Sunday, 2 October 2016

शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचा एक सुंदर गोंधळ !सुदिन सुवेळ तुझा गोंधळ मांडिला वो ।
ज्ञान वैराग्याचा वरती फुलवरा बांधिला वो ।
चंद्र सूर्य दोन्ही यांचा पोत पाजळिला वो ।
घालुनि सिंहासन वरूते घट स्थापियला वो ॥२॥
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ॥ध्रु.॥
प्रवृत्ती निवृत्तीचे घालुनि शुद्धासन वो ।
ध्येय ध्याता ध्यान प्रक्षाळिले चरण वो ।
काया वाचा मनें एकविध अर्चन केले वो ।
द्वैत अद्वैत भावे दिले आचमन वो ॥२॥
भक्ति वैराग्य ज्ञान याही पूजियली अंबा वो ।
सद्रूप चिद्रूप पाहुनी प्रसन्न जगदंबा वो ।
एका जनार्दनी शरण मूळकदंबा वो ।
त्राहे त्राहे अंबे तुझा दास आहे उभा वो ॥३॥
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ॥

कल्याण - डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर , श्रीमलंग व आदी परिसरात नवीन पदनियुक्ती !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु:।।

सर्व वारकरी बंधू भगिनी वर्गास एक आनंदाची गोष्ट
वारकरी संप्रदाय युवा मंच द्वारे एक सुशिक्षित तथा संस्कारीक युवा वर्ग आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे . नुकतीच वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र यांद्वारे कल्याण - डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर , श्रीमलंग व आदी परिसरात अत्यंत निष्ठावान अशा युवा वारकऱ्यांची कार्याची दखल घेत विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे ती पद् नियुक्त यादी समवेत असणाऱ्या पत्रात नाम निर्देशित करण्यात आली आहे . पद नियुक्त सर्व युवा वारकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व भविष्यातील कार्यास हार्दिक शुभेच्छा !

- अक्षय चंद्रकांत  भोसले
संस्थापक : वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र