Monday 16 December 2013

|| श्री मारुती स्तोत्र ||

|| श्री मारुती स्तोत्र ||


भीमरुपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती| वानरी अंजनीसुता, रामदुता प्रभंजना||१||
महाबली प्राणदाता, सकळा उठवी बळे| सौख्यकारी दु:खहारी, धूर्त वैष्णव गायका|| २||
दीननाथा हरीरुपा, सुंदरा जगदंतरा| पातालदेवता हंता, भव्य सिंदुर लेपना|| ३||
लोकनाथा, जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना| पुण्यवंता, पुण्यशिळा, पावना परितोषका|| ४||
ध्वजांगे उचली बाहो, आवेशे लोटला पुढे| काळाग्नी काळरुद्राग्नी, देखता कांपती भये|| ५||
ब्रम्हांडे माईली नेणों आंवाळे दंतपंक्ती| नेत्राग्नी चालील्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळे|| ६||
पुच्छ ते मुर्डीले माथा, किरीटी कुंडले बरी| सुवर्ण कटी कांसोटी , घंटा किंकिणी नागरा|| ७||
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपात़ळु| चपळांग पाहता मोठे, महाविद्युल्लतेपरी|| ८||
कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे उत्तरेकडे| मंद्रादीसारखा द्रोणु क्रोधे उत्पाटिला बळे|| ९||
आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती| मनासी टाकीले मागे, गतिसी तुळणा नसे|| १०||
अणुपासुनि ब्रम्हांडाएवढा होत जातसे, तयासी तुळणा कोठे, मेरुमंदार धाकुटे || ११||
ब्रम्हांडाभोवते वेढे, वज्रपुच्छे करु शके| तयासी तुळणा कैंची, ब्रम्हांडी पाहता नसे|| १२||
आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा| वाढता वाढता वाढे, भेदिले शून्यमंडळा|| १३||
धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्रसमस्तही|पावती रुपविद्यादी स्तोत्रपाठेकरुनिया|| १४||
भूतप्रेतसमंधादि रोगव्याधीसमस्तही| नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने|| १५||
हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी| दृढदेहो, निसंदेहो, संख्याचंद्रकळागुणे|| १६||
रामदासी अग्रगण्यु, कपीकुळासी मंडणु| रामरुपी अंतरात्मा, दर्शने दोषनासती|| १७||
|| इती श्री रामदासकृतं संकटनिरसनं मारुतीस्तोत्रं सम्पूर्णं ||

|| श्री गणपती स्तोत्र ||

|| श्री गणपती स्तोत्र ||

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम ||
भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये || १ ||
प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकम ||
तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम || २ ||
लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ||
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्णं तथाष्टमम || ३ ||
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम ||
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम || ४ ||
द्वादशितानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः ||
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो || ५ ||
विद्यार्थी लभते विध्यां धनार्थी लभते धनम ||
पुत्रार्थी लभते पुत्रन मोक्षार्थी लभते गतिम || ६ ||
जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासै: फलं लभेत ||
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: || ७ ||
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत ||
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: || ८ ||
इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||

|| श्री स्वामी समर्थाष्टक ||

|| श्री स्वामी समर्थाष्टक ||

असें पातकी दीन मीं स्वामी राया |
पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ||
नसे अन्य त्राता जगी या दीनाला |
समर्थां तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || १ ||
मला माय न बाप न आप्त बंधू |
सखा सोयरा सर्व तू दीन बंधू ||
तुझा मात्र आधार या लेकराला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || २ ||
नसे शास्त्र विद्या कलादीक काही |
नसे ज्ञान, वैराग्य ते सर्वथा ही ||
तुझे लेकरु ही अहंता मनाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ३ ||
प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा |
तुझा दास मी ही स्मृती ना मनाला ||
क्षमेची असे याचना त्वत्पदाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ४ ||
मला काम क्रोधाधिकी जागविले |
म्हणोनी समर्था तुला जागविले ||
नका दूर लोटू तुझ्या सेवकाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ५ ||
नको अंत पाहू त्वरे धाव घेई |
तुझ्यावीण नाही दुजी श्रेष्ठ आई ||
अनाथासि आधार तुझा दयाळा |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ६ ||
कधी गोड वाणी न येई मुखाला |
कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला ||
कधी मुर्ती तुझी न ये लोचनाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ७ ||
मला एवढी घाल भीक्षा समर्था |
मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा ||
घडो पाद सेवा तुझ्या किंकराला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ८ ||
|| श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ||

दत्त जयंती ...

आज दत्त जयंती ...
" पूर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या " 

भगवान दत्तात्रय यांचा जन्म झाला चला ......घ्या लवकर पाळण्याची दोरी आणि म्हणा भगवान दत्तात्र्यांचा पाळणा ...खास तुमच्यासाठी  
पाळणा - 
जो जो जो रे जो जो जो । तू मी ऎसे उमजो ॥धृ॥
्रेम पालख दत्तात्रय । हालविते अनसुया ।
बोधुनि निजरुप समजाया । भवभ्रम हा उडवाया ॥१॥
रजोगुणी तू ब्रह्माया । श्रमलासी तान्हया ।
सुखे निज आता अरे सखया । धरी स्वरुपी लया ॥२॥
तमोरुपे तू सदाशिवा । विश्रांति घे देवा ।
धरि रे स्वरुपी तू भावा । संहारिता विश्‍वा ॥३॥
विष्णू सात्त्विक तू अहंकार । दैत्यांचा संहार ।
करिता श्रमलासी अपार । आता समजे सार ॥४॥
ऎसा आनंदे पाळणा । मालो गातसे जाणा ।
सदगुरुकृपेने आपणा । दत्ता निरंजना ॥५॥

तुमचा ,
अक्षय भोसले