Friday 3 February 2017

प.पू. ह.भ.प.श्रीमारूतीमामा कराडकर यांचे देहावसान ..!

मारूतीबोवा कराडकर मठाचे मठाधिपती मारूतीमामा कराडकर यांचे आज शुक्रवारी सायंकाळी प्रदीर्घ आजाराने देहावसान  झाले. ते ६५ वर्षाचे होते.

सुमारे दिडशे वर्षे वारकरी संप्रदाय परंपरा असलेल्या मारूतीबोवा मठाचे ते गेली पाच वर्षे पासून मठाधिपती होते. वारकरी संप्रदायात शेकडो वर्षाची परंपरा असलेली देहू, आळंदी आणि पंढरपूर अनेक वार्‍या त्यानी पायी केल्या होत्या. भगवान मामाच्या प्रेरणेतून  मठाधिपती म्हणून त्यानी कराड मठाची परंपरा कायम ठेवली आणि वाढवली. मामाच्या पश्चात पारायण सोहळ्यात  व्याख्यानमाला आयोजित करून त्यांनी नवा उपक्रम राबविला होता. मारूती मामाच्या देहावसानानंतर कराड मठावर आणि  वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

गुरूवर्य महाराज म्हणजे वैराग्यमूर्ती.
आजन्म संप्रदायाची निष्ठेने सेवा केली.
सद्गुरू भगवानमामा कराडकर महाराजांच्या पश्चात महाराज गादीवर बसले.
पूर्वाश्रमी ही ते ब्रह्मचारी होते. उत्तम वैद्य व विविध आजारांवर  आयुर्वेदीक औषधे देण्यात ते निष्णांत होते. गुरूवर्य तात्या व महाराज हे लहानपणीचे सवंगडी-  गुरूबंधू.
आळंदी- पंढरीची नियमांची वारी. फड परंपरा मोठ्या निष्ठेने सांभाळली.  या दिव्य परंपरेला साजेसे वर्तन.
मितभाषी-  अत्यंत सेवाभावी वृत्ती, भजननिष्ठ  असा हे योगी आज  आम्हा सर्वांना पोरके करून निजधामाला गेले.....

आता गुणांचे वर्णन करणे फक्त परमात्माने आपल्या हातात ठेवले आहे.
गेले दिगंबर ईश्वर विभूती |
राहिल्या त्या किर्ती जगामाजी||
वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी|
आता ऐसे कोणी होणे नाही||

मारूती बुवा यांचे पार्थिव शनिवार दिनांक ०४ रोजी सकाळी ०९ते १२ दरम्यान मठात  अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर कृष्णा घाटावर त्याचा अंत्यविधी करण्यात येणार आहे. वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र यांच्यावतीने पूज्य महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत व भावपूर्ण श्रद्धांजली ..!

  -शोकाकुल
वाराकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांना विवेकानंद समाजरत्न पुरस्कार २०१७ ..!