्रेम मागा विठ्ठला ||
अशी सावळ्या पांडुरंगाची प्रेमाने आळवणी करीत लाखो वारक-यांची मांदियाळी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. बोलावा विठ्ठल। पाहावा विठ्ठल। करावा विठ्ठल। जीवेभावे॥ अशी त्यांची अवस्था झालेली आहे. सर्व लौकिक आणि भौतिक सुविधांचा-सुखाचा त्याग करून हे वारकरी मोठय़ा भक्तिभावाने पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत. जात, धर्म, श्रेष्ठ, कनिष्ठ हे सर्व भेद गळून पडले आहेत. समाजातील सर्व घटक या ठिकाणी एकरूप झाल्यासारखे दिसु लागले . ज्याप्रमाणे अनेक नद्या अखेर सागराला येऊन मिळतात तेव्हा आपले स्वत्व टाकून सागराशी एकरूप होऊ लागले  . त्याचप्रमाणे समाजाच्या सर्व स्तरात वावरणारे लोक या ‘वारी’शी एकरूप झाल्याचे दिसु लागले जस कि पुंडलिक राय यांना
अवघी सुखाची राशी | पुंडलिकासी ओळळी ||
असे भजन करत चालण्यामुळे शेकडो भाविक मोहित होऊन दिंडीत येऊन अधिकच भर पडत चालली . ज्याप्रमाणे गंगेच पान जात असता मार्गाने लोकांचे पाप ताप घालवत व किनाऱ्याची झाडे पोषित जाऊन  समुद्राला मिळत .
कां फेडित पाप ताप| पोखीत तीरींचे पादप |
समुद्रा जाये आप। गंगेचें जैसें ||
तैसे बांधली सोडीत | बुडाली काढीत |
साकडी द्व्डीत | आर्तांचिया || -  || संत ज्ञानेश्वर महाराज  ||
असे गावो गाव मुक्काम  करत पंढरीच्या दिशेने भजन करत मार्गक्रमण करू लागल्या माझ्या माऊली व वारीत भजन करण्याची प्रथा पद्धती निर्माण झाली . .
आवडल्यास नक्कीच इतरांपर्यंत हि पोहचवा व अध्यात्मिक कार्यास सर्वांपर्यंत पोहचवण्यास सहयोग करा
तुमचा ,
अक्षय भोसले – ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !

चला येतंय न मग वारीला तुम्ही हि ? - अक्षय भोसले

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
चला येतंय न मग वारीला तुम्ही हि ? 
  

वारकरी मांदियाळी आपल्या प्रतीक्षेत ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ 
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !