Wednesday, 28 June 2017

धडपड

 

आपली सगऴी धडपड ही आपल्या उपजीविकेसाठी चालू असते.पोट भरावे यासाठी सर्वांचे प्रयत्न चालू असतात.मग तो श्रीमंत असो अथवा गरीब.गरीब भाकरीसाठी प्रयत्न करेल आणि श्रीमंत पंचपक्वान्नासाठी करेल.गरीबाचे थोडक्यात समाधान होईल किंवा त्याला थोडेच मिऴेल आणि श्रीमंताला भरपूर मिऴेल पण समाधान होणार नाही.पण कसेही असले तरी प्रत्येक जण आपल्या पोटासाठी प्रयत्न करतोच.
थोडासा विचार केला तर जन्माला येऊन केवऴ पोट भरण्यासाठी,उपजीविकेसाठीच आपली शक्ती खर्च करावी हे योग्य आहे का ? की जन्माला येऊन जन्मोजन्मीचे श्रम नष्ट करण्यासाठी सुखरूप असणारा परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ? कारण उपजीविका सर्वांचीच होते.पण परमात्मा सर्वांना कळतोच असे नाही.पोट भरण्यासाठी आपले सामर्थ्य पणाला लावण्याची गरज नसते.कारण पोट सर्वांचेच भरते.प्रयत्न करणाऱ्याचेही आणि न करणाऱ्याचेही ! पैसा कोणीही मिऴवतो.किडामुंग्यांना नोकरी करावी लागत नाही,तरीही त्यांचे उदरभरण होते.अशी अनेक उदाहरणे सापडतील.जन्मलेले बालक जन्मल्याबरोबर अनाथ झाले तरी भरणपोषण होतेच.

वृत्त्यर्थ नातिचेष्टेत,साहि धोत्रैव निर्मिता ।
गर्भादुप्ततिते जन्तौ मातु: प्रसवत: स्तनौ  ।।

आपल्या उपजीविकेसाठी फार धडपड करू नये.ती ब्रम्हदेवाने निर्माण करून ठेवलेली असते.प्राणी मातेच्या उदरातून बाहेर पडतो तेव्हा आईच्या स्तनांना पान्हा फुटत असतो.आपले पोट तसेही भरते.त्या प्रयत्नात आपले मूऴ उद्दिष्ट विसरू नये. कबीरमहाराजांनी म्हटले आहे,

मुरदे को हरि देत है कपडो लकडी आग ।
जीवित नर चिन्ता करे उनका बडा अभाग ।।

मेलेल्यालाही देव कपडा,लाकूड ,अग्नि हे सगऴे देतोच.मग जिवंत माणसाला चिंता करण्याचे कारण काय ? अभागी मनुष्यच त्याची चिंता करतो.त्यासाठी सर्व सामर्थ्य खर्च करण्यात अर्थ नाही.देव मिऴविण्यात सर्व सामर्थ्य खर्च करावे.तो भेटला की सुखरूपातच आहे.

।। रामकृष्णहरि ।।

संदर्भ - संतसंग

© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.

#chaitanyadeglurkar #vari #alandi #pune

Monday, 19 June 2017

About Akshayvari - Megha Tangde

Akshayvari - Pandhricha Dev Bahut Kowala - Gayatri Gaikwad & Chiatnay ...

अक्षयवारी २०१७ - दै.पुण्यनगरी

अक्षयवारी २०१७  - दै.पुण्यनगरी 

अक्षयवारी प्रस्तुत अभंगवाणी लवकरच आपल्या भेटीस ..!

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
अक्षयवारी प्रस्तुत अभंगवाणी लवकरच आपल्या भेटीस ..!
विशेष सहभाग -
पंडीत श्रीसुर्यकांत गायकवाड . 
श्री.रमाकांत गायकवाड .
सौ.संगीता गायकवाड ,
कु.गायत्री गायकवाड .
तबला साथ - श्री.पांडुरंग पवार व चि.चैतन्य पांडुरंग पवार .
निवेदन - कु.मेघा तांगडे
- वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

Saturday, 17 June 2017

श्रीमाऊलींचा प्रस्थान सोहळा ...!

माऊली आपल्या  आजोळघरी (दर्शन मंडप इमारत) पहिल्या मुक्कामी

सुखा लागी तरी - गायत्री गायकवाड

अक्षयवारी प्रस्तुत अभंगवाणी

आजची अभंग गायन सेवा - गायत्री गायकवाड ( उपशास्त्रीय गायिका , पुणे )

https://youtu.be/Ghwo5TGa4UY

#अक्षयवारी - ८४५१८२२७७२

Friday, 16 June 2017

श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर , पंढरपूर आकर्षक विद्युत रोषणाई ...!

श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर , पंढरपूर
आगामी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात व परिसरात विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली आहे .

#अक्षयवारी

चला वारीला माऊली ...!

व्हय ! शामराव आपल्या गावातली समदी पंढरीच्या इटोबाला भेटायला का काय म्हणत्यात ती वारीला गेलीती आता मला बी वाटू लागलय आपण बी जाऊ की वारीला माऊली संग ...! चल उरक आता निघल पाहिजे आज प्रस्थान हाय माऊलींच

#अक्षयवारी

Varkariyuva.blogspot.in

Wednesday, 14 June 2017

वारीला येताय मग या वस्तू घेतल्यात का ?

१) टाळ - प्रत्येकाकडे वैक्तिक टाळ अवश्यक
२)वारकरी संप्रदायिक भजनी मालिका
३) किट - १)आपले औषधें (मधुमेह ect )२) अंगदुखी , डोकेदुःखी ४ ) ताप सर्दी इत्यादी
४) वळकुटी - मिनी सतरंजी , त्याच आकाराचा प्लास्टिकचा कागद
५)कपड्यांची बॅग
६)ताट तांब्या चमचा ect
७) निवासाच्या प्रत्येक तंबूत बल होल्डर असतो तो काढून आपल्याकडील बल होल्डर  + त्याला टू पिन लावता येईल असा होल्डर जर सोबत असेल तर आपला मोबाईल आपल्या जवळ राहील .मोबाईल चार्जिंग साठी एखाद एक्स्टेंशन बोर्ड असेल तर आपल्या सोबत इतर वारकऱ्यांची हि मोबाईल चार्जिंग सोय होते .
८) पुरुषांनी विशेष करून सांप्रदायिक पोषक वापरावा (शुभ्र सदरा धोतर व टोपी  )
९) किट क्र २ - कैची , सुई , धागा इत्यादी वेळी प्रसंगी अचानक लागतात .
१०) शक्यतो जे प्रथम वरीला येत आहेत त्यांनी शुद्ध पाणीच प्यावं वारी दरम्यान पाणी बॉटल ५ ते १० रु. उपलब्द होते .
११)शबनम or बॅग - दिवसरभराच्या प्रवासात सामानाची बॅग अर्थात वळकुटी हि ट्रक मध्ये टाकलेली असते तिची गाठ हि रात्रीच्या मुक्कामवर च होत असते म्हणून शबनम अर्थात लहान बॅग हि आपल्या सोबत असावी जेणेकरून त्यात भजनी मालिका, टाळ, काही औषध , पाण्याची बॉटल त्यात ठेवता येतील.
१२) मुक्कामाच्या ठिकाणी पाणी उपलब्ध झाल तर कपडे धुण्याकरिता लागणारी सामुग्री . पाण्याची काटकसर करा मुख्यतः सुकवण्याकरिता लांब दोरी
१३) लहान प्लास्टिक चा कागद .सहसा माऊली विसाव्याला थांबली असता त्यावर आराम करण्याकरिता  बसता हि येत व झोपता हि येत .
१४)छत्री किंवा कोट पाऊसा पासून संरक्षण करण्यासाठी .
१५) एक मोठी गोण त्यावर ठळक अक्षराने आपले नाव व क्रमांक पत्ता  लिहलेला असावे त्यात सामानाची बॅग बसेल इतकी व ती बांधून सामनाच्या ट्रक मध्ये टाकता येते व नंतर शेकडोंच्या समानातून शोधताना सहज मिळते .
१६) आपल्या नावच आय कार्ड इत्यादी आपल्या खिशात ठेवावे दिंडीत गेल्यावर सहसा दिंडी सोडू नये पण कदाचित चुका मूक झाली असता भेट घडावी म्हणून  पहिल्याच दिवशी सहकारी वर्गाचा फोन नंबर व दिंडीची पत्रिका सोबत ठेवावी .
१७)मौल्यवान वस्तू कृपया सोबत आणने टाळणे .
१८) एक छान तुळशीची जप माळ - निवांत वेळी नाम जप करण्यास उपयुक्त
१९) पूजेचे देव - व ग्रँथ
२०) हरिपाठच पुस्तक सुरवातीला असावे ज्यांचा पाठ नाही त्यांच्या करिता पण वारीच्या शेवटी पंढरपूर येई पर्यंत तो हि पाठ झालेला असतो .

चला तर मग साऱ्या वस्तू अगदी व्यवस्थित भरून घ्या आणि आता घरी बसुन काय करता चला पाऊले चालती पंढरिची वाट.

प्रस्थान :  दि.१७ जून २०१७ 
श्री संत ज्ञानेश्वरमहाराज समाधी मंदिर , श्री क्षेत्र आळंदी देवाची  येथून .

#अक्षयवारी

आशा विविध अपडेट्स साठी ८४५१८२२७७२ या क्रमांकावर "वारी" हा एस एम एस करावा .

Varkariyuva.blogspot.in

संघटन - ह.भ.प.श्रीगुरू श्रीचैतन्य महाराज देगलूरकर.

संघटन

आज आपल्या देशाची,समाजाची परिस्थिती ही चिंताजनक आहे.परदेशातून देशावर,धर्मावर,संस्कृतीवर होणारे हल्ले समाजजीवनाची घडी विस्कऴित करीत आहेत,ही सुर्यप्रकाशाइतकी स्पष्ट गोष्ट आहे आणि आपणही आपले स्वत्व विसरून त्याला बऴी पडतो आहोत.या सर्व गोष्टी घडण्याचे कारण काय असावे,याचे मुऴातून चिंतन केल्यास एक उत्तर सापडते,ते म्हणजे विघटन ! कारण जोपर्यंत समाज,देश हा सुसंघटित होत नाही,तोपर्यंत बाहेरच्या कोणत्याही आक्रमणाला थोपविण्याचे सामर्थ्य त्याच्या ठिकाणी निर्माण होणार नाही.एक व्यक्ती अनेक आघाड्यांवर एकाच वेऴी लढू शकत नाही.महाभारत म्हणते,

भेदे गणा विनश्युर्हि भिन्नास्तु सुजया: परै: ।
तस्मात्संघातयोगेन प्रयतेरन्गणा: सदा ।।

समुदायामध्ये भेद निर्माण झाला की त्यांचा सर्वथा नाश हा ठरलेलाच ! कारण त्यांच्यात फूट पडली की शत्रु त्यांचा सहज पराभव करू शकतात.म्हणून समुदायाने नेहमी संघशक्तीने कार्य करावे.आज नेमका याचाच अभाव आहे.आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे.ही खरी गोष्ट आहे.पण संघटनेच्या मुऴाशी दोन गोष्टी मानाव्या लागतात.एक म्हणजे वैचारिक ऐक्य आणि दोन,कृतीचा समन्वय.काही वेऴा उलटाही विचार करावा लागतो.काही वेऴा कृतीचा तर काही वेऴा विचारांचा समन्वय संघटनेसाठी आवश्यक असतो आणि एकदा संघटना झाली की सिकंदरासारख्या जगज्जेत्यालाही माघार घ्यावी लागते हा इतिहास आहे.महाभारतात यासाठी मधमाश्यांचे उदाहरण दिले आहे.

सर्वथा संहतैरेव दुर्बलैर्बलवानपि ।
अमित्र: शक्यते हन्तुं मधुहा भ्रमरैरिव ।।

पोऴ्यातील मध काढणाऱ्याचा मधमाश्या एकजुटीने प्राण घेतात.तसे सर्वांची एकता असेल तर दुर्बलदेखील बलिष्ठ शत्रूचा नाश करू शकतात.अनेक मुंग्या मोठ्या सापाला नष्ट करू शकतात ते एक होऊनच.पंचतंत्रात याची अनेक उदाहरणे सापडतील.मुंग्यांना,मधमाश्यांना जे शक्य होते ते माणसाला जमू नये ? आज आपण जातीच्या,धर्माच्या नावाखाली संघटित होतो,पण ते संघटन देशाचे हित करेलच असे नाही.कारण या संघटनेचा हेतू शुद्ध असेलच असे नाही.सर्वांनी शुद्ध अंत:करणाने देशाच्या,समाजाच्या हितासाठी संघटीत होण्याचा सोपा उपाय सातशे वर्षांपूर्वी जगाच्या माउलीने सांगून ठेवला आहे.

भूता परस्परे जडॊ । मैत्र जिवाचे ।।

।। रामकृष्णहरि ।।

संदर्भ - संतसंग

© ह.भ.प.श्रीगुरू श्रीचैतन्य महाराज देगलूरकर.

संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची बैलजोड

संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची बैलजोड, सोबत यंदाचे मानकरी श्री.संजय कुऱ्हाडे पाटिल .

#अक्षयवारी - ८४५१८२२७७२

Sunday, 11 June 2017

वारी - काय आहे जाणून घ्या


१) वारी सोहळा हा माऊलींचा असला
तरी माऊलीला ज्याची चिंता तो
वारकरी ऊन, पाऊस, वारी याची
तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे
असते ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते माऊली...
काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात
पाणीसुद्धा घालत नाहीत. काय खायचे-
प्यायचे ते रात्री तळावरच... निष्काम सेवेचा धडा मिळतो या
वारीतच!
२) पालखी सोहळ्यात सर्वांत पुढे चालणारा
श्री माऊलींचा अश्व हा श्री
श्रीमंत शितोळे सरकार यांचे अंकली-
बेळगाववरून श्रीक्षेत्र आळंदीस
परंपरेनुसार पायीच आणला जातो. विशेष हे
की या अश्वावर कोणीही
मनुष्य स्वार झालेला नसतो. हा अश्व ज्येष्ठ शु॥११ ला
अंकलीवरून प्रस्थान करतो आणि जेष्ठ वद्य ७ ला
(पूर्ण ११ दिवस) आळंदीत प्रवेश करतो.
आळंदीला इंद्रायणी नदीच्या
पुलापाशी अश्व आले की
श्रीमंतांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात
सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्री
हैबतबाबांची दिंडी अश्वांना
सामोरी जाते. अश्वांची पूजा
केली जाते. त्यानंतर वाजतगाजत अश्वांना मंदिरात आणले
जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या
असतात.
३) अश्वाला आळंदीसं पायी आणण्याच्या
मागे केवळ परंपराच नाही तर एक
श्रदधाही जोडलेली आहे हा अश्व
अंकली (बेळगाव) वरून आळंदी येताना ज्या
ज्या गावी जातो तेथील जनसमुदाय त्याचे
दर्शन घेतात; कारण त्याला केलेला नमस्कार श्री
माऊलीच्याकडे आणि त्यांच्या करवी
श्री पंढरीच्या विठुरायाकडे पोहोचतो
अशी दृढ श्रदधा असते.
४) संपूर्ण सोहळ्यात श्रींची सामूहिक चार
स्नाने होतात. पंढरीस जाते वेळी व
परतीचे वेळी होणारे नीरा स्नान
आणि श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढ
एकादशी व आषाढ पौर्णिमेस होणारे श्री
चंद्रभागेचे स्नान.
५) संपूर्ण वारीत सकाळच्या वेळीस फक्त
दोनच ठिकाणी आरती होतात प्रथम-
थोरल्या पादुका (चर्होली) आणि दुसरी पुणे
येथे शिंदे छत्रीपाशी.
६) श्रीमंत शिंदे सरकार यांनी
श्री माऊलींच्या मंदिर
व्यवस्थेसाठी आळंदी आणि नाणज
ही गावे इनाम दिली होती,
श्री गुरु हैबतबाबादेखील शिंदे सरकार यांचे
पदरी सरदार होते. माऊलींच्या
मदिरातील महाद्वार, नगारखाना, वीणा मंडप
हे श्री शिंदे सरकार यांनीच बांधले.
श्रीमंत शिंदे सरकारांच्या याच सेवेचे स्मरण म्हणून
त्यांचे समाधीस्थळ असलेल्या शिंदे छत्री
जवळ सकाळची आरती होते.
७) इ.स.१८३१ पासून ह्या वारी सोहोल्यास
श्रीमंत शितोळे सरकार यांचा राजाश्रय आहे.
आजही तो अखंडपणे चालूच आहे. त्यांच्या ह्या
सेवेचे स्मरण आणि बूज म्हणून आजही
श्री माऊलीचा रात्रीतळाचा
मुक्काम श्रीमंत शितोळे सरकारांच्या तंबूतच असतो.
८) वाखरी येथून पंढरीस वारी
जाताना श्री माऊलींच्या पादुका रथातून उतरून
घेऊन श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या
जातात.
९) वारीतील दिडयामध्ये काही
वाद निर्माण झाल्यास तो वाद मालक, चोपदार, दिंडी प्रमुख,
देवस्थान विश्वस्थ यांच्या सयुक्त बैठकित, श्रीमंत
शितोळे सरकार यांच्या ध्वजाखाली निर्णय घेऊन
सोडविण्यात येतो.
१०) संपूर्ण वारी सोहळ्यात मानाच्या
कीर्तनाव्यतिरिक्त इतर कुठलेही
कीर्तन होत नाही. ह्या
कीर्तन सेवा श्री हैबतबाबांपासून चालत
आलेल्या आहेत आणि आजही त्यांचे वंशज अतिशय
श्रद्धेने त्या पार पाडत आहेत.
११) वारी सोहळ्यातील सर्वांत मोठे
आकर्षण म्हणजे ‘रिंगण’. त्याचे दोन प्रकार आहेत १) उभे, २)
गोल. वारीसोहळ्यात तीन उभी
आणि चार गोल रिंगणे होतात. त्यातील दोन रस्त्याच्या
उजव्या तर दोन रस्त्याच्या डाव्या बाजूला होतात.
त्यांतही दोन रिंगणे जेवणापूर्वी आणि दोन
रिंगणे जेवणानंतर होतात.
या रिंगण सोहळ्यानंतरचा ‘उडीचा कार्यक्रम’ हा खूपच
सुंदर आणि अवर्णनीय असतो.
१२) वारीत चालत असताना म्हणायच्या अभंगांचा क्रम
आणि नियम ठरलेला असतो. रूपाचे, भूपाळीचे, वासुदेव,
आंधळे, पांगळे, गौळणी इत्यादी अभंग
सकाळच्या वेळी, दुपार जेवणानंतर हरिपाठ, गुरूपरंपरेचे
अभंग, नाटाचे अभंग वारकरी म्हणतात. ठराविक वारांचे
अभंग त्या त्या दिवशी म्हटले जातात.
१३) सर्व दिंड्या एकच अभंग एकदम म्हणत नाहीत.
प्रत्येक दिंडीत मात्र एका वेळी एकच
अभंग ऐकू येतो.
१४) दुपारी जेवणानंतर ज्ञानोबारायांचा ‘हरिपाठ’ म्हटला
जातो. हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामधील शेवटचे चरण
‘ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान |
समाधी संजीवन हरिपाठ॥ ‘म्हटले जाते
त्यावेळी दिंडी थांबते; त्याबरोबर
पालखीही थांबते आणि
दिंडीतील लोक उभे राहून ते चरण
म्हणतात. तेथूनच भूमीला स्पर्श करून
श्री माऊलीला वंदन करतात.
१५) वारीसाठीची
पूर्वतयारी संस्थान समिती, मालक, चोपदार
हे चैत्र महिन्यापासूनच सुरू करतात. वारीच्या
मार्गातील सर्व तहसील,
ग्रामपंचायतींना भेट देऊन तेथील
व्यवस्थेची पाहणी करतात व योग्य
उपाययोजना सुचवितात.
१६) वारीत लाखोंचा जनसमुदाय एकत्रित चालतो पण त्यात
कधीच कुठेही भांडणतंटा होत
नाही. विशेष काही तक्रार असल्यास
रात्रीच्या मुक्कामासाठीच्या तळावर त्याबाबत
निर्णय घेतला जातो.
१७) वारीतील प्रत्येक दिंडी
स्वत:चे सर्व साहित्य स्वत: आणते. दिंडीमध्ये
चालणार्या प्रत्येक वारकर्याची त्यात अंतर्गत
भिशी (कॉन्ट्रिब्यूशन) असते. सर्व खर्च या
निधीतून केले जातात. काही दानशूर
दिंडीला या ना त्या स्वरूपात दानही देतात.
१८) रथापुढील दिंड्या माऊली चालायला
लागली की चालणे सुरू करतात.
माऊली विसाव्याला किंवा तळावर थांबल्यावरच या दिंड्या
विसावतात (बसतात). विसाव्याच्या जागी अगोदर
पोहोचूनही जोवर माऊली विसावत
नाही तोवर या दिंड्याही विसावत
नाहीत.
१९) काही वारकरी वारीत
फक्त पाणीवाटपाची सेवा देतात.
वारी सुरू होऊन संपेपर्यंत त्यांचे काम पाणी
वाटपाचेच असते. २०) काही वारकरी
संपूर्ण वारीत अनवाणी चालतात, तर
काही वारीत एकच वेळ जेवण करून
चालतात.
२१) वारी सोहळ्यातील काही
दिंड्या ह्या लोकशाही पद्धतीने चालविल्या
जातात. श्री गुरू बाबासाहेब आजरेकर फड (रथामागे ७
क्रमांकाची दिंडी) हे या
पद्धतीचे उदाहरण. फक्त वारीपुरतेच
नाही तर वर्षभर ह्या दिंड्यांचे
हरीभक्तीचे कार्यक्रम आपापल्या
गावी सुरू असतात.
२२) संपूर्ण वारी सोहळ्यात एकच
जरीपटका असतो, असे सर्वश्रुत आहे. पण वास्तवात
वारीच्या व्यवस्थेच्या दृष्टीने एकूण
तीन जरीपटके असतात.
२३) श्री माऊलींचे धाकटे बंधू
श्री सोपानकाकांची पालखी
वेळापूर समोरील भंडीशेगाव
मुक्कामापूर्वी ‘टप्पा’ येथे येऊन श्री
माऊलीस भेटते. यालाच ‘बंधुभेट’ म्हणतात. हा
अतिशय भावूक प्रसंग असतो. या वेळी
दोन्ही भावंडांचे रथ एकमेकांना भेटतात व
मानकरी आणि विश्वस्त मंडळी दर्शन
घेऊन श्रीफलांचे आदान-प्रदान करतात.
२४) वेळापूर येथे भारुडाचा मान हा शेडगे दिंडीकर्यांना
आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या तत्कालीन
बहुजनसमाजाला आध्यात्मिक ज्ञानदान करण्याचा श्री
एकनाथ महाराजांचा उद्देश त्यांच्या भारुडातून आपल्यासमोर साकारतो.
२५) श्री ज्ञानोबारायांना अखिल मानवजात
‘माऊली’ असेच म्हणते. लेकराचे हित चिंतते
ती माऊली! विश्वातल्या यच्चयावत
जीवांना त्रैलोक्यातील सर्व सुखे प्राप्त
व्हावीत, असे मागणे ज्ञानोबाराय पसायदानामध्ये
विश्वात्मक देवाकडे मागतात म्हणून ज्ञानोबाराय हे
‘माऊली’ आहेत. आमच्या नामदेवरायांनी तर
ज्ञानोबारायांना ‘योग्यांची माऊली’ म्हणून
गौरविले. नाथरायांनी ‘साधकांचा मायबाप’ असा ज्ञानोबारायांचा
महिमा गायला. श्री ज्ञानेश्वर महाराजांना आपण
‘ज्ञानोबा’ असे मोठ्या प्रेमादराने संबोधतो. ‘बा’ हे
आदरार्थी वचन आहे. ज्ञानोबारायांच्या ठायी
असणारे साधकाचे मातृत्व ‘माऊली’ या संबोधनाने तर
साधकाचे पितृत्त्व ‘बा’ या शब्दाने सूचीत होते.
जगी ऐसा बाप व्हावा| ज्याचा वंश मुक्तीस
जावा॥पोटा येतां हरले पापा| ज्ञानदेवा मायबापा॥असे तुकोबाराय
म्हणतात.
२६) श्रींचे वारी सोहळ्यात होणारा
‘ज्ञानोबा-तुकाराम’ हा गजर केवळ एक सांप्रदायिक नामजप नसून
त्यास सोऽहं साधनेचे अधिष्ठान आहे. एक श्वास तर दुसरा
उच्छ्श्वास आहे, आणि एक उच्छ्श्वास आहे तर दुसरा श्वास
आहे. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हे भजन म्हणजे
मध्यमपदलोपी समास आहे. या दोन नामांत
माऊलींपूर्वीचे आणि तुकोबारायांनंतरचे व या
दोहोंच्या दरम्यानचे संप्रदायातील सर्व संत सामावलेले
आहेत..
येताय ना मग वारीला..
- अक्षयवारी

Varkariyuva.blogspot.in(चैतन्याचा जिव्हाळा )

Sunday, 4 June 2017

संत श्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा दिनक्रम ...!

संत श्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा  दिनक्रम ...!

कसॊटी - प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर

अनेक संकटातून,प्रतिकूल परिस्थितीतून तावून-सुलाखून बाहेर पडल्यानंतर माणूस परिपक्व होतो.
सर्व मोठ्या महात्म्यांची चरित्रे पाहिली तर याची अनेक उदाहरणे पाहावयाला मिऴतील.छत्रपती शिवाजी महाराज,महाराणा प्रताप वगैरे योद्ध्यांची किंवा संतांची चरित्रे पाहिल्यास अत्यंत हालअपेष्टातून त्यांना जावे लागले असे दिसते.पण त्यामुऴेच त्यांची चरित्रे घडली.श्रीतुकोबाराय म्हणतात,

तुका म्हणे तोचि संत ।
सॊसी जगाचे आघात ।।

सुभाषितकाराने ते आघात कोणते, हे दृष्टांताने सांगीतले आहे.

यथा चतुर्भि: कनकं परीक्ष्यते,
निघर्षणच्छेदनतापताडनै: ।

तथा चतुर्भि: पुरूष: परीक्ष्यते: श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा ।।

एखाद्याला सोन्याच्या शुद्धतेबाबत संशय निर्माण झाला तर तो सोनाराकडे जातो.सोनार कसोटीवर घासतो.सोन्याची कसोटी चार प्रकाराने होते.त्या कसोटीतून सोन्याचे गुण तपासले जातात.कसोटीवर घासून त्याची चकाकी तपासली जाते,त्याला तोडून त्याचा चिवटपणा पाहिला जातो,त्याला तापवून त्याचा रंग बदलतो,त्याला हातोडीने ठोकून त्याचा मऊपणा, ते ताणले जाते की नाही हे पाहिले जाते.नंतर सोन्याला किंमत येते.सोनेसुद्धा कसोटीला लावले जाते,तेव्हांच त्याला सोने म्हटले जाते.त्याप्रमाणेच माणसालाही मोठे व्हायचे असेल तर त्यालाही कसोटी लावावी लागते.त्याच्या ठिकाणचे ज्ञान,त्याचे शील,गुण आणि त्याचे आचार यावरून माणसाचे मोठेपणं ठरत असते.यांपैकी एकही गुण नसेल तर त्याचे मोठेपणं कुचकामी ठरते.
छत्रपती शिवरायांचे चरित्र पाहिल्यास हे सर्व गुण त्यांच्या ठिकाणी प्रसंगपरत्वे पाहायला मिऴतात,म्हणूनच तर ते जगासमोर आदर्श ठरले.

।।राम कृष्ण हरी ।।

संदर्भ - संतसंग

© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.

सौ.प्रतिभाताई पाटील (मा.राष्ट्रपती - भारत ) आज श्रीमाऊलींच्या दर्शनास ..!

सौ.प्रतिभाताई पाटील (मा.राष्ट्रपती - भारत )  आज श्रीमाऊलींच्या दर्शनास ..!