Saturday 31 May 2014

निषेध ! निषेध ! निषेध ! - अक्षय भोसले

निषेध ! निषेध ! निषेध!



आम्ही वारकरी आहोत मात्र स्वराज्याचे धारकरी सुद्धा आहोत ! 
भले तर देऊ कासेची लंगोटी , नाठालाच्या माथी हनु काठी ..आता काठीने भागनार नाही यांना मुळासकट नष्ट केल पाहिजे .
एक वेळ स्व ता चा खुन माफ करु पण छत्रपतीँचा आणि हिंदु देवतांचा अपमान करणाय्राला मुळासकट साफ करु..
लाखो करोडो लोँकांच्या ह्रदयावर आधिराज्य गाजवणाय्रा छत्रपती शिवराय,छत्रपती शंभुराजे व बाळासाहेब ठाकरे यांचे अश्लिल छाया चित्र बनवून टाकणाय्रांचा जाहिर निषेध !
पण ज्या कोणी हरामखोरांने हे कृत्य केले आहे त्याला तमाम हिंदूस्थानातील हिंदुची एकी काय असते हे येणाय्रा काळात बघायला मिळेल.
त्या पेज वरील हिंदु देवतांचे व महाराजांचे Photoshop करुन जे फोटो टाकलेत ते पाहुन वाईट वाटल पण हेच Photo देखिल बर्याच लोकांनी Like केलेत आणि ते मराठी आहेत हे पाहून तळपायाची आग मस्तकात जातेय.
आता लोक त्या पेज ची लिँक सर्वत्र पसरवत आहेत पेज बंद व्हावी हा त्यांचा हेतु झाला पण हे सर्व आगीत तेल ओतण्यासारखच आहे. कृपया भावना भडकवु नका.
बघू आता सरकार काय याला उत्तर देत नाहीतर आम्ही आहोतच सक्षम याकरिता !
कुठे गेली आपली media कोण कोणासोबत पळून गेल , कोणाचे कोणाशी संबंध , अरे अशा फालतू गोष्टी दाखवता मात्र माझ्या शिवबांचा झालेला अपमान पाहून शांत बसता लाजा कशा वाटत नाही ..बांगड्या भरा हातात तुम्ही आणि मिरवा ...निषेध ! निषेध ! निषेध !
जय शिवराय !
जय शंभुराजे!
जयस्तु हिँदुराष्ट्र !
जय वारकरी !
तुमचा ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !

सर्वधर्म समभावाची शिकवण देणारा जगाच्या पाठीवर एकमेव संप्रदाय – वारकरी संप्रदाय ( लेखक - अक्षय भोसले )

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
सर्वधर्म समभावाची शिकवण देणारा जगाच्या पाठीवर एकमेव संप्रदाय – वारकरी संप्रदाय

माझे तुकोबाराय म्हणतात कि ,
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
आइका जी तुम्ही भक्तं भागवत ।
कराल तें हीत सत्य करा ॥२॥
कोण्या ही जिवाचा न घडो मत्सर ।
वर्म सर्वेश्वरपूजनाचे ॥३॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
सुख-दुःख जीव भोग पावे ॥४॥
वारकरी संप्रदायत सर्व धर्माचे संत होऊन गेलेत आणि भाविक  भक्तजन यांची मांदियाळी आहे . आपण पहा न आमच्या माऊली या ब्राह्मण समजाच्या आहेत  तर आमचे श्री संत तुकाराम महाराज हे बहुजन समाजाचे चोखोबा राया हरिजन समाजाचे होते , सावता महाराज हे माळी समाजाचे , नामदेव महाराज शिंपी समाजाचे  , सेना महाराज नाभिक समाजाचे , संत नरहरी महाराज सोनार समाजाचे इतकच नव्हे तर मुस्लीम समाजाचे कबीर जी आमच्या संप्रदायात आहेत आणि असे कित्येक नाव सांगता येतील . महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत भर संतानी यात्रा केली या भगवत ध्र्माकॅह प्रचार केला व सर्वाना एकत्रित केल .आपण आज म्हणतो कि सर्व समाजाने एकत्र आले पाहिजे मात्र हे कार्य १२ शतकापासून आमचे साधू संत करत आलेत आणि आजतागायत अविरत सुरु आहे .
आजच सरकार म्हणत कि स्त्री शिक्षण स्त्रियांना समाजात माण सन्मान दिला पाहिजे . मात्र आपल्या माहितीकरिता समाजात सध्या ज्या स्त्रिया वेश्या व्यवसाय करतात त्यांना आता काय किमत आहे पण आमच्या कान्होपत्र अशा कुळात जन्माला येऊन हि संत या पदाला जाऊन पोहचल्या हि क्रांती केवळ वारकरी संप्रदायच करू शकला . संप्रदायात तेव्हा पासून आज पर्यंत आणि पुढे स्त्रियांना मंच स्थान आहे याच मूर्तिमंत उदाहरण आमच्या चिमुकल्या मुक्ताई , सोयराबाई , जनाबाई , भगीरथी जी , बहिणाबाई कित्येक नाव आपल्या डोळ्यांसमोर येतील .आमचा भगवंत यांची भक्ती पाहून यांच्या सोबत काम करयचा इतका मोठा स्त्रियांना माण सन्मान केवळ वारकरी संप्रदायच देऊ शकला आज तागायत . आज नोकरवर्गास काय किमत देतात वरिष्ठ मात्र आमचे गावबा जे कि काम करण्याकरिता नाथमहाराजांच्या घरी राहिले पडेल ते काम केल व अखेर संत या पदाला जाऊन  पोहचले .
आदरणीय गुरुवर्य प्रमोद महाराज  यांच्याशी बोलताना त्यांनी त्यांच्या जीवनातील एक गोष्ट सांगताना पूजनीय दादा महाराजंचा ( ह.भ.प. दादा महाराज सातारकर ) उलेख्ख केला ते नेहमी सांगयचे समर्थाचिया भोजने | तळलिया वोळलिया एकची पक्वान्ने || जस कि एखादा श्रीमंत मानूस आणि उदारही   आहे त्याच्या कडे कधी भोजनाची पंगत असेल न तर त्यांच्या  घरातल्यांना हि त्या दिवशी तेच अन्न आणि बाहेरील गोर गरीब जन माणसाना हि तेच अन्न अर्थात भेद भाव नाही .
माऊली म्हणतात,
‘‘या रे या रे लहान थोर
याती भलते नारी नर
न करावा लागे विचार अन्यथा’’
अर्थात, लहान-थोर, उच्च-नीच, वरिष्ठ-कनिष्ठ, स्त्री-पुरुष, तुम्ही कुणीही असा, सगळ्यांनी या आणि सामील व्हा!
तुकोबा म्हणतात,
तुका म्हणे नाही जातीसवे काम
ज्याचे मुखी नाम तोची धन्य!
तुकोबा-ज्ञानोबांचे हे विचारच आपल्याला भविष्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत, याची मला खात्री आहे.
आणि अगदी तसच एक ठिकाणी समर्थ म्हणतात ना , मऱ्हाटा / मराठा  तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा !
मराठा म्हणजे केवळ मराठा जात नव्हे तर त्यात येतात त्या सर्व १८ पगड जाती धर्म सर्वांचा समावेश आणि याच शिकवणीने पुढे साकरल गेल ते शिवराज्य आणि आपल स्वराज्य ..म्हणजे यात हि वारकरी संप्रदाय तथा साधू संत यांचे आशीर्वाद मार्गदर्शन होतच . आणि आज राम राज्य तर आहे सुराज्य तर आहे मात्र त्यातील शांतता स्त्रियांना असणारा माण सन्मान वर वर पाहता दिसत आहे सगळ ठीक मात्र अस नसून अजून हि काही वाईट प्रवृत्तीने आमचा युवा वर्ग मग ते व्यसन दारूचे असेल किंवा इतर कोणत्या गोष्टीच माझी सर्व मातृ वर्गास विनंती आहे कि आता पासून आपल्या मुलांनावर संस्कार करा मला माहीत आहे कि या गोष्टी सांगण्याची गरज नाही आईला कोणत्या हि कारण “लेकुराचे हित वाहे माउलीचे चित्त ”मात्र मुल बिघडतात ती  संगतीने आणी जर असू घडू द्यायचे नसेल आपल्या मुलांनी आमच्या माऊली ,  तुकाराम महाराज ,  शिवाजी राजांच्या प्रमाणे , स्वामी विवेकानंद घडवायचेत तर त्यांच्या हातात श्रीमद भगवत गीता , ज्ञानेश्वरी , रामायण , श्री गाथा , दासबोध आदी ग्रंथ द्या , आणि हे जर सुजनवाक्य चांगले विचार सदोदित जवळ राहिले तर नक्कीच राम राज्य आल म्हणून समझा पण परिवर्तनाची गरज आपल्या स्वत : पासून केली पाहिजे .आणि हे सार करताना तुम्ही अस करा कि कुणाच मन दुखवल जानार नाही न याची काळजी घ्या समजवा मित्र परिवारास
कोण्या ही जिवाचा न घडो मत्सर ।
वर्म सर्वेश्वरपूजनाचे ॥
आणि अस वागण हे हि एक प्रकारे देवाची पूजा केल्याप्रमाणे आहे .
जीवनात चढ उतार तर असतातच कि , आयुष्य संघर्ष करायला शिका जिथे अत्याचार चुकीच्या गोष्टी दिसतात लागलीच आवाज उठवा आपण सारे एक होऊ या आणि जस महाराजांनी म्हटल कि आपला धर्म विष्णुमय अर्थात आनंदच स्वरूप अस आनंदाने बहरून टाकूया .
आणि हा सर्व आनंद कुठे तर केवळ आपल्या वारकरी संप्रदायातच ..
तर नक्की तुम्हाला याकॅह अनुभव घ्याचाय ना तर अवश्य वारीस या पहा ना   “ तो सुख सोहळा स्वर्गी नाही ” अस उगाच का म्हटल्य जन्मासी येउनी पहा रे पंढरी !
आजच्या तरुणाईला माझ्या बंधू भगिनींना हाच संदेश आहे कि शिक्षण घ्या यात वादच नाही मात्र त्याला अध्यात्माची जोड द्या अगदी दुधात जशी साखर आगदी तस होऊन जाईल .
शोकांतिका हीच वाटते कि आज परदेशातील युवा इथे येऊन आपल्या संत साहित्य वर अभ्यास करून पदव्या घेऊ लागले एका दृष्टीने चांगल हि आहे कि आपल संत साहित्य जगभरात जातय मात्र आपल्या मुलांनी भारतीय संस्कृती सोडून पाश्चिमात्य संस्कृतीच अवलोकन करण्यास सुरवात केली . उठा जागे व्हा अजून हि वेळ गेलेली नाही .
असो तूर्त आपली रजा घेतो लवकरच भेटू नवीन विषया सोबत .
यात जे काही चुकल असेल ते माझ आणि बरोबर ते गुरुवर्य प्रमोद महाराजांचं आमच्या पूजनीय . देगलूरकर  परंपरेच .
तुमचा ,
अक्षय भोसले – ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !

आई तल ना ग वालीला .... - अक्षय भोसले

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
पहा कस हे बाळ आपल्या आईला विनवतय जायचं मला विठुरायाच्या भेटीला तल ना ग वालीला   ...


लेकुराचे हित | वाहे माउलीचे चित्त ||
ऐसी कळवळयाची जाती | करी लाभाविण प्रीति ||
पोटी भार वाहे | त्याचें सर्वस्वही पाहे ||
तुका म्हणे माझें | तुम्हा संतांवरी ओझें ||
तुमचा ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !

माझ्या जीवीची आवढी पंढरपुरा नेईन गुढी ! - अक्षय भोसले

माझ्या जीवीची आवढी पंढरपुरा नेईन गुढी !

माऊली माऊली माऊली ..