Saturday 11 June 2016

काळ सार्थक केला त्यांनी ।।

शेगाविचा राणा पंढरीच्या दिशेने !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

जाऊ देवाचिया गावा ।।
पंढरपूर च्या आषाढी सोहळ्यासाठी आज पहाटे समर्थ सदगुरु संत श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे राजवैभवी थाटात प्रस्थान झाले..
संस्थान चे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री शिवशंकर भाऊ पाटील यांचे हस्ते पुजन होऊन पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला..
एकुन ३५  दिवस ७०० किलोमीटर चे अंतर हे ७०० वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने पायी चालत, पावली खेळत ही वारी करतात.. मुखाने अभंगाचे गायन  विठल्लाचे नामस्मरण आणि टाळ, विना, मृदंग, शंख, तुतारी, ध्वज,पताका, मेना, घोडा, हत्ती, रथ, पालखी असा मोठा लवाजमा या पालखी सोहळ्यात असतो.

- varkariyuva.blogspot.in

चला येताय न मग वारीला ?