Thursday 6 November 2014

श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते मासिक " वैष्णव दर्शन " अंकाचे कौतुक !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू || || श्रीगुरू ||
दिनांक ०४ नोव्हेंबर २०१४ .
श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर- राजेसाहेब , फलटण यांच्या भेटी दरम्यानची एक आठवण ! आपल्या व्यस्त कार्यातून राजेसाहेब यांच्याशी तब्बल एक ते पाऊनतास संवाद घडला त्या दरम्यान एका प्रजाहितदक्ष व्यक्तिमत्वाचे जवळून कार्य पाहण्याची संधी मिळाली , भेटी दरम्यान फलटण संस्थान आणि वारकरी संप्रदाय यांचे ऋणानुबंध माऊलींचे पिताश्री विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी जी भारत परिक्रमा केली त्या दरम्यान त्यांनी फलटण येथील श्री राम मंदिर येथे वास्तव्य केले होते त्या संदर्भातील ओवी काव्य असे अनेक दस्तावेज आज हि राजदरबारी उपलब्ध आहेत अशा अनेक आठवणींना राजेसाहेबांनी उजाळा दिला . 

मासिक " वैष्णव दर्शन " याला हि आमच्या खूप खूप शुभेच्छा ! आपल्याकरिता आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत असे हि अत्यंत आपुलकीने त्यांनी सांगितले .
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

श्रीक्षेत्र पंढरपुर येथे श्रीमंत श्रीगुरू ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकरजी यांच्या शुभहस्ते मासिक " वैष्णव दर्शन " याचे प्रकाशन सोहळा ..!

|| ज्ञानेशो भगवान विष्णू || || श्रीगुरू ||
आपणास कळविण्यास आत्यानंद होत आहे की , कार्तिक महावारीच्या पर्वकाळी दि. ०३ नोव्हेंबर २०१४ रोजी श्रीमंत श्रीगुरू ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकरजी यांच्या शुभहस्ते मासिक " वैष्णव दर्शन " याचे प्रकाशन झाले तो एक आमचा परमभाग्याचा सुवर्ण क्षण 
श्रीगुरुंच्या चरणी दंडवत ! कायमच आपल मार्गदर्शन तथा आशीर्वाद आम्हास मिळत राहो हि आपल्या चरणी नम्र प्रार्थना ! 
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ 
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

Monday 27 October 2014

ह.भ.प अक्षय महाराज भोसले यांच नवी मुंबई येथील कीर्तन !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू || || गुरुकृपा ||
गुरुवर्यांना चरणस्पर्श तथा आपणा सर्वांस प्रणाम ,
दिनांक २६ ऑक्टो २०१४ दिवस हा आयुष्यात कायम अविस्मरणीय राहील असा होता , मुळात त्यादिवसी वाढदिवस आणि त्याहून अधिक म्हत्वाच शिवसाई अखंड हरीनाम सप्ताहातील प्रथम दिनी कीर्तन सेवा , प्रस्तुत कीर्तनास ह.भ.प. प.पु कीर्तनरत्न नामदेव अप्पा शामगावकर ( Guru Namdev Appa ( Maharaj ) Shamgaonkar  ( हे हि आवर्जून उपस्थित होते , अनेक इंजिनियर , डॉक्टर , पोलीस अधिकारी हे उपस्थित होते मुळात माझे सर्व महाविद्यालीयीन मित्र परिवार ( तरणा भाग्यवंत नटे हरीकीर्तनात हे आज या मुलांनी सार्थक केल ) ,
प्राणिया रे एक बीज मंत्र उच्चारी | प्रतिदिनी राम कृष्ण म्हण का रे मुरारी ||
हेची साधन रे तुज सर्व सिद्धीचे | नाम उच्चारी रे गोपालाचे वाचे ||
उपास पारणे नलगे वनसेवन | नलगे धुम्रपान नळे पंचाग्नी साधने ||
सुखाचे फुखाचे काही न वेचे भांडार | कोटी यज्ञपरीस तुका म्हणे हेची सार ||
तुकराम महाराज गाथा 
 (Tukaram Maharaj Gatha ) अभंग ३९५१ (देवडीकर पद्धत )
या वरील अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रामणिक प्रयत्न केला , वंदनीय अप्पा यांनी तब्बल दोन तास बसून कीर्तनाचा आनंद घेतला व जाता जाता पाठीवर आशीर्वादाची कौतुकाची थाप टाकली उपस्थित श्रोते वर्गाने भरभरून शुभेच्छा आशीर्वाद दिले खऱ्या अर्थाने वाढदिवस सफल झाला , अस वाटल ,
तद्सोबतच माझ्यावर प्रेम करणारे आपण सर्व आपण दिलेल्या शुभेच्छा आशीर्वाद यांमुळे नक्कीच आपण करत असलेल्या कार्यातील उत्साह वाढतो आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे , असाच आपला स्नेह वाढत राहो हीच सदिच्छा !
तुमचा ,
अक्षय भोसले ( Akshay Maharaj Bhosale ) - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र ( Varkari Sanprday Yuva Mnch , Maharashtra )


Wednesday 22 October 2014

मासिक " वैष्णव दर्शन " ०३ नोव्हेंबर २०१४ पासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध - संपादक


|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास मासिक वैष्णव दर्शन तथा वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! 
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ 

Saturday 27 September 2014

नवरात्र उत्सवानिम्मित पवई येथील अक्षय महाराज भोसले यांचे संकीर्तन !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
वारकरी संप्रदाय युवा मंच तर्फे , पवई , मुंबई येथील नवरात्र उत्सव निम्मित कीर्तनसेवा 

Thursday 25 September 2014

नवरात्र उत्सव निम्मित पवई येथे एक दिवसीय कीर्तन सोहळा !


श्री तुळजाभवानी , तुळजापूर - आईच आगमन


अनादी निर्गुण प्रगटली भवानी |
मोह महिषासूर मर्दना लागुनी | 
विविध तापाची करावया झाडणी | 
भक्ता लागी तू पावसी निर्वाणी | 
आईचा जोगवा मागीन | 
श्री देवी माता - श्री तुळजाभवानी , तुळजापूर
आपणा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक तथा मंगलमय शुभेच्छा !
must visit & subscribe :-www.fb.com/vaishnavdarshn ( मासिक - " वैष्णव दर्शन ")
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र !

Sunday 21 September 2014

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

आज पूजनीय कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांची जयंती ! 
अण्णा यांचा व्यक्तीक आयुष्यात फार मोठा त्याग होता , आपले सद्विचार आणि आपल कार्य चंद्र सूर्य असे पर्यंत कायम राहील , " स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ! "
खेड्यातील मुले शिक्षणा पासून वंचित होती आपल्या मुळे ती ज्ञानगंगेच्या प्रवाहात आली , 
आपल्या शालेय अर्थात रयत शिक्षण संस्थेतून आदरणीय प्राचार्य . शिवाजीराव भोसले यांच्या सारखे कित्येक रत्न जन्माला आले , संपूर्ण महाराष्ट्र तथा भारत देश आपल्या ऋणात कायम आहे , माझ सदभाग्य कि मी अण्णा च्या वटवृक्षातील एका विद्यालयात शिकलो . ज्ञानयोगी कर्मयोगी कर्मवीर भाऊराव पाटील यांना शतश वंदन ! 
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ 
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र 

Saturday 20 September 2014

आपल मत ! आपल भविष्य !


बोरीवली ते आळंदी या मार्गावर एस.टी.बस सेवा लवकरच होणार सुरु - अक्षय भोसले

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

आपणा सर्वाना कळविण्यास आनंद होत आहे कि लवकरच बोरीवली ते देहू - आळंदी एस टी बस सेवा सुरु होईल व त्या प्रयत्नात वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र तथा श्रीमंत माऊली , मुंबई यांच्या मार्फत याचा पाठपुरावा सुरु आहे , हि बस सेवा लवकर सुरु व्हावी या करिता जन सामन्य लोकांच अर्थता आपल्या सर्वांच मत अधिक महत्वाच आहे आपले असंख्य निवेदन जर महामंडळ कार्यालय पर्यंत पोहचले तर येणाऱ्या कार्तिकी एकादशी ला बस सेवेचा शुभारंभ होईल , आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेत , सदरहू पत्राचा नमुना दिला आहे आपल्या विभागातील वारकरी मंडळ , धार्मिक मंदिरे , सामज सेवी संस्था , समाजसेवक , राज्यकर्ते आदींचे निवेदन पत्र आपण आमच्या पर्यंत पोहचवा त्याचा पाठ पुरावा करण्याची जबाबदारी आमची निवेदन पत्राचा नुमुना खाली देत आहोत माहिती करिता
पत्र :-
प्रती ,
विभागीय व्यवस्थापक ,
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ,
मुंबई .
राम कृष्ण हरी !
विषय : बोरीवली ते आळंदी या मार्गावर एस.टी.बस सेवा सुरु करण्याबाबत .
महोदय ,
मुंबई पूर्व-पश्चिम उपनगर , ठाणे , नवी मुंबई या परीसरात वारकरी संप्रदायातील भाविकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे . हे भाविक आषाढी , कार्तिकी तसेच प्रत्येक महिन्याच्या एकादशीच्या निम्मिताने आळंदी-देहू येथे श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या तसेच संत श्री तुकाराम महाराज यांच्या दर्शनाकरिता वारी करतात .
मुंबई पूर्व- पश्चिम उपनगर , ठाणे , नवी मुंबई या भागातून महाराष्र् राज्य परिवहन महा मंडळाची देहू- आळंदी येथे जाण्यास थेट सुविधा नाही . त्यामुळे भाविकांना मुंबईहून पुणे अथवा स्वारगेट येथे जाऊन एस.टी.महामंडळाची किंवा पुणे महानगरपालिकेची दुसरी बस पकडावी लागते .
या निवेदनाद्वारे आपणास आम्ही विनंती करतो कि , आपण बोरीवली-पवई-भांडूप-ठाणे-नवी मुंबई(मार्गे कोपरखैरणे)-पनवेल-देहू-आळंदी ते परत बोरीवली या मार्गावर एस.टी.बस सेवा सुरु करावी. या सुविधेचा लाभ मुंबई परिसरातील सर्व वारकरी वर्गास होईल व ते आपले ऋणी राहतील .
धन्यवाद !
आपले स्नेहांकित

संपर्क :- अक्षय चंद्रकांत भोसले : ०८४५१८२२७७२ 
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य

Monday 15 September 2014

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सप्तशतकोत्तर रौप्य मोह्त्स्व कार्यक्रम प्रसंगी ..

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सेवा प्रतिष्ठान , भाद्रपद व ६ कपिलाषष्ठी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त डोंबिवली येथे आयोजिलेल्या ग्रंथ दिंडी कार्यक्रमात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे महत्त्व तथा युवा पिढी कश्याप्रकारे संप्रदायात संतसाहित्यात कार्यशील होऊ शकेल या बाबत माऊलीभक्त साधकवर्ग यांच्याशी संवाद साधताना , समवेत परम श्रद्धेय श्री अरविंदनाथजी गुरुजी रनाळकर यांची संतसंगत प्राप्त झाली श्री संत निळोबाराय महाराज म्हणतात जस कि , साधु संत। महाभाग्याचे हे भाग्य , प्रस्तुत प्रसंगी आदरणीय परमार्थिकस्नेही ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर , परम आदरणीय ह.भ.प. क्षीरसागर महाराज , पाक्षिक " स्वर्णिमा " याच्या संपादिका आदरणीय अपर्णाताई परांजपे तथा आदी मान्यवर उपस्थित होते . ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सेवा प्रतिष्ठान आपणास खूप खूप धन्यवाद आदरणीय गुरुजींचे अमुल्य मार्गदर्शन आणि सतसंगत आपल्यामुळे प्राप्त झाली . ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सेवा प्रतिष्ठान च्या भविष्यातील वाटचालीस माऊली यश देवो व आपल कार्य उतरोत्तर वाढत जावो हि माऊली चरणी प्रार्थना !

Sunday 31 August 2014

वारकरी संप्रदायभूषण गुरुवर्य ह.भ.प. महंत प्रमोदजी महाराज जगताप यांना वाढदिवसानिम्मित अभिष्टचिंतन !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

" आता हृदय हे आपुले।चौफाळूनिया भले।।
वरी बैसवू पाउले । श्रीगुरुंची।।" - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी 


आता या हृदयाचा चौरंग करुन त्यावर श्रीगुरुंच्या पाउलांचे अधिष्ठान करु ज्याप्रमाणे माऊली यांनी निवृत्तीनाथांच्या विषयी म्हटल अगदी तीच भावना सतत मनात असते गुरुदेवांच्या बाबतीत  माझ्या श्रीगुरूंचा आज जन्मोत्सव काय लिहाव आणि किती लिहाव हेच कळत नाही आज अगदी कंठी प्रेम दाटे । नयनी निर लोटे । हीच अवस्था झाली अगदी अक्षय भोसले जे काही आहे ते केवळ माझ्या गुरुरायांच्या कृपाअशीर्वादाने !
इयत्ता सहावीत असताना गुरुवर्यांच पहिल कीर्तन श्रवण केल घणसोली येथे लहान वय मात्र गुरुवर्य ह.भ.प. महंत प्रमोदजी महाराज यांचा कीर्तन एकल त्यांची दिव्य वाणी मुखकमलावरील सुहास्य , दिव्य विचार आदींचा बालमनावर परिणाम झाला आणि त्यांनी वारकरी संप्रदायाच बीज माझ्या मनात रुजवल . आदरणीय श्रीगुरू अर्थता अण्णा यांना द्यावे तितके धन्यवाद कमी त्यांच्या मुळेच आज मी एका मोठ्या परंपरेचा वारसदार ठरलो ती परंपरा अर्थता " पूजनीय. देगलुरकर परंपरा " त्यांनी सांगितलेली पंचसूत्री हि आयुष्याची वाटचाल करण्याकरिता गाईडलाईन आहे , आता पर्यंत अनकेदा गुरूगृही राहण्याचा योग आला आणि त्याचं माझ्यावर असलेल पुत्रवत प्रेम नक्कीच मी जन्मो जन्मी बहु पुण्य केल असावं तेव्हा मला श्रीगुरू लाभले , आज या उच्च प्रतिभावंत माझ्याकरिता माझ सर्वस्व असणाऱ्या गुरुरायांच्या चरणी लक्ष लक्ष दंडवत !
श्रीगुरू , ज्ञानाई- ज्ञानदा , आई बाबा हेच माझ जीवन माझे आदर्श यांच्यामुळेच आज जी काही संप्रदायाची सेवा होते .
अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला माझ्या गुरुदेवांना दंडवत तथा वाढदिवसानिम्मित अभिष्टचिंतन !
आदरणीय गुरुदेवांच्या चरणी इतकीच प्रार्थना कि ,
तुमचिये दासीचा दास करुनी ठेवा | आशीर्वाद द्यावा हाची मज ||

तुमचा ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

Friday 29 August 2014

श्री गणेश अभंग !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

चिंतामणी देवा गणपतीसी आणा। करावे भोजन दुजे पात्री ॥१॥
देव म्हणे तुकया येवढी कैसी थोरी। आभिमान भितरी नागवणे॥२॥
वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न। तटस्थ ब्राह्मण बैसले की॥३॥
तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते। आणिन त्वरित मोरयासी॥४॥
- संत तुकाराम महाराज 

Sunday 24 August 2014

आदिनाथ गुरु सकळ सिध्‍दांचा - श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


श्री निवृत्‍तीनाथ महाराज आपली नाथपरंपरा आदिनाथापासून म्‍हणजेच भगवान शंकरापासून असल्‍याचे सांगतात. "आदिनाथ उमा बीज प्रगटले । मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती ॥ तेची प्रेममुद्रा गोरखा दिधली । पूर्ण कृपा केली गहिणीनाथ ॥" या अभंगातून तर श्री ज्ञानराज माऊली -"आदिनाथ गुरु सकळ सिध्‍दांचा ।" या अभंगातून सांगतात. त्याच शिवशंकरा चरणी नमन ! 
अक्षय भोसले - ०८४५१८२२७७२ 
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र !

गोसेवा हीच ईश्वरसेवा ! - संत तुकाराम महाराज


|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

गोसेवा हीच ईश्वरसेवा ! 
भूतदया गाई पशुंचे पालन | तान्हेल्या जीवन वनामाजी ||
स्वत : जगतगुरू तुकाराम महाराज आपणा सर्वाना उपदेश करतात कि आपण प्राणी मात्रांवर दया केली पाहिजे प्रेम केल पाहिजे आणि हेच सांगताना ते गाई अस नमूद करतात , ज्या गाईच्या दुधामुळे आपण सर्व आज सशक्त आहोत मात्र आज तीच आपली आई धोक्यात आहे ! निर्धार करा कि आपल्या विभागातील गाईंची स्वत : काळजी घ्याल . गो मातेचे संरक्षण झालेच पाहिजे . गेले काही दिवस पवई येथून दिवसेंदिवस गाईंच प्रमाण होत आहे काही अज्ञात इसम रात्री टोळी नि येऊन गायांची चोरी करतातपकडतात , भले मोठे असे इंजेक्शन दिले जाते काही क्षणात त्या बेशुद्ध पडतात , विभागातील काही युवा मुलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व सशत्र तथा हत्यारबंद असतात आपला नाईलाज होत आणि प्रशासन हि याकडे अजिबात लक्ष देत नाही आता अआप्नच उपाय सुचवा ? नेमक गो भक्तांना गो रक्षकांनी काय करावे . वारंवार पोलीस यंत्रणा अदिना सांगून हि कोण काहीच करत नाही .अजून किती दिवस हे असच चालणार ? 
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ 


|| श्री गणेश नमन || - श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| श्री गणेश नमन || 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे शुभाशीर्वाद तथा शुभेच्छा वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र यांस !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


आदरणीय ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्याशी संवाद साधताना ह.भ.प.अक्षय महाराज भोसले ! 
विषय :- आजची युवा पिढी आणि आपल संत साहित्य 
अण्णा यांनी अस प्रतिपादन केल कि आजच्या सरकारने 'नगरेची रचावी जलाशये निर्मावी। महावने लावावी नानाविध॥'' ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला पाहिजे तेव्हा पाणी टंचाई थांबेल मोठ्या प्रमानात युवा वर्गाने सक्रीय राहील पाहिजे तेव्हा आपला देश विकासाकडे जाईल , आण्णा यांनी आपले आशीर्वाद तथा शुभेच्छा वारकरी संप्रदाय युवा मंच च्या कार्यास दिल्या . 

Thursday 14 August 2014

६८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||.


जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती ! 
त्वामहं यशोयुतां वंदे !

६८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

आजची तरुणाई जर संत साहित्याच आचरण मनन चिंतन करेल तर लवकरच युवा पिढीत परिवर्तन घडून येईल ! देश उन्नत आहेच आपला मात्र अजून सर्वोच्च शिखरावर असेल विश्वात सर्व बाबतीतच कायम 

आपला ,

अक्षय भोसले - ०८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य

Friday 1 August 2014

सेवासुर्य श्री ह.भ.प. सुभाष महाराज घाडगे यांस वाढदिवसानिम्मित अभिष्टचिंतन !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


" सेवासुर्य " अगदी सूर्याप्रमाणे तेजोमय कार्य करणारे तथा युवकप्रेरणास्थान श्री ह.भ.प.गुरुवर्य सुभाष महाराज घाडगे यांस वाढदिवसानिम्मित अभिष्टचिंतन ! आपणास दीर्घायुष्य तथा आरोग्य संपन्नता लाभो हि माऊलीचरणी प्रार्थना !

समस्त वारकरी संप्रदाय तथा वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र !
 

माळीन गावातील दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या सर्व व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली !

देवा तुझ आणि माझ नेमक वैर काय आहे रे का आमच्यावर इतका रागवलायस तू का इतक दुख आमच्या वाट्याला पाठवतोयस .. 


तुझा माझा देवा कां रे वैराकार । दुःखाचे डोंगर दाखविशी ॥१॥ 
बळें बांधोनियां देसी काळा हातीं । ऐसें काय चित्तीं आलें तुझ्या ॥२॥
आम्हीं देवा तुझी केली होती आशा । बरवें ह्रषिकेशा कळों आलें ॥३॥
नामा म्हणे देवा करा माझी कींव । नाहीं तरी जीव घ्यावा माझा ॥४॥

माळीन गावातील दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या सर्व व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली !
त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त हो हि माऊलि चरणी प्रार्थना !
शोकाकुल :- वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

Monday 28 July 2014

भगवान विष्णू आणि भगवान शिवजी यांची एकरुपता दर्शवणारा आणि शिव नामाच महत्त्व सांगणारा अभंग

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


भगवान विष्णू आणि भगवान शिवजी यांची एकरुपता दर्शवणारा आणि शिव नामाच महत्त्व सांगणारा अभंग :- 

शिव ऐसा शब्द कल्याणदायक । जाणती भाविक साधुजन ॥१॥
तारक हें नाम भोळ्याभाविकांसी । नेणते जाणत्यांसी लाभ एक ॥२॥
उपमन्यु बाळक दूध मागों गेला । क्षीरांब्धि दिधला उचितासी ॥३॥
दुष्टदुराचारी पतित तारिले । नाही आव्हेरिलें दीनानाथें ॥४॥
नामा म्हणे शिव विष्णु एकरूप । ताराया अमूप अवतार ॥५॥
- श्री संत नामदेव महाराज

Sunday 27 July 2014

श्रावण महिना प्रारंभ :)

|| ज्ञानेशो भगवान विष्णू || 

श्रावण महिना प्रारंभ  


शिव भोळा चक्रवर्ती।
त्याचे पाय माझे चित्ती॥
वाचे वदता शिवनाम।
तया न बाधी क्रोधकाम॥
धर्म अर्थ काम मोक्ष।
शिवा देखता प्रत्यक्ष।
एका जनार्दनी शिव।
निवारी कळिकाळाचा भेव॥
- संत एकनाथ महाराज

Monday 21 July 2014

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील पदार्थविज्ञान विषयक संदर्भ - शास्त्रज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील पदार्थविज्ञान विषयक संदर्भ ! 
गीतेच्या या प्राकृत टीकेचे सार्थक होण्यासाठी ' लक्ष देऊन ऐकावे ' अशी श्रोत्यांनी विनंती करताना श्री ज्ञानराज म्हणतात ,
तिये अवधान द्यावे गोठी | बोलिजेल नीट मऱ्हाटी |
जैसी कानाचे आधी दृष्टी | उपेगा जाये ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ७-२०६
श्रोत्यांनी अवधानपूर्वक ऐकले तर ज्याप्रमाणे कानाच्या आधी दृष्टी उपयोगी पडते ( ऐकायला येण्यापूर्वी दिसते ) , तसे माझ्या या मराठी बोलण्याचे होईल . प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त असतो त्यामुळे आपल्याला दूरची गोष्ट आधी दिसते मग ऐकायला येते हे वैज्ञानिक सत्य उपमा म्हणून वापरले आहे .
संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य समझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र 

Friday 18 July 2014

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील धातुशास्त्र विषयक संदर्भ - शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील धातुशास्त्र विषयक संदर्भ ! 
चित्त शुद्ध करण्याकरिता सत्कर्म आवश्यक असतात हे सांगण्यासाठी उपमा देतात ,

भांगार आथी शोधावे | तरी आगी जेवी नुबगावे |
का आरिसयालागी साचावे | अधिक रज ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८-१४०

सोने ( धातु -Metal )शुद्ध करायचे असेल तर अग्नीचा कंटाळा करून चालणार नाही . अर्थात धातु हे अग्नीच्या सहाय्यानेच शुद्ध होतात .
संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य समझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील वनस्पतीशास्त्र विषयक संदर्भ - शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||



     श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीत आलेले वनस्पतीशास्त्र विषयक संदर्भ ! 
परमेश्वरच्या संकल्परुपी बिजामधून हि सृष्टी निर्माण झाली आणि पुन्हा ती त्या संकल्पाताच सामावणार आहे . ( सृष्टी उत्पत्ती आणि लय ) हे सांगताना म्हटले आहे , 
बीज शाखाते प्रसवे | मग ते रुखपण बीजी सामावे |
तैसे संकल्पे होय आघवे | पाठी संकल्पी मिळे || 
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ९-२९२ 
ज्याप्रमाणे बी मधून खोड , मुळे , फांद्या इत्यादी सर्व झाड जन्माला येते आणि पुढे ते झाड लहानशा बी मधे सामावून जाते त्याप्रमाणे ...
( असाच विषय ' बीज मोडे झाड होये | झाड मोडे बीजी समाये | ' ..-- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १७-५९ येथे हि आहे )
भाजलेले बी उगवत नाही ' बीजे सर्वथा आहाळली | .... तरी न विरुढती सिंचली |...
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी २-६६
पुढे पंधराव्या आध्यायात ' उर्ध्वमूलमध : शाखम ' यावर भाष्य करताना वनस्पतीशास्त्रातील बीजभाव , बीजांकुरभाव वृद्धी , फलभाव , पानझड इत्यादी अवस्थांचे सविस्तर वर्णन केले आहे .
संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य समझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

मुंबई अग्निशामक दलाचे " शहीद नितीन इवलेकर " यांना मानाचा सलाम - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

   मुंबई अग्निशामक दलाचे " शहीद नितीन इवलेकर " यांना मानाचा सलाम !                



                आज दुर्दैवी घटना घडली मुंबईत अंधेरीतील लोटस बिझनेस पार्कमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी इमारतीत गेलेला अग्निशामक दलाचा एक जवान नितीन इवलेकर शहीद झाला. या घटनेत २१ जवान जखमी आहेत , नितीन मित्रा तुझे हे धाडस आम्ही सदैव लक्षात ठेवू आमच्या साऱ्या मुंबईकरांच्या तू सदैव स्मरणात राहशील . शूरा मी वंदितो ! ;'( समस्त वारकरी संप्रदाय तथा मुंबईकर यांच्या वतीने तुला भावपूर्ण आदरांजली ! 
                         युवकांनो पहा आजचा या युवाने धाडस केल शेवटी जिंकला मात्र स्वत: ला मात्र हरवून बसला .गड आला पण सिह गेला अगदी असच काहीस घडल आमच्या नितीन इवलेकर यांच्या समवेत ! आपण हि हाच आदर्श घ्यावा कि आपल्या कार्याकरिता जीवाची बाजी लावायला पण आपण तत्पर असल पाहिजे हाती घेतलेले काम पूर्ण केलच पाहिजे .
तुझ्या या शुर बाळाला प्रणाम ! हे भारत माता तुझ्या खुशीत तुझ्या या मुलाला सामवून घे .

शूरा मी वंदितो ! नितीन इवलेकर अमर रहे ! शूरा मी वंदितो ! शूरा मी वंदितो !

शोकाकुल
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र परिवार

श्री ज्ञानेश्वरीतील आरोग्य / शरीरशास्त्र विषयक संदर्भ - शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरीत आलेल आरोग्य / शरीरशास्त्र विषयक संदर्भ आपल्यापुढे मांडण्याचा आमचा छोटा प्रयत्न ! 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आदर्श औषध कोणते याचा उल्लेख केलेला आहे .
जैसे रसौषध खरे | आपुले काज करूनि पुरे |
आपणही नुरे | तैसे होतसे ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८-१०७९
ज्या प्रमाणे खरे औषध आपले रोग्निवारणाचे अपेक्षित कार्य पूर्ण करून स्वत : ही संपून जाते , त्याचा कोणताही अन्य परिणाम ( side effect ) होत नाही . ( त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्तीनंतर साधनाची आवशक्यता संपते )
जीव भावासाठी पंचमहाभूतांचे केवळ पंचीकरण होऊन पुरत नाही तर पचीकरण होऊन पुरत नाही तर पंचीकरणा बरोबर ज्यावेळेस अहंकाराची उपलब्धी होते , त्यावेळेस पंचमहाभूते जीवभावास प्राप्त होतात . हे सांगताना म्हटले आहे ,
जैसा ज्वरु धातुगतु | अपथ्याचे मिष पहातु |
मग जालिया आतु | बाहेरी व्यापी ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १३-८०
जंतुसंसर्ग झाल्यावर लगेचच काही रोग होत नाही तर काही अपथ्य झाल्याच्या निमित्ताने शरीराची प्रतिकारक्षमता कमी झाल्यावर रोग होतो .
आपण स्वीकारलेल्या अन्नाप्रमाणे शरीर आणि मन- बुद्धी बनत जाते . यासाठी अन्नशुद्धीही महत्त्वाची असते .
तेवी जैसा घेप आहारु | धातु तैसाचि होय आकारू |
आणि धातु ऐसा अंतरु | भावो पोखे ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १७-११६
सेवन केलेल्या अन्नाच्या गुणांप्रमाणे शरीराला बल प्राप्त होते आणि अंत : करणही त्यानुसार बनत जाते ..
                 संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य समझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
                  आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

ज्ञानेश्वरीतील भौगोलिक संदर्भ - शास्त्रज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||.

भौगोलिक संदर्भ 


अठराव्या आध्यायात , माणसाच्या शरीरात निरनिराळ्या प्रकारची कार्ये करणाऱ्या वायुत्त्वाच्या स्वरूपाविषयी म्हटले आहे , 

आणि पूर्वपश्चिमवाहणी | निघलिया वोघाचिया मिळणी |
होय नदी नद पाणी | एकचि जेवी ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८-१३१

ज्याप्रमाणे पूर्वेला वाहणारी नदी असो किंवा पश्चिमेला वाहणारी नदी असो , लहान नदी असो वा मोठा नद असो त्याचे पाणी एकाच समुद्राला जाऊन मिळते ,
(त्याप्रमाणे निरनिराळ्या इंद्रियांच्या द्वारे एकच प्राणशक्ती कार्यरत असते. )
आपल्या देशातल्या चार प्रमुख महानद्यांच विचार केला तर त्यापैकी गंगा , गोदावरी आणि कावेरी या पूर्व समुद्राला , गंगासागराला ज्याला बंगालचा उपसागर असे म्हटले जाते त्याला आणि नर्मदा हि पश्चिम समुद्राला सिंधू सागराला ज्याला अरबी समुद्र म्हटले जाते त्याला मिळतात .
भारता भोवती असलेले हे तीनही समुद्र वास्तविक एकच आहेत . पृथ्वीसाठी ' भूगोल ' हा शब्द अनेक ठिकाणी वापरलेला आहे .
उदा .
' .....भूगोलु हा || '
-- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १०-७०
किंवा

' तरि भूगोलुचि काखे सुवावा ..'
-- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १०-२६०

निगिजे पुर्विलिया मोहरा | की येईजे पश्चिमेचिया घरा |
निश्चळपणे धनुर्धरा | चालणे एथिंचे ||
-- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ६-१५९
संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य समझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र 

Thursday 17 July 2014

श्री ज्ञानेश्वरीतील लोहचुंबकिय संदर्भ - शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


 श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील लोहचुंबक संदर्भ आपल्या पुढे मांडण्याचा आमचा हा प्रयत्न्न !


लोहचुंबका विषयी श्री ज्ञानेश्वरीत काही उपमा आलेल्या आहेत , परमेश्वर प्रकृतीचा ( मुळमाया ) अंगीकार केला कि सृष्टीचा उत्पत्ती होते , परंतु याचा परमेश्वराला काहीही शीण होत नाही , हे सांगताना उपमा देतात ,
                    जड परि जवळिका । लोह चळे तरि चळो कां ।
                     कवणु शीणु भ्रामका । सन्निधानाचा ॥
                                         - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ९-११६
लोखंड जड असूनही लोह्चुबंकच्या जवळ खेचले जाते , त्याच्या या खेचले जाण्याचा लोहचुंबकाला कोणता त्रास होतो ? अर्थात कोणताही त्रास होत नाही . त्याप्रमाणे परमेश्वराला या सृष्टीचा , व्यवहाराचा काही शीण नाही .
      तेराव्या अध्यायात क्षेत्र क्षेत्रज्ञानाविषयी सांगताना दृष्टांत देतात ,
                             संसर्गे चेष्टिजे  लोहे | परि लोह भ्रामक नोहे |
                            क्षेत्र क्षेत्रज्ञा आहे | तेतुला पाडू ||
                            - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १३-११२२
ज्याप्रमाणे लोहचुंबकाच्या सानिध्यात लोखंडहि चुंबकासारखे होते . परंतु लोखंड काही चुंबक नसते , त्याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्याविषयी समजावे .
                  अठराव्या अध्यायात हि ईश्वरी सत्तेने भूत मात्रांचे व्यवहार होतात हे सांगतानाही लोहचुंबकाचि उपमा दिली आहे ,
                        भ्रामकाचेनि संगें । जैसें लोहो वेढा रिगे ।
                          तैसीं ईश्वरसत्तायोगें । चेष्टती भूतें ॥
                                                   - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८-१३११
 जसे लोखंड लोहचुंबकाच्या सामर्थ्यामुळे हालते , फिरते , तसे ईश्वराच्या सत्तेने जड असलेल्या भूतमात्रांच्या हालचाली होतात .
                            संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य सामझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
                           आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मच , महाराष्ट्र
                                 -

१२ व्या शतकात सांगितले खगोलशास्त्र - शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

 
      अकराव्या अध्यायाच्या आरंभी या अध्यायामधे शांत आणि अद्भुत रस एकत्र आले आहेत हे सांगताना म्हटले आहे ,
                          नातरी अवसेचा दिवशी | भेटली बिंबे दोनी जैशी |
                          तेवी एकवळा रसी | केला एथ || - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ११-०५
 अमावस्येच्या दिवशी चंद्र आणि सूर्य पृथ्वीच्या एकीकडेच असतात , जणू काय ते एकमेकांना भेटतात .( त्याप्रमाणे  शांत आणि अद्भुत हे दोन्ही रस या अध्यायात एकमेकांना भेटले आहेत )
                   वद्य पक्षात कमी कमी होत अमावस्येला रात्री चंद्र संपलेला नसतो तर त्या दिवशी तो सूर्याबरोबरच उगवतो , मावळतो , त्यामुळे अमावस्येला रात्री आकाशात चंद्र दिसत नाही , हे वैज्ञानिक सत्य सांगितले आहे .
                    चंद्राच्या दिसणाऱ्या कला या दृश्यभास असतात म या कला चंद्र , सूर्य आणि पृथ्वी यांच्या परिभ्रमणामुळे बदलणाऱ्या जागांच्या परस्पर सापेक्षतेच्या परिणामाने दिसतात , चंद्र आणि त्यांच्या या कलांचा हा संकेत भगवंताचे समत्व सांगताना उदाहरण म्हणून सांगितला आहे .
                  हा गा पूर्णिमेआधी कायी | चंद्र सावयवुचि नाही |
                        परी तिये दिवशी भेटे पाही | पूर्णता तया ||          
                                                          - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८ - ११२७
पुर्निमेआधी चंद्राचे पूर्णबिंब दिसत नसले तरी चंद्रबिंब पूर्ण नसते काय ? अर्थात असतेच . पण पुर्निमेच्या दिवशी त्याचे  पूर्णबिंब दिसते
                संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य सामझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
                          आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मच , महाराष्ट्र
             

आकाशाचा रंग निळा हा केवळ भास :- शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


पृथ्वीवरून आपल्याला आकाश निळे दिसते परंतु वास्तविक आकाश काही निळे नसते . पृथ्वीवरून दिसणारा तो एक आभास आहे हे हि ग्रंथराज ज्ञानेश्वरीत दोनी ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात सांगितलेले आहे .
निळिमा अंबरी | का मृगतृष्णालहरी |
तैसे वायाचि फरारी | वावो जाहले ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी : १३-१०५
ज्या प्रमाणे आकाशाचा निळा रंग किंवा मृगजळाच्या लाटा वास्तविक नसतात , व्यर्थ असतात
( त्याप्रमाणे मन हा वायूत्त्वाचाच एक अभ्यास आहे . ) मुळात आकाशाचा रंग हा निळा नाही अस यातून प्रतिपादन होत .
वांझेच्या लेका | कैची जन्मपत्रिका |
नभी निळी भूमिका | के कल्पू पा ||
-श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी : १५-२३४
वांझेच्या मुलाची जन्मपत्रिका असते का ? किंवा आकाशाला निळा रंग असतो का ? अर्थात या दोन्ही गोष्टी अस्तित्वात नसतात , ( त्याप्रमाणे या संसारवृक्षाचे अस्तित्व जाणावे )
संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य सामझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मच , महाराष्ट्र 

Wednesday 16 July 2014

सापक्षतेचा सिद्धांत - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी

|| ज्ञानेशो  भगवान विष्णू ||
सापक्षेतेचा सिद्धांत माऊलींच्या ज्ञानेश्वरीत :)



 अथवा नावे हन जो रिगे । तो थडियेचे रुख जातां देखे वेगें ।
 तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ॥
                                                     - श्री ज्ञानेश्वरी ४-९७
                                             नावेत बसून जाताना नदीच्या काठावरील झाडे धावताना दिसतात , परंतु खरे पाहिले तर ती स्थिरच असतात , कर्म आत्म्याकडून घडत नसून शरीराकडून ते घडत असते . कर्माचरण आभासात्मक आहे हे पटवून देताना ज्ञानेश्वरांनी प्रस्तुत दृष्टांत श्रोत्यांच्या पुढे ठेवला आहे . विज्ञानाच्या परिभाषेत हा " सापेक्षतेचा सिद्धांत आहे .
                                             केवळ प्रपंच ज्ञान एवढ्या मर्यादित अर्थाने ज्ञानेश्वरांनी विवेचन केले नसून , त्यातील ' सर्वसमावेशक ' अर्थ जाणून घेणे महत्वाचे आहे . दैनदिन व्यवहारातील आचारविचार  , नितीमुल्ये सर्व शास्त्रे ' प्रपंच विज्ञानात येतात असे ज्ञानेश्वरीतील बहुसंख्य दृष्टांतावरून लक्षात येते .
संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य सामझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
                           आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मच , महाराष्ट्र