Thursday 29 May 2014

“मेळविली मांदी वैष्णवांची ”- अक्षय भोसले

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
पहा ना जस कि आपण म्हणतो कि वारी जवळ आली आता तयारीला लागल पाहिजे अगदी असच जेव्हा माउलींनी वारी सुरु केली तेव्हाचा प्रसंग आपणापुढे मांडण्याचा आमचा हा प्रयत्न !
संताचिये पायी हा माझा विश्वास | सर्व भावे दास झालो त्यांचा || गुरुवर्यांना दंडवत 

माझ्या माऊलीने अर्थात ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्या वर्षाच्या आत रेडा बोलवणे , मेलेले पितर जेवण्यास बोलवणे , मशीद बोलविणे , सच्चिदानंदयांस जिवंत करणे , ज्ञानेश्वरी अमृतानुभव व इतर ग्रंथ लिहिणे , भिंत चालवणे , पाठीवर मांडे भाजून दाखवणे वैगरे सर्व कृत्य केली म्हणजे ये मराठीचिये नगरी | ब्रह्मविद्येचा सुकाळ करी | घेणे देणे सुखचि वरी || व मिरविला बडिवार सिद्धाईचा || हि सर्व कामे पूर्ण झाली . आता उरलेल्या आयुष्यात भक्ती व वारकरी पंथाचा प्रचार करणे हे काम राहिले होते . त्याकरिता काय काय केले पाहिजे , याची आखणी करून , दिंडीची रचना केली , त्याकरिता टाळ , घोळ , चिपळ्या , विना , मृदुंग , भेरी , तुतारी , कुंचा म्हणजे चवरी , गरुड , ध्वज , पताका ,दंड , देवाचा छडीदार चोपदार , एवढी सामुग्री तयार करून दिंडीची रचना केली व त्याकरिता “मेळविली मांदी वैष्णवांची ”
भक्त समुदाय मिळवला व शके १२१३ ला आषाढी वारीस पहिली दिंडी काढली .कारण १२१२ मध्ये नेवाश्यला होते त्याच्या अगोदर पैठणात होते . म्हणून पहिली वारी शके १२१३ च मानली पाहिजे असो याप्रमाणे दिंडीची रचना करून पंढरीस निघाले त्याचे वर्णन एका अभंगात ज्ञानोबा माऊली करतात ते अस कि ,
उंच पताका झळकती | टाळ मृदुंग वाजती |
आनंदे प्रेमे गर्जती | भद्रजाती विठ्ठलांचे ||१||
आले हरीचे विनट | वीर विठ्ठलाचे सुभट |
भेणे दिप्पट | पळती थाट दोषांचे ||२||
तुलसीमाळा कंठी | गोपीचंदनाच्या उटी |
सहस्त्र विघ्ने लक्ष कोटी | बारा वाटा पळताती ||3||
सतत कृष्णमुर्ती सावळी | खेळे हृद्यकमळी |
शांती क्षमा तयाजवळी | जीवेभावे अनुसरल्या ||४||
सशत्र नामचे हातीयेर | शंख चक्राचे शृंगार |
अति बळ वैराग्याचे थोर | केला मार षडवर्गा ||५||
ऐसे एकांग वीर | विठठल रायाचे डिंगर |
बापरखुमा देवीवर | तीही निर्धार जोडीला ||६||
श्री संत ज्ञानेश्वर महाराज गाथा २२६
निवृत्ती संत हा सोपान | महावैष्णव कठीण |
मुक्ताबाई तेथे आपण | नारायण जपतसे ||५||
ज्ञानदेव वैष्णव मोठा | विठ्ठ्ल नामे मुक्तपेठा |
स्नान दान घडे श्रेष्ठा | वैकुंठा वाटा संत गेले ||६||
श्री संत ज्ञानेश्वर महाराज गाथा २२७
आषाढी पर्वणी आला यात्रा काल | निघाले सकळ वारकरी ||
या प्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळा काढून वाटेने भजन करीत पंढरीस निघाले .
जस माउलींनी तेव्हा तयारी केली तसीच अगदी आता सर्व संस्थान महाराज मंडळी सर्व भक्त जन तयारी करू लागले वैष्णवंची मांदी मिळवू लागलेत . पहा जरा आठवून तो प्रसंग डोळ्यापुढे केवळ आनंद आणि आनंदच
जास्तीत जास्त युवा वर्गापर्यंत देशा विदेशात वारकरी संप्रदाय अग्रगण्य असावा जसा कायमच राहत आला आहे या करीतच हा छोटा प्रयत्न .युवकानो जास्तीत जास्त संत साहित्य वाचा . विज्ञान युगातील शिक्षणाला अध्यात्माची जोड द्या आणि पहा आनंद काही निराळाच
आपण वेळ काढून इतक सर्व वाचल आपणास द्यावे तितके धन्यवाद कमीच .
इतरांपर्यंत हि माहिती पोहचवता आली तर नक्कीच प्रयत्नशील रहा हि विनंती !
तुमचा ,
अक्षय भोसले – ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !

पाऊले चालती पंढरीची वाट .... अक्षय भोसले

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
पाउले चालती पंढरीची वाट ..यंदा आपणहि चला , पहा काय आनंद असतो वारीचा तो !
असो

आपण जर पूर्व इतिहास पाहिला तर आपणास अस पाहिला मिळेल कि माउलींच्या आधी दोन थोर तथा महान व्यक्तींनी प्रतिज्ञा केली होती त्यात प्रथम नाव येत ते महान शिवभक्त रावणजी याचं व तद्नंतर पितामहा भीष्मजी रावणाची अशी प्रतिज्ञा होती कि संपूर्ण लंका सोन्याची करीन मात्र केवळ सात कोटी घरच सोन्याची झाली इतर नाही दुसरी प्रतिज्ञा अशी होती कि सोन्याला सुगंध आणीन मात्र आज तागायत सोन्याला सुंगंध नाही आपणच अस म्हणतो एखादा चांगल काम झाल तर सोने पे सुहागा ..मात्र मुळात सोन्याला आजतगायत सुगंध नाही . तसरी प्रतिज्ञा अशी कि लंके भोवतालचा समुद्र सागर गोड करीन मात्र आज पर्यंत तो खारटच आहे आणि चौथी प्रतिज्ञा  अशी कि स्वर्गात जाण्याकरिता शिडी बनविण पण ते हि नाही होऊ शकल  मात्र रावण महाशयांच्या चारीहि प्रतिज्ञा विफल ठरल्या . आणि आणि पितामहां भीष्म यांनी संपूर्ण पृथ्वी निश्पांडवी करीन अशी प्रतिज्ञा केली मात्र  हि प्रतिज्ञा  चुतरा तो शिरोमणी यांनी होऊ नाही दिल . मात्र माझ्या माऊलीयांनी अशी प्रतिज्ञा केली होती कि
अवघाची संसार सुखाचा करीन | आनंदे भरीन तिन्ही लोक ||१||
जाईन  गे माये तया  पंढरपुरा | भेटेन माहेरा आपुलिया ||२||
आणि ती  सार्थ हि केली
 अशी ज्ञानेश्वरांना पंढरपूरला जाण्याची तीव्र इच्छा झाली . पांडुरंगाची भेट होईल कि नाही , असे वाटयचे . पंढरीराव पाहुणे आमच्या घरी येतील काय ? किंवा आम्हाला तरी त्यांच्याकडे जावयास मिळेल काय ? कोण्या का रितेने होईना , देवाची भेट झाली पाहिजे , हाच ध्यास घेतला . ज्याला त्याला विचारायचे , आम्हास पांडुरंगाचे दर्शन घडेल काय ? एक वेळ तर एक कावला कांव कांव करत असता , तय्लाच विचारू लागले . बहुतेक असा कावला ओरडू लागला तर स्त्रिया म्हणतात , आज कुठला तरी पाहुणा येणार व ज्याचे नाव घेतले असता कावळा उडून जातो , तेव्हा समजावे कि तो पाह्गुना आज येणार आहे , त्याप्रमाणे ज्ञानोबा स्त्रीची भूमिका घेऊन एका मैत्रिणीला म्हणतात .सखे ! तो कावळा काही उडला नाही . तेव्हा माऊली नवस करू लागली . उड उड रे काऊ |  तुझे सोनेने मढिवन पाऊ || दहीभाताची उंडी | लावीन तुझे तोंडी || दुधे भरुनी वाटी | लावीन तुझे ओठी || असे चार पाच नवस केल्यावर कावळा उडाल्याबरोबर ज्ञानोबा म्हणतात , ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे | भेटती पंढरीराणे शकून सांगे || या प्रमाणे ज्ञानेश्वारांशी पांडुरंगाच्या भेटीचा ध्यास लागला व मी पंढरपूरला कधी जैन कधी जैन असे झाले व शेवटी पताका घेऊन पंढरीशी जायचेच असा त्यांनी निश्चय केला .
 माझ्या मनाची आवडी | पंढरपुरा नेईन गुढी ||
पांडुरंगी मन रंगले | गोविंदाचे गुणी वेधले ||
जस कि आपण आज हि पाहतो माउलींचा अश्व ....
माय माऊली माझी माऊली ....माऊली ...माऊली ...
तुमचा ,
अक्षय भोसले – ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !