Sunday 15 December 2013

दत्तगुरूंचे २४ गुरु

दत्तगुरूंचे २४ गुरु 


:: दत्तरूपी अवधूताचे २४ गुरु :: 

१. पृथ्वी :: सहिष्णुता आणि सहनशीलता

पंचमहाभूतांपैकी एक पृथ्वी. पृथ्वी कडून अवधुतांना सहिष्णुता आणि सहनशीलता हे गुण शिकायला मिळाले. पृथ्वीवरील सर्व जीव तिच्यावर ह्या न त्या मार्गाने आघात करीत असतात. कधी तिला नागरून, कधी खणून, कधी पोखरून तर कधी मलविसर्जन करून परंतु पृथ्वी समान भावाने आणि आपल्या सहनशील गुणाने सर्वांना तिच्या काळजातून पिक देते ज्यामुळे सर्व मानवसृष्टी आपले उदरभरण करते. पृथ्वी ठाई सर्वांना जागवण्याची शक्ती आहे. ती सर्वांना नुसते पिकाचं नव्हे परंतु अनेक रत्ने, खनिजे सुद्धा देते आणि ते देखील निरपेक्ष भावनेने.

१.१. वृक्ष ( उपगुरु ) :: परोपकार

वृक्षाचा परोपकार हा गुण अवधूतांनी ग्रहण केला. वृक्ष निरपेक्ष मनाने, सर्व प्राणीमात्रांना छाया देतो, पक्ष्यांना निवासाचे स्थान देतो, सर्वांना गोड फळे देतो. कुठलाही दुजाभाव वृक्षाठाई नाही. आपण त्याला दगड मारला तरी वृक्ष त्याच्या परोपकारी वृत्तीला कधीच सोडत नाही. वृक्षाच्या पानांचा, फुलांचा, फळांचा, खोडाचा सर्वतोपरी उपयोगच होतो. अनेक छोटे - मोठे जीव वृक्षावर अवलंबून असतात परंतु त्याने त्याचा सार्थ अभिमान न बाळगता ते आपल्या सेवेस सदैव रुजू असते.

१.२. पर्वत ( उपगुरु ) :: संपादन आणि संचय

पर्वत आपल्या उदरामध्ये अनेक खनिजे, रत्ने ह्याचे संपादन करून संचय करून ठेवते. आणि मानवास त्याचा उपभोग घेता येतो. इतकेच नव्हे तर ते पाण्यासारखा मुलभूत रत्नाचाही, पर्वत स्वतःमध्ये संचय करते. परंतु वेळ आली कि हे सर्व मानवालाच अर्पण असते. तसेच मानवांनी ज्ञान संपादन करून त्याचा संचय करावा आणि इतरांना त्याचा लाभ निरपेक्ष मनाने व बुद्धीने उपभोगू द्यावा.

२. वायु :: विरक्ती

वायु हा मुक्त संचारी आहे. तो सर्वांना स्पर्शून जातो. सुगंध, दुर्गंध ह्यांना देखील स्पर्श करतो परंतु तो ह्यातून मुक्त आहे. तो कुणातही अडकून न राहता त्याचा तो मुक्त संचार करीत राहतो. उष्ण प्रदेश असो अथवा शीतकटिबंध वायु त्याची मार्गक्रमणा पूर्ण करतो. मानवाने वायूचा हा गुण आत्मसाद करावा. कोणत्याही गुण- दोषांत अडकून न राहता श्रुतीप्रतिपादित मार्गक्रमणा करावी. कोणत्याही प्रदेशातून विहार करीत असता तेथेच खिळून राहू नये.

३. आकाश :: अचल, अविनाशी

आकाश स्थिर, अचल आणि अविनाशी गुणांनी युक्त आहे. राजाचा महाल असो अथवा गरीबाची झोपडी आकाश त्याचे पांघरूण सर्वांवर पांघरते. तिथे लहान मोठा हा भेदभाव नाही. आकाश सर्वव्यापी आहे. निश्चल आहे. निर्विकार आहे. त्याच प्रमाणे आत्मा हा सर्वव्यापी आहे. अविनाशी आहे. जसे आकाश ढगांनी व्यापलेले असले तरी आकाशाचे सतंत अस्तित्व टिकून आहे त्याच प्रमाणे शरीर आवरणामध्ये आत्मा झाकलेला जरी असला तरी कोणत्याही स्थितीचा चांगल्या - वाईट परिणाम आत्म्यावर होत नाही. आत्मा त्याचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे.

४. पाणी :: पावित्र्य, मधुरता, पावकता

उदक म्हणजेच पाणी. मनुष्याने पाण्याप्रमाणे निर्मल राहून इतरांच्या मनातले मलीन विचार साफ केले पाहिजे. पाण्याचे अनेक गुणधर्म विषद करता येतात. पाण्याला ज्या आकारामध्ये आपण टाकतो तो त्या आकाराचे रूप स्वतः धारण करतो परंतु स्वतःचे सत्त्व सोडत नाही. त्याचप्रमाणे मानवाने सर्व परिस्थितीशी जुळवून घेऊन स्वतःचे सत्त्व टिकवले पाहिजे. ज्या प्रमाणे पाण्यात सर्व घटक विरघळवण्याची क्षमता आहे तसेच पाणी त्यात सामावणारे गढूलत्व तळाशी ठेवते आणि स्वछ निर्मल पाणी वरती राहते . ह्या गुणधर्मांचा अवलंब मानवाने करून इतरांच्या मलीन कर्मांना तळाशी स्थान देऊन निर्मल मनाने त्यांच्या पातकाचे क्षालन करावे. उदक हे सर्वांसाठीच ज्या प्रमाणे अमृत बनून वाहत असते. त्याप्रमाणे मानवाचा सहवास अमृतासम भासावा ह्याकरिता पाण्याचे हे गुणधर्म आचरणात आणावेत. पाणी जर एकाठिकाणी साचून राहिले तर त्याचे दबके तयार होते. आणि दबके हे साचून राहिल्यानी कालांतरानी दुर्गंधी निर्माण करते. त्यामुळे ज्ञानार्जन करताना मानवानी कुठेही थांबून साचलेल्या दुर्गंधीयुक्त दबक्या समान न होता एका निर्मल स्वछ झर्याचे गुणधर्म आचरून सतत विहार करावा. पवित्र राहून आपल्या मधुरतेने दुसर्यांना सतत सुखवीत राहणे हाच खरा पुरुषार्थ.

५. अग्नी :: पवित्रता

अग्नी.. अतिशय पवित्र अशी अग्नी तिच्या मध्ये सर्व चांगले - वाईट सामावून घेते. तिच्या तेजाने सर्व मळभ नाहीसे करते. कोणताही दुजाभाव तिच्यामध्ये नाही. आणि आपल्या तेजाचा तिला गर्व नाही. राखेखाली दुमसत राहून आपल्या तेजाला राखेची किनार ती जोडते. आणि एक महत्वाचा गुण म्हणजे सर्वांना उब प्रदान करते. तेव्हा अवधूत म्हणतात कि त्यांच्या पाचव्या गुरु कडून त्यांनी हि शिकवण घेतली कि मनुष्याने अग्नी प्रमाणे तप करून ज्ञानाने तेजस्वी होणे गरजेचे आहे. अग्नीची पवित्रता बाळगून सर्वांसमवेत समान आचरण ठेवावे. आपल्या कुठल्याही कृत्याला अहंकाराची झाल लागू ना देता आपल्या आत्म्याचे तेज जपावे.

६. चंद्र

चंद्र १६ कलांमधून भ्रमण करतो. अमावस्येची कला तिथपासून पौर्णिमेपर्येंत असे १६ आकार चंद्र घेतो परंतु चंद्राचे असे कमी जास्त होणे चंद्रास बाधक नाही. त्याचप्रमाणे जन्म, वाढ, स्थिती, विकास, क्षय आणि नाश हे सहा विकार देहाला लागू पडतात. आत्मा ह्यातून मुक्त आहे. ह्याचे कारण असे कि चंद्राच्या कला ज्या आपण बघतो त्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या योगाने, परंतु तत्वतः चंद्र तसाच आहे. तसाच आपल्या शरीर ज्या विकारांमधून जाते त्यामुळे आत्म्याचा स्थायी भाव बदलत नाही.

७. सूर्य :: आलिप्तपणा आणि परोपकार

सूर्य आणि मानवाचा आत्मा हे अवधूतांना एकसमान भासतात, कारण ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले असता सूर्य पाण्यात बुडून जात नाही किंवा सूर्य गढूळ होत नाही. ते पाणी वाहताना जर पहिले तर सुर्यचे प्रतिबिंब विकृत जरूर होईल परंतु मुलतः सूर्य ह्या सर्व विकारांपासून आलिप्त आहे, तसेच आत्मा हा मानवी शरीरच्या कोणत्याही विकारास बाधक नाही तो सर्वार्थ असून आलिप्त आहे. मानवाचा देह कसाही असो, कोणतेही कर्म सिद्ध करत असो तरीही आत्मा त्याचे अस्तित्व स्वतंत्र राखते. आत्म्याची शरीराबरोबर सोबत हि एखाद्या प्रतिबिंबा इतकीच असते.
सूर्याचा दुसरा गुण म्हणजे सूर्य दररोज सर्वांना त्याच्या सूर्य किरणांनी तेज प्रदान करतो. अंधार नाहीसा करतो. कोणताही मनात भेदभाव न बाळगता सर्वांवर आपल्या तेजाची पाखरण करतो. अन्नधान्य पिकवण्यास सहाय्यक ठरतो. जमिनीवरील पाण्याचा संचय करून आवश्यक त्यावेळी पर्जन्य वृष्टी करून सर्वांची तृष्णा शालन करतो. त्याप्रमाणे मानवाने सूर्यप्रमाणे आपल्या ज्ञानाच्या तेजोकिरणांनी सर्वांच्या हितार्थ अज्ञानाच्या अंधाकाराचे पतन करावे. सर्वांसोबत समान वागणूक ठेवावी.

८. कपोत पक्षी ( कबुतर ):: विरक्ती

एका वनामध्ये अवधूतांनी एक कपोत पक्ष्याच्या जोड्याला बघितले. जे एकमेकांच्या प्रेमात लुब्ध होऊन रानावनात संचार करीत. एकमेकांवर जीवापाड प्रेम करून त्या कपोतानी त्याचा सुंदर असा संसार थाटला होता. काही दिवसांनी कपोती गरोदर राहिली आणि तिनी काही अंडी दिली. कपोत आणि कपोती त्या अंड्यांना प्रेमची उब देत असे आणि त्यांचे दिवस असेच प्रेमात चालले होते. त्या अंड्यातून गोंडस पिल्ले बाहेर आली. आपल्या पिल्लांना उत्तम दर्ज्याचा आणि मुबलक चारा मिळावा ह्यासाठी कपोत आणि कपोती आता जीवापाड मेहनत करू लागेल. आणि एक दिवस आपल्या पिल्लांना चारा आणायला गेलेल्या कपोत आणि कपोतीच्या पिल्लांना फासेपारध्यांनी आपल्या जाळ्यात अडकून टाकले. आपल्या पिल्लांना जाळ्यात तळमळताना पाहून कसलाहि विचार न करता कपोती स्वतः जाळ्यात धावून गेली आणि तिने आपले प्राण गमावले. आपल्या पिल्लांना आणि कपोतीला असे प्राण गमवलेले पाहून कपोताने आपले प्राण आपल्या कुटुंबासाठी दिले आणि तो स्वतः जाळ्यात गेला. कुटुंबाबद्दलची आसक्ती विवेक बाजूला ठेवायला लावते. संसारच्या मोहातून विरक्त होऊन मानवानी सुखार्जन केले पाहिजे नाहीतर तो काळाचा भक्ष होईल.

९. अजगर :: उदासीन परंतु आत्मसंतुष्ट

अजगराला गुरु करताना त्याची उदासीनता लक्षात आली. देहानी विशाल, शक्तींनी अचाट, सामर्थ्यानि बलवान अश्या अजगराकडे आपण बघतो तेव्हा तो शांत, अविचल, स्थिर भासतो. अजगर त्याला त्याच्या प्रारब्धाने जे काही अन्न भक्षणास मिळेल ते तो गोड समजून भक्षण करून निपचित पडून राहतो. मग ते अन्न थोडे असो कि जास्त, कडू असो कि गोड, अजगरास त्याची भ्रांत सतावित नाही. तो कितीही संकटे आली किंवा त्याला कितीही डिवचले, मारले तरी तो वार करीत नाही. आहे त्यात तो संतुष्ट राहून आपले जीवन व्यतीत करतो. मानवाने देखील अजगराच्या ह्या गुणाप्रमाणे आपल्या प्रारब्धाप्रमाणे जे काही मिळेल जसे मिळेल त्याचा स्वीकार करून सुखी राहिले पाहिजे. लोभाला दूर लोटून आत्मसंतुष्टी प्राप्त केली पाहिजे.

१०. समुद्र :: समतोल

समुद्राची समतोल आणि धीरगंभीर वृत्ती अवधूतांच्या नजरेतून सुटत नाही. अतिशय विशाल अश्या समुद्राची खोली आपल्याला निश्चित मोजता येत नाही. सदैव प्रसन्नतेने वाहणाऱ्या समुद्राला प्रवाह नाही. तो निर्मळ आहे. पर्जन्य वृष्टी होऊन नद्यांना पूर येतो आणि अनेक नद्या समुद्रास येऊन मिळतात ह्याच्या व्यर्थ गर्व बाळगून समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. किंवा निसर्गातल्या सुकलेल्या वातावरणाने समुद्र कधी आटत नाही. ह्याचाच अर्थ असा मानवाने त्याच्या आयुष्यात आलेल्या सुखाने कधीही फुलून जाऊ नये अथवा दुःखाने खचून जाऊ नये. समुद्र त्याच्या खोलीचा थांग लागू देत नाही परंतु अनेक रत्नांची आपल्यावर परमार करतो. अनेक रत्नसाठा हा समुद्राच्या पोटातून मानवाला उपभोगायला मिळतो. त्याचप्रमाणे मानवाने आपल्या गुणांचा थांग लागू न देता त्याचा उपयोग दुसर्यांच्यासाठी जरूर करावा.

११.पतंग :: मोहाचा त्याग

पतंग हा असा एक कीटक आहे जो फुलपाखराप्रमाणे असतो परंतु त्याला दिव्याच्या तेजाची अति ओढ असते. दिव्याच्या प्रकाशाला जाऊन तो बिलगतो, परंतु त्या दिव्याला बिलगल्यानी त्या पतंग्याचा जळून मृत्यू होतो. तरीही ते पाहूनही दुसरा पतंग त्याचा मोह आवरू शकत नाही आणि तोही मृत्युच्या पाशात ओढला जातो. पतंग्याच्या ठाई असलेला लोभ त्याच्या विवेकाचा मारक होतो त्यामुळे अति मोहामुळे मानवानी कोणत्याही लोभस बळी पडू नये आणि आपला काळ ओढवून घेण्यासाठी कारणीभूत होऊ नये. माणसाने कोणत्याही परिस्थितीत विवेकशून्य बनू नये. ह्याकरिता पंतगाला गुरु बनवले.

१२. भ्रमर :: सरग्रही आणि आसक्त

भ्रमर म्हणजे भुंगा हा प्रत्येक फुलाचा रसिक बनतो आणि प्रत्येक फुलाचा आस्वाद घेण्यासाठी तयार होतो. ज्याप्रमाणे भुंगा फुलांमधील रस ग्रहण करतो त्याप्रमाणे योग्याने ज्ञान ग्रहण करावे सारग्रहण करावे. परंतु भ्रमर ज्याप्रमाणे फुलाच्या प्रेमात पडून त्या फुलाचा आसक्त होतो, फुलाने आपली पानं मिटून घेतली तरी त्या फुलाला दुखापत होऊ नये म्हणून हालचाल न करता स्तब्ध राहतो व आपला काल ओढून घेतो त्याप्रमाणे योगी माणसांनी कसल्याही मोहामागे आसक्ती दर्शवू नये.

१३. मक्षिका (मधमाशी) :: लोभ आणि निर्लोभ

मक्षिका (मधमाशी) :: इथे अवधूतांनी मधुहा आणि ग्राममाशी ह्यांची तुलना केली आहे. मधमाशी, अतिशय कष्ट करून, श्रम करून मधाचा दिवस न रात्र संचय करते. तिचे पोळे अश्या उंच ठिकाणी ती बांधते कि तिथे इतरांना पोहोचणे कठीण असते. मधमाशी साठवलेल्या मधाचा स्वतःही उपभोग घेत नाही आणि इतरांनाही त्या साठवलेल्या मधाचा उपभोग घेऊ देत नाही.परिणामतः मध गोळा करणारे लोक येतात आणि सर्व मध तर नेतातच पण मधमाशीने कष्टाने बांधलेले पोळे तोडून-मोडून जातात.

ग्राममाशी :: ह्याच्याच अगदी विरुद्ध ग्राममाशी ती कधीच कोणत्या गोष्टींचा, अन्नाचा संचय करत नाही. जे मिळेल ते ती खावून मोकळी होते आणि आपली उपजीविका अव्याहत चालू ठेवते. निवाऱ्याची चिंता तिला नसते. ह्याचाच अर्थ असा कि योगी पुरुषाने लोभाची गाठोडी सोबत बाळगून दुखी, कष्टी होऊ नये. उदरनिर्वाहासाठी भिक्षा मागून जे काही मिळेल त्यात संतुष्ट असावे. निवाऱ्याची चिंता योग्याने करू नये आणि ज्ञान सोडून धनाचा, अन्नाचा अथवा कोणत्याही गोष्टीचा संचय योग्याने करू नये.

१४. गज (हत्ती) :: नम्र परंतु संयमहीन

शक्तिशाली, बुद्धिवान प्राणी म्हणजे हत्ती. उन्मत्तता आणि प्रचंडशक्ती असून देखील लहान - थोर असा भेदभाव न करता सदैव नम्रतेने खाली बघून चालणारा आणि सर्वांना वंदन करणारा गज जेव्हा कामवासनेला भुलतो तेव्हा स्वतःच्या नाशास कारणीभूत ठरतो. हत्तीला पकडण्यासाठी बनवलेल्या खड्डया मध्ये हत्तीणीची लाकडी प्रतिकृती उभारून मानव त्यावर हत्तीणीची कातडी पांघरतात. तिच्या वासाने हत्ती आपली विवेकबुद्धी विसरून कामासुखास बळी पडतो आणि मानवाचा दास होतो. त्याचप्रमाणे योग्याने नम्र जरूर असावे परंतु स्त्रीसुखास भुलून आपला विवेक सोडू नये नाहीतर काळ नक्कीच विनाश बनेल.

१५.मृग :: चंचलता, लोभाचा त्याग

वाऱ्याप्रमाणे अतिशय वेगवान असे मृग नेहमी भीतीनी ग्रस्त असते. आपला जीव मुठीत घेऊन भिरभिरत्या नजरेने बघत असते. चपळता असूनही मृगाची चंचलता त्याच्या नाशाला कारणीभूत ठरते. कस्तुरी-मृग मधुर गायनाला, वाद्याच्या मधुर ध्वनी लहरींवर लुब्ध होऊन पारध्याच्या जाळ्यात अडकतोच. मृगाची बेसावधवृत्ती, चंचलता, आणि नादाप्रती अति लोभापायी मृगाला पराध्याचे शिकार व्हावे लागते. योगी पुरुषाने ह्याचे जरूर भान ठेवावे. आसक्ती अथवा लोभापायी चंचल बनू नये. बेसावध राहून एकदा का काळ ओढवून घेतला कि दुसर्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नसतो हे नीट समजून योग्याने आपले आचरण शुद्ध ठेवावे. नादलुब्धते पासून योग्याने दूर राहावे. भगवंताच्या गुणांचे वर्णन अथवा ॐकार स्वरूप नाद ह्यांशिवाय इतर नाद हे योगी पुरुषाला साजत नाही.

१६. मासा :: ओढ, आसक्ती

मासा पाण्यात राहणारा एक जीव. परंतु त्या माश्याला पाण्याची इतकी ओढ, इतकी आस असते कि तो पाण्यावाचून एक क्षण जिवंत राहू शकत नाही. त्याची पाण्याशी असलेली आसक्ती, ओढ हि परमोच्च असते. माश्याला पाण्याहून विलग करता येत नाही. त्याप्रमाणे भगवंताविषयी योगी पुरुषाला तितकीच ओढ असावी. भगवंताच्या नामस्मरणाने योग्याचे प्रत्येक क्षण व्यातीती व्हावेत. भगवंत आणि भक्त एकरूप झाले पाहिजेत कि भगवंतापासून भक्ताला विलग करणे म्हणजे शरीरापासून आत्म्याला विलग करणे.
माश्याचा अजून एक गुणधर्म म्हणजे रसनेची तृप्ती होण्यासाठी गळाला अडकवलेले अन्न मासा ग्रहण करायला जातो आणि आपला मृत्यू ओढवून घेतो त्याप्रमाणे योग्याने त्याच्या जिव्हेच्या स्वादास अति महत्व देणे व्यर्थ आहे.योग्याने परमात्म्यावर विश्वास ठेऊन मिळालेली भिक्षाच संपूर्ण मानवी.

१७. पिंगला वेश्या:: आत्मजागृती आणि परीवर्तन

पिंगला म्हणजेच एक वेश्या, जी आपले शरीर, द्रव्यासाठी विकते आणि कामसुखात लुब्ध राहते. अश्या स्वैराचारीणीला श्री दत्तगुरूंनी कसे काय गुरु बनवले? तर त्याचे कारण,आत्मजागृती आणि परीवर्तन. वेश्या जी धनामागे, वासेनेमागे सर्व श्रुंगार करणारी एक स्त्री, जीची सावली देखील अपवित्र वाटावी. जी पुरुषाला आपल्या शारीरिक सुंदर्यावर नादी लावणारी, हि वारांगना. जि सर्व सुख भोगून देखील ती जणू अतृप्त होती. अनेक दिवस आपल्या मादक सौंदर्याचा व्यर्थ गर्व बाळगून जिने धनाचा मोठा संचय केला. परंतु काळ कोणासाठी थांबत नाही तसा तो तिच्या साठी देखील थांबला नाही. जसे दिवस सरले त्या दिवसांसोबत वेश्येच तारुण्य हि सरले आणि कोणीही तिच्याकडे बघेनसा झाले. तिचे सौंदर्य आता काहीच कामाचे नव्हते हे तिला सुधा कळून चुकले परंतु एक वेडी आस लाऊन ती रोज नटून दारात उभी असे, पण तिला बघणार कोण. अश्या परिस्थितीत तिला तिच्या चुकांची जाणीव झाली. ज्या गोष्टींना तिने अनन्य महत्व दिले ते फोले होते हे तिला कळून चुकले. आणि ती परमात्म्याला शरण आली. श्रीहरींनी तिचा उद्धार केला. तिला झालेल्या आत्मजागृतीने आणि तिच्या मधील झालेल्या परीवर्तनामुळेच तिला गुरु बनवले. योग्यांनी देखील भौतिक सुखाचा वाली बनू नये. आपल्याकडे असलेले तारुण्य हे चिरकाल नाही हे लक्षात घ्यावे. शरीराचे चोचले पुरवण्यापेक्षा आत्मा आणि विवेक ह्यांना जागृत ठेवावे हीच शिकवण ह्या उदाहरणातून शिकायला मिळते.

१८. टिटवी :: लोभाचा त्याग

टिटवी म्हणजे शिकारी पक्षी. एकदा एका जंगलात अनेक टिटवे पक्षी होते. त्यांच्यातल्याच एका टिटव्यानी एक मोठा मांसाचा गोळा शोधून आणला परंतु जसा त्या सर्व टिटव्यांना त्या मांसाचा वास लागला तसे ते सगळे तिथे गोळा झाले. आणि त्यांनी त्या टिटव्याला चोची मारायला सुरवात केली. असंख्य वेदना होत असूनही तो टिटवा ओरडू शकत नव्हता, कारण तो ओरडला तर मांसाचा गोळा चोचीतून खाली पडेल. पण तो मांसाचा गोळा मिळत नाहीये हे पाहून त्या इतर टिटव्यांनी त्याला पंखांनी फडाफड मारायला सुरुवात केली. आता मात्र वेदना असह्य होऊन त्याने चोच उघडली आणि तो मांसाचा गोळा खाली पडला. तसे ते सगळे टिटवे तिथे जमा झाले आणि त्या एका गोळ्यासाठी भांडू लागले. ह्यावरून योग्यांनी हे लक्षात घ्यावे त्या टिटव्याने त्याला होणारी वेदना दूर करायला त्याला झालेला त्या मांसाच्या गोळ्याचा त्याग केला म्हणजेच लोभाचा त्याग करणे म्हणजेच वेदनेपासून मुक्तता.


१९. बालक :: कुतुहूल आणि निरागसता

लहान मुलांना देवाचे दूत म्हणतात ते काही खोटं नाही. लहान मुल कोणताही भेदभाव न बाळगता सगळ्यांचा त्वरित स्वीकार करतात. त्याला आपले विश्वच इतके प्रिय असते कि त्याला राग, लोभ, मद, मत्सर, चिंता, त्रागा ह्या गोष्टींची भ्रांतच नसते. मान-अपमान ह्या गोष्टी लहान बालकास शिवत नाहीत. कुतुहूल आणि निरागसता हे गुण बालकाला निसर्गातच देणगी म्हणून मिळतात. कोणी लाडाने खेळवले अथवा कोणी रागाने झिडकारले तरी त्याला त्याचे दुखः होत नाही कि अति आनंदात ते मुल रममाण होत नाही. योग्यांनी हा बालकाचा गुण अंगी बाळगावा. निरागस आणि सरळ वृत्ती ठेवावी. कोणत्याही गोष्टीसाठी राग मानू नये किंवा आनंदात बुडून जाऊन परमात्म्याला विसरू नये.

२०. कुमारी आणि कंकण:: एकाकीपणा साधनेस योग्य

कोण्या एका कुमारिकेला घरात राखण करायला ठेऊन तिचे आई-वडील कुलस्वामिनीच्या यात्रेला जातात. त्यावेळी अचानक त्या कुमारिकेचा विवाह ज्या घरात ठरला आहे त्या घरातली मंडळी घरी येतात. घरात कोणी नाही परंतु त्यांचा आदरसत्कार करायला हवा ह्या विचारात ती कुमारिका काहीही न बोलता त्यांच्या आदर सत्काराच्या तयारीला लागते. घरामध्ये तांदूळ सडलेले नाहीत हे पाहून कुमारिका लगेच तांदूळ सडू लागते परंतु तिच्या कंकणाचा आवाज होऊ लागते. पूर्वीच्या काळी रिवाज असे कि स्त्रियांच्या ककणांचा आवाज होणे बरे नाही, त्यावरून त्या मुलीची अथवा स्त्रीची स्वभाव परीक्षा होत असेल. तेव्हा आपल्या ककणांचा आवाज झाला तर वर पक्षाला वाटेल कि मुलगी दांगट आहे म्हणून त्या कुमारीकेनी आपल्या हातामाध्ले दोन कंकण काढून ठेवले आणि पुन्हा तांदूळ सडू लागली पण तरीहि आवाज होताच होता. त्या कुमारिकेने हातामध्ये एक-एक कंकण ठेऊन आपले काम सुरु केले. ह्यावरून योगी पुरुषाने असे लक्षात घ्यावे कि अनेकजण जिथे एकत्र होतात तिथे कोलाहल होतो आणि दोन जणांमध्ये संवाद. कोणताही गट बनवून राहण्यापेक्षा योगी पुरुषाने साधनेसाठी एकाकीपणा आचरावा.

२१. सर्प :: एकांतवास आणि मुक्तसंचारी

सर्प ह्या एकविसाव्या गुरुकडून एकांतवासाचा बोध होतो. सर्प हा एकाकी जगणारा जीव आहे. तो स्वतःचं घरसुद्धा बांधत नाही. मुंग्यांनी कष्टाने बनवलेल्या आयत्या वारुळात तो निवांत जाऊन वास्तव्य करतो. आणि पुन्हा मनात येईल तेव्हा मुक्तपणे संचार करीत राहतो. सर्प सहसा कोणाच्याही दृष्टीक्षेपात न पडता त्याचा तो एकटा विहार करतो. ह्यावरून योगी माणसाने मुक्तासंचारी असावे. निवाऱ्याची विवंचना न करता मुक्तसंचार करावा जिथे विसाव्यास जागा मिळेल तिथे काही क्षण विसावा घेऊन पुन्हा आपली मार्गक्रमणा चालू ठेवावी. त्याचप्रमाणे एकांतवास पत्करावा. योग्यांनी वाईट अथवा चांगल्यांची संगत न करता आपल्या जीवनाची एकाकी वाटचाल करावी जी त्याला परमेश्वरा नजीक पोहोचवेल.

२२. शरकर्ता (बाण करणारा, कारागीर ) :: एकाग्र चित्त

शरकर्ता म्हणजे बाण तयार करणारा कारागीर. एक दिवस अवधूतांना एक अपूर्व अनुभव आला, एक साधा बाण तयार करणारा कारागीर आपल्या कामामध्ये इतका गर्क होता कि त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचा पूर्ण विसर पडला. तो आपले काम पूर्ण एकाग्र चित्ताने करत बसला होता. त्या शरकर्त्याच्या झोपडी शेजारून त्या नगरीच्या राजाची राजस्वारी पूर्ण जल्लोषात, वाजत-गाजत, सरंजामासहित गेली. परंतु त्या कोणत्याच गोष्टीचा त्या कारागीरावर काहीच परिणाम झाला नाही. तेव्हा त्या राजाचा सेवक खास त्या शरकर्त्या जवळ आला आणि त्याला विचारले कि, "ह्या वाटेने राजेसाहेबांची स्वारी जाऊन आपण आपले कार्य करीत बसलात, का आपल्याला ह्याची जाणीव झाली नाही?" तेव्हा तेवढ्याच नम्रपणे त्या कारागिराने उत्तर दिले, "महाशय मी माझ्या कर्मामध्ये गर्क असल्या कारणाने मला कसलेच अवलोकन झाले नाही, त्याबद्दल क्षमा असावी." ह्यावरून योगी पुरुषाने एकाग्रता आणि बाळगून ईश्वर चिंतन करावे. परमेश्वर स्वरूपात विलीन होऊन जावे. हाच मार्ग योग्याला मुक्ती प्राप्त करवून देऊ शकतो आणि सर्व

२३. कातणी (कोळी) :: निर्विकार

ऊर्णनाभी म्हणजे कोळी किंवा कातणी. हा कोळी अतिशय निर्विकारपणे जगतो. शाश्वततेचा लोभ करीत बसत नाही. कोळी त्याच्या पोटातून निघणाऱ्या द्रव्यापासून तंतू तयार करून त्याला हवे तसे जाळे विणतो. त्या जाळ्यावर अनेक क्रीडा करतो, लटकतो पुन्हा ते बनवलेले जाळे स्वतःच खाऊन टाकतो आणि पुन्हा नवीन जाळे तयार करतो. कातणी कोणाचाही बांधक नाही मुक्तपणे हव्या त्या जागी हवे तसे जाळे पुन्हा पुन्हा निर्माण करतो. ह्यावरून योग्याने हे लक्षात घ्यायला हवे कि परमेश्वर निराकार, निर्विकार आहे. तो कोणाचा बाधक नाहीये. त्यामुळे परमेश्वराला वाटले तर तो संपूर्ण विश्वाची पुनर्रचना करतो. म्हणूनच ह्या जगात घडणाऱ्या घटनांना योग्यांनी अधिक महत्व देणे व्यर्थ आहे. परमेश्वरा व्यतिरिक्त काहीच शाश्वत नाही हे सत्य मानावे, आणि परमेश्वर आज्ञेप्रमाणे चालावे.

२४. भिंगुरटी (कुंभारीण माशी) :: तीव्र ध्यास

कुंभारीण माशी म्हणजे भिंगुरटी, एक अळी पकडून आणते आणि तिला भिंतीशी बांधलेल्या घरट्याला बांधून ठेवते. ती अळी मरणाच्या भीतीने ग्रस्त होऊन त्या कुंभारीण माशीचा तीव्र ध्यास घेते. इतका कि त्या ध्यासापायी अळीचे कुंभारीण माशीत रुपांतर होते, आणि ती अळी उडून जाते. त्याप्रमाणे योगी पुरुषाने परमेश्वर प्राप्तीचा तीव्र ध्यास धरला पाहिजे. ईश्वराशी पूर्ण एकरूप होऊन जावे. इतके कि भक्त आणि देव ह्यांना ह्याचात फरक जाणवू नये. ईश्वराचा अंश बनून त्या सर्वात्मका भगवंतात भक्ताने पूर्णपणे विरघळून जावे. त्या परमात्म्यालाच आपले अस्तित्व बनवावे. परमेश्वर प्राप्तीतच योगी पुरुषाचा पुरुषार्थ साध्य होतो. ह्या करिता अवधूतांनी कुंभारीण माशीला आपला २४ वा गुरु बनवले.
असे एकून अवधूत चिंतन दत्त गुरु यांचे २४ गुरु ....आज दत्त जयंती..यामुळेच आपण त्यांच्या कडून नक्कीच काही न काही आत्मसात करू हि प्रार्थना ...

"श्री संत तुकाराम महाराज : आक्षेप व खंडण"

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
"श्री संत तुकाराम महाराज : आक्षेप व खंडण"
लेखक. श्री बाबुराव महाराज वाघ
फ्री डाऊनलोडिंग साठी उपलब्ध.
डाऊनलोडिंग लिंक : http://bit.ly/1fBGMtW


तुमच माझ आपल सर्वांच :- वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य .
तुम्ही मित्रांना काय भेट देता ....अथवा बरच काही असेल पण आज जरा काही वेगळ भेट द्या मित्रांना एक पान जरी वाचल तरी तुम्ही दिलेली भेट सार्थकी .....न तोटा न कोणता खर्च .तुमचा एक सेकंद खरच फक्त लिंक पाठवा पुढे जास्तीत जास्त परमार्थिक क्षेत्राचा अनुभव घ्या आनद घ्या . जीवन सुंदर आहे 
 

पांडुरंगा करू प्रथम नमन । दुसरे चरण संतांचिया॥

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
राम कृष्ण हरि ! ..आपण सारेच कीर्तन आदि भक्तीमय वातावरणात नेहमीच वावरत असतो ..जेव्हा आपण कीर्तनास जातो कीर्तनाच्या प्रारंभीस कीर्तनकार एक अभंग म्हणतात अगदी लहान नमन पर .अर्थात
पांडुरंगा करू प्रथम नमन । दुसरे चरण संतांचिया॥१॥
यांच्या कृपादाने कथेचा विस्तारु । बाबाजी सद्गुरुदास तुका ॥२॥ ...वेळेअभावी पुढील ९८ चरण म्हणन संगन जमत नाही मुळात कीर्तनाची वेळ हि आता २ तास असते दुर्दैवाने ..असो ..तर आज आम्ही प्रयत्न करतोय पुढील ९८ अधिक सुरवातीची २ अशी म्ह्जेच १०० चरणांचा अभंग तुकाराम महराजंचा आहे ..आपल्या पुढे मांडत आहोत ...

पांडुरंगा करू प्रथम नमन । दुसरे चरण संतांचिया॥१॥
यांच्या कृपादाने कथेचा विस्तारु । बाबाजी सद्गुरुदास तुका ॥२॥
काय माझी वाणी मानेल संतांसी । रंजवू चित्तासी आपुलिया ॥३॥
या मनासी लागो हरिनामाचा छंद । आवडी गोविंद गावयासी ॥४॥
सीण जाला मज संवसार संभ्रमे । सीतळ या नामे जाली काया॥५॥
या सुखा उपमा नाही द्यावयासी । आले आकारासी निर्विकार ॥६॥
नित्य धावे तेथे नामाचा गजर । घोष जयजयकार आइकता ॥७॥
तातडी ते काय हरिगुण गाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥८॥
मूळ नरकाचे राज्य मदे माते । अंतरे बहुत देव दुरी ॥९॥
दुरी अंतरला नामनिंदकासी । जैसे गोचिडासी क्षीर राहे ॥१०॥
हे वाट गोमटी वैकुंठासी जाता । रामकृष्णकथा दिंडी ध्वजा ॥११॥
जाणते तयांनी सांगितले करा । अंतरासी वारा आडूनिया ॥१२॥
यासी आहे ठावे परि अंध होती । विषयाची खंती वाटे जना ॥१३॥
नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया । भस्म दंड छाया तरुवराची ॥१४॥
चित्त ज्याचे पुत्र पत्‍नी बंधूवरी । सुटल हा परि कैसे जाणा ॥१५॥
जाणते नेणते करा हरिकथा । तराल सर्वथा भाक माझी ॥१६॥
माझी मज असे घडली प्रचित । नसेल पतित ऐसा कोणी ॥१७॥
कोणी तरी काही केले आचरण । मज या कीर्तनेविण नाही ॥१८॥
नाही भय भक्ता तराया पोटाचे । देवासी तयाचे करणे लागे ॥१९॥
लागे पाठोवाटी पाहे पायां कडे । पीतांबर खडे वाट झाडी ॥२०॥
डिंकोनिया का रे राहिले हे लोक । हे चि कवतुक वाटे मज ॥२१॥
जयाने तारिले पाषाण सागरी । तो ध्या रे अंतरी स्वामी माझा॥२२॥
माझिया जीवाची केली सोडवण । ऐसा नारायण कृपाळु हा ॥२३॥
हा चि माझा नेम हा चि माझा धर्म । नित्य वाचे नाम विठोबाचे ॥२४॥
चेतवला अग्नि तापत्रयज्वाळ । तो करी शितळ रामनाम ॥२५॥
मना धीर करी दृढ चित्ता धरी । तारील श्रीहरि मायबाप ॥२६॥
बाप हा कृपाळु भक्ता भाविकांसी । घरी होय दासी कामारी त्या ॥२७॥
त्याचा भार माथा चालवी आपुला। जिही त्या दिधला सर्व भाव ॥२८॥
भावेविण जाणा नाही त्याची प्राप्ति । पुराणे बोलती ऐसी मात ॥२९॥
मात त्याची जया आवडे जीवासी। तया गर्भवासी नाही येणे ॥३०॥
यावे गर्भवासी तरी च विष्णुदासी । उध्दार लोकासी पूज्य होती ॥३१॥
होती आवडत जीवाचे ताइत। त्या घडी अच्युत न विसंभे ॥३२॥
भेदाभेद नाही चिंता दुःख काही । वैकुंठ त्या ठायी सदा वसे ॥३३॥
वसे तेथे देव सदा सर्वकाळ । करिती निर्मळ नामघोष ॥३४॥
संपदा तयांची न सरे कल्पांती। मेळविला भक्ती देवलाभ ॥३५॥
लाभ तया जाला संसारा येऊनी । भगवंत ॠणी भक्ती केला ॥३६॥
लागलेसे पिसे काय मूढजनां । काय नारायणा विसरली ॥३७॥
विसरली तया थोर जाली हाणी । पचविल्या खाणी चौऱ्यासी ॥३८॥
शिकविले तरी नाही कोणा लाज । लागलीसे भाज धन गोड ॥३९॥
गोड एक आहे अविट गोविंद । आणीक तो छंद नासिवंत ॥४०॥
तळमळ त्याची काही तरी करा । का रे निदसुरा बुडावया ॥४१॥
या जनासी भय यमाचे नाही । सांडियेली तिही एकराज्ये ॥४२॥
जेणे अग्निमाजी घातलासे पाव । नेणता तो राव जनक होता ॥४३॥
तान भूक जिही साहिले आघात । तया पाय हात काय नाही ॥४४॥
नाही ऐसा तिही केला संवसार । दुःखाचे डोंगर तोडावया ॥४५॥
याच जन्मे घडे देवाचे भजन । आणीक हे ज्ञान नाही कोठे ॥४६॥
कोठे पुढे नाही घ्यावया विसावा । फिरोनि या गावा आल्याविण॥४७॥
विनविता दिवस बहुत लागती । म्हणउनि चित्ती देव धरा ॥४८॥
धरा पाय तुम्ही संतांचे जीवासी । वियोग तयासी देवा नाही ॥४९॥
नाही चाड देवा आणीक सुखाची । आवडी नामाची त्याच्या तया॥५०॥
त्याचीच उच्छिष्ट बोलतो उत्तरे । सांगितले खरे व्यासादिकी ॥५१॥
व्यासे सांगितले भक्ति हे चि सार । भवसिंधु पार तरावया ॥५२॥
तरावया जना केले भागवत । गोवळ गोपी भक्त माता पिता ॥५३॥
तारुनिया खरे नेली एक्यासरे । निमित्ते उत्तरे ऋषीचिया ॥५४॥
यासी वर्म ठावे भक्ता तरावया । जननी बाळ माया राखे तान्हे ॥५५॥
तान्हेले भुकेले म्हणे वेळोवेळा । न मगता लळा जाणोनिया ॥५६॥
जाणोनिया वर्म देठ लावियेला । द्रौपदीच्या बोलासवे धावे ॥५७॥
धावे सर्वथा धेनु जैसी वत्सा । भक्तालागी तैसा नारायण ॥५८॥
नारायण व्होवा हाव ज्याच्या जीवा । धन्य त्याच्या दैवा पार नाही ॥५९॥
पार नाही सुखा ते दिले तयासी । अखंड वाचेसी रामनाम ॥६०॥
रामनाम दोनी उत्तम अक्षरे । भवानी शंकरे उपदेशिली ॥६१॥
उपदेश करी विश्वनाथ कानी । वाराणसी प्राणी मध्ये मरे ॥६२॥
मरणाचे अंती राम म्हणे जरी । न लगे यमपुरी जावे तया ॥६३॥
तयासी उत्तम ठाव वैकुंठी । वसे नाम चित्ती सर्वकाळ ॥६४॥
सर्वकाळ वसे वैष्णवांच्या घरी । नसे क्षणभरी स्थिर कोठे ॥६५॥
कोठे नका पाहो करा हरिकथा । तेथे अवचिता सापडेल ॥६६॥
सापडे हा देव भाविकांचे हाती। शाहाणे मरती तरी नाही ॥६७॥
नाही भले भक्ती केलियावाचूनि। अहंता पापिणी नागवण ॥६८॥
नागवलो म्हणे देव मी आपणा । लाभ दिला जना ठकला तो ॥६९॥
तो चि देव येर नव्हे ऐसे काही । जनार्दन ठायी चहू खाणी ॥७०॥
खाणी भरूनिया राहिलासे आत । बोलावया मात ठाव नाही ॥७१॥
ठाव नाही रिता कोणी देवाविण । ऐसी ते सज्जन संतवाणी ॥७२॥
वाणी बोलूनिया गेली एक पुढे । तयासी वाकुडे जाता ठके ॥७३॥
ठका नाही अर्थ ठाउका वेदांचा । होऊनि भेदाचा दास ठेला ॥७४॥
दास ठेला पोट अर्थ दंभासाटी । म्हणउनि तुटी देवासवे ॥७५॥
सवे देव द्विजा तीही दुराविला । आणिकांचा आला कोण पाड ॥७६॥
पाड करूनिया नागविली फार । पंडित वेव्हार खळवादी ॥७७॥
वादका निंदका देवाचे दरुशन । नव्हे जाला पूर्ण षडकर्मी ॥७८॥
षडकर्मी हीन रामनाम कंठी । तयासवे भेटी सवे देवा ॥७९॥
देवासी आवडे भाविक जो भोळा । शुध्द त्या चांडाळा करुनि मानी ॥८०॥
मानियेला नाही विश्वास या बोला । नाम घेता मला युक्ति थोडी ॥८१॥
युक्त थोडी मज दुर्बळाची वाचा । प्रताप नामाचा बोलावया ॥८२॥
बोलता पांगल्या श्रुति नेति नेति । खुंटलिया युक्ति पुढे त्याच्या ॥८३॥
पुढे पार त्याचा न कळे चि जाता । पाउले देखता ब्रम्हादिका ॥८४॥
काय भक्तीपिसे लागले देवासी । इच्छा ज्याची जैसी तैसा होय ॥८५॥
होय हा सगुण निर्गुण आवडी । भक्तिप्रिय गोडी फेडावया ॥८६॥
या बापासी बाळ बोले लाडे कोडे । करुनि वाकुडे मुख तैसे ॥८७॥
तैसे याचकाचे समाधान दाता । होय हा राखता सत्त्वकाळी ॥८८॥
सत्त्वकाळी कामा न येती आयुधे । बळ हा संबंध सैन्यलोक॥८९॥
सैन्यलोक तया दाखवी प्रताप । लोटला हा कोप कोपावरी ॥९०॥
कोपा मरण नाही शांत होय त्यासी । प्रमाण भल्यासी सत्त्वगुणी ॥९१॥
सत्त्व रज तम आपण नासती । करिता हे भक्ति विठोबाची ॥९२॥
चित्त रंगलिया चैतन्य चि होय । तेथे उणे काय निजसुखा ॥९३॥
सुखाचा सागरु आहे विटेवरी । कृपादान करी तो चि एक ॥९४॥
एक चित्त धरू विठोबाचे पायी । तेथे उणे काही एक आम्हा ॥९५॥
आम्हासी विश्वास याचिया नामाचा । म्हणउनि वाचा घोष करू ॥९६॥
करू हरिकथा सुखाची समाधि । आणिकाची बुध्दी दुष्ट नासे ॥९७॥
नासे संवसार लोक मोहो माया । शरण जा रे तया विठोबासी ॥९८॥
सिकविले मज मूढा संतजनी । दृढ या वचनी राहिलोसे ॥९९॥
राहिलोसे दृढ विठोबाचे पायी । तुका म्हणे काही न लगे आता ॥१००॥
अशा व्यक्त करतो नक्कीच च आपणास आवडेल आमची हि पोस्ट  आवडल्यास नक्कीच जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत पोहचवा ..
तुमचा ,
अक्षय भोसले
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य .

कैवल्य सम्राट चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना पैठण धर्मसभेत दिलेलं शुद्धी पत्रक

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

सर्वाना सांगण्यास आनंद होतो कि कैवल्य सम्राट चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना पैठण धर्मसभेत दिलेलं शुद्धी पत्रक आपल्या पुढे सादर करत आहे. त्यातील मजकूर जसा आहे अगदी तसाच  
सदरहू शुद्धी पत्रक पैठण येथील ब्राह्मण सभेत देण्यात आले , त्या ब्रह्मसभेचे मुख्य अध्यक्ष दशग्रंथी विद्व्दवरीयान बोपदेव नावाचे मोठे पंडित होते . यांचा परिचय असा कि विदर्भात वर्धा नदीच्या काठी वेदपद गावी यांचा जन्म झाला . त्यांच्या वडिलांचे नाव केशवपंत व आजोबांचे नाव महादेव होते . बोपदेवांच्या वडिलांनी सिद्धमंत्र नावाचा ग्रंथ लिहिला व त्याच्यावर बोपदेवांनी सिद्धप्रकाश नावाची टीका लिहली . बोपदेवांनी एकंदर 26 ग्रंथ केले ते असे व्याकरणावर दहा (१० ), वैदिकावर नऊ (९) , जोतीषावर एक (१) ,साहित्यावर तीन (३) , व भागवत तत्वावर तीन (३) . अशा या महान विद्वान प्रकांडपंडिताने निवृत्तिनाथ , ज्ञानदेव , सोपानदेव , मुक्ताबाई यांना शुद्धी पत्रक दिले . शुद्धी पत्रामध्ये प्रास्ताविक ( भाग एक ) ,श्लोक ( भाग दोन) , आर्या ( भाग तीन ), श्लोक ( भाग चार ) एकून यात २५ श्लोक आहेत . त्यापैकी प्रास्ताविक जे आहे अर्थात भाग एक आज माऊली कृपेने आपल्या पुढे सादर करतोय .... शुद्धी पत्रक माझ्या वाचनात आल ते म्हणजे वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प .गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते यांच्या ब्रह्मचित्कला या ग्रंथात त्यांनी संपूर्ण शुद्धीपत्रकाचा मजकूर दिला आहे . सर्वांन पर्यंत हि गोष्ट पोहचावी या करिता हा छोटा प्रयत्न . माउली आपल्या या लेकराकडून कार्य करवून घेत आहेत फारच आनंद होत आहे . लवकरच पुढील भाग हि आपल्या समोर येतील ....
संतचरणरज अक्षय भोसले .

महाराष्ट्राचे सुपुत्र तथा महाराष्ट्राची शान मा .ना .शरदचंद्रजी गोविँदराव पवार (साहेब) यांना 73 व्या वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा. . . . !

कुळी कन्या-पुत्र होती जे सात्विक... तयाचा हरिक वाटे देवा...||
साहेब आपण हेसार्थपणे सिद्ध केल नक्कीच धन्य ते माता पिता ....
महाराष्ट्राचे सुपुत्र तथा महाराष्ट्राची शान
मा .ना .शरदचंद्रजी गोविँदराव पवार (साहेब) यांना 73
व्या वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा. . . . !

आदरणीय साहेब आपण नक्कीच महराष्ट्रातील सर्वच वारकरी वर्गाकडे स्वत : वैयक्तिक लक्ष देऊन वारकरी वर्गाचे सर्वच प्रश्न उदा : आळंदी , देहू , पंढरपूर , पैठण आदि तीर्थक्षेत्र यांचा विकास , वारकरी वर्गास अनुदान प्रत्येक क्षेत्रात शिक्षण अथवा व्यवसाय आदि गोष्टी मध्ये सवलती आणि सर्वात सोप सांगयचं झाल तर " गोमटे ते करा माझे " आपणास तर सर्वच सद्य स्थिती माहित आहे साहेब ..आपण नक्कीच या बाबत योग्य निर्णय घ्याल  आपणास उदंड आयुष्य लाभो हि विठ्ठला चरणी प्रार्थना तमाम वारकरी वर्ग आणि वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य परिवार .
आपला कृपाभिलाषी ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२

ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ॥

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||



ज्ञानियांचा राजा गुरु महाराव
म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ॥धृ॥

मज पामरासी काय थोरपण
पायीची वहाण पायी बरी ॥॥

ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे
इतर तुळणे काय पुढे ॥२॥

तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली
म्हणोनी ठेविली पायी डोई ॥३॥
 —

शांतीब्रह्म श्री .संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ

शांतीब्रह्म श्री .संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ


अभंग १ ला
हरिचिया दासा हरी दाही दिशा । भावे जैसा तैसा हरी तया ॥१॥
हरी मुखी गातां हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥२॥
जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झालीं अंगे हरिरुप ॥३॥
हरिरुप झालें जाणणे हरपले । नेणणें ते गेलें हरिचे ठायीं ॥४॥
हरिरुप ध्यांनीं हरिरुप मनीं । एका जनार्दनी हरी बोला ॥५॥
अभंग २ रा
हरि बोला हरि बोला नाहीं तरी अबोला । व्यर्थ गलबला करुं नका ॥१॥
नको नको मान नको अभिमान । सोडी मी तूं पण तोचि सुखी ॥२॥
सुखी जेणे व्हावे जग निववावे । अज्ञानी लावावें सन्मार्गासी ॥३॥
मार्ग जया कळे भावभक्तीबळें । जगाचिया मेळे न दिसती ॥४॥
दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी । एका जनार्दनी ओळखिले ॥५॥
अभंग ३ रा
ओळखिला हरि धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरी सिध्दीसहीत ॥१॥
सिध्दी लावी पिसे कोण तया पुसे । नेले राजहंसे पाणी काय ॥२॥
काय ते करावे संदेही निर्गुण । ज्ञानाने सगुण ओस केले ॥३॥
केले कर्म झाले तेचि भोगा आले । उपजले मेले ऐसे किती ॥४॥
एकाजनार्दनी नाही यातायाती । सुखाची विश्रांति हरीसंगे ॥५॥
अभंग ४ था
जें जें दृष्टीं दिसे ते ते हरिरुप । पूजा ध्यान जप त्यासी नाही ॥१॥
वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्री देव । तयाविण ठाव रिता कोठें ॥२॥
वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत । अनंतासी अंत पाहता नाही ॥३॥
आदि मध्य‍ अंती अवघा हरि एक । एकचि अनेक एक हरि ॥४॥
एकाकार झाले जीव शिव दोन्ही । एका जनार्दनी ऐसे केले ॥५॥
अभंग ५ वा
नामाविण मुख सर्पाचे ते बीळ । जिव्हा नव्हे काळसर्प आहे ॥१॥
वाचा नव्हे लांव जळो त्याचें जिणे । यातना भोगणे यमपुरी ॥२॥
अंतकाळी कोणी नाही सोडविता । पुत्र बंधु कांता संपत्तीचे ॥३॥
अंतकाळी कोणी नाहीं बा सांगाती । साधुचे संगती हरि जोडे ॥४॥
कोटि कुळें तारी हरि अक्षरें दोन्ही । एका जनार्दनी पाठ केली ॥५॥
अभंग ६ वा
धन्य माय व्याली सुकृताचे फळ । फळ ते निर्फळ हरीवीण ॥१॥
वेदाचेंही बीज हरि हरि अक्षरें । पवित्र सोपारे हेचि एक ॥२॥
योग याग व्रत नेम धर्म दान । नलगे साधन जपतां हरि ॥३॥
साधनाचे सार नाम मुखी गाता । हरी हरी म्हणता कार्यसिद्धी ॥४॥
नित्य मुक्ती तोचि एक ब्रह्मज्ञानी । एका जनार्दनी हरि बोला ॥५॥
अभंग ७ वा
बहुता सुकृती नरदेह लाभला । भक्तिवीण गेला अधोगती ॥१॥
बाप भाग्य कैसें न सरेचि कर्म । न कळेचि वर्म अरे मूढा ॥२॥
अनेक जन्मांचे सुकृत पदरीं । त्याचे मुखी हरी पैठा होय ॥३॥
राव रंक हो का उंच नीच याती । भक्तिवीण माती मुखी त्याच्या ॥४॥
एका जनार्दनी हरी हरी म्हणता । मुक्ति सायुज्यता पाठी लागे ॥५॥
अभंग ८ वा
हरिनामामृत सेवी सावकाश । मोक्ष त्याचे भूस दृष्टीपुढें ॥१॥
नित्यनामघोष जयाचे मंदिरी । तेचि काशीपुरी तीर्थक्षेत्र ॥२॥
वाराणशी तीर्थक्षेत्रा नाश आहे । अविनाशासी पाहे नाश कैचा ॥३॥
एका तासामाजी कोटि वेळां सृष्टी। । होती जाती दृष्टी पाहे तोचि ॥४॥
एकाजनार्दनी ऐसे किती झाले । हरिनाम सेविलें तेचि धन्य ॥५॥
अभंग ९ वा
भक्तिवीण पशू कशासी वाढला । सटवीनें नेला कैसा नाही ॥१॥
काय माय गेली होती भूतापाशी । हरी नये मुखासी अरे मूढा ॥२॥
पातकें करिता पुढें आहे पुसता । काय उत्तर देता होशील तू ॥३॥
अनेक यातना यम करवील । कोण सोडवील तेथे तुजला ॥४॥
एका जनार्दनी सांगताहे तोंडे । आहा वाचा रडे बोलताचि ॥५॥
अभंग १० वा
स्वहिता कारणें संगती साधूची । भावे भक्ति हरीची भेटी तेणे ॥१॥
हरी तेथे संत संत तेथे हरी । ऐसे वेदचारी बोलताती ॥२॥
ब्रह्मा डोळसातें वेदार्थ नाकळे । तेथे हे आंधळे व्यर्थ होती ॥३॥
वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष । वेदें नाही ऐसे सांगितले ॥४॥
वेदाचींही बीजाक्षरे हरि अक्षरे दोन्ही । एका जनार्दनी हरि बोला ॥५॥
अभंग ११ वा
सत्पद तें ब्रह्म चित्पद तें माया । आनंद पदीं जया म्हणती हरि ॥१॥
सत्पद निर्गुण चित्प‍द सगुण । सगुण निर्गुण हरि पायी ॥२॥
तत्सदिति ऐसें पैल वस्तू‍वरी । गीतेमाजी हरि बोलियेलें ॥३॥
हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकांसी । अभिमानियांसी गर्भवास ॥४॥
अस्ति भाति प्रिय ऐंशी पदे तिन्ही । एका जनार्दनी तेचि झाले ॥५॥
अभंग १२ वा
नाकळे ते कळे कळे ते नाकळे । वळे तें नावळे गुरुवीण ॥१॥
निर्गुणी पावलो सगुणी भजतां । विकल्प धरितां जिव्हा झडे ॥२॥
बहुरुपी धरी संन्याशाचा वेष । पाहून तयास धन देती ॥३॥
संन्याशाला दिले नाही बहुरुप्याला । सगुणी भजला तेथें पावे ॥४॥
अद्वेताचा खेळ दिसे गुणागुणीं । एका जनार्दनी ओळखिले ॥५॥
अभंग १३ वा
ओळखिला हरि साठविला पोटी । होता त्याची भेटी दु:ख कैचे ॥१॥
नर अथवा नारी हो कां दुराचारी । मुखी गाता हरी पवित्र तो ॥२॥
पवित्र ते कुळ धन्य त्याची माय । हरि मुखे गाय नित्य नेमें ॥३॥
कामक्रोध लोभ जयाचे अंतरी । नाही अधिकारी ऐसा येथे ॥४॥
वैष्णवांचे गुह्य काढीले निवडूनी । एका जनार्दनी हरि बोला ॥५॥
अभंग १४ वा
हरि बोला देतां हरि बोला घेतां । हसतां खेळतां हरि बोला ॥१॥
हरि बोला गातां हरि बोला खातां । सर्व कार्य करितां हरि बोला ॥२॥
हरि बोला एकांती हरि बोला लोकांती । देह त्यागी अंती हरि बोला ॥३॥
हरि बोला भांडता हरि बोला कांडता । उठतां बैसतां हरि बोला ॥४॥
हरि बोला जनी हरि बोला विजनी । एका जनार्दनी हरि बोला ॥५॥
अभंग १५ वा
एक तीन पांच मेळा पंचविसांचा । छत्तीस तत्वांचा मूळ हरि ॥१॥
कल्पना अविद्या येणे झाला जीव । मायोपाधि शिव बोलिलेति ॥२॥
जीव शीव दोन्ही हरीरुपी तरंग । सिंधु तो अभंग नेणे हरी ॥३॥
शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे । रज्जूंवरी भासे मिथ्या सर्प ॥४॥
क्षेत्र क्षेत्रज्ञाने जाणताती ज्ञानी । एका जनार्दनी हरी बोला ॥५॥
अभंग १६ वा
कल्पने पासूनी कल्पिला जो ठेवा । तेणे पडे गोवा नेणे हरी ॥१॥
दिधल्या वांचूनि फळप्राप्ति कैंची । इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा ॥२॥
इच्छावे ते जवळी हरिचे चरण । सर्व नारायण देतो तुज ॥३॥
न सुटे कल्पना अभिमानाची गांठी । घेतां जन्म कोटी हरि कैंचा ॥४॥
एका जनार्दनी सांपडली खूण । कल्पना अभिमान हरी झाला ॥५॥
अभंग १७ वा
काय नपुंसका पद्मिनीचे सोहळे । वांझेसी डोहळे कैंचे होती ॥१॥
अंधापुढे दीप खरासी चंदन । सर्पा दुग्धपान करुं नये ॥२॥
क्रोधी अविश्वासी त्यांसी बोध कैंचा । व्यर्थ आपुली वाचा शिणऊं नये ॥३॥
खळाची संगती उपयोगासी नये । आपणा अपाय त्याचे संगें ॥४॥
वैष्णवी कुपथ्य टाकिले वाळुनी । एका जनार्दनी तेचि भले ॥५॥
अभंग १८ वा
न जायेचि ताठा नित्य खटाटोप । मंडूकी वटवट तैसे तें गा ॥१॥
प्रेमावीण भजन नाकावीण मोती । अर्थावीण पोथी वाचुनी काय ॥२॥
कुंकवा नाहीं ठाव म्हणे मी अहेव । भावावीण देव कैसा पावे ॥३॥
अनुतापावीण भाव कैसा राहे । अनुभवें पाहे शोधुनिया ॥४॥
पाहतां पाहणे गेले ते शोधूनि । एका जनार्दनी अनुभविलें ॥५॥
अभंग १९ वा
परिमळ गेलिया वोस फूल देठीं । आयुष्या शेवटी देह तैसा ॥१॥
घडीघडी काळ वाट याची पाहे । अजूनि किती आहे अवकाश ॥२॥
हाचि अनुताप घेऊनि सावध । काहीतरी बोध करी मना ॥३॥
एक तास उरला खट्वांगरायासी । भाग्यदशा कैसी प्राप्त झाली ॥४॥
सांपडला हरी तयाला साधनीं । एकाजनार्दनी हरी बोला ॥५॥
अभंग २० वा
करारे बापांनो साधन हरीचे । झणी करणीचे करुं नका ॥१॥
जेणें नये जन्म यमाची यातना । ऐसिया साधना करा कांही ॥२॥
साधनाचे सार मंत्र बीज हरी । आत्मतत्व धरी तोचि एक ॥३॥
कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम । एक हरिनाम जपतां घडे ॥४॥
एका जनार्दनी न घ्यावा संशय । निश्चयेंसी होय हरीरुप ॥५॥
अभंग २१ वा
बारा सोळा जणी हरीसी नेणती । म्हणोनि फिरती रात्रंदिवस ॥१॥
सहस्त्र मुखांचा वर्णिता भागला। हर्ष जया झाला तेणे मुखें ॥२॥
वेद जाणू गेला पुढें मौनावला । तें गुहय तुजला प्राप्त कैंचे ॥३॥
पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा । दास सदृगुरुचा तोचि जाणे ॥४॥
जाणते नेणते हरीचे ठिकाणी । एका जनार्दनी हरी बोला ॥५॥
अभंग २२ वा
पिंडी देहस्थिति ब्रह्मांडी पसारा । हरिवीण सारा व्यर्थ भ्रम ॥१॥
शुक याज्ञवल्क्य दत्त कपिलमुनी । हरीसी जाणोनि हरिच झाले ॥२॥
यारे यारे धरुं हरिनाम तारुं । भवाचा सागरु भय नाही ॥३॥
साधुसंत गेले आनंदी राहिले । हरिनामें झालें कृतकृत्य ॥४॥
एका जनार्दनी मांडिले दुकान । देती मोलावीण सर्व वस्तु ॥५॥
अभंग २३ वा
आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥
नको खेद करुं कोणत्या गोष्टीचा । पति लक्ष्मीचा जाणतसे ॥२॥
सकळ जीवांचा करितो सांभाळ । तुज मोकलील ऐसे नाही ॥३॥
जैसी स्थिती आहे तैशापरी राहे । कौतुक तूं पाहे संचिताचें ॥४॥
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा । हरिकृपें त्याचा नाश झाला ॥५॥
अभंग २४ वा
दुर्बळाची कन्या समर्थानें केली । अवदसा निमाली दरिद्र्याची ॥१॥
हरिकृपा होता भक्ता निघती दोंदे । नाचती स्वानंदे हरिरंगी ।१२॥
देव भक्त दोन्ही एकरुप झाले । मुळीचे संचलें जैसे तैसें ॥३॥
पाजळली ज्योती कापुराची वाती । ओवाळीतां आरती भेद नुरे ॥४॥
एका जनार्दनीं कल्पचि मुराला । तोचि हरी झाला ब्रह्मरुप ॥५॥
अभंग २५ वा
मुद्रा ती पांचवी लाऊनियां लक्ष । तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे ॥१॥
कानीं जे पेरिलें डोळां ते उगवलें । व्या‍पक भरिलें तोचि हरी ॥२॥
कर्म उपासना ज्ञान मार्गी झालें । परिपाठी आले सर्व मार्ग ॥३॥
नित्य प्रेमभावे हरिपाठ गाय । हरिकृपा होय तयावरी ॥४॥
झाला हरिपाठ बोलणे येथुनि । एका जनार्दनी हरी बोला ॥५॥
संत एकनाथ महाराज यांच्या विषयी अधिक जाणून घेण्याकरिता खालील वेब साईट ला नक्कीच भेट द्या :- www.santeknath.org
वारकरी संप्रदाय युवा मंच ,महाराष्ट्र राज्य .
|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

महाराष्ट्रातील तमाम वारकरी वर्गाचा आणि कलावर्गाचा प्रतिसाद हवाय मोठ्या प्रमाणात ...वारकरी संप्रदाय युवा मंच तर्फे संपूर्ण महराष्ट्रात वारकरी संप्रदाय करिता तथा कला वर्गाकरिता काही सर्वांपेक्षा वेगळ करण्याचा उदा :- गुरुकुल आणि आदि बाबी आपण सारे सर्वांच्याच मदतीने प्रयत्न करत आहोत . या करिता सर्वांशी सदैव संपर्कात राहण नितांत गरजेच आहे . याकरिता आपण आपल नाव , दूरध्वनी ,इमेल आणि ठिकाण आदि गोष्टी कमेंट मध्ये नमूद करव्यात हि नम्र विनंती ! सदरहू माहिती भविष्यात आम्हास महत्वाची ठरेल संपर्काकरिता 
आपला कृपाभिलाषी ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ .

ह. भ. प. सुभाष महाराज घाडगे यांना यंदाचा सेवासम्राट गुणवंतबाबा चराटे प्रतिष्ठान यांच्या तर्फे " सेवा शिरोमणी पुरस्कार" जाहीर

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

नुकतच हाती आलेल्या वृत्ता प्रमाणे अस समझल कि आमचे आदरणीय गुरुवर्य . ह. भ. प. सुभाष महाराज घाडगे यांना यंदाचा सेवासम्राट गुणवंतबाबा चराटे प्रतिष्ठान यांच्या तर्फे " सेवा शिरोमणी पुरस्कार" जाहीर झाला . आदरणीय भाऊ अहोरात्र वारकरी संप्रदाय आणि आदि सामाजिक कार्यात कार्यरत असतात . याच कार्याची एक पावती अस आपण म्हणू शकतो २७ डिसेंबर रोजी दादर येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा आहे  त्यांना खूप खूप शुभेच्छा तथा हार्दिक अभिनंदन ..त्याचं वारकरी युवा मंचावर असलेल प्रेम आणि नेहमीच ते मार्गदर्शन करत असतात . आपल्या सर्वंच युवा मंच अर्थात वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हि भविष्यात अशा काही गोष्टी उदा : पुरस्कार ज्येष्ठ कीर्तनकार आदींचे मान्यवरांच्या हस्ते त्याच्या कार्यास पुढे नेण्याकरीता उत्साह मिळेल व त्यांचे कार्य अविरत चालेल असा आपण सारे हि प्रयास करणार आहोत . लवकरच या साऱ्या बाबी सर्वांच्या लक्षात येतील ,
तुमचा ,
अक्षय भोसले .

ज्येष्ठ अभिनेते विनयजी आपटे यांना वारकरी संप्रदाय युवा मंच तथा मित्र परिवार यांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली !

मराठी चित्रपट सृष्टीतील भारदस्त आवाज आज हरवला ..........

ज्येष्ठ अभिनेते विनयजी आपटे यांना वारकरी संप्रदाय युवा मंच तथा मित्र परिवार यांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली !
 

"सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव" - वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्र राज्य

"सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव"
१२ ते १५ डिसेंबर २०१३
स्थळ- न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग


कार्यक्रम पत्रिका
१२ डिसेंबर(गुरुवार)-
दुपारी ०३.३० ते रात्री १०.००
१.मधुकर धुमाळ (सनई)
२.डॉ. रेवा नातू (गायन)
४.संजीव अभ्यंकर व अश्र्विनी भिडे-देशपांडे (जसरंगी गायन जुगलबंदी)
५.उस्ताद निशात खाँ (सतार)
६.पं.अनिंदो चटर्जी (तबला)
७.गानमार्तंड. पं.जसराज (गायन)
१३ डिसेंबर (शुक्रवार)
दुपारी ०४.०० ते रात्री १०.००
१.वसीम अहमद खाँ (गायन)
२.पं.उल्हास बापट (संतूर)
३.नृत्यांगना शोवना नारायण(नृत्य)
४.बेगम परवीन सुलताना (गायन)
१४ डिसेंबर (शनिवार)
दुपारी ०३.३० ते रात्री १०.००
१.हरीश तिवारी (गायन)
२.ईंद्राणी मुखर्जी (गायन)
३.प्रवीण गोडखिंडी (बासरी) व आर.कुमरेश (व्हायोलिन) (जुगलबंदी)
५.राजा काळे (गायन)
६.मालिनी राजूरकर (गायन)
१५ डिसेंबर (रविवार)
सत्र १ ले सकाळी ०८.०० ते दुपारी १२.००
१.ऊपेंद्र भट (गायन)
२.जयंती कुमरेश (वीणा)
३.पं.अजय चक्रवर्ती (गायन)
१५ डिसेंबर (रविवार)
सत्र २ रे दुपारी ०४.०० ते रात्री १२.००
१.मीरा प्रसाद (सतार)
२.गुलाम नियाझ खाँ(गायन)
३.अर्शद अली खाँ (गायन)
४.कौशिकी चक्रवर्ती (गायन)
५.राजीव तारानाथ (सरोद)
६.डॉ.प्रभा अत्रे (गायन)
तिकीटे दिनांक ५ डिसेंबर पासून खालील ठीकाणी उपलब्ध आहेत.
१.शिरीष ट्रेडर्स (कमला नेहरू उद्याना समोर)
२.नावडीकर म्युझिकल्स (कोथरूड)
३.दिनशाँ अँड कंपनी (लक्ष्मी रोड)
४.बेहरे बंधू आंबेवाले (शनिपाराजवळ)
वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सर्व काल्प्रेमी आणि रसिक सर्वांनाच हि माहिती जास्तीत जास्त मिळावी या करिता आमचा छोटा प्रयत्न .
 आपण हि माहिती आपल्या जास्तीत जास्त मित्र परिवार पर्यंत कलाप्रेमी कालारासिका पर्यंत पोहचवावी हि विनंती .

एकमेका सहाय्य करू... अवघे धरू सुपंथ....मात्र चांगल्या समाज उपोयोगी तत्वांसाठी , लोक जनजागृती संतांची वाचन घरो घरी पोहचवण्यासाठी ...

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

जादू टोणा विरोधी कायदा हा ७०० वर्षापूर्वी संतानी केलेल्या लोकजागृतीचा खरा विजय आहे . सर्व वारकरी एकत्र होते आहेत आणि पुढे हि राहतील ! हि गोष्ट अपवाद कि काही मतभेद असतील मात्र वारकरी हे नेहमीच एकत्र आहेत हे सर्वांनी निट लक्षात घ्यावे .. एकमेका सहाय्य करू... अवघे धरू सुपंथ....मात्र चांगल्या समाज उपोयोगी तत्वांसाठी , लोक जनजागृती संतांची वाचन घरो घरी पोहचवण्यासाठी .... 
आता हि गोष्ट वेगळी कि मला माझ्या ज्येष्ठ मार्ग्दर्ष्कानी सांगितली कि ज्या झाडाला फळ असतील माणस तय्लाच दगड मारतात ..आपण आपल काम करत राह्यचं काय मग भगत काय सामील व्हा ....आपण हि आणि इतरांना हि सांगा हा कायदा धर्म बुडवणारा नसून धर्म वाचवणारा आहे आता ज्यांना भीती आहे या कायदायची ती का आणि कशा बद्दल त्यांच्या विषयी आम्ही बोलन चुकीच राहील आपण सर्व तितके सुज्ञान तर आहातच ..समझने वालो को इशारा काफी ..... ..हा कायदा वारकरी यांचं विरोधात तर बिलकुल नाही मुळात यात विरोध वारकरी यांनी कराव अस काहीच नाही मात्र काही केवळ नाव लौकिक किवा इतर काही आदि गोष्टी करिता करत असतील विरोध .......काल पासून आम्ही ऐकतोय कि म्हटल जात आहे अस कि तुम्हाला किती लख भेटले याला पाठिंबा देण्याकरिता ...किती हास्यसपद आहे असो ., ज्यांना वाट अस न तर त्यांनी आम्हाला मिळवून दयाव कारण त्यांना अनुभव दिसतोय अस काही करण्याचा  हा हा हा ..उगचच काही भलते आरोप करत बसू नये ..इतकच असेल तर माहितीचा अधिकार आहे करा वापर त्याचा आणि करा सिध्द अरूप कोणी अडवल नाही लोकशाही आहे ! मात्र प्रथम सिद्ध करा आणि मगच बोला आणि विचार करून बोला ..असो वारकरी एकत्र आहेत होते आणि कायम असतील ! आणि नक्कीच जयंचा विरोध आहे ते हि समझुन घेऊन उशिरा का होईना या ला पाठिंबा देतील तय्नच नेहमी स्वागतच असेल  ,
तुमचा
अक्षय भोसले .

भोंदू लोकां विषयीच परखड मत तुकोबाराय मांडतात आपल्या अभंगातून...

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
भोंदू लोकां विषयीच परखड मत तुकोबाराय मांडतात आपल्या अभंगातून ... “भगव्या वस्त्रावरूनच एखाद्याला साधू म्हणायचे तर कुत्र्याचा रंगही 

भगवाच असतो.” 
“केवळ जटा वाढवल्या, दाढी राखली म्हणजे कुणी साधू होत नसतो
तसे असते तर मग केसाळ शेपटी असणार्र्या कोल्ह्यालाही साधू 
म्हणणे भाग पडेल.”
“एखाद्याने डोंगरात गुहा तयार करून त्या ठिकाणी वास्तव केले,
म्हणजे तो काही साधू होत नाही. तसे झाले तर मग गुहेत, 
बिळात राहणार्र्या उंदराला सुद्धा साधुत्वाची पदवी द्यावी लागेल.”
वरवर साधुत्वाची लक्षणे धारण करून साधुत्वाचा आव आणणार्र्या
भोंदूला साधुसंत समजणे चुकीचे आहे .
आणि मुळात मुद्दा हा आहे कि वारकरी या कायद्याला वरोध करतात मात्र आपणास आम्ही सांगू इच्छितो कि आम्ही संत वचनावर विश्वास ठेवतो , जस कि तुकाराम महराजांनी सांगितल कि वरील अभंगात कि जे भोंदू आहेत अशा भोंदू बाबा बुवा करिता हा कायदा आहे . वारकरी संप्रदायात अशा लोकांना स्थान नाही हे आम्ही हि म्हणतोच मात्र आमच्या आधी आमचे तुकोबाराय म्हणतात आपल्या अभंगा तून कि हे सर्व खोटेपणा आहे , आणि मुळात जे वारकरी आहे त्यांनी घाबरायचं कारणच उरत नाही , त्यामुळे वारकरी याला विरोध कस काय करू शकतील आणि जे करतील ते ???.........तुम्हाला अस वाटल मी पुढे काही बोलीन अहो समझुन जा आपण सुज्ञान आहात .......अहो वेळ आली तर भले तर देऊ कासेची लंगोटी , नाठाळाच्या माथी हनु काठी असा संप्रदाय आहे त्यांना पाठीशी घालणारा नाही बस इतकच ...सर्व वारकरी वर्गाने याला नक्कीच जास्तीत जास्त पाठिंबा द्यावा ....
आपला कृपाभिलाषी ,
अक्षय भोसले .

जगद्गुरू तुकोबराया त्यांच्या सम कालीन काळात पाहेलेली फसवे गिरी भोंदू गिरी आपल्या अभंगातून सांगतात

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
वारकऱ्यांच्या पदराआडून काही समाजविघातक शक्ती जादू टोणा विधेयकाला विरोध करीत आहेत हे आपणास बारकाइने पाहिल्यास लगेचच समझुन येईल ..

स्वत : जगद्गुरू तुकोबराया त्यांच्या सम कालीन काळात पाहेलेली फसवे गिरी भोंदू गिरी आपल्या अभंगातून सांगतात .ते आपल्या पुढे मांडण्याचा एक छोटा प्रयत्न ..कायद्यातील एक नव्हे तर अनेक विधयेक कलमांना तुकोबांचे अभंग प्रमाण आहेत . ते आपण पाहू चित्रमय रूपाने  कशा प्रकारे हा कायदा म्हणजे संतवचन पाहूनच बनवलेला आहे हे आपणास कळून येईल लगेचच  ,
तुमचा 
अक्षय भोसले .

जादू टोणा विधेयकाला वारकरी संप्रदायाचा विरोध असल्याचा अभास निर्माण केला जातोय .

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
जादू टोणा विधेयकाला वारकरी संप्रदायाचा विरोध असल्याचा अभास निर्माण केला जातोय . 

सातशे वर्षांपूर्वी नामदेव, ज्ञानदेवांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर सुरू केला. समतेची चळवळ अभारली असा वारकरी संप्रदाय या विधेयकाला विरोध करू शकत नाही. जे ज्ञानोबा-तुकोबांच्या विचारांना विरोध करतात ते वारकरी असू शकत नाही . यालाच प्रमाणभूत विधेयकातील प्रत्येक कलमाला अनुसरून त्यास संतांच्या अभंगाचे प्रमाण आपल्या पुढे सादर करतोय ....कारण हा कायदा म्हणजे संतानी मांडलेल्या विचारांचा विजय आहे . बोला `पुंडलिक वरदे हरी विठ्ठल' श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज कि जय . सब संतन कि जय ..!
अशा व्यक्त करतो कि आपण सर्व वारकरी गुरुवर्य बंधू भगिनी ज्येष्ठ विचारवंत यास पाठिंबा द्याल ...
तुमचा ,
अक्षय भोसले .
 

तेचि संत तेचि संत - बाबामहाराज सातारकर

तेचि संत तेचि संत
- बाबामहाराज सातारकर


जगद्गुरू तुकोबारायांचा महिमा वाढवण्याकरता
श्रीहरीने वह्या तारण्याचा चमत्कार घडवून आणला .
निळोबा महाराज संतांची लक्षणे सांगताना म्हणतात ,
तेचि संत तेचि संत। ज्यांचा हेत विठ्ठलीं।
नेणती कांहीं टाणाटोणा। नामस्मरणावाचुनी।।
टाणाटोणा करतात , अंगारा , धुपारा देतात ,
त्यांना वारकरी संप्रदायाच्या परंपरेत कोठेच स्थान
नाही ; कारण इतर मंडळींची साधना ही केवळ
रिद्धीसिद्धी प्राप्तीकरता असते आणि त्या
रिद्धिसिद्धीच्या आधारे लोकांच्या वर वर्चस्व
स्थापून त्यांचे शोषण करणे हाच त्यामागील हेतू दिसतो
. त्यात लोककल्याणाचा अभावच दिसून येतो आणि
म्हणूनच या रिद्धीसिद्धीचा उपयोग काही
काळापर्यंतच होतो , मग त्यांचे सत्त्व कमी कमी होत
जाते . पुण्याची पाउटी सरल्यानंतर जसे स्वर्गातून
खाली हाकलून दिले जाते , तसे रिद्धिसिद्धीचा
अनाठायी उपयोग केल्यामुळे त्यांचे सत्त्व कमी होते .
मग लोकांना उलटे अनुभव येऊ लागतात . त्यामुळे ते म्हणू
लागतात , महाराजांकडे पूवीर् ताकद होती . पण आता
काही तसे शिल्लक राहिले नाही . म्हणून प्राप्त
झालेल्या शक्तीचा कशासाठी उपयोग करायचा हे जर
कळले नाही तर ज्या रिद्धिसिद्धीने त्यांना यश
प्राप्त झाले , तीच रिद्धिसिद्धी त्यांच्या नाशाला
कारणीभूत होते .
जारण - मारण , उच्चाटण करणारे मांत्रिक सूर्यग्रहण
, चंदग्रहण या काळात खूप कठोर साधना करत असतात
. त्यांच्या मनासारखा मोबदला त्यांना मिळाला की ,
ज्या व्यक्तीचा आपला संबंध नाही , त्याचे वाईट
करायला ते मागेपुढे पाहत नाहीत . पण अशा
माणसांचा शेवट अत्यंत वाईट होतो , अशी कित्येक
उदाहरणे पाहायला मिळतात . पण संत जी नामसाधना
करीत असतात ती सर्वश्रेष्ठ असल्यामुळे रिद्धिसिद्धी
त्यांच्या दारात हात जोडून उभ्या असतात .
आवडेल जीवा जीवाचिये परी। सकळा अंतरीं एक भाव।।
तुका म्हणे कृपा केली नारायणें। जाणिजे तें येणें अनुभवें।।
रामेश्वरभटांनी तो अभंग हातात घेतल्याबरोबरच ,
त्यांची निम्मी व्यथा कमी झाली आणि अभंगातील '
होतील शीतळ अग्निज्वाळा ' हे चरण वाचल्याबरोबर
त्यांच्या अंगाचा संपूर्ण दाह कमी झाला आणि त्यांना
अंतर्बाह्य शीतलता प्राप्त झाली . हा आगळावेगळा
अनुभव रामेश्वरभटांनी स्वत : च अतिशय प्रांजळपणे
आपल्या अभंगात व्यक्त केला आहे . तो मुळातूनच
पाहण्यासारखा आहे . ते सांगतात ,
माझी मज आली रोकडी प्रचित। होऊनि फजित दु : ख
पावें।।
कांहीं द्वेष त्याचा करितां अंतरीं। व्यथा या शरीरीं
बहुत जाली।।
ज्ञानेश्वरें मज केला उपकार। स्वप्नीं सविस्तर
सांगितले।।
तुका सर्वांश्रेष्ठ प्रिय आम्हां थोर। कां जे अवतार
नामयाचा।।
त्याची तुज कांहीं घडली रे निंदा। म्हणोनि हे बाधा
घडली तुज।।
आतां एक करी सांगेन तें तुला। शरण जाई त्याला
निश्चयेशीं।।
दर्शनेचि तुझ्या दोषा परिहार। होय तो विचार
सांगितला।।
तोचि हा विश्वास धरूनि मानसी। जाय कीर्तनासी
नित्यकाळ।।
म्हणे रामेश्वर त्याच्या समागमें। जालें हे आराम देह
माझें।।
अंगाचा दाह अशा प्रकारे शमल्यानंतर रामेश्वरभट
तुकोबारायांच्या दर्शनाला निघाले . तुकोबारायांना
हे कळल्यानंतर महाराज स्वत : होऊनच त्यांना
भेटण्यासाठी निघाले . महाराजांचे मन किती निर्मळ ,
मृदुमधुर , द्वेष - मत्सररहित होते याची साक्ष या
घटनेतून सहज पटावी . महाराजांना वाटले रामेश्वरभट
उच्चवणीर्य , विद्वान ब्राह्माण . मग त्यांनी
आपल्यासमोर यावे आणि दहा माणसांत शरण येऊन आपले
पाय धरावे हे योग्य होणार नाही . तेव्हा आपणच
गावाबाहेर जाऊन त्यांना भेटावे .
अर्ध्या रस्त्यांतच रामेश्वरभटांची व तुकोबारायांची
भेट झाली . महाराजांना पाहून त्यांचा सूक्ष्म असा जो
वर्णाभिमान तोही पूर्ण नाहीसा झाला आणि त्यांनी
महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातले . तेव्हा
ते म्हणाले , '' तुकोबाराय , आपण पांडुरंगाचे श्रेष्ठ
भक्त असून , महावैष्णव आहात . '' तुकोबाराय म्हणाले ,
'' मला काही कळत नाही . मी हीन यातीमध्ये , हीन
कुळात जन्माला आलो . '' त्या वेळी रामेश्वरभट म्हणाले
, '' वैष्णवाची याती वाणी जो आपण। भोगी तो पतन
कुंभपाकीं। ' ते पुढे म्हणतात ,
उंच निच वर्ण न म्हणावा कोणी। जें का नारायणीं
प्रिय जालें। चहूं वर्णांसी हा असे अधिकार। करिता
नमस्कार दोष नाहीं। आणि शेवटी सांगतात , ' म्हणे
रामेश्वर नामीं जे रंगले। स्वयेंचि ते जाले देवरूप। ' त्या
वेळेस तुकोबारायांचे चरण धरून रामेश्वरभटांनी त्यांची
खूप स्तुती केली व उर्वरित आयुष्य तुकोबारायांच्या
संगतीतच काढण्याचा निश्चय त्यांनी केला
जादू-टोणा विरोधी कायद्याला पाठिंबा देण्यासाठी 
आझाद मैदानावर वारकऱयांची दिंडी
आळंदी येथील बैठकीत वारकरी संघटनांनी घेतला निर्णय

.
मुंबई (प्रतिनिधी) : जादू-टोणा विरोधी कायदा हा वारकरी संतांनी सातशे वर्षे केलेल्या लोकजागृतीचा विजय असून या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या नेतृत्वाखाली राणीबाग ते आझाद मैदान दरम्यान दिंडी निघणार असल्याची माहिती वारकरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शामसुंदर महाराज सोन्नर यांनी दिली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळय़ाच्यानिमित्ताने लाखो वारकरी आळंदी येथे दाखल झाले आहेत. बुवाबाजी करणाऱया काही लोकांनी वारकऱयांचा या कायद्याला विरोध असल्याचा अभास निर्माण केला आहे. त्यासाठी वारकरी संप्रदायातील काही बोगस धर्माचार्यांना हाताशी धरून कायद्याविरोधात अपप्रचार सुरू केला आहे. त्यामुळे वारकऱयांच्या मनामध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळय़ानिमित्त आळंदीमध्ये `ज्ञानेश्वर महाराज साधक आश्रम' येथे गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध वारकरी संघटनांची बैठक झाली. या बैठकीत तुकाराम महाराज सांगळे यांनी हा कायदा वारकरी किंवा हिंदुपरंपरेच्या कुठेही विरोधात कसा नाही याबाबत कायद्याच्या प्रत्येक कलमाचे विवेचन करून सांगितले. वारकऱयांनी उपस्थितीत केलेल्या प्रत्येक शंकेचे निरसन शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले. वारकरी संप्रदायामध्ये धर्माचार्य अशी कोणतीही पदवी नसताना अशी बोगस पदवी लावून फिरणारे लोक बुवाबाजी करणाऱयांची सुपारी घेऊन या कायद्याला विरोध करीत असल्याचे गोविंद महाराज साळेकर यांनी सांगितले. अशा बोगस धर्मांच्या भुलथापांना बळी न पडता वारकऱयांनी या कायद्याच्या बाजूने उभे राहावे, असे आवाहन साळेकर यांनी केले.
जादू-टोणा विरोधी वट हुकामाचे कायद्यात रुपयांतर व्हावे या मागणीसाठी विविध संघटनांचा मोर्चा 2 डिसेंबर रोजी भायखळा येथील राणीबाग पासून आझाद मैदानापर्यंत निघणार आहे. या मोर्चामध्ये दिंडीने सहभागी होऊन वारकरी या कायद्याच्या विरोधात नसल्याचा संदेश आम्ही देणार आहोत. वारकरी संतांच्या विचारांना वंदन करणाऱया प्रत्येक वाकऱयांनी या दिंडीत सहभागी व्हावे, असे आवाहन शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले आहे.
.
संपर्क :
शामसुंदर महाराज सोन्नर - 9594999409
तुकाराम महाराज सांगळे - 9892166470
अक्षय महाराज भोसले -Akshay Bhosale
8451822772

" ज्ञानदा "...एक सांगितिक कार्यशाळा

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

माउली कृपेने गुरुकृपेने लवकरच आपल्या सर्वान पुढे एक सुंदर अशी कार्यशाळा अर्थातच वारकरी संप्रदाय युवा मंच , महराष्ट्र राज्य प्रस्तुत " ज्ञानदा "...एक सांगितिक कार्यशाळा आपल्या भेटीस येत आहे . सदरहू कार्य शाळेत सर्वच कलावंताना गायन तथा वादन कलेतील दिग्ज्ज गुरुवर्य यांच्या मार्फत मार्गदर्शन पर दोन दिवसीय कार्यक्रम ..दिवसातून चार सत्र ..अश्या ऐकून आठ सत्रांचा हि कार्यशाळा आहे ..
अधिक माहिती करिता संपर्क ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२
 

आदरणीय पू.ल. देशपांडे यांनी आदरणीय भीमसेनजींची एक मुलाखत

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

काही दिवसांपूर्वी माझ्या हाती अत्यंत जुनी अशी आदरणीय पू.ल. देशपांडे यांनी आदरणीय भीमसेनजींची एक मुलखत असलेली ध्वनीफीत माझ्या हाती आली ..त्यातलाच थोडा भाग आपल्या पुढे मांडण्याचा छोटा प्रयत्न ..! 
त्यात आदरणीय पुलजीनि सांगितलेले गोष्ट आपल्या पुढे मांडतोय क्षमा करा काही चूक भूल झाली तर ..
वंदनीय रामकृष्णबुवा वझे तथा वझेबुवा (२८ नोव्हेंबर, इ.स. १८७४ - ५ मे, इ.स. १९४५) हे ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातकीर्त गायक आणि मराठी संगीत नाटकांचे संगीतकार होते. वझेबुवांची धृपद, खयाल, ठुमरी आदि गायनप्रकारांवर हुकमत होते असे व्यक्ती तथा आपले सर्वांचे लाडके आदरणीय वंदनीय या दोन्ही कलावंत हे अविस्मरणीय असे आणि पूजनीय वंदनीय असे आहेत ..भीमसेनजिना गायनाचे संस्कार त्यांच्या आई कडून प्राप्त झाले . भीमसेन जी साधरणता : १० ते १२ वर्षाचे असताना त्यांना गायन विषयी फार जिज्ञासा होती मी फार जबाबदारीने शब्द वापरतोय जिज्ञासा ...छंद वेगळा आणि जिज्ञासा वेगळी छंद कालांतराणे बदलू शकतो मात्र जिज्ञासा हि त्याच्या मुलाशी जावूनच संपते ..ती जिज्ञासा आदरणीय पंडित जिंकडे होती ....त्यांना शालेय शिक्षणात इतका रस नवता मात्र संगीत म्हणजे जीव त्यांचा .. ते जेव्हा घरून संगीत शिक्षणा करिता निघाले त्यांच्याकडे अत्यंत कमी पैसे त्याकाळात साधरणत पुणे लाच घरून येईपर्यंत त्यांचे पैसे संपले होते मात्र परिस्थिती ला न जुमानता त्यांनी एक कल्पना केली हि गोष्ट आदरणीय रामकृष्णबुवा वझे आणि भीमसेन जी यांच्या संदर्भात सामाईक आहे ती अशी कि सुरवातीच्या काळात अत्यंत बिकट परिस्थती होती ते आसतील तितक्या पैशांची तिकीट काढत बस अथवा रेल्वेची ..आणि तिकीट संपल कि वझे बुवा स्टेशन वर कापड पसरून बसायचे आणि गायन करयचे आणि सर्वाना वाट्याच कि अरे रे भिकारी मुलगा असून हि चांगल गातोय कि ,काही रसिक लोक पैसे द्यायचे पुरेशी तिकटी पुरते पैसे जमा झाले कि लगेच पुढे वाटचाल अस त्यांना प्रवास केला .., आदरणीय भीमसेनजिनी तर हे हि सांगितल कि कित्येकदा तुरुंगात हि गेलो तिकीट नसल्यामुळे , तिथे हि साहेबाना थोड काही गान ऐकवल कि सूट भेटायची कि पुन्हा पुढच्या गावी अस दरमजल करत ते त्याकाळी ग्वाह्लेर ला पोहचले ..सांगायचं तात्पर्य इतकच कलाकार मोठे दिसतात पण त्यांनी त्याकरिता घेतलेली मेहनत त्यांची कलेवर असलेली श्रद्धा हि आत्यंतिक महत्वाची ...असे कितीतरी कलाकार आपल्या महराष्ट्रातील खेड्यापाड्यात शहरात असतील मात्र परिस्थितीमुळे त्यांना कलेची आवड असूनही शिक्षण घेता येत नाही ..अशा सर्वच क्षेत्रातील कालकार वर्गाकरिता महराष्ट्र सरकार द्वारे आपल्या महाराष्ट्र राज्यात एक मोठ अस कलेच दालन ज्यालाच आपण सारे गुरुकुल असे म्हणतो ते आदरणीय सरकारने लवकरात लवकर बनवाव सध्या त्याच प्रस्ताव बनवण्याचं कार्य दिग्ज्ज पंडित सामजिक संस्था इतर सर्वांच्या सहकार्याने चालू आहे आपला सर्वांचा पाठिंबा आम्हास मिळावा हि अपना सर्वांस नम्र विनंती ..लाखो प्रतिभावंत कलाकार यामुळे प्रकाश झोतात येतील तुमच या विषयीच काय मत आहे नक्कीच कळवा लवकर आम्हास
तुमचा कृपाभिलाषी ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२
|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
प्रथम तर वंदनीय पूजनीय गुरुवर्यांना चरण स्पर्श ! 


‘‘आता हृदय हे आपुले, चौफाळूनिया भले, वरी बैसवू पाऊले, श्रीगुरूंची’’ माऊली म्हणतात, माझ्या सद्गुरू निवृत्तीनाथांची पावले जमिनीला लागू नयेत म्हणून मी माझे हृदय त्यांच्या पायाखाली पसरतो .....अगदी तशी भावना श्री गुरुंविषयी मनात आहे गुरुवर्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
 
|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

नुकतच काही दिवसांपूर्वी कलाक्षेत्रातील दिग्गज आदरणीय पंडितजी माणिकजी मुंडे यांना भेटण्याचा योग आला . त्यांच्याशी किमान ३ ते ४ तास संभाषण झाल . त्यांच्या बोलण्यातून एक दृष्टीक्षेपात आल त्यांनी एक खंत व्यक्त केली कि आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अनेक नामवंत दिग्गज कलाकार आहेत .उदाहरणार्थ तालयोगी सुरेशजी तळवलकर , डॉ. प्रभाताई जी अत्रे , विजय जी घाटे असे अनेक हजोरो नामवंत आणि श्रेष्ठ कलाकार( शास्त्रीय संगीत , पखवाज , तबला व इत्यादी कलाक्षेत्र ) आहेत आणि सर्वांकडे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी ची संख्या पुन खूप आहे मात्र ते स्वतंत्र शिक्षण पद्धती ..अगदी मुंडे गुरुजीन सहित मात्र अस काही स्थळ ठिकाण असावं आपल्या राज्यात कि जिथे सर्व दिग्गजांचा एकत्रित वावर असेल ..जास्तीत जास्त प्रमणात हे ज्ञान सर्वोतोपरी तळागाळातील कालारासिकापर्यंत पोह्चो काल्प्रेमीन पर्यंत पोह्चो ..सर्व दिग्गज मंडळींचे बाहेर विदेशात तेथील सरकार त्यांना मदत करते तिथे त्यांचे गुरुकुल आहेत मात्र ज्या भूमीत त्या कलेचा खरा उगम आहे तिथे मात्र त्यासाठी विशेष अस काहीच कस नाही ? आता लवकरच पुणे मुंबई तथा उर्वरित संपूर्ण महारष्ट्रातील ज्येष्ठ मान्यवर कलाकार दिग्ज्ज मंडळींशी या वर चर्चा करून काही ठोश पावल आम्ही उचलणार आहोत या कार्याकरिता आपल्या सर्वंचे आशीर्वाद व पाठिंबा मिळावी हि नम्र अपेक्षा ! हे कार्य कोणाच वैयक्तिक नाही समज कार्य आहे आणि सर्वच जन याचा एक प्रमुख घटक आहे अशा करतो आपण सर्व याला नक्कीच पाठिंबा द्याल 
तुमचा ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२
( टीप :- ज्यांना यास पाठिंबा दयाव अशी इच्छा असेल त्यांनी नक्कीच हि पोस्ट सर्व कलाप्रेमी कलारसिक व जाणकार संगीत श्रोत्यापर्यंत हि गोष्ट नक्कीच पोहचवावी )