Wednesday 13 July 2016

नामदेव पायरी - श्री क्षेत्र पंढरपूर

नामदेव पायरी-
अशी आख्यायिका सांगतात की संत नामदेवांनी श्री पांडुरंगाला सांगितले की, " हे भगवंता! मला तुमचे वैकुंठपद नको त्यापेक्षा इथे येणार्‍या सर्व भक्तांच्या पायधुळ मला लागेल अशी जागा द्या". असे म्हणुन संत नामदेवांनी मंदिराच्या पायरीकडे बघितले तर ती भुमी एकदम दुभंगली. या वेळी भगवंत पांडुरंग संत नामदेवास म्हणाले की, " हे नामा,तुला ही भुमी दिली. माझ्या दर्शनास येणार्‍या भक्तमंडळीची पायधुळ तुला लाभेल." नंतर पांडुरंगास नामदेवांनी नमस्कार केला आणि त्या दुभंगलेल्या भुमीमध्ये उडी टाकली.त्याचवेळी तिथे असलेल्या संत नामदेवांच्या मंडळींनी उड्या घेतल्या. सर्व लोक बघत असतानाच भुमी एकदम पहिल्याप्रमाणे झाली.
         ही घटना शके १२३८ आषाढ वद्य त्रयोदशीस झाली. संत नामदेवांसह त्यांच्या परिवारातील ज्या १४ जणांनी उड्या घेतल्या त्यात त्यांची आई गोणाई,वडिल दामाशेटी,पत्नी राजाई,चार पुत्र श्रीनारायण,श्रीविठ्ठल,श्रीगोविंद,श्रीमहादेव तसेच तिघी सुना गोडाई,येसाई,मखराई,मुलगी लिंबाई, बहिण आऊबाई,संत नामदेवांच्या दासी आणि शिष्या संत जनाबाई यांचा समावेश होता. या ठिकाणी पुजेकरीता सर्व लोकांनी पायरी केली आहे या पायरीस संत नामदेव पायरी असे म्हणतात.

Varkariyuva.blogspot.in

श्री माऊलींचे वाखरी येथील शेवटचे गोल रिंगण संपन्न !

बाजीरावाची विहीर येथे माऊलींचे २ रे उभे रिंगण संपन्न !

श्री क्षेत्र पंढरपूर पालखी आगमन क्रम

पंढरपूरमध्ये येणाऱ्या मानाच्या  पालख्यांचा क्रम
१) संत नामदेव
२) संत मुक्ताबाई
३) संत सोपानकाका
४) संत निवृत्तीनाथ
५) संत एकनाथ
६) संत तुकाराम
७) संत ज्ञानदेव
पुर्वी संत ज्ञानदेवांकडुन वाखरी येथे संत मुक्ताबाईला साडीचोळीचा आहेर दिला जात असे . त्यावेळी सोहळा लहान होता . आता सोहळा वाढल्यामुळे तो व्दादशी दिवशी मुक्ताबाई मठात जावुन आळंदी संस्थांनच्या वतीने दिला जातो . ती साडी चोळी मुक्ताईला दिवाळीत भाऊबीजेला नेसवली जाते .

सद्गुरू श्रीभानुदासमहाराज देगलूरकर प्रथम पुण्यतिथी महोत्सव ,श्री क्षेत्र पंढरपूर

।। श्रीपांडुरंग ।।
।। सद्गुरू श्रीगुंडामहाराज समर्थ ।।

सद्गुरू श्रीभानुदासमहाराज देगलूरकर प्रथम पुण्यतिथी महोत्सव ,श्री क्षेत्र पंढरपूर

प्रारंभ : आषाढ वद्य ७ , शके १९३८ , मंगळवार , दि.२६/०७/२०१६
समारोप : आषाढ वद्य ३० , शके १९३८ , मंगळवार , दि.०२/०८/२०१६

सप्रेम नमस्कार ,
प.पु.वै.सद्गुरू श्रीभानुदासमहाराज देगलूरकर यांची प्रथम पुण्यतिथी  आषाढ वद्य १४ , सोमवार दि.१ ऑगस्ट २०१६ रोजी आहे .श्री सद्गुरुंच्या  प्रथम पुण्यस्मरण महोत्सवाचे निमित्ताने श्रीपंढरीशाच्या सानिध्यात , श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढ  वद्य ७ , मंगळवार , दि.२६/०७/२०१६ ते आषाढ वद्य ३० मंगळवार , दि ०२/०८/२०१६ या कालावधीत श्री भगवन्नामसंकीर्तन महोत्सव संपन्न होत आहे .या महोत्सवामध्ये वारकरी संप्रदयातील मान्यवरांची कीर्तने व प्रवचने होणार आहेत. आपण या महोत्सवात सहभागी होऊन घडणाऱ्या भक्तीज्ञान प्रसादाचा लाभ घ्यावा .

महोत्सवातील नित्याचे कार्यक्रम -
प्रातःकाळी
०४.०० ते ०५.३०  - काकडा भजन , विष्णुसहस्त्रनामपाठ
सकाळी
०६.०० ते ०९.०० - श्री ज्ञानेश्वरी पारायण
                         (व्यासपीठ : ह.भ.प.एकनाथमहाराज कोष्टी , आळंदी )
०९.०० ते १०.०० - श्री तुकाराममहाराज गाथा प्रवचन
१०.०० ते १२.०० - कीर्तन
सायंकाळी
०४.०० ते ०५.०० - सामुदायिक हरिपाठ
०५.०० ते ०६.३० - श्री ज्ञानेश्वरी प्रवचन व मान्यवरांचे प्रवचन
रात्री
०७.०० ते ०७.३० - आरती
०७.३० ते ०९.३० - कीर्तन

भजन मार्गदर्शन - ह.भ.प.श्री रामचंद्रबाबा बोधे  , आळंदी
  ह.भ.प.श्री.एकनाथमहाराज कोष्टी , आळंदी व ह.भ.प.श्री गंभीरमहाराज अवचार हे आपल्या विद्यार्थीवर्गासह उपस्थित राहणार आहेत .

सद्गुरू श्रीभानुदासमहाराज देगलूरकर प्रथम पुण्यतिथी महोत्सव ,श्री क्षेत्र पंढरपूर

श्री भगवन्नामसंकीर्तन महोत्सवातील दैनिक कार्यक्रम

मंगळवार , दि.२६ जुलै २०१६
सकाळी १०.०० ते १२.०० कीर्तन
ह.भ.प.श्री शंकरमहाराज बडवे
सायंकाळी ०५.०० ते ०६.३० प्रवचन
ह.भ.प.श्री बाळासाहेबमहाराज हरिदास
सायंकाळी ०७.३० ते ०९.३० कीर्तन
ह.भ.प.श्री केशवमहाराज नामदास

बुधवार , दि.२७ जुलै २०१६
सकाळी १०.०० ते १२.०० कीर्तन
ह.भ.प.श्री दादामहाराज शिरवळकर
सायंकाळी ०५.०० ते ०६.३० प्रवचन
ह.भ.प.श्री मारोतीमहाराज कुरेकर
सायंकाळी ०७.३० ते ०९.३० कीर्तन
ह.भ.प.श्री विठठलमहाराज वासकर

गुरुवार , दि.२८ जुलै २०१६
सकाळी १०.०० ते १२.०० कीर्तन
ह.भ.प.श्री पांडुरंगमहाराज घुले
सायंकाळी ०५.०० ते ०६.३०  प्रवचन
ह.भ.प.श्री कैवल्यमहाराज चातुर्मास्ये
सायंकाळी ०७.३० ते ०९.३०  कीर्तन
ह.भ.प.श्री संदीपानमहाराज हासेगावकर

शुक्रवार, दि. २९ जुलै २०१६
सकाळी १०.०० ते १२.०० कीर्तन
ह.भ.प.श्री ज्ञानेश्वरमहाराज कंधारकर
सायंकाळी ०५.०० ते ०६.३०  प्रवचन
ह.भ.प.श्री बद्रीनाथमहाराज तनपुरे
सायंकाळी ०७.३० ते ०९.३०  कीर्तन
ह.भ.प.श्री बाळासाहेबमहाराज देहूकर

शनिवार , दि.३० जुलै २०१६
सकाळी १०.०० ते १२.०० कीर्तन
ह.भ.प.श्री गुरुराजमहाराज देगलूरकर
सायंकाळी ०५.०० ते ०६.३०  प्रवचन
ह.भ.प.श्री योगीराजमहाराज गोसावी
सायंकाळी ०७.३० ते ०९.३०  कीर्तन
ह.भ.प.श्री मुकुंदमहाराज जाटदेवळेकर

रविवार , दि.३१ जुलै २०१६
सकाळी १०.०० ते १२.०० कीर्तन
ह.भ.प.श्री जयवंतमहाराज बोधले
सायंकाळी ०५.०० ते ०६.३०  प्रवचन
ह.भ.प.श्री गुरुबाबामहाराज औसेकर
सायंकाळी ०७.३० ते ०९.३०  कीर्तन
ह.भ.प.श्री बंडामहाराज कराडकर

सोमवार , दि.०१ ऑगस्ट २०१६
सकाळी १०.०० ते १२.००
दिंडी सोहळा , नगर प्रदक्षिणा व धार्मिक विधी
सायंकाळी ०५.०० ते ०६.३०  स्मरणिका व ग्रंथ प्रकाशन सोहळा
प्रवचन - ह.भ.प.श्री वा.ना.उत्पात
सायंकाळी ०७.३० ते ०९.३०  कीर्तन
ह.भ.प.श्री चंद्रशेखरमहाराज देगलूरकर

मंगळवार , दि. ०२ ऑगस्ट २०१६
सकाळी  ०९.०० वा काल्याचे कीर्तन , समारोप व नंतर महाप्रसाद
ह.भ.प. श्रीगुरु प.पु. चैतन्यमहाराज देगलूरकर

महोत्सवातील सर्व कार्यक्रम श्रीगुरु श्रीप्रसादमहाराज अमळनेरकर व श्रीगुरु श्रीचंद्रशेखरमहाराज देगलूरकर यांचे मार्गदर्शनाखाली होतील .

पुण्यतिथी महोत्सवातील मुख्य दिवस आषाढ वद्य १४ , सोमवार दि. ०१ ऑगस्ट २०१६ हा आहे . या दिवशी सायंकाळी पु.तीर्थरूप वै.सद्गुरू भानुदासमहाराज देगलूरकर यांचे प्रथम पुण्यस्मरणा निमित्त ग्रंथाचे व स्मरणिकेचे प्रकाशन होईल .

ग्रंथ व स्मरणिका प्रकाशन सोहळा
अध्यक्ष - मा. श्री सुधाकरपंत परिचारक
शुभहस्ते - ह.भ.प.श्रीप्रसादमहाराज अमळनेरकर

प्रमुख उपस्थिती : ह.भ.प.श्रीनिवृत्तीमहाराज वक्ते , ह.भ.प.श्रीरामकृष्णदास लहवितकर , ह.भ.प.श्रीउद्धवमहाराज कुकुरमुंडेकर .

स्थळ : संत श्री गजाननमहाराज मंदिर प्राकार , श्री क्षेत्र पंढरपूर , जि. सोलापूर -४१३३०४

प्रेषक -
सद्गुरू श्रीभानुदासमहाराज देगलूरकर प्रथम पुण्यतिथी महोत्सव समिती, श्री क्षेत्र पंढरपूर
देगलूरकर मठ , उत्पात गल्ली , पंढरपूर - ४१३३०४
दूरभाष - ०२१८६ - २२२७७८
- varkariyuva.blogspot.in