Thursday, 3 July 2014

रयत शिक्षण संस्थेचे मॅाडर्न स्कूल , वाशी यांद्वारे आषाढी एकादशी वारी निम्मित आयोजित व्यख्यान माला " संत साहित्य आणि विज्ञान "

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

नवी मुंबई येथील रयत शिक्षण संस्थेचे मॅाडर्न स्कूल , वाशी यांद्वारे आषाढी एकादशी वारी निम्मित आयोजित व्यख्यान माला

" संत साहित्य आणि विज्ञान "

सहभाग :
१ ) अक्षय भोसले - प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू संस्कृती !
२ ) नीलम चव्हाण - BE in Electronics & Telecommunication Engineering

शालेय मुलांवर जसे आता संस्कार होतील तेच संस्कार शिकवण ते आयुष्यभर जोपासतात या करिता प्राचार्य श्री विनयकुमार हानशी यांनी हा अभिनव उपक्रम विद्यार्थी वर्गापुढे ठेवला आहे .
आपणा सर्वांस हि सस्नेह निमंत्रण ..!
 —

Thursday, 26 June 2014

अधिवक्ता . जयवंतजी महाराज बोधले बार्शी भूषण पुरस्काराने सन्मानित !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


आमचे परमस्नेही आदरणीय अधिवक्ता . जयवंतजी महाराज बोधले यांना नुकताच बार्शी येथे झालेल्या लायन्स क्लब च्या वतीने बार्शी येथे तब्बल ११ वर्षे वारकरी संप्रदायाची सेवा तथा प्रचार प्रसार आणि जन मार्गदर्शन समाज प्रबोधन या कार्यत विशेष कार्य केल्या बद्दल बार्शी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
आपण केलेल्या कार्याची हि पोहच पावती आहे असे आम्ही सारे वारकरी समझतो आपण आम्हा सर्व युवा वर्गास नेहमीच आदर्श स्थानी आहात . आपणास प्रणाम तथा खूप खूप शुभेच्छा ! 
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ 
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य

Tuesday, 24 June 2014

योगेश्वर संत निवृत्तीनाथ महाराज समाधी - ज्येष्ठ वद्य १२ तृतीय प्रहर शके १२१९

योगेश्वर संत निवृत्तीनाथ महाराज समाधी - ज्येष्ठ वद्य १२ तृतीय प्रहर शके १२१९ 




गेल्या त्या विभूती अनादी अवतार :.
भगवंताने स्वत : श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीची शिळा लावली . माता रखुमाईस गहिवर येऊन त्या रडू लागल्या , संत म्हणत यांना हि ओसंडून आले , देव गंधर्व हि भारी चिंता करू लागले . नामदेवांच्या पुत्रांनी तर लहानच असल्यामुळे दीर्घ कंठाने टाहो फोडून , उभ्याने शरीर जमिनीवर टाकले , विसोबा खेचर फार कष्टी झाले . सूर्यासारखा निवृत्तीनाथ जुं सर्व जगात अंधार झाला . योगेश्वर समाधिस्त झाले .
गेल्या त्या विभूती अनादी अवतार | आता देवा फार आठवते ||
नामा म्हणे हरी धरवेना धीर | येती गहिंवर ओसांडोनी ||
परिसाभागवत करितसे शोक | म्हणती देवा दुख: फार झाले ||
द्वादशी समाधी दिधली निवृत्तिसी | झाले उदासी अवघे जन ||
( नामदेव महाराज गाथा .१२१० - ११ )
नंतर देव म्हणाले " आता पूजा करा समाधीस पुष्पे वाहून सर्वांनी प्रदक्षिणा करा " त्या प्रमाणे सर्वांनी प्रदक्षिणा केली व पुशकारीनला आच्म्नास गेले . दशमी ते अमवस्यापर्यंत एकंदर पाच दिवस त्र्यंबकेश्वरी राहून आमवस्येला काला केला व प्रतिपदेला पंढरपूरला निघाले .
पाच दिवस उत्सव केला निवृत्तिसी | काला अमावस्येशी त्र्यंबकेश्वरी ||

व काला झाला .
प्रतिपदेसी हरी निघाले बाहेरी | कीर्तन गजरी पुढे होत ||
काही ऋषी , मुनी तेथेच ब्रह्मगिरीवर राहिले , काही अलंकापुराला म्हणजे आळंदीस आले , तर काही ऋषी संत मंडळी पंढरपूरला आषाढी यात्रेस निघाली , जस कि पहा आज योगेश्वर निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा आई नंतर लगेचच आषाढी वारी .!

शत शत नमन तथा दंडवत मायबापा निवृत्तीनाथा !
visit :- www.facebook.com/vaishnavdarshn

आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !

Monday, 23 June 2014

" वैष्णव दर्शन " - वारकरी , वैष्णव , भागवत संप्रदायाच एकमेव मुखपत्र

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

आपल्या सेवेत
" वैष्णव दर्शन " - वारकरी , वैष्णव , भागवत संप्रदायाच एकमेव मुखपत्र 
आपण  व आपल्या मुलांच्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्याकरिता हवेत सद्विचार  संत विचार आणि तेच आम्ही आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत आहोत या मासिक स्वरूपातून
आजच या पेज ला भेट द्या व सभासद व्हा .
आम्ही तरुणांनी अंगिकारलेल्या सेवाव्रतास आपल्या आशीर्वादाची व सहकार्याची नितांत गरज आहे  

लिंक :- https://www.facebook.com/vaishnavdarshn

सोबत आपल्या मित्रांना हि यात सहभागी करा व किमान १०  मित्र मैत्रीणीना  पेज पाहण्यास  निमंत्रित करा  .
एकमेका साहय्य करू | अवघा धरु  सुपंथ ||
- अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ / ९८९२७४७८९३
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र .

Tuesday, 3 June 2014

सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यामार्फत अनेक अनुदान तथा शिष्यवृत्ती - अक्षय भोसले .

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
प्रथमच आपल्या सर्व युवा वारकरी बंधू भगिनी आणि इतर सर्वच जे भारतीय शास्त्रीय संगीत शिकत आहेत त्यांच्या करिता   खुश खबर ...

सांस्कृतिक कार्य संचालनालय  यांच्यामार्फत अनेक अनुदान तथा शिष्यवृत्ती असतात मात्र त्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहचत नाही ती  आपला सर्वांपर्यंत पोहचावी म्हणून आमचा हा एक छोटा प्रयत्न :-
सांस्कृतिक कार्य संचालनालय भारतरत्न पंडित . भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती योजना
आपण नक्कीच याचा  पाठपुरावा करावा .
लिंक :- https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Citizen%20Charter/Marathi/Cultural%20Affairs.pdf

तुमचा ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !