Saturday 13 May 2017

वृंदावन म्हणजे काय ? - प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर

( प.पू. श्रीगुरु महाराजांनी आजच्या कथा सत्रात वृंदावन या संदर्भाने अनेक व्याख्या सांगीतल्यात त्यापैकी एक )

गोपिका अखंड चिंतन भगवतांच करत होत्या . खर प्रेम ते आहे. पूर्वराग रस सरोवरामध्ये फुललेल एक कमळ . त्या कमळातल्या कर्णिक (केसर ) म्हणजे गोपिका आहेत . त्या कर्णिके वरती जे बारीक बारीक पराग कण असतात तो पराग कण म्हणजे परमात्मा आहे. त्या पराग कणांचा मकरंद म्हणजे राधा आहे आणि राधेचे हृदय म्हणजे वृंदावन आहे .

- प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर
श्रीभागवत कथा निरूपण , फोगला आश्रम - श्रीक्षेत्र वृंदावन  कथेतून साभार

(प्रथम दिन - दि.१३ मे २०१७ )

संकलन - अक्षय चंद्रकांत भोसले

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
Varkariyuva.blogspot.in

भागवत ही एक कोळश्याची खान आहे - प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर

भागवताच्या संदर्भाने माझ्या मनात नेहमी एक येणार विचार    रूपक अलंकारातून व्यक्त करतो . भागवत द्वादश स्कँदाने युक्त आहे . १२ स्कँद आहेत भागवताचे . काय आहे हे भागवत . माझ्या दृष्टीने जर विचार कराल तर भागवत ही एक कोळश्याची खान आहे . कोळश्याची खाणीमध्ये मनुष्य जर उतरला आणि एका बाजूने खाली उतरून दुसऱ्या बाजूने वर चढला आणि बाहेर पडला . कुठल्या भिंतीला स्पर्श झाला नाही . कुठल्या भिंती ला कपडे लागले नाहीत . काही नाही. पण बाहेर पडताना तो काळा होऊनच बाहेर पडणार हे नक्की आहे .त्यात ही पांढरे शुभ्र कपडे घालून तो आत उतरला तर अधिक चांगले . आत जाताना तो पांढरा स्वच्छ असतो येताना तो बाहेर निघताना काळा कुळकुळीत होऊन बाहेर पडतो . फक्त कपडे पांढरे असले पाहिजेत .मग तिथल्या भिंती ला स्पर्श नाही झाला , कशाला हात नाही लावला , काही घासल नाही गेल तरी चालेल नुसतं या दारातून जा , त्या दारातून बाहेर पडा . काळेपणा येणार .तस भागवत ही एक कोळश्याची खाण आहे.आपण फक्त एवढंच करायचे की शुद्ध अंत:करण घेऊन याच्यात उतरायचं .मग आम्हाला कोणती कथा कळली नाही तरी चालेल आम्हाला त्याच्यातील तत्वज्ञान कळलं नाही तरी चालेल आम्हाला त्याच्यातील प्रेमाच्या व्याख्या नाही कळल्या तरी चालतील . आम्ही भागवताच्या प्रथम स्कँधातून आत उतरायचं शुभ्र कपडे घालून शुभ्र अंत:करण घेऊन आणि द्वादश स्कँधातून बाहेर पडायचं आपल्याला सुद्धा पांडुरंगाचा रंग लागल्याशिवाय राहणार नाही तो काळा होणारच आहे . भागवताच हे महात्म्य आहे . भागवत हर करत तुमच्या माझ्या करिता . भागवताने हे केलेलं आहे अनेकांच्या जीवनामध्ये , आपल्यावर जबाबदारी एवढीच आहे की आपण फक्त शुभ्र कपडे घालायचे .आपण फक्त अंत:करण शुद्ध ठेवायचं .

- प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर
श्रीभागवत कथा निरूपण , फोगला आश्रम - श्रीक्षेत्र वृंदावन  कथेतून साभार
फोटो - श्रीनिलेश ढोमसे

संकलन - अक्षय चंद्रकांत भोसले
varkariyuva.blogspot.in