(सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।) एक युवा चळवळ - वारकरी वर्गाकरिता , युवा परिवर्तनाकरिता,स्वदेशी प्रेमाकरिता,आपल्या सर्वांसाठी . तुमचा माझा सर्वांचा एकच हक्काच व्यासपीठ - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य संपर्क :अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ ( मुख्य कार्यालय - मुंबई )शाखा : नवी मुंबई ,कल्याण - डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर,पुणे , सातारा , नाशिक , जळगाव , औरंगाबाद , जालना , धुळे ,रायगड , ठाणे , परभणी , नांदेड , कोल्हापूर , सोलापूर
Sunday, 13 April 2014
Friday, 11 April 2014
श्री रामचंद्रजी टेंपल ट्रस्ट , कॉटन ग्रीन कीर्तन मोह्त्सव
|| सुस्वागतम || || लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेञं रघुवंशनाथं कारुण्यरुपं करुणाकरंते श्रीरामचंद्रमं शरणं प्रपद्ये || (७५ वे अमृत महोत्सवी वर्ष)
श्री रामचंद्रजी टेंपल ट्रस्ट येणाञ्या श्री राम भक्तांचे हार्दिक स्वागत... दर्शनाची वेळ :- सकाळी ०६.३० ते १२.१५ संध्याकाळी ०५.०० ते ०९.३० दैनंदिन कार्यक्रम :- सकाळी ०६.३० काकड आरती, दुपारी ११ ते १२ भजन, संध्याकाळी ०५ ते ०६ श्री मद् भागवत कथा, संध्याकाळी ०६.३० ते ०७.३० पंचपदी आरती,राञौ ०८ ते ०९ श्री राम चरित मानस कथा... किर्तन :- दिनांक ११.०४.१४ एकादशी राञी ०८.३० ते १०.३० ह.भ.प. श्री. गणेश महाराज मंडलीक, दिनांक १३.०४.१४ रविवार सकाळी ०९ ते ११ ह.भ.प. श्री. ञ्नानेश्वर महाराज तळेकर, दिनांक १५.०४.१४ श्री हनुमान जयंती निमित्त सकाळी ०६ ते ०८ ह.भ.प. श्री. तुकाराम महाराज सांगळे, दिनांक २०.०४.१४ रविवार सकाळी ०९ ते ११ ह.भ.प. श्री. सुदाम महाराज पालवे, दिनांक २५.०४.१४ एकादशी राञी ०८.३० ते १०.३० ह.भ.प. श्री. अक्षय महाराज भोसले, दिनांक २७.०४.१४ रविवार सकाळी ०९ ते ११ ह.भ.प. श्री. श्रीरंग महाराज साळुंखे.भाविकांनी लाभ घ्यावा..... विशेष सुचना :- मंदिराची स्वच्छता व पावित्र्य राखावे... कथेच्या वेळात मोबाइल बंद ठेवावेत.आपली उपस्थिति प्रार्थनीय.... वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
Thursday, 10 April 2014
Saturday, 5 April 2014
नित्य भजन करणाऱ्या महात्म्यापेक्षा संसार व्यापार धंदा करून फावल्या वेळात नाम घेणारा खरा भक्त ठरतो - अक्षय भोसले
|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
आपण सर्वच कीर्तनात प्रवचनात अनेक ठिकाणी दृष्टांत ऐकतो . अनेक दिवसांपासून साधरणता ६ वी ला असताना पु . गुरुवर्य प्रमोद महाराज जगताप यांच्या कीर्तनाने माझी श्रवण भक्ती सुरु झाली व संप्रदायाचा एक पाईक झालो . तेव्हापासून आता पर्यंत शेकडो कीर्तने श्रवण करण्याचा योग आला . नेहमी सर्वच कीर्तनकार आपल्या कीर्तनातून अनेक कथा गोष्टी सांगत असतात ते सांगण्यामागे त्यांचा दृष्टीकोन वेगळा असतो तो म्हणजे सध्या सोप्या गोष्टीमधून मुद्दा जनसमुदायाला पटवून देणे कथे मधून शेवटी सिद्धांत सांगणे . नेमक सार काय कथेच हे अनेक साहित्यिक कीर्तनकार नेहमी सांगतात व त्यामुळे आपल्या लक्षात तो मुद्दा कायमचा राहतो असेच काहीसे दृष्टांत मुली कृपेने जे श्रवण केले ते अपना पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय . प्रत्येक आठवड्याला दर रविवारी एक दृष्टांत .
* नित्य भजन करणाऱ्या महात्म्यापेक्षा संसार व्यापार धंदा करून फावल्या वेळात नाम घेणारा खरा भक्त ठरतो .
कथा :-
एकदा नारद आपला विना व चिपळ्या वाजवीत भगवंताचे भजन करीत देवाजवळ गेले व विचारू लागले , 'देवा ! तुझा सर्वात मोठा भक्त कोण आहे ? ' कारण नारदाला असे वाटले . आपण रात्रंदिवस भगवंताचे भजन करतो तेव्हा भगवान आपणास सर्वात मोठा भक्त तूच आहेस असे म्हणतील . असे समजून नारदाने , देवाला प्रश्न केला . तेव्हा भगवंताने नारदाला सांगितले . नारद ! मृत्यूलोकामध्ये एक माझा मोठा भक्त आहे हे ऐकून नारदाला फार आश्चर्य वाटले व नारदाने देवाला म्हटले , '' तो भक्त मला पाहवयाचा आहे . '' तेव्हा तो कोठे राहतो ते संग . देवाने नारदाला त्या भक्ताचा पूर्ण पत्ता दिला . त्या प्रमाणे नारद वेश पालटून त्या ठिकाणी नारदाला एक साधा टेल - साबण आदि माल विकताना दिसला . नारद त्याचा सारा कार्यक्रम त्या ठिकाणी बसून पाहू लागला . दिवसभर त्या गृहस्थाने इमानदारीने व्यापार केला . सायंकाळी आपले दुकान बंद करून घरी गेला , परंतु नारदहि त्याच्यापाठीमागून निघाला . तो गृहस्थ घरी पोहचताच आपल्या आई वडिलांची त्यब्यतीची विचारपूस केली . नंतर लहान मुलास जवळ घेतले . त्याचे थोडे कोड कौतुक केले नंतर पत्नी मुलांसह भोजन करून झोपताना नित्याप्रमाणे भावपूर्वक भगवंताची प्रार्थना करून झोपला व सकाळी उठल्यानंतर स्नान संध्या करून नित्यप्रमाणे देवाची प्रार्थना करून दररोजच्या आपल्या उद्योगाला लागला .
नारदाने हे सर्व पाहून ते देवाजवळ गेले व म्हणाले . ''देवा ! तो गृहस्थ दिवसाला दोन वेळ तुझ नाव घेतो व सारा दिवस व्यापार धंदा करतो त्यापेक्षा मी आपले रात्रंदिवस भजन करत आहे , तेव्हा मी आपला मोठा भक्त आहे .''
तेव्हा भगवंताने नारदास एक दिवस एक दिवा तेलाने भरून दिला व सांगितले . नारदा ! हा दिवा घेऊन तिन्ही लोकातून तू फिरून ये . पण या दिव्यातील एक थेंब हि टेल सांडले नाही पाहिजे , त्यानंतर तुला मी खरा भक्त कोण ते सांगतो , नारद तो दो दिवा घेऊन तिन्ही लोकातून चक्कर मारून आले , परंतु चक्कर मारताना त्यंचे सर्व लक्ष त्या दिव्याकडे होते कारण दिव्यातील एक थेंब तेल सांडायला नको , त्यामुळे तिन्ही लोकात चक्कर मारून देवाजवळ येईपर्यंत एकदा सुद्धा देवाचे नाव नारदाला आठवले नाही .
नारद आलेले पाहून भगवंताने विचारल , ''नारदा तिन्ही लोकात चक्कर मारताना माझे नाव आपण किती वेळा घेतले ?''
तेव्हा नारद म्हणाले ,'' देवा एकदा हि नाही .'' तेव्हा भगवान म्हणाले , 'नारदा ! मी सांगितलेल्या एका कामात आपण माझे नाव एक वेळ सुद्धा घेतले नाही , तेव्हा तो साधा गृहस्थ , आपला सारा प्रपंच संभाळून . मुल बाळ यांचा बोजा घेऊन , व्यापार धंदा करतो व नेमाने दोन वेळा का होईना माझ नित्य भावपूर्वक नाव घेतो , तेव्हा तोच माझा खरा भक्त .' हे ऐकून नारद लज्जित झाले अभिमान गळीत होऊन , भगवंताला नमस्कार करून निघून गेले .
सिद्धांत :- नित्य भजन ध्यान करताना जरी दिसत आले तरी , तो खरा भक्त ठरत नाही . कारण भजन करून जर अभिमान असेल तर , खरा भक्त ठरत नाही . परंतु एखाद्या संसारी मनुष्य व्यापार - धंदा करतो व जमेल तसे ध्यानपूर्वक देवाचे नाव घेतो , तो खरा भक्त ठरतो .
हरि बोला हरि बोला नाहीं तरी अबोला । व्यर्थ गलबला करुं नका ॥
नको नको मान नको अभिमान । सोडी मी तूं पण तोचि सुखी ॥
धन्यवाद आवडल्यास नक्कीच इतरांपर्यंत पोहचवा .
आपला कृपाभिलाषी ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

श्रीराम नवमी उत्सव - अक्षय भोसले
|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
राम नवमी राम जन्माचा संत नामदेव महाराजांचा अभंग :-
उत्तम हा चैत्रमास। ऋतु वसंताचा दिवस
शुक्लपक्ष ही नवमी। उभे सुरवर योगी
माध्यान्हाशी दिनकर। पळभर होय स्थिर
सुशेभित दाही दिशा। आनंद नर नारी शेषा
अयोनी संभव नोहे काही श्रमी |
नामयाचा स्वामी प्रगटला ||
अओना सर्वाना माहीतच असेल कि ,
झाले रामराज्य काय उणे आम्हासी | धरणी धरी पिक गायी ओळल्या म्हशी ||
स्वप्नीही दुख कोणी ण देखे डोळा | नामाच्या गजरे भय सुटले कळीकाळा ||
राम राज्यात कोणास दुख नव्हते . अर्थात सर्व सुखी होते . भूमी भरपूर पिक देत होती . वेळेवर पाऊस पडत होता . गायी म्हशी भरपूर दुध देत होत्या , सर्व ऋतू अनुकूल होते . तुलसीदासांच्या भाषेत रामराज्य म्हणजे -
दैहिक दैविक भौतिक तापा | रामराज नाही काहुही व्यापा |
सब नर करही परस्पर प्रीती | चलहि स्वधर्म निरत श्रुति नीती |
चारिऊ चरण धर्म जगमाही | पुरी रहा सपनेहु अघ नाही |
अर्थ असा कि - राम राज्यात आदि भौतिक अध्यात्मिक आदिदैविक हे तिन्ही ताप नव्हते . सर्व जन एकमेकांवर प्रेम करीत होते . सर्व जन स्वधर्माने , नीतीने वर्तत होते , जसे वेदात सांगितले . धर्मरूपी गाय चारही चरणावर उभी होती म्हणजेच १ % हि अधर्म नव्हता . स्वप्नातसुद्धा लोक पापाचा विचार करीत नव्हते . हे एक दोन दिवस नाही तब्बल ११ हजार वर्षे .
दशवर्षसहस्त्राणि दशवर्षशतानी च |
रामो राज्यमुपासित्वा ब्र्हमलोक प्रायाच्छती || रामायण
रामासारखा देव नाही - भगवान रामाचे चरित्र आदरणीय , आचरणीय व वंदनीय आहे .
रामासारखा राजा नाही - राजा रामाचे विशेषवत्व असे कि हे लोकाभिराम होते रामरक्षेत हा शब्द तीन वेळा आला आहे . आपण पाहू शकता राम रक्षा नक्कीच
जौ अनिती कुछु भाषौ भाई |
तै मोहि बरजहु भय बिसराई || तुलसीदासजी
रामासारखा पुत्र नाही - पित्याने सावत्र आईस पूर्वी कधी दिलेल्या दोन वराकरिता चौदा वर्षे वनवास , तोही आनंदाने स्वीकारला .
रघुकुल रिती सदा चली आई | प्राण जाई प्र बचन न जाई || तुलसीदास जी
रामसारखा पती नाही - जनकपुरीत सीतेची प्रथम भेट झाली . तेव्हा रामाने सीतेस हि भेट दिली , तेव्हा आजपासून फक्त तुला सोडून मला सर्व स्त्रिया मातेसमान .
अस भरपूर काही आमच्या श्री राम प्रभू साठी साग्ण्याकरिता ...
आपणास व आपल्या संप[उरण परिवारास वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
शुभेच्छुक :- अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर संस्कृती .
Subscribe to:
Posts (Atom)