।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।
दसरा दिवाळी तोचि माझां सण | सखे हरभजनभेटतील ||१|
| अमुप जोडल्या पुण्याचिया राशी | पार त्या सुखासी नाही लेखा ||२|| धन्य दिवस आजी झाला सोनियाचा | पिकली हे वाचा रामनामे ||३||
तुका म्हणे काय होऊ उतराई | जीव ठेवूं पायीं संतांचिये ||४||
विजयादशमीच्या आपणास सगळ्यांनाच मनापासून हार्दिक शुभेच्छा
......!!!!
पुण्य फळले बहुता दिवसा | भाग्य उदयाचा ठसा |
झालो सन्मुख तो कैसा | संतचरण पावलो ||
भाग्याचा उदय | ते हे जोडी संत पाय """||
धन्य दिवस आजी झाला सोनियाचा
जगात साधु संत नाहीत..असे नाही...पण त्यांची भेट होणे मात्र कठीण आहे. असे सर्वच संतांनी म्हटले आहे.संतचरणसंग म्हणजेच असा संग तोच की ज्याच्या अंतःकरणावर परिणाम झाला पाहीजे ना...हदयात भक्तीप्रेमाचा उदय व्हायला हवा...त्यांच्या संगती शिवाय भगवद् भक्ती निर्माण होणे अशक्यच....
ज्ञानी विद्वान पुरूषांच्या संगतीत ज्ञान, विद्या प्राप्त होते...धनवानाच्या संगतीने धनाची प्राप्ती...
तसेच संत महात्म्यांच्या संगतीत भगवद् भाव प्राप्त होतो....माऊली म्हणतात...."
साधुचा अंकिला हरिभक्त
सर्वोपकारी महात्म्या पुरुषाचा संग दुर्लभ आहे...अगम्य आहे..
.....जरी संत भेटले तरी त्यांना "संत" स्वरूपात जाणणे कठीण आहे...
कारण वास्तविक ते जगात राहुन जगासारखे वावरताना दिसतात पण.. त्यांचा अंतरंगातील अध्यात्मिक अधिकार भाव फार श्रेष्ठ असतो...त्या अधिकाराचे दृष्टीने
त्यांना ओळखने कठीण असते.
...या संसारात क्षणभर जरी संत्सग घडला...तरी या सांसारिक जिवाला कल्याणकारी असतो....
ही संत्सगती म्हणजेच आपली दिवाळी आणि दसरा
क्षणभराची श्री देवर्षि नारदांची संगती घडून वाल्याकोळ्यास त्यांच्याकडून श्री नारायण मंत्राची प्राप्ती झाली.
संत हे ज्ञान ,वैराग्य,भक्तीप्रेम यानी कायावाचामनाने संपुर्ण व्यापून गेलेले असतात....श्री विठ्ठल विठ्ठल
- varkariyuva.blogspot.in