Tuesday 9 August 2016

जीवन - प.पू.श्रीगुरू श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर

|| ज्ञानेशो भगवान विष्णु:||

माणसाने जीवन कसे जगावे, हा प्रश्न काहींना गोंधऴात टाकणारा,काही जणांना चमत्कारिक वाटणारा.पण स्वत:च्या जीवनाचे अंतर्मुख होऊन चिंतन करणा-यांना हा प्रश्न पडतोच ! जगात सर्व जीव जगत असले,तरीही जीवन कसे जगावे,याचे चिंतन फक्त माणूसच करू शकतो,पण फक्त विचारी माणूसच !!
इतरांना मरण येईपर्यंत प्राप्त परिस्थितीत जगावेच लागते.माणूस वेगऴ्या पद्धतीने जीवन व्यतीत करू शकतो.माणसाचे जगणे स्वाभिमानाचे असले पाहिजे.रस्त्यावर फिरणारा कुत्रा लोकांनी टाकलेल्या तुकड्यावरच जगू शकतो.माणूसही जर इतरांच्या जीवावर जगत असेल तर कुत्र्यांत आणि माणसांत फरकच राहणार नाही.शंभर वर्षे कुत्रा होऊन जगण्यापेक्षा माणसाने दोन दिवसांचे;पण सिंहाचे जीवन जगावे महाभारतात म्हटले आहे, ' मुहूर्तं ज्वलितं श्रेयो न च धूमयितं चिरम् ।' अर्थात थोडा वेऴ पण चमकून जाणे चांगले,पण दीर्घ काऴ धुमसणे बरे नव्हे.दीर्घ काऴ लाचारीचे जीवन जगण्यापेक्षा अल्पकाऴच पण स्वाभिमानाने जगावे.स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या चाफेकर बंधूंचे वय फार नव्हते,पण ते जेवढा काऴ जगले तो देशाबद्दलचा प्रखर अभिमान मिरवीत जगले.इंग्रजांची लाचारी पत्करून,पुष्कऴ माया जमवून ते पुष्कऴ जगूही शकले असते.महाभारतामध्ये विदुलामाता संजयाला एका प्रसंगामध्ये उपदेश करताना म्हणते,
'अलातं तिन्दुकस्येव मुहूर्तमपि हि ज्वल । मा तुषाग्निरिवानर्चिर् धूमायस्व जिजीविषुः ॥'
ती म्हणते,टेंभुरणीच्या लाकडाच्या कोलतीप्रमाणे थोडा वेऴ का होईना पण चमकून जा. केवऴ जीवाची आशा धरून कोंड्याप्रमाणे धुमसत राहू नको.यातून माणसाने स्वाभिमानाने जगावे असाच उपदेश आहे.पंचतंत्रात म्हटले आहे,
'यज्जीवते क्षणमपि प्रथितं मनुष्यै: विज्ञानशौर्यविभवार्यगुणै: समेतम् ।
तन्नाम जीवितमिह प्रवदन्ति तज्ज्ञा : काकोऽपि जीवति चिराय बलिं च भुंक्ते ।।'
माणसे क्षणभराचे का होईना जे जीवन विशेषज्ञान, पराक्रम ,वैभव इ.गुणांनी युक्त जीवन जगतात,त्यालाच तज्ज्ञ लोक जीवित म्हणतात.अन्यथा कावऴासुद्धा माणसांनी टाकलेला बली खाऊन पुष्कऴ वर्षे जगतो.त्या जगण्याला काय किंमत ? ज्या जीवनात ज्ञान,पराक्रम,दान,परोपकार नाही,ते जीवन मानवी नाहीच.याउलट अशा गुणांनी युक्त जीवन जगासमोर आदर्श ठरत असते.कसे जगायचे हे आपण ठरवायचे.

© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर 

श्री माऊली - एक प्रसन्न मुद्रा

माझी लाडकी माऊली - ज्ञानदा

श्रीनारायणानंद सरस्वती दंडीस्वामी महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

श्रीनारायणानंद सरस्वती दंडी स्वामी महाराज उर्फ दत्तानंदजी
(पू.श्री बालयोगी महाराज)  यांचे आज  दुःखद निधन !

-varkariyuva.blogspot.in

प.पू.सद्गुरू श्रीभानुदासमहाराज स्मृती सोहळा साम TV वर

प.पू.सद्गुरू श्रीभानुदासमहाराज स्मृती सोहळा साम TV वर
बुधवार दि १० ऑगस्ट २०१६ रोजी सायंकाळी  ०५.३० वाजता अवश्य पहा .