Monday 4 July 2016

माऊली लोणंद कडे मार्गस्थ !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ संतशिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराजांची ( माऊलींची ) पहाट-पूजा सकाळी ५:४५ वा. पालखी तळ वाल्हे येथे संपन्न झाली

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ संतशिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे रथामधून आज सकाळी ६:३० वा. लोणंद कडे मार्गस्थ

सकाळचा विसावा- पिंपरे खुर्द विहीर

दुपारचा नैवेद्य- नीरा

नेवैद्य झाल्यानंतर माउलींचे शाही स्नान होईल

रात्रीचा मुक्काम- लोणंद

येथे दीड दिवस पालखी चा मुक्काम असेल.
बुधवारी दिं ०६-०७-२०१६ रोजी पालखी दुपारी उभे रिंगण सोहळा करून तरड कडे मार्गस्थ होईल.

- varkariyuva.blogspot.in

वारी विशेष मुलाखत on झी २४ तास (आनंदवारी )

वारी विशेष मुलखात - आंनदवारी with ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले , डॉ . वीणा खाडिलकर जी , कु.मेघा तांगडेजी , सौ. संगीता गायकवाड

प्रशांत अनासपुरे धन्यवाद आमचं कार्य आपण झी 24 तास च्या माध्यमातून हजारो लोकांच्या पर्यंत पोहचवले . लिंक पुढील प्रमाणे अवश्य पहा फक्त एक क्लिक

- https://youtu.be/qm_LGHPXRY8

श्री माऊली वाल्हे येथे दाखल !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।

श्री माऊली यांच्या पालखीचा प्रेवेश १ वाजता  वाल्हे येथे झाला ."श्री माऊलीं"ची पालखी
उद्या सकाळी ६:३० वा लोणंद कडे मार्गस्थ होईल.
पावसाची संथ धार आज ही बऱ्यापैकी आहे .
माऊलींच्या सोहळ्यामध्ये आज शिक्षण मंञी विनोदजी तावडे यांनी युवकमिञ गुरूवर्य बंडातात्याची भेट घेतली. शिक्षण व नदी प्रदूषण या संदर्भात चर्चा केली.

- varkariyuva.blogspot.in