Sunday 23 February 2014

श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले - अभिष्टचिंतन उदयन महाराजांना कोटी कोटी शुभेच्छा !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

आमचे लाडके,
श्रीमंत
छत्रपती उदयनराजे
भोसले (महाराज साहेब ):-
म्हणतात ना
"बस नाम
ही काफी है"'
असच
काही आहे यांच्या बाबत..
या व्यक्तिमत्वाची ओळख
आपल्या महाराष्ट्रात
कोणालाही सांगण्याची गरज
मला तरी वाटत नाही..
उदयन राजेना एक वादळ
असे विशेषण
द्यायला खुप खुप
आवडेल...
अतिशय सरळ
स्वभाव असणारे राजे...
अवघ्या महाराष्ट्राचे
आराध्यदैवत
असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे
‘थेट’ तेरावे वंशज
असलेल्या उदयनराजेंविषयी महाराष्ट्राच्या
हृदयात एक वेगळीच
आदराची जागा आहे.
लोक त्यांना प्रेमाने
"महाराज साहेब" म्हणतात.
उदयनराजे तसे मनाने हळवे
आहेत .काम
करण्याची महाराज
साहेबांची एक विशेष
पद्धत आहे,
अगदी राजाला शोभेल
अशीच..
आलेल्या माणसाने
आपली समस्या काय आहे
आणि ती सोडवण्यासाठी काय
करावं लागेल; इतकंच
महाराज साहेबांना सांगायचं.
जास्त काथ्याकूट
करायचा नाही. ‘काम
होईल,’ म्हणून महाराज
साहेब सांगतात,
तेव्हा तो गरजवंत
आश्चर्यचकीत
झालेला असतो. महाराज
साहेबांची कामं
करायची पद्धत
चांगली की वाईट, यावर
मतभेद होऊ शकतात, पण
‘महाराज साहेब कुणालाच
नाही म्हणत नाहीत,
प्रत्येकाचं काम करतात,’
असं सातार्यातील
अनेकजण सांगतात.
स्वत:च्या अनुभवावरून.
उदयन महाराज
शिवछत्रपतींचा वारसा समर्थपणे
पुढे चालवत
आहेत,राजमाता कल्पनाराजे
यांच्या मार्गदर्शनखाली उत्तम
काम करत आहेत , आज
महाराजांचा वाढदिवस
आजच्या दिवशी त्यांना शुभेच्छा देतानाच
आई
तुळजा भवानी त्यांना उदंड
आयुष्य
देवो आणि वारसा खंबीरपणे
पुढे चालवण्यासाठी अजून
बळ देवो हीच
प्रार्थना .......!!!
अक्षय भोसले .
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

Tuesday 18 February 2014

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ! 


निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।
नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।
यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणताराजा ।।
आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।
धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।।
देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलीया भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षीऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।कित्येक दृष्ट संहारली।
कित्येकासी धाक सुटला ।कित्येकाला आश्रयो जाहला
।शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।

जय भवानी, जय शिवाजी
! जय जिजाऊ !
!! जय शंभू राजे !!

मुजरा राजं मुजरा

शिव जयंतीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

Sunday 16 February 2014

"अखंड हरिनाम सप्ताह " - घणसोली , नवी मुंबई

राम कृष्ण हरी !

श्री ज्ञानेश्वर महाराज व श्री तुकाराम महाराज 
"अखंड हरिनाम सप्ताह "
माघ व १ , रविवार दी . १६/०२/ २०१४ ते माघ व. ८ ,रविवार दी.२३/०२/२०१४ पर्यंत 
पहाटे :- काकड आरती .
ज्ञानेश्वरी पारायण :-पारायण नेतृत्त्व ह.भ.प. अक्षय महाराज भोसले 
दुपारी भजन :- मान्यवर दिग्ज्ज गायक
सायंकाळी प्रवचन :-अक्षय महाराज भोसले यांच सात दिवस विविध विषयांवर प्रवचन
(विषय :- आई ,वडिल ,गुरुप्रेम ,व्यसनमुक्ति ,संस्कृति ,ज्ञानेश्वरी ,संत ,संत साहित्य अदि )
रात्रि ८ते १० हरी कीर्तन
दिनांक :- १६/०२/२०१४ ह.भ.प. नारायण महाराज गोपाले ( वेदांतचार्य)
१७/०२/२०१४ ह.भ.प.डॉ.विजय महाराज बाळसराफ (PHD IN CHEMICAL ENGINEERING)
१८/०२/२०१४ ह.भ.प.अंबादास महाराज बोरुडे .
१९/०२/२०१४ ह.भ.प.पांडुरंग महाराज विघने .
२०/०२/२०१४ ह.भ.प.मधुकर महाराज सानप .
२१/०२/२०१४ ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर. (वरिष्ठ पत्रकार " प्रहार " )
२२/०२/२०१४ ह.भ.प.श्री .माधव महाराज रसाळ .(रामायणाचार्य)
२३/०२/२०१४ ह.भ.प.श्री .माधव महाराज रसाळ .(रामायणाचार्य) काल्याचे कीर्तन होइल.
गायनाचार्य :- ह.भ.प.अशोक महाराज पावडे , ह.भ.प. देविदास महाराज पावडे , ह.भ.प. प्रल्हाद महाराज सुपेकर , ह.भ.प. सुरेश महाराज बडे , ह.भ.प. राहुल महाराज ताम्हाणे .
मृदुंगाचार्य :- ह.भ.प.भास्कर महाराज राजगुरू ,ह.भ.प. वाल्मिक महाराज नलावडे व शिष्य परिवार , ह.भ.प.गणेश महाराज बोराडे, ह.भ.प. दत्तात्रय महाराज गागरे ,ह.भ.प. राधाकृष्ण महाराज सुपेकर , ह.भ.प.मयूर महाराज खैरनार .

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र यांच्या तर्फे प्रकाशित मासिक "वैष्णव संदेश"

राम कृष्ण हरी !

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र यांच्या तर्फे प्रकाशित मासिक "वैष्णव संदेश" लवकरच आपल्या सर्वा पुढे सादर कृत आहोत .
सदर मासिकात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाशी संबधित बातम्या , उत्सव तथा नामांकित अभ्यासू व्यक्तीं द्वारे कीर्तन प्रवचन या प्रमाणेच लिखित स्वरूपात चिंतन आपणास पहावयास मिळेल
सविस्तर रित्या खलील प्रमाणे
* संत चरित्र 
* सकल संत यांच्या अभंगावर चिंतन
* ज्ञानेश्वरितिल ओवी वर सार्थ चिंतन
* संप्रदायातील विशेष उल्खेनिय कार्य केलेल्या व्यक्तिंची माहिती
* राजश्री शिवरायांच्या जिवनातील प्रसंगाची माहिती
* स्वदेशी प्रेम संदर्भात शास्त्रज्ञ श्री .राजीव दिक्षित जी यांची संग्रहित व्यखाने लिखित स्वरूपात
* आयुर्वेद
* भारतीय संस्कृति अणि परंपरा
अदि विषयांवर विशेष लेख तज्ञ व्यक्तींकडून
आपला ही सहयोग असावा ही नम्र विनंती .
जहिरातिकारिता अवश्य संपर्क करा
श्री .अक्षय भोसले
८४५१८२२७७२/९८९२७४७८९३ .
ईमेल :- acbhosale99@gmail.com
facebook :- fb.com/akshaybhosale26

Tuesday 11 February 2014

महाराष्ट्राच पारमार्थिक वैभव वारकरी भूषण परम पूजनीय प्रात : स्मरणीय गुरुवर्य " बाबा महाराज सातारकर " यांचा जन्मदिन !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
आज संपूर्ण महाराष्ट्राच पारमार्थिक वैभव वारकरी भूषण परम पूजनीय प्रात : स्मरणीय गुरुवर्य  " बाबा महाराज सातारकर " यांचा जन्मदिन :) आन अस म्हणूया कि खरच  आज आजी सोनियाचा दिनु ।
वर्षे अमृताचा घनु ॥१॥
हरी पाहिलारे हरी पाहिलारे
सबाह्यभ्यंतरीं अवघा व्यापक मुरारी ॥२॥
दृढ विटे मन मुळीं । विराजीत वनमाळी ॥३॥
बरवा संत समागमु प्रगटला आत्मरामु ॥४॥
माघ शुद्ध त्रयोदशी ला महाराज या भूतलावर आले आणि अविरत अगदी लहानपणापासून ते आजतागायत संप्रदाय प्रचार प्रसाराच कार्य करीत आहेत . केवळ महाराष्ट्रच नव्हे तर परदेशात ( चेन्नई , UK, USA  ,लंडन )आदि ठिकाणी पूज्य महाराजांची अनेकदा कीर्तनसेवा  झाली आहे . संप्रदाय विदाशात महाराजांनी पोहचवला यात महाराज अग्रगण्य आहेत .  आजच्या परम मंगल दिनी विठूराया आणि माऊली यांच्याकडे इतकच मागीन कि  " अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा| माझिया सकाळ हरीच्या दासा || " महाराजंच कार्य संप्रदायाविषयीच प्रेम पाहता वारकरी संप्रदायातील एक शिखर म्हणजेच पूजनीय महाराज आहेत . " धन्य महाराज जन्मले संसारी '' महाराजांविषयी काय आणि किती बोलाव याला परीसीमा नाही जस कि सूर्यच तेज अगदी तसेच महाराज . आमच हि आयुष्य महाराजांना प्राप्त होवो उतरोत्तर महाराजांची अमृतवाणी श्रवण करण्याचा योग आम्हाला प्राप्त होवो .
महाराजंच्या वाढदिवस तुकाराम महाराजांचा अनुग्रह दिनाच्या साप्ताह मध्येच असल्याकारणाने आज दिनांक :- १२ फेब्रुवारी  २०१४ वार बुधवार कोपरखैरणे नवी मुंबई येथे महाराजंच हरी कीर्तन आहे व साप्ताहचि सांगता . महाराजंचा वाढदिवस ( पूजा विधी ) न्यू सातारा समूह , वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र  आदि . मार्फत  साजरा केला जाणार असून आपण सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी . पूजनीय बाबा महाराजंच्या चरणी दंडवत व खूप खूप शुभेच्छा !
वेळ :- सायंकाळी ठीक ७ वाजता .
स्थळ :- यशवंतराव चव्हाण महाविद्यालय प्रांगण , ( D-MART जवळ ) , कोपरखैरणे , नवी मुंबई .
संपर्क :- अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ ( वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य )

Friday 7 February 2014

परमार्थ सांडून प्रपंच करिसी | तरी तू येम यातना भोगिसी | - दासबोध " सुजनवाक्य "

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||

आज दासबोध जयंती  आणि योग योग असा कि आजच सुजन वाक्य हे हि रामदास स्वामीयांच्या दासबोधातील  

परमार्थ सांडून प्रपंच करिसी |
तरी तू येम यातना भोगिसी |

' परमार्थ ' हा शब्द ज्यांच्या गावीही नाही अशी निव्वळ प्रपंचात अडकलेली जी माणसे आहेत , त्यांचा विचार समर्थ रामदासस्वामी जी पुढील ओवीत प्रतिपादन करतात ..

परमार्थ सांडून प्रपंच करिसी |
तरी तू येम यातना भोगिसी |
संसाराच्या राहटगाडग्यात अनेक लोक परमार्थ करावयाचे विसरून जातात . परमार्थ म्हणजे आयुष्याच्या शेवटी म्हातारपनात करण्याचा उद्योग असाही सोयीस्कर अर्थ अनेकजण लावतात . सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहलेली ज्ञानेश्वरी माणसे एकष्टव्या वर्षी वाचतात याला काय म्हणावे ? प्रपंच करताना परमार्थाचे विस्मरण झाले तर त्याची फलश्रुती ठरलेली आहे .अशा व्यक्तीला यम यातना भोगाव्या लागतील . श्री संत ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात , जे लोक हरिस्मरण करीत नाहीत ; असे लोक यमाचे पाहुणे असतात . यमराज त्यांचे आदरतिथ्य करतात .

हरिविण जन्म नर्कचि पै जाणा | यमाचा पाहुणा प्राणी होय || - संत ज्ञानेश्वर महाराज

श्री संत नामदेव महाराज म्हणतात . प्रपंचाच्या नादात , धनाच्या आणि मनाच्या मदमस्ती मध्ये जो देवाचे नामस्मरण करीत नाही , त्याला यमदंड सोसावा लागतो .

धन मान बळ नाठविसी देवा | मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे ||
यमाचे यमदंड बैसतील माथा | तेव्हा तुझा रक्षिता कोण आहे || - संत नामदेव महाराज

श्री संत तुकाराम महाराज या यातनांचे वर्णन करताना म्हणतात कि ; यमाला करुणा माहीत नाही . ओढाळ जनावर हाती लागल्यावर मालक जसा त्याला बेदम मारतो , तशी अवस्था होते .

नाही त्या यमासी करून | बाहेर काढीता कुडी प्राणा |
ओढाळ सापडे बैसतील माथा | तेव्हा तुझा ताक्षिता कोण आहे || - संत तुकाराम महाराज

समर्थ रामदासस्वामी त्याकरिता एक दृष्टांत देतात , कामगार कामावर गेला नाही तर साहेब त्याला ज्याप्रमाणे दंड करतो , तसा परमार्थ ण केला तर प्रपंचीकला यमदंड ठरलेलाच आहे .

साहेब कामास नाही गेला | गृहीच सुखडोनि राहिला |
तरी साहेब कुटील त्याला | पाहाती लोक || - दासबोध
म्हणून परमार्थ सांडून सुखाने नुसता प्रपंच करीत राहिल्यास तर अंती यमयातना भोगाव्या लागतील आणि तुला दुख प्राप्त होईल .

:- श्री महंत प्रमोदजी महाराज जगताप

जास्ती जास्त मित्र परिवारपर्यंत हि पोस्त आपण पोहचवा स्वत : हि आनंद घ्या आणि इतरांना हि द्या .
वारकरी संप्रदाय युवा मंच ,महाराष्ट्र राज्य - ८४५१८२२७७

Thursday 6 February 2014

हरिनाम सप्ताह - सातारकर फड

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
नवी मुंबईत बरसणार भक्तिमय हरिमय आनंदाचा पाऊस !
न्यू सातारा समूह ( ग्रुप ऑफ को - ऑपरेटीव्हज ) पुरस्कृत
न्यू सातारा जिल्हा नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित .
श्री चैतन्य अध्यात्मिक ज्ञानप्रसार संस्था आयोजित
हरिनाम सप्ताह वर्ष १९ वे
सादरकर्ते :- सातारकर फड
दिनांक :- ६ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०१४ (
रात्री ०८.०० ते १०.०० हरिकीर्तन
गुरुवर्य प.पु . बबा महाराज सातारकर
वंदनीय . भगवती ताई सातारकर - दांडेकर
ह.भ.प. आदरणीय . चिन्मय (Chinmay जी )महाराज सातारकर
यांद्वारे कीर्तन सेवा होणार आहे आणि या वातावरणात नाहून निघण्याची सुवर्ण पर्वणी नवी मुंबईकर तथा मुंबईकर यांना प्राप्त होणार आहे .
तसेच तदपूर्वी रोज सायंकाळी ५ ते ७ विभगातील प्रसिद्ध गायकांची भजनमोह्त्सव .
साय .७ ते रात्री ८ :- प्रवचन:-
०६ फेब्रुवारी :- ह.भ.प.रामचंद्र महाराज कड
०७ फेब्रुवारी :- ह.भ.प.सुभाष महाराज घाडगे ( ह.भ.प. सुभाष महाराज घाडगे)
०८ फेब्रुवारी :- ह.भ.प.अशोक महाराज सूर्यवंशी
०९ फेब्रुवारी :- ह.भ.प.उत्तम महाराज मोहिते
१० फेब्रुवारी :- ह.भ.प.वसंत महाराज मंडलिक
११ फेब्रुवारी :- ह.भ.प. चिन्मय महाराज लाटे
१२ फेब्रुवारी :- ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर (Shamsundarmaharaj Sonnar )
सर्वाना प्रेमाचे आणि आग्रहाचे निमंत्रण
निमंत्रक :-
आदरणीय राजाराम जी ( नाना ) निकम,
श्री चैतन्य अध्यात्मिक ज्ञानप्रसार संस्था ,
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य .
संपर्क - अक्षय भोसले ८४५१८२२७७२

Wednesday 5 February 2014

सुजनवाक्य - ||मग मानिती सकळ ||

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ:। निर्विध्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक व साहित्य प्रसारास प्रारंभ
सुजनवाक्य - ||मग मानिती सकळ ||
प्रत्येकाच्या मनात एक उर्मी असते , कि मला लोकांनी मानावे . लोकांनी मानावे याकरिता मनसे नाना प्रकारचे खटाटोप करीत असतात . आपला नावलौकिक व्हावा याकरिता प्रयत्नशील असतात . काहीच कार्य न करिता कार्यकर्ता म्हणवणारे कार्यकर्ते काही कमी नाहीत . कार्य करणार नाहीत ; पण फोटोच्या वेळेस वेळेवर हजर होणारेही कमी नाहीत . अशाने कीर्ती वाढत नाही . अंगी गुण असतील तर हे खटाटोप न करता देखील लोक मानतील , असे जगद्गुरू तुकाराम महराज आपल्याला एका अभंगात सांगतात .

नसावे ओशाळ | मग मानिती सकळ ||- तुकाराम महाराज

जो ओशाळ आहे , त्याला कदापि कीर्ती प्राप्त होणार नाही . मनात जर आशा वास करीत असेल , तर अशा आशा बद्ध माणसाला स्वार्थ सुटणार नाही . मग अशा स्वार्थी माणसाला कोण मानणार ? त्याकरिता प्रथम आपण ओशाळ नसावे . मग अपोआप लोक आपल्याला मानू लागतील .

जय तेथे पावे मन | चाले बोलिले वचन || - तुकाराम महाराज

केवळ त्याला मान मिळत नाही , तर तो जाईल तिकडे त्याच्या मागे मान फिरत असतो . तो स्वार्थी नसल्यामुळे तसेच त्याचे जीवन प्ररार्थी झालेले असल्यामुळे तो जे बोलेल ते वचन समाज मान्य करतो . कारण नि : स्पृह माणसाचे जीवन हे सर्व समाजाकरताच असते . 'उरलो उपकारापुरता ' या बोधावर ते असतात .

राहो नेदी बाकी | दान ज्याचे त्यासी टाकी || -तुकाराम महाराज

सेवा करणाऱ्या व्यक्तीला त्याची पोहच देण्याची वृत्ती त्याच्या ठायी निर्माण होते . तो कोणाचे ऋण ठेवीत नाही . ज्याचे त्याचे दान त्या त्या व्यक्तीच्या पदरात टाकतो . अशा व्यक्तीला सर्वचजण मानतात .
व्हावा वाटे जना | तुका म्हणे साठी गुणा ||- तुकाराम महाराज
जग अशा व्यक्तीला मानते . ती व्यक्ती प्रत्येकाला हवी हवीशी वाटते . त्याच्या जवळ असणारे गुण यास कारणीभूत असतात . गुनिजनालाच कीर्ती माळ घालते . थोडक्यात , समजा कोणाला मानतो ? जो ओशाळ नाही , जो समाजाचे ऋण ठेवीत नाही , ज्याच्या ठायी सद्गुण आहेत , अशालाच समाज मानतो . आज लोकेषणा असणाऱ्या व्यक्तींना हा तुय्काराम महाराजांचा उपदेश बोधप्रद ठरावा असाच आहे .

सदरहू चिंतन गुरुवर्य श्री महंत प्रमोद महाराज जगताप यांच्या सुजनवाक्य या ग्रंथरुपी पुस्तकातील आहे .
जास्तीत जास्त लोकांपर्यंत वारकरी साहित्य पोहचवण्याची जबाबदारी आता तुमची आहे .
 अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य - अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ .

Tuesday 4 February 2014

|| सुजनवाक्य || - गुरुवर्य श्री. प्रमोदजी महाराज जगताप

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
प्रथमत : सर्वच गुरुवर्य , ज्येष्ठ तथा मान्यवर सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन एक आनंदाची पर्वणीच जणू .
सर्वांच्या भेटीस ........
महाराष्ट्रातील घरा घरा पर्यंत पोहचलेल अस सर्वांच आवडंत ग्रंथ रुपी पुस्तिका
|| सुजनवाक्य ||
आता आपणास फेसबुक आणि whtsapp तथा google search मध्ये हि उपलब्ध होणार आहे . सध्याच्या सुसंस्कारीत तरुणांची संघटना तयार करणे त्या करिता युवा शिबिरे आयोजित करणे आणि भारतातील संत वांडमयचा भारतभर व परदेशात प्रचार प्रसार करणे या दृष्टीकोनातून आदरणीय गुरुवर्य प्रमोद महाराज जगताप यांनी वारकरी संप्रदाय युवा मंचास लिखित साहित्य प्रसार करण्यास परवानगी दिली त्या बद्दल त्यांचे शतश ऋणी आहोत . लाखो युवा वर्गास , वारकरी वर्गास नक्कीच याचा मोठ्या प्रमणात याचा आनंद उपभोगता येईल . याकरिताच हा एक आमचा छोटा प्रयत्न ....
ग्रंथास
कृपाशीर्वाद :- श्रीगुरु धुंडामहाराज देगलूरकर
प्रस्तावना :- श्रीगुरू चैतन्यजी भानुदासमहाराज देगलूरकरजी
आशीर्वाद :- श्री गुरुवर्य बाबा महाराज सातारकर
मा .श्री. वा. ना. उत्पात , पंढरपूर
पाईकपण :- गुरुवर्य श्री. प्रमोदजी महाराज जगताप
संपादक :- प्रा.डॉ. यशवंतरावजी पाटणे
अभिप्राय :- श्री .अरुणजी मानकर
प्रकाशक :- आदरणीय . ज्ञानेश्वर (भाई ) वांगडे (शिवसह्याद्री प्रकाशन)
प्रसार माध्यम ( facebook / whtsapp /google search / telegram ) :- वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य
आपला कृपाभिलाषी ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य