Saturday 20 September 2014

आपल मत ! आपल भविष्य !


बोरीवली ते आळंदी या मार्गावर एस.टी.बस सेवा लवकरच होणार सुरु - अक्षय भोसले

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

आपणा सर्वाना कळविण्यास आनंद होत आहे कि लवकरच बोरीवली ते देहू - आळंदी एस टी बस सेवा सुरु होईल व त्या प्रयत्नात वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र तथा श्रीमंत माऊली , मुंबई यांच्या मार्फत याचा पाठपुरावा सुरु आहे , हि बस सेवा लवकर सुरु व्हावी या करिता जन सामन्य लोकांच अर्थता आपल्या सर्वांच मत अधिक महत्वाच आहे आपले असंख्य निवेदन जर महामंडळ कार्यालय पर्यंत पोहचले तर येणाऱ्या कार्तिकी एकादशी ला बस सेवेचा शुभारंभ होईल , आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेत , सदरहू पत्राचा नमुना दिला आहे आपल्या विभागातील वारकरी मंडळ , धार्मिक मंदिरे , सामज सेवी संस्था , समाजसेवक , राज्यकर्ते आदींचे निवेदन पत्र आपण आमच्या पर्यंत पोहचवा त्याचा पाठ पुरावा करण्याची जबाबदारी आमची निवेदन पत्राचा नुमुना खाली देत आहोत माहिती करिता
पत्र :-
प्रती ,
विभागीय व्यवस्थापक ,
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ,
मुंबई .
राम कृष्ण हरी !
विषय : बोरीवली ते आळंदी या मार्गावर एस.टी.बस सेवा सुरु करण्याबाबत .
महोदय ,
मुंबई पूर्व-पश्चिम उपनगर , ठाणे , नवी मुंबई या परीसरात वारकरी संप्रदायातील भाविकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे . हे भाविक आषाढी , कार्तिकी तसेच प्रत्येक महिन्याच्या एकादशीच्या निम्मिताने आळंदी-देहू येथे श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या तसेच संत श्री तुकाराम महाराज यांच्या दर्शनाकरिता वारी करतात .
मुंबई पूर्व- पश्चिम उपनगर , ठाणे , नवी मुंबई या भागातून महाराष्र् राज्य परिवहन महा मंडळाची देहू- आळंदी येथे जाण्यास थेट सुविधा नाही . त्यामुळे भाविकांना मुंबईहून पुणे अथवा स्वारगेट येथे जाऊन एस.टी.महामंडळाची किंवा पुणे महानगरपालिकेची दुसरी बस पकडावी लागते .
या निवेदनाद्वारे आपणास आम्ही विनंती करतो कि , आपण बोरीवली-पवई-भांडूप-ठाणे-नवी मुंबई(मार्गे कोपरखैरणे)-पनवेल-देहू-आळंदी ते परत बोरीवली या मार्गावर एस.टी.बस सेवा सुरु करावी. या सुविधेचा लाभ मुंबई परिसरातील सर्व वारकरी वर्गास होईल व ते आपले ऋणी राहतील .
धन्यवाद !
आपले स्नेहांकित

संपर्क :- अक्षय चंद्रकांत भोसले : ०८४५१८२२७७२ 
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य