Thursday 22 September 2016

पू.कर्मवीर श्री.भाऊराव पाटील जयंती !

पूज्य  कर्मवीर अण्णांची एक  आठवण  - पेढे


हायस्कुल स्कॉलशीप ला प्रा. शिवाजीराव भोसले प्रथम आले , त्यांच्या यशाचं वर्तमान कर्मवीर अण्णा ना समझल . व त्यांनी शिवाजी रावाना बोलवलं  व म्हटले पेढे कुठेत , शिवाजी राव शांतच ..म्हटले अरे तू या संस्थेत येऊन एक वर्ष झालं ना ?   प्राचार्य शांत उभे होते व ते म्हटले अण्णा मला तुमच्या बोलण्याचा बोध होत नाही . त्यावर ते म्हणाले आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या  प्रत्येक वस्ती गृहा मध्ये पेढे या शब्दाला विशिष्ट पारिभाषिक अर्थ आहे . आणि तो आपल्या संस्थेपुरता मर्यादित आहे .तो अर्थ असा की आदल्या दिवशी केलेल्या स्वयंपाकातुन ज्या भाकरी उरतात त्या शिळ्या भाकरी  सकाळच्या प्रहरी  धुऊन त्यांचे तुकडे करून तेल मीठ तिखट लावून तव्यावर परतल्या नंतर त्यांचं घडणारे जे रूपांतर  त्याला रयत शिक्षण संस्थे मध्ये पेढे असं म्हणतात . व हे गरिबांचे  पेढे आहेत व आता हे पेढे देणे तुला अवघड आहे का .
गरिबांची अस्मिता फुलवण्याची शक्ती ज्यांच्या अंगी असते ती माणस् कुठल्या पद्धतीने संस्कार करतात हे बघण्यासारखं .एखादं म्हणाला असता पेढे खूप महाग आहेत इतकी खाती तोंड आहेत एवढे पेढे लागतील . परात भर  पेढे प्राचार्य भोसले यांनी दुसऱ्या दिवशी वाटले . म्हणजे आपला आंनद उत्सव स्वाभिमान पूर्वक साजरा करण्याची शिकवण  गरिबांच्या ठायी प्रगट व्हावि या साठी हि माणसं स्वतःची परिभाषा निर्माण करत असे . आणि मला अभिमान वाटतो कि माझं शिक्षण याच संस्थेत झाल.

.

कर्मवीर अण्णांच्या जयंती निम्मित त्यांचीच एक आठवण आपल्या बरच काही शिकवून जाते.


- अक्षय चंद्रकांत भोसले ०८४५१८२२७७२

प.पू.श्रीगुरु महंत श्रीप्रमोदमहाराज जगताप यांची अमृतवचने !

गुरुकृपा होण्यासाठी गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक !
१. साधकाने गुरुंवर पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यास त्यांच्या केवळ अस्तित्वानेच सर्वकाही शक्य होणार आहे.
२. अध्यात्मात वाटचाल करणे हे धारदार तलवारीवरून चालण्यासारखे आहे. त्यामुळे गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते.
३. गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही.
४. गुरूंची अवहेलना/निंदा केल्यामुळे घडणा-या पापाचे क्षालन जगन्नियंताही करू शकत नाही.
५. आपण गुरूंची सेवा जेवढी अधिकाधिक करू, तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळेल.
६. गुरूंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहेे.
७. देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो; मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात् भगवंताचीच प्राप्ती करवून देतात.
८. गुरूंचेे चरणकमल म्हणजे प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच होय.
९. जन्मदाते (आई-वडील) आपल्याला केवळ अन्न देतात; मात्र गुरु आपल्याला आत्मोद्धाराचे ज्ञान देतात.
१०. गुरूंच्या एका दृष्टीक्षेपाने आपल्या अनंत कोटी पापांचे क्षालन होऊन त्यांच्या अनंत कोटी कृपाशीर्वादांचा आपल्यावर वर्षाव होतो.
११. ईश्वररूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता असते.
१२. अन्य कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरुचरणकमल ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे.
१३. गुरु शिष्याचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवतात.
१४. गुरूंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट गुरुसेवा होय.
१५. गुरूंच्या कृपेने एखाद्या संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होते.
१६. पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो; परंतु गुरूंनी दिलेले ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही.
१७. गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल..........
तर जप, तप, व्रत, तीर्थाटन, योग आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे.
१८. आपली देवावर श्रद्धा आणि गुरूंवर भक्ती असल्यास कुणीही आपला पराभव करू शकणार नाही.
१९. कृपाळू गुरूंमुळे आपल्याला देवाशी एकरूप होण्याचा मार्ग सापडतो.
२०. नाव, प्रसिद्धी, शक्ती किंवा संपत्ती यांच्या अपेक्षेविना गुरूंची सेवा करावी.
२१. केवळ गुरुच आपले प्रारब्ध पालटू शकतात.
२२. गुरु साक्षात् ईश्वराचा अवतार असल्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा प्रत्यक्ष ईश्वराचाच असतो.
२३. जे ज्ञान मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे साधना करावी लागते, ते गुरूंच्या केवळ एका दृष्टीक्षेपाने क्षणार्धात मिळते.
२४. गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्ती होणेे शक्य नाही.
२५. गुरूंपुढे ईश्वर किंवा कोणतेही उच्च पद श्रेष्ठ नाही.
२६. गुरुमंत्राचा जप करणा-याचीच आध्यात्मिक उन्नती होते.
२७. गुरूंच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नाही, तर ऐहिक लाभही होतो.
२८. या विश्वात एखाद्याकडे असणारे सर्वांत मोठे ऐश्वर्य म्हणजे गुरु !
२९. गुरूंच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही मिळत नाही.
३०. गुरूंच्या शब्दांवर पूर्ण श्रद्धा असणाराच साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो.
३१. जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरु-शिष्य यांच्यातील निरपेक्ष प्रीतीशी होऊ शकत नाही.
एखाद्यामध्ये तळमळ असेल, तर त्याला गुरूंची कृपा आपोआप मिळते. गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही. केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे. गुरुच त्याला त्यासाठी पात्र बनवतात..

महावैष्णव प.पू.प्राचार्य शंकर वामन उर्फ मामासाहेब दांडेकर

महावैष्णव प.पू.श्रीसंत दादामहाराज सातारकर