Saturday 5 April 2014

नित्य भजन करणाऱ्या महात्म्यापेक्षा संसार व्यापार धंदा करून फावल्या वेळात नाम घेणारा खरा भक्त ठरतो - अक्षय भोसले

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

आपण सर्वच कीर्तनात प्रवचनात अनेक ठिकाणी दृष्टांत ऐकतो . अनेक दिवसांपासून साधरणता ६ वी ला असताना पु . गुरुवर्य प्रमोद महाराज जगताप यांच्या कीर्तनाने माझी श्रवण भक्ती सुरु झाली व संप्रदायाचा एक पाईक झालो . तेव्हापासून आता पर्यंत शेकडो कीर्तने श्रवण करण्याचा योग आला . नेहमी सर्वच कीर्तनकार आपल्या कीर्तनातून अनेक कथा गोष्टी सांगत असतात ते सांगण्यामागे त्यांचा दृष्टीकोन वेगळा असतो तो म्हणजे सध्या सोप्या गोष्टीमधून मुद्दा जनसमुदायाला पटवून देणे कथे मधून शेवटी सिद्धांत सांगणे . नेमक सार काय कथेच हे अनेक साहित्यिक कीर्तनकार नेहमी सांगतात व त्यामुळे आपल्या लक्षात तो मुद्दा कायमचा राहतो असेच काहीसे दृष्टांत मुली कृपेने जे श्रवण केले ते अपना पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय . प्रत्येक आठवड्याला दर रविवारी एक दृष्टांत .

* नित्य भजन करणाऱ्या महात्म्यापेक्षा संसार व्यापार धंदा करून फावल्या वेळात नाम घेणारा खरा भक्त ठरतो . 


कथा :-
एकदा नारद आपला विना व चिपळ्या वाजवीत भगवंताचे भजन करीत देवाजवळ गेले व विचारू लागले , 'देवा ! तुझा सर्वात मोठा भक्त कोण आहे ? ' कारण नारदाला असे वाटले . आपण रात्रंदिवस भगवंताचे भजन करतो तेव्हा भगवान आपणास सर्वात मोठा भक्त तूच आहेस असे म्हणतील . असे समजून नारदाने , देवाला प्रश्न केला . तेव्हा भगवंताने नारदाला सांगितले . नारद ! मृत्यूलोकामध्ये एक माझा मोठा भक्त आहे हे ऐकून नारदाला फार आश्चर्य वाटले व नारदाने देवाला म्हटले , '' तो भक्त मला पाहवयाचा आहे . '' तेव्हा तो कोठे राहतो ते संग . देवाने नारदाला त्या भक्ताचा पूर्ण पत्ता दिला . त्या प्रमाणे नारद वेश पालटून त्या ठिकाणी नारदाला एक साधा टेल - साबण आदि माल विकताना दिसला . नारद त्याचा सारा कार्यक्रम त्या ठिकाणी बसून पाहू लागला . दिवसभर त्या गृहस्थाने इमानदारीने व्यापार केला . सायंकाळी आपले दुकान बंद करून घरी गेला , परंतु नारदहि त्याच्यापाठीमागून निघाला . तो गृहस्थ घरी पोहचताच आपल्या आई वडिलांची त्यब्यतीची विचारपूस केली . नंतर लहान मुलास जवळ घेतले . त्याचे थोडे कोड कौतुक केले नंतर पत्नी मुलांसह भोजन करून झोपताना नित्याप्रमाणे भावपूर्वक भगवंताची प्रार्थना करून झोपला व सकाळी उठल्यानंतर स्नान संध्या करून नित्यप्रमाणे देवाची प्रार्थना करून दररोजच्या आपल्या उद्योगाला लागला .
नारदाने हे सर्व पाहून ते देवाजवळ गेले व म्हणाले . ''देवा ! तो गृहस्थ दिवसाला दोन वेळ तुझ नाव घेतो व सारा दिवस व्यापार धंदा करतो त्यापेक्षा मी आपले रात्रंदिवस भजन करत आहे , तेव्हा मी आपला मोठा भक्त आहे .''
तेव्हा भगवंताने नारदास एक दिवस एक दिवा तेलाने भरून दिला व सांगितले . नारदा ! हा दिवा घेऊन तिन्ही लोकातून तू फिरून ये . पण या दिव्यातील एक थेंब हि टेल सांडले नाही पाहिजे , त्यानंतर तुला मी खरा भक्त कोण ते सांगतो , नारद तो दो दिवा घेऊन तिन्ही लोकातून चक्कर मारून आले , परंतु चक्कर मारताना त्यंचे सर्व लक्ष त्या दिव्याकडे होते कारण दिव्यातील एक थेंब तेल सांडायला नको , त्यामुळे तिन्ही लोकात चक्कर मारून देवाजवळ येईपर्यंत एकदा सुद्धा देवाचे नाव नारदाला आठवले नाही .
नारद आलेले पाहून भगवंताने विचारल , ''नारदा तिन्ही लोकात चक्कर मारताना माझे नाव आपण किती वेळा घेतले ?''
तेव्हा नारद म्हणाले ,'' देवा एकदा हि नाही .'' तेव्हा भगवान म्हणाले , 'नारदा ! मी सांगितलेल्या एका कामात आपण माझे नाव एक वेळ सुद्धा घेतले नाही , तेव्हा तो साधा गृहस्थ , आपला सारा प्रपंच संभाळून . मुल बाळ यांचा बोजा घेऊन , व्यापार धंदा करतो व नेमाने दोन वेळा का होईना माझ नित्य भावपूर्वक नाव घेतो , तेव्हा तोच माझा खरा भक्त .' हे ऐकून नारद लज्जित झाले अभिमान गळीत होऊन , भगवंताला नमस्कार करून निघून गेले .
सिद्धांत :- नित्य भजन ध्यान करताना जरी दिसत आले तरी , तो खरा भक्त ठरत नाही . कारण भजन करून जर अभिमान असेल तर , खरा भक्त ठरत नाही . परंतु एखाद्या संसारी मनुष्य व्यापार - धंदा करतो व जमेल तसे ध्यानपूर्वक देवाचे नाव घेतो , तो खरा भक्त ठरतो .
हरि बोला हरि बोला नाहीं तरी अबोला । व्यर्थ गलबला करुं नका ॥
नको नको मान नको अभिमान । सोडी मी तूं पण तोचि सुखी ॥
धन्यवाद आवडल्यास नक्कीच इतरांपर्यंत पोहचवा .
आपला कृपाभिलाषी ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

श्रीराम नवमी उत्सव - अक्षय भोसले

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

राम नवमी राम जन्माचा संत नामदेव महाराजांचा अभंग :-
उत्तम हा चैत्रमास। ऋतु वसंताचा दिवस
शुक्लपक्ष ही नवमी। उभे सुरवर योगी
माध्यान्हाशी दिनकर। पळभर होय स्थिर
सुशेभित दाही दिशा। आनंद नर नारी शेषा
अयोनी संभव नोहे काही श्रमी |
नामयाचा स्वामी प्रगटला ||
अओना सर्वाना माहीतच असेल कि ,
झाले रामराज्य काय उणे आम्हासी | धरणी धरी पिक गायी ओळल्या म्हशी ||
स्वप्नीही दुख कोणी ण देखे डोळा | नामाच्या गजरे भय सुटले कळीकाळा ||
राम राज्यात कोणास दुख नव्हते . अर्थात सर्व सुखी होते . भूमी भरपूर पिक देत होती . वेळेवर पाऊस पडत होता . गायी म्हशी भरपूर दुध देत होत्या , सर्व ऋतू अनुकूल होते . तुलसीदासांच्या भाषेत रामराज्य म्हणजे -
दैहिक दैविक भौतिक तापा | रामराज नाही काहुही व्यापा |
सब नर करही परस्पर प्रीती | चलहि स्वधर्म निरत श्रुति नीती |
चारिऊ चरण धर्म जगमाही | पुरी रहा सपनेहु अघ नाही |
अर्थ असा कि - राम राज्यात आदि भौतिक अध्यात्मिक आदिदैविक हे तिन्ही ताप नव्हते . सर्व जन एकमेकांवर प्रेम करीत होते . सर्व जन स्वधर्माने , नीतीने वर्तत होते , जसे वेदात सांगितले . धर्मरूपी गाय चारही चरणावर उभी होती म्हणजेच १ % हि अधर्म नव्हता . स्वप्नातसुद्धा लोक पापाचा विचार करीत नव्हते . हे एक दोन दिवस नाही तब्बल ११ हजार वर्षे .
दशवर्षसहस्त्राणि दशवर्षशतानी च |
रामो राज्यमुपासित्वा ब्र्हमलोक प्रायाच्छती || रामायण
रामासारखा देव नाही - भगवान रामाचे चरित्र आदरणीय , आचरणीय व वंदनीय आहे .
रामासारखा राजा नाही - राजा रामाचे विशेषवत्व असे कि हे लोकाभिराम होते रामरक्षेत हा शब्द तीन वेळा आला आहे . आपण पाहू शकता राम रक्षा नक्कीच
जौ अनिती कुछु भाषौ भाई |
तै मोहि बरजहु भय बिसराई || तुलसीदासजी
रामासारखा पुत्र नाही - पित्याने सावत्र आईस पूर्वी कधी दिलेल्या दोन वराकरिता चौदा वर्षे वनवास , तोही आनंदाने स्वीकारला .
रघुकुल रिती सदा चली आई | प्राण जाई प्र बचन न जाई || तुलसीदास जी
रामसारखा पती नाही - जनकपुरीत सीतेची प्रथम भेट झाली . तेव्हा रामाने सीतेस हि भेट दिली , तेव्हा आजपासून फक्त तुला सोडून मला सर्व स्त्रिया मातेसमान .
अस भरपूर काही आमच्या श्री राम प्रभू साठी साग्ण्याकरिता ...
आपणास व आपल्या संप[उरण परिवारास वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
शुभेच्छुक :- अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर संस्कृती .